Saturday, 31 May 2025

सुजाता कचरे व वहीदा खतीब अहिल्यादेवी पुरस्काराने सन्मानित




हेरले /प्रतिनिधी
महिला व बालविकास क्षेत्रामध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल हेरले (ता. हातकणंगले) येथील सुजाता कचरे व वहीदा खतीब या दोन महिलांना ग्रामपंचायतीच्या वतीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आसल्याची माहिती निवड समितीचे अध्यक्ष तथा लोकनियुक्त सरपंच राहुल शेटे यांनी दिली .
        महिला व बालविकास विभाग महाराष्ट्र शासन यांच्या आदेशाने व ग्रामपंचायत हेरले यांच्या वतीने ग्रामपंचायतीच्या क्षेत्रामध्ये महिला सक्षमीकरण, महिला स्वयंसहाय्यता महिला बचतगट, आरोग्य , साक्षरता ,आरोग्य स्वयंमसेविका(आशा) यासारख्या कार्यामध्ये उल्लेखनीय कार्य करून महिलांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. या कामाची दखल घेऊन त्यांना सरपंच राहुल शेटे व उपसरपंच निलोफर खतीब, सदस्य उर्मिला कुरणे यांच्या हस्ते सन्मानपत्र , शाल, श्रीफळ , सन्मानचिन्ह , देऊन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले . 
       यावेळी सरपंच राहुल शेटे ,उपसरपंच निलोफर खतीब ,ग्रामपंचायत अधिकारी बी एस.कांबळे,ग्रामपंचायत सदस्य विजय भोसले,मनोज पाटील,अमित पाटील, मानसिंग माने,उर्मिला कुरणे, जयश्री कुरणे आदी उपस्थित होते.

Thursday, 29 May 2025

गणितायन’च्या प्रयोगशीलतेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची दाद


शिक्षक डॉ. दीपक शेटे यांच्या उपक्रमास मनःपूर्वक शुभेच्छा

हेरले /प्रतिनिधी
“शिक्षण म्हणजे केवळ माहितीचा प्रसार नव्हे, तर अनुभवातून प्रेरणा देणं,” हे तत्त्व प्रत्यक्षात उतरवत कोल्हापूरातील एका शिक्षकाने अनोखा शिक्षण प्रयोग उभारला असून, त्याची राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दखल घेतली आहे. ‘गणितायन’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या उपक्रमाचे कौतुक करत अजित पवार यांनी डॉ. दीपक शेटे यांना मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
डॉ. शेटे यांनी हातकणंगले तालुक्यातील नागाव येथे स्वतःच्या घरी एक आगळी वेगळी गणित प्रयोगशाळा विकसित केली आहे. मागील १५ वर्षांत सुमारे ५० लाख रुपयांची स्वखर्चाने गुंतवणूक करत त्यांनी ‘गणितायन’ हे अनुभवाधिष्ठित गणित शिक्षण केंद्र उभारले आहे. यामध्ये मापन साहित्य, जुनी नाणी, मोजमाप उपकरणे, दुर्मीळ पोस्ट तिकीटे, नोटा, भिंतीवर लावले जाणारे पट्टे, प्राचीन घड्याळे आदी १०,००० हून अधिक वस्तूंचा समावेश आहे.
विद्यार्थ्यांना गणिताचा इतिहास, तत्त्वज्ञान आणि संकल्पना समजावून सांगणाऱ्या या केंद्राची माहिती मिळताच उपमुख्यमंत्र्यांनी याची दखल घेतली. 
"शिक्षणात नावीन्य, समर्पण आणि प्रयोगशीलतेचा संगम म्हणजे शेटे सरांचा उपक्रम. महाराष्ट्रात असे शिक्षक आहेत हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे," असे अजित पवार यांनी सांगितले.
तसेच, शिक्षण विभागाने अशा उपक्रमांना प्रोत्साहन द्यावे, यासाठी त्यांनी निर्देश दिले असून ‘गणितायन’ची राज्यस्तरावर नोंद घेण्याचेही सूचित केले आहे.
हे शिक्षण केंद्र विद्यार्थ्यांना खुले असून आजवर हजारो विद्यार्थी, शिक्षक, शास्त्रज्ञ, आमदार व कुलगुरूंनी येथे भेट दिली आहे. प्रयोगशील शिक्षणाचा हा प्रयोग केवळ स्थानिक नव्हे, तर राज्याच्या शैक्षणिक चळवळीचा एक महत्त्वाचा भाग ठरत आहे.

Tuesday, 27 May 2025

संदीप पुजारी यांची जिल्हा कोतवाल कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड

पुलाची शिरोली/ वार्ताहर
 येथील गाव कामगार तलाठी कार्यालयातील कोतवाल संदीप धोंडीराम पुजारी यांची कोल्हापूर जिल्हा कोतवाल कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या संचालक पदी निवड झाली आहे.
 संदीप पुजारी गेली अनेक वर्षापासून कोतवाल म्हणून काम पाहत आहेत. शासनाच्या विविध योजना, महसुली विभागाचे कामकाज, महामार्ग आंदोलन, पूर परिस्थिती,कोरोना संकट, नैसर्गिक आपत्ती यासारख्या अनेक सामाजिक व शासकीय कामांमध्ये पुजारी यांचे उल्लेखनीय काम आहे. या त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना जिल्ह्याच्या संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
या निवडीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

Monday, 19 May 2025

या शैक्षणिक वर्षापासून मुलांना इयत्ता अकरावी प्रवेश ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेद्वारेच मिळणार‘ - मुलांनी ऑफलाईन प्रवेश घेऊ नये.


कोल्हापूर /प्रतिनिधी
                 दिनांक 6 मे 2025 च्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या शासन निर्णयानुसार शैक्षणिक वर्ष 2025- 26 पासून राज्यातील सर्व क्षेत्राकरिता अल्पसंख्यांक दर्जासह उच्च माध्यमिक शाळा, स्वतंत्र कनिष्ठ महाविद्यालय व वरिष्ठ महाविद्यालय संलग्नित कनिष्ठ महाविद्यालय याच्या मध्ये  सर्व शाखा मधील इयत्ता अकरावीचे प्रवेश केंद्रीय पद्धतीने ऑनलाईन करण्यात येणार आहे.         
       विद्यार्थ्यांचे ऑनलाईन प्रवेश निश्चित करताना पालकांनी शासन निर्णय प्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क भरणे बंधनकारक राहील तसेच प्रवेश निश्चित केले नंतर विषयांमध्ये बदल केल्यास सदर विषयासाठी शासन नियमाप्रमाणे खाजगी व्यवस्थापनाने निर्धारित केलेले शुल्क अदा करावे लागेल.              
     शासनमान्य प्रवेश क्षमतेपेक्षा अधिक प्रवेश कोणत्याही कनिष्ठ महाविद्यालयास करता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व पालकांनी प्रत्येक प्रवेश फेरीदरम्यान शासन मान्यता प्रवेश क्षमतेनुसार शिल्लक प्रवेश क्षमता तपासून घ्यावी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये.
        ऑफलाइन पद्धतीने प्रवेश घेऊन विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही.
     *CBSE व ICSE या बोर्डाच्या उच्च माध्यमिक विद्यालया मध्ये ऑन लाईन प्रवेश होणार नसून फक्त राज्य मंडळाशी संलग्न असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातच प्रवेश केले जाणार आहेत*
    सर्व पालकांना विनंती करण्यात येते की, ऑफलाईन प्रवेश निश्चित करू नका.  ऑनलाईन प्रक्रियेद्वारे प्रवेश होणार असल्याने ऑनलाईन प्रवेशासाठी कागदपत्रे तयार ठेवून वेळापत्रकाप्रमाणे ऑनलाईन माहिती भरावी व इयत्ता ११ वी प्रवेश घ्यावा. असे आवाहन शिक्षणाधिकारी डॉ एकनाथ आंबोकर यांनी केले आहे.

Saturday, 17 May 2025

राजेंद्र विद्यामंदिरचा शंभर टक्के निकाल


    हेरले / प्रतिनिधी
राजेंद्र एज्युकेशन ट्रस्टचे राजेंद्र विद्यामंदिर इंग्लिश मीडियम स्कूल हालोंडीच्या दहावीचा निकाल सलग २३ वर्षे शंभर टक्के लागला आहे.
      गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी 
प्रथम अनुष्का सुनील पाटील ९५.६० टक्के व अभिनव अभिजित पाटील ९५.६० टक्के, द्वितीय वैष्णवी अशोक पाटील ९३ टक्के , तृतीय समीक्षा राजगोंडा पाटील ९१.४० टक्के, चतुर्थ सानिका अजय पाटील ९१ टक्के, तर पाचवा भक्ती दीपक ऐतवडे ८९.६० टक्के गुण मिळवून शाळेत क्रमवारीत अव्वल आले. ५ विद्यार्थी ९० टक्क्यांपेक्षा जास्त, २१ विद्यार्थी ८० टक्के, तर १२ विद्यार्थी ७० टक्के व १२ विद्यार्थी ६० टक्क्यांपेक्षा जास्त गुण घेऊन यशाचे शिखर गाठले.

Thursday, 15 May 2025

वडगाव विद्यालय आणि ज्युनिअर कॉलेजचे दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश

पेठवडगाव /प्रतिनिधी
  शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित,
 वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावने
दहावी परीक्षेत दैदिप्यमान यश संपादन केले. विद्यालयाचा एकूण  निकाल  ९७.८० टक्के लागला.सेमी १०० टक्के,सेमी संस्कृत १०० टक्के व टेक्निकलचा १०० टक्के लागला आहे. 
 गुणानुक्रमे यशस्वी विद्यार्थी -                                           प्रथम क्रंमाक- कु. कोळी समीक्षा दीपक        (96.20% ),द्वितीय क्रमांक कु. पाटील अदिती विकास
( 94.60% ),तृतीय क्रमांक  कु. पाटील अनुजा संजय   
 ( 91.60% ),  टेक्निकल शाखा प्रथम क्रमांक
 कु. सुनिता रामू गुंडरे (75% ), मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक कु.वरद सचिन डोईफोडे   (90.20% )आदीनी यश संपादन केले.
90% पेक्षा जास्त 9 विद्यार्थी,80 ते 90 % दरम्यान 26 विद्यार्थी ,70 ते 80% दरम्यान 45 विद्यार्थी यांनी यश मिळविले आहे.
   या यशवस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई , चेअरमन डॉ. सौ. मंजिरी मोरे- देसाई , प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे ,कौन्सिल सदस्य  बाळ डेळेकर , कौन्सिल सदस्य ए. ए.पन्हाळकर वरिष्ठ लिपिक  के. बी. वाघमोडे  यांचे प्रोत्साहन तर मुख्याध्यापिका सौ. आर. आर. पाटील , उपमुख्याध्यापक एस. एच. निर्मळे , पर्यवेक्षिका यु.सी. पाखरे, टेक्निकल विभाग प्रमुख ए. एस.आंबी व सर्व शिक्षक यांचे मार्गदर्शन लाभले.

Tuesday, 13 May 2025

कोकण व कोल्हापूर दहावी परीक्षेतही अव्वल


कोल्हापूर /प्रतिनिधी

फेब्रुवारी मार्च 2025 मध्ये झालेल्या माध्यमिक शालांत परीक्षा (एसएससी) मध्ये कोकण विभागाने, विभागीय मंडळ स्थापनेपासून म्हणजे सन २०१२ पासून प्रथम क्रमांक कायम ठेवला आहे. चालू वर्षी कोकण विभागीय मंडळाचा निकाल 98.82% इतका आहे. मागील वर्षी 99.01% निकाल होता. निकालात 0.19 इतकी किंचितशी घट झाली आहे. तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्याने 99.32% निकालासह राज्यात प्रथम येण्याचा बहुमान मिळवला आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळाने 96.87% निकालासह राज्यात द्वितीय स्थान प्राप्त केले आहे. मागील दहा वर्षांचा विचार करता (सन 2021 चा अपवाद वगळता) कोल्हापूर विभाग द्वितीय क्रमांकावर आहे. मागील वर्षी कोल्हापूर विभागीय मंडळाचा निकाल 97.45% इतका होता. निकालात 0.58% इतकी किंचितशी घट झाली आहे.

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळात कॉपीमुक्त अभियान प्रभावीपणे राबवण्यात आले. बारावी प्रमाणे दहावी मध्ये दोन्ही मंडळांनी अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक प्राप्त केला आहे.
राज्यात निकालात व कॉपीमुक्त अभियानात कोकण व कोल्हापूर विभाग अव्वल आहे. कोल्हापूर विभागात कॉपीमुक्त अभियान जोरकसपणे राबविण्यात आले. कोल्हापूर विभागात तर डिसेंबर 2024 पासूनच मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली.

