कोल्हापूर/प्रतिनिधी
गोकुळ दूध संघ ताराबाई पार्क विभागाकडील कंत्राटी कर्मचारी सौ.सुनीता संताजी मोरे यांचे पती जर्जर आजारांवर उपचार घेत आहेत.तो खर्च मोठा असल्याने तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मदतीचा हात देण्यासाठी ताराबाई पार्क येथील आस्थापना विभाग प्रमुख अशोक पुणेकर यांनी पुढाकार घेतला.त्यांच्या हाकेला साथ देत बघता बघता सुमारे पंचवीस हजार रुपये जमा झाले.
ती रोख स्वरूपातील आर्थिक मदत पशुसंवर्धन विभागाचे व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, आस्थापना विभागाचे प्रमुख अशोक पुणेकर, युनियन प्रतिनिधी निवास पाटील यांच्या हस्ते देणेत आली.
याप्रसंगी सहा.संकलन अधिकारी सुरेश पाटील, स्टोअर प्रमुख सुरेश पाटील, अशोक पाटील, विनोद पाटील, पंडीत पाटील, मिलिंद जोशी, सुनिता कांबळे, सुनिल पाटील, रंगराव कोळेकर, चंद्रकांत बडेकर आदीसह ताराबाई पार्क कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
फोटो..
ताराबाई पार्क कोल्हापूर येथे कंञाटी कर्मचारी सौ.सुनीता मोरे यांना आर्थिक मदत देताना डॉ.प्रकाश साळुंखे, अशोक पुणेकर, निवास पाटील, सुनिता कांबळे आदी.
No comments:
Post a Comment