मौजे वडगाव ग्रामपंचायतीच्या वतीने विविध साहित्य वाटप
मौजे वडगाव (ता हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने चर्मकार समाज व मातंग समाजाकरिता ग्रामपंचायतीच्या १५% निधीतून विविध समाज उपयोगी साहित्याचे वाटप सरपंच कस्तुरी पाटील, उपसरपंच रघूनाथ गोरड , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे - पाटील यांच्या हस्ते करण्यात आले .
मौजे वडगाव ग्रामपंचायतीच्या सन २०२४ -२५ सालातील १५% निधीतून चर्मकार समाजासाठी गॅस शेगड्या व भांडी सेट तसेच मातंग समाजासाठी मोठे पातेले व भांडीसेट आशा विविध समाजउपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले . यावेळी दोन्ही समाजातील मान्यवरांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे आभार मानून समाधान व्यक्त केले .
यावेळी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच रघूनाथ गोरड ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे- पाटील मॅडम, ग्रा. पं . सदस्य सुरेश कांबरे , सुनिल खारेपाटणे , स्वप्नील चौगुले, मिनाक्षी आकिवाटे, अविनाश पाटील , अमोल झांबरे, प्रकाश कांबरे , महेश कांबरे, संदिप कांबरे, सतिश कांबरे, संतोष लोंढे , कुंदन बनसोडे, यांच्यासह समाज बांधव उपस्थित होते.
चर्मकार समाज व मातंग समाजासाठी समाजउपयोगी साहित्याचे वाटप करतांना मौजे वडगाव ग्रामपंचयातचेसरपंच उपसरपंच व अन्य पदाधिकारी
No comments:
Post a Comment