"राज्यस्तरावरून वेळोवेळी मिळालेले मार्गदर्शन व प्रेरणा, विभागीय मंडळ स्तरावरील सर्वांचे परिश्रम, जिल्हास्तरीय सर्व यंत्रणांचे सहकार्य, शाळा, महाविद्यालयाकडून मिळालेला उत्तम प्रतिसाद यामुळे कोकण व कोल्हापूर मंडळ अव्वल स्थानी आहे.
-राजेश क्षीरसागर,
 विभागीय अध्यक्ष, 
कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळ.

Monday, 12 May 2025

दहावी बोर्ड परीक्षेचा निकाल 13 मे रोजी

कोल्हापूर /प्रतिनिधी

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे  माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा फेब्रुवारी-मार्च २०२५ निकाल अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे. अशी माहिती प्रसिध्दीस पत्रकाद्वारे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली.

  मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या विहित कार्यपध्दतीनुसार जाहीर करण्यात येत आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२५ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपध्दतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर मंगळवार दिनांक १३ मे, २०२५ रोजी दुपारी १.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येत आहे.

अधिकृत संकेतस्थळांचे पत्ते पुढीलप्रमाणे आहेत.

१. https://results.digilocker.gov.in

२. https://sscresult.mahahsscboard.in

3. http://sscresult.mkcl.org

४. https://results.targetpublications.org

4. https://results.navneet.com

6. https://www.tv9hindi.com/education/board-exams/maharashtra-board-

exams

७. https://education.indianexpress.com/boards-exam/maharashtra-ssc-10-

results

2. https://www.indiatoday.in/education-today/results

. https://www.aajtak.in/education/board-exam-results

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (३. १० वी) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेस प्रविष्ट झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण उपरोक्त संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील व सदर माहितीची प्रत्त (प्रिंट आउट) घेता येईल,

तसेच https://mahahsscboard.in (in school login) या संकेतस्थळावर शाळांना

एकत्रित निकाल व इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल.

सदर निकालाबाबतचा अन्य तपशील पुढीलप्रमाणे-

११ ऑनलाईन निकालानंतर माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस प्रविष्ट झालेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पध्दतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन https://mahahsscboard.in स्वतः किंवा शाळांमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. यासाठी आवश्यक अटी शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी बुधवार, दिनांक १४/०५/२०२५ ते बुधवार, दिनांक २८/०५/२०२५ पर्यंत अर्ज ऑनलाईन पध्दतीने करता येईल. त्यासोबतच ऑनलाईन पध्दतीने शुल्क Debit Card/Credit Card/UPI/ Net Banking याद्वारे भरता येईल.

२) फेब्रुवारी-मार्च २०२५ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरुन करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक राहील. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करावयाचे असेल त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा,

३) फेब्रुवारी-मार्च २०२५ च्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु. मार्च २०२६ व जून-जुलै २०२६) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेअंतर्गत उपलब्ध राहतील.

४) जून-जुलै २०२५ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (१० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी गुरुवार दिनांक १५/०५/२०२५ पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.

Friday, 9 May 2025

सन २०२४-२०२५ च्या सेवक संचानुसार रिक्त-अतिरिक्त शिक्षकांची समायोजन प्रक्रीया थांबवावी.जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाची मागणी


