हेरले /प्रतिनिधी
गणितायण लॅब निर्मितीसाठी गेली सोळा वर्ष देशातील विविध ठिकाणी जाऊन गणिताची विविध मापे वजने यांचा संग्रह करणारे डॉ . दीपक शेटे हे गणितातील फुलेच वेचत आहेत असे गौरव उद्गार जिल्हा परिषद कोल्हापूरचे माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी काढले .
डॉ .दीपक शेटे नागाव (ता. हातकणंगले )यांनी सुमारे ४५ लाख रुपयांची स्वखर्चाने तयार केलेली गणितायन डीएम लॅब पाहण्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे सर्व उपशिक्षणाधिकारी व सर्व विस्तार अधिकारी आले होते.त्या प्रसंगी ते बोलत होते.
गणित हा विषय काही जणांना काटेरी वाटत असला तरी फणसाप्रमाणे आतला गणितीय गर गोडच आहे . गणिताची हीच गोडी चाखावी या उद्देशाने आज महाराष्ट्राची ओळख बनत असलेली डॉ .दीपक शेटे नागाव तालुका हातकणंगले यांनी सुमारे ४५ लाख रुपयांची स्वखर्चाने तयार केलेली गणितायन डीएम लॅब पाहण्यासाठी जिल्हा परिषद माध्यमिक शिक्षण विभागाचे सर्व उपशिक्षणाधिकारी व सर्व विस्तार अधिकारी आले होते.गणितायन लॅबमधील विविध राज्याची मापे,वेगवेगळी वजने,विविध आकाराची तराजू, गुंजू ते तोळा याचा प्रवास, कवडी पासून ते नाणी , विविध दुर्बीण,विविध पेन,वाळूचे घड्याळ ते डिजिटल घड्याळ,विविध मापनाच्या पट्ट्या,विविध देशातील पेन्सिल,गुंटूर साखळी ते मीटर टेप,जुनी गणित व विज्ञान पुस्तके, साडेसहा हजार पोस्ट तिकिटांचा संग्रह, विविध गणितीय तक्ते,नोटांमधील अंकांच्या गमती.
डॉ. दीपक शेटे यांचा सोळा वर्षाचा गणितीय प्रवास ऐकताना व पाहताना सर्वजण आश्चर्यपणे पहात व माहिती घेत होते.जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना याचा कसा लाभ देता येईल याविषयी चर्चा झाली .
या सर्वांची माहिती देत असताना मान्यवरांनी
जिज्ञाशा पोटी विचारत विविध प्रश्नांची चर्चा घडवून येत होती .या सर्व नाविण्याच्या विविध गोष्टी पहात तब्बल अडीच तास वेळ दिला .
यावेळी जिल्हा परिषद कोल्हापूर माध्यमिक विभाग येथील उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे , विस्तार अधिकारी जयश्री जाधव , विस्ताराधिकारी डी.सी. कुंभार , विस्तार अधिकारी धनाजी पाटील ,विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे या मान्यवरांनी गणितायन लॅबला भेट दिली.
फोटो
उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे डॉ. दीपक शेटे यांचा सत्कार करतांना त्यांच्या समवेत उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे , विस्तार अधिकारी जयश्री जाधव , विस्ताराधिकारी डी.सी. कुंभार , विस्तार अधिकारी धनाजी पाटील ,विस्तार अधिकारी रत्नप्रभा दबडे आदी मान्य वर.
No comments:
Post a Comment