कोल्हापूर /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदान प्राप्त (2005 पुर्वी) शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेच्या वतीने बजेट अधिवेशना दरम्यान दोन टप्प्यात आंदोलन करण्यात येणार आहे. ६ मार्च ते १६ मार्च कालावधीमध्ये उपासमार पूर्व वस्तुस्थिती कथन आंदोलन. सदर आंदोलनाची दखल न घेतल्यास १७ मार्च ते २१ मार्च या कालावधीत अन्नत्याग साखळी उपोषण, निदर्शने, आझाद मैदान मुंबई उपरोक्त मागण्या करिता निदर्शने, धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांनी दिली आहे.
मयत बांधवांच्या वारसदारांना तसेच सेवानिवृत्त शिक्षकांना तात्काळ जुनी पेन्शन योजनेचे लाभ देण्यात यावेत. २१नोव्हेंबर २००५ पूर्वी अंशतः / टप्पा अनुदान प्राप्त शिक्षकांना १९८२ ची जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्यात यावी.उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने आदेशित केल्याप्रमाणे शंभर टक्के अनुदानित शाळेत १नोव्हेंबर २००५ पूर्वी नियुक्ती
विनाअनुदनित तुकडीवरील शिक्षकांना जुनीच पेन्शन योजना लागू करावी. २००५ पूर्वी नियुक्त सर्वच विनाअनुदनित शिक्षकांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी. विनाअनुदनित शिक्षकांना सेवा उपदानसुद्धा नियुक्ती दिनांक ग्राह्य धरून सेवाउपदान सातव्या सातव्या वेतन आयोगाप्रम सर्व शिक्षकांना देण्यात यावे.कृपया वरील मागण्याचा सहानुभूतीपूर्वक विचार करून आंदोलनापूर्वीच मागण्याबाबत सकारात्मक तोडगा काढून आझाद मैदानावर होणारा आक्रोश उपासमार मेळावा थांबवावा ही नम्र विनंती. असे आवाहन अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment