Thursday, 16 January 2025

कोहिनूर मेटॅलिक्स प्रा.लि. व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेन्ट्रलच्या वतीने विद्या मंदिर शाळेला पायाभूत सुविधा

कोल्हापूर / प्रतिनिधी

शिरोली औद्योगिक वसाहतीतील कोहिनूर मेटॅलिक्स प्रा.लि. व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेन्ट्रलच्या वतीने श्रीरामनगर  येथील विद्या मंदिर शाळा क्रमांक ३ ला पायाभूत सुविधा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी वाचनातून बुद्धीचा विकास होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी वाचन करावे असे मत  व्यक्त केले. सरपंच शितल कदम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.तर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेन्ट्रलचे अध्यक्ष संजय भगत, प्राचार्य डॉ.महादेव नरके प्रमुख उपस्थित होते. 
श्रीमती शेंडेकर पुढे म्हणाल्या, प्राथमिक शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी रोटरी सारख्या सामजिक संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच मुलींसाठी स्वच्छतागृहे अत्यावश्यक आहेत. त्यामूळे समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी अशा प्रकारचे काम करुन शासकीय शिक्षण व्यवस्था बळकट करावी असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे, रोटरीचे अध्यक्ष संजय भगत, प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापिका खामकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी कोहिनूर मेटॅलिकच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्वच्छ्ता गृहाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध पुस्तके भेट देण्यात आली.
उपसरपंच विलास गुरव, ग्रामपंचायत सदस्य आनंदा कांबळे, सौ. छाया बुवा, रोटरियन संदिप साळुंखे, अविनाश चिकनिस, राहुल माने, राजेश अडके, बदाम पाटील, ओंकार भगत, उमेश मालेकर आदी उपस्थित होते.
............................
फोटो.. 
राम नगर एमआयडीसी येथील विद्या मंदिर शाळा क्रमांक ३ ला पायाभूत सुविधा उद्घाटन प्रसंगी प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर, शेजरी शितल कदम, भरत रसाळे, संजय भगत, महादेव नरके, अविनाश चिकनिस आदी.

No comments:

Post a Comment