हेरले /प्रतिनिधी
विद्या मंदिर मौजे वडगाव ता. हातकणंगले येथे वार्षिक तपासणीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकारी कोल्हापूर मीना शेंडकर यांनी भेट दिली. त्यांनी शालेय वातावरण, परिसर विविध शालेय उपक्रम यांचा आढावा घेतला. शाळेतील सर्व बाबींचे सूक्ष्म निरीक्षण करून शाळेचे शाळेच्या गुणवत्तेचे कौतुक केले. शाळेतील हलगी वादन, लेझीम पथक, मानवी मनोरे यांचे विशेष कौतुक केले. त्यांना आलेले शिक्षण क्षेत्रातील अनुभव सुद्धा व्यक्त केले व शाळेच्या कामकाजाबद्दल समाधान व्यक्त केले .
शालेय वार्षिक तपासणी समितीमध्ये जिल्हा शिक्षण विस्तार अधिकारी ठोकळ, एन. जे .पाटील , मुख्याध्यापक जी. एस .पाटील , आर. बी. पाटील, नौशाद शेडबाळे,जी. एम. लोंढे यांचा समावेश होता. त्यांनी प्रत्येक वर्गाचे निरीक्षण करून आढावा घेतला.
शाळेचे मुख्याध्यापक बाळासो कोठावळे यांनी उपस्थितांचे स्वागत व प्रास्ताविक केले. शाळेतील विविध उपक्रमांची माहिती व यशोगाथा यांचे सादरीकरण फिरोज मुल्ला व वैशाली कुंभार यांनी केले.
शाळेतील शिक्षकवृंद सायली चव्हाण, देवदत्त कुंभार, शबनम जमादार, रिजवाना नदाफ, सविता कांबळे, स्वाती देसाई , वैशाली कांबळे यांचे बहुमोल सहकार्य लाभले.
फोटो
विद्या मंदिर मौजे वडगाव शाळेला प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर मॅडम यांनी भेट दिली त्यांच्या समवेत शिक्षकवृंद.
No comments:
Post a Comment