हेरले / प्रतिनिधी
वैज्ञानिक प्रवृत्ती आणि चिकित्सक बुद्धीच्या विकासाने माणूस संवेदनशिल आणि विवेकी बनतो. आजच्या धर्माध आणि विद्वेषी वातावरणात विवेकी विचार घडविणाऱ्या कार्यशाळेला विशेष महत्व आहे. असे
अंजली चिपलकट्टी यांनी प्रतिपादन केले.
सेंटर फॉर रेनेसाँ , हेरले या रिसर्च अँड डेव्हलपमेंट इन्स्टिटयूटच्या वतीने कॉलेज युवकांसाठी एक दिवसाची कार्यशाळा रविवार रोजी आयोजित करण्यात आली होती. माणूस असा का वागतो? या पुस्तकाच्या लेखिका अंजली चिपलकट्टी (पुणे) यांनी तज्ञ म्हणून या कार्यशाळेत त्यांनी मांडणी केली.
कोल्हापूर, सांगली, आणि सातारा जिल्ह्यातील कायदा , मेडिसिन , एआय , कॉम्पुटर सायन्स , मेकॅनिकल इंजिनियर , नॅनो सायन्स , स्ट्रक्चरल इंजिनिअर अशा विविध शाखेतून ६० हुन अधिक विध्यार्थ्यानी या कार्यशाळेत भाग घेतला . या कार्यशाळेत वैज्ञानिक वृत्ती आणि चिकित्सक विचारक्षमता म्हणजे काय ? मानवी विकास प्रक्रियेमध्ये मेंदूचा विकास कसा घडला ?परिणामी आज आपल्या विकसित मेंदूच्या क्षमता काय आहेत ? त्यांचा विकास कसा होतो ? केला जाऊ शकतो ? या विषयावर पहिल्या सत्रात मांडणी आणि चर्चा झाली .
दुसऱ्या सत्रात माणसामध्ये निसर्गतः चिकित्सक प्रवृत्ती आणि विचार करण्याची क्षमता आहे . त्यामुळे माणूस भौतिक गरजांच्या पलीकडे भावनिक आणि आध्यात्मिक अंगानी सुद्धा विचार करतो. त्यामुळे खासकरून धर्मविचाराचा विकास कसा झाला ? आज संघटित धर्म कसा घडला ? त्याचे राजकीय सांस्कृतिक आणि मानवी संबंधावर काय परिणाम होतात ? या विषयावर सखोल मांडणी झाली . विविध उदाहरणे , कोडी आणि विचार प्रवृत्त करणारे प्रश्न देवून विद्यार्थ्यांना अंजली चिपलकट्टी यांनी बोलते केले त्यामुळे अत्यंत सघन चर्चा घडली. माणसाचा विचार बंधिस्त झाला कि त्याचा व्यवहार संकुचित होतो . अशा माणसांना प्रोपगंडा आणि वास्तव यात फरक समजत नाही ही माणसे धार्मिक कट्टरता आणि भडक अतिरेकी अहंकारी विचारधारेला सहज बळी पडतात .
या कार्यशाळेचे यशस्वी आयोजन बशीर पठाण , मुन्ना पठाण, मुसा शेख, रेहाना मुरसल, रासिका मुल्ला , गौस खतीब, डॉ. सुरज चौगुले , डॉ.झाकीरहुसेन संदे , मोहम्मद सैफ मुल्ला आदीने केले.
फोटो
हेरले: सायन्टिफिक टेंपरामेंट आणि क्रिटिकल थिंकिंग विषयावर कार्यशाळेत बोलतांना अंजली चिपलकट्टी
No comments:
Post a Comment