कोल्हापूर / प्रतिनिधी

सन २०२४ -२५ सेवक संच्यानुसार रिक्त अतिरिक्त शिक्षकांची समोयजन प्रक्रिया थांबवावी या मागणीचे जिल्हा मुख्याध्यापक संघ व जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ यांच्या वतीने लेखी निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर यांच्या नेतृत्वाखाली व व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड,  चेअरमन राहुल पवार ,सचिव आर. वाय. पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत दिले. प्राथमिक शिक्षणाधिकारी यांचे लेखी निवेदन अधिक्षक उदय सरनाईक यांनी स्विकारले
   लेखी निवेदनातील आशय असा की,शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ चा सेवक संच दि. १५ मार्च, २०२४ च्या शासन निर्णयानुसार झालेला आहे. सेवक संच सध्या शाळांना ऑनलाईन उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. सदर सेवक संचामध्ये प्रत्येक जिल्ह्यात १० ते १५% शाळांमध्ये शिक्षकांची शून्य (०) पदे मंजूर झालेली आहेत. तर कांही शाळांमध्ये इ. ९ वी १० वी च्या गटात शून्य (०) पदे आलेली आहेत. कांही शाळांची सेवक संच चुकीचे आलेले आहेत. प्रत्येक जिल्ह्याची माहीती घेतली असता दि. १५ मार्च, २०२४ च्या या शासन निर्णयाचा खूप मोठा फटका मराठी शाळांना बसलेला आहे.
  सदर शिक्षकांचे लगेचच समायोजन करण्यासाठी आपण संदर्भाकिंत पत्रानुसार माहिती मागविलेली आहे. या मराठी शाळा शिक्षकांअभावी बंद पडल्यातर डोंगरी भागातील, ग्रामीण भागातील शेतक-यांच्या कष्टक-यांचे मुलांचे शिक्षणच बंद होणार आहे. दि. १५ मार्च, २०२४ च्या या शासन निर्णयातील सेवक संचाच्या विद्यार्थी संख्येच्या निकषात बदल करण्या संदर्भात महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाचे पदाधिकारी नाम. शिक्षणमंत्री महोदय, मा. शिक्षण आयुक्त, मा. शिक्षण संचालक यांच्या बरोबर बैठक घेऊन विद्यार्थी संख्येचे निकष बदल करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. कांही जिल्ह्यातील संस्थाचालक व मुख्याध्यापक संघटना यांनी मा. उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे व सदर शासन निर्णयानुसार सेवक संच प्रक्रीयेला स्थिगीती मिळवलेली आहे असे समजते.
  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ महामंडळाने सदर समायोजन प्रक्रीयेला कांही कालावधीसाठी स्थिगीती द्यावी व शासन निर्णयानुसार विद्यार्थी संख्येच्या निकषात बदल करणे संदर्भात महामंडळाच्या पदाधिकारी यांच्या बरोबर सहविचार सभा घ्यावी असे पत्र मा. शिक्षण संचालक, महाराष्ट्र राज्य यांना दिलेले आहे. तेव्हा आपणही पुढील आदेशा होईपर्यंत रिक्त-अतिरिक्त पदांची मागविलेली माहिती कांही कालावधीकरिता स्थगित करावी ही विनंती कोल्हापूर जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघ कोल्हापूर करीत आहे.
 या शिष्टमंडळामध्ये बी. जी. बोराडे, भरत रसाळे, सुधाकर निर्मळे, राजेश वरक, इरफान अन्सारी ,पंडीत पवार ,शिवाजी कुरणे, संदीप पाथरे, संभाजी पुजारी, पोपट पाटील आदी उपस्थित होते.

फोटो 
लेखी निवेदन माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांना देताना शिक्षक आमदार प्रा. जयंत आसगावकर, व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड,  चेअरमन राहुल पवार ,सचिव आर वाय पाटील  शेजारी अन्य मान्यवर

Wednesday, 7 May 2025

संच मान्यता प्रक्रिया स्थगित करावी यासाठी शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ यांचे माध्यमिक शिक्षणाधिकारी यांना शुक्रवारी निवेदन



कोल्हापूर /प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या संच मान्यते बाबत पारीत केलेला शासन आदेश अन्याय कारक असून त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक शाळा बंद पडतील. हजारो शिक्षक अतिरिक्त ठरणार असून अनेक शाळांना मुख्याध्यापक मिळणार नाहीत. सदरच्या आदेशास नुकतेच मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. सदरच्या स्थगिती नुसार कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेली संच मान्यता त्वरीत स्थगित ठेवावी यासाठी कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ व जिल्हा मुख्याध्यापक संघ यांचे संयुक्त शिष्ट मंडळ शुक्रवार दि. ९ मे रोजी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांना सकाळी ११ वा. लेखी निवेदन देण्याचा निर्णय आज विद्याभवन येथे घेण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संघाचे चेअरमन राहुल पवार होते. व्यासपीठ  अध्यक्ष एस.डी. लाड यांच्या मार्गदर्शनाखाली सभा संपन्न झाली.
      या सभेस शिक्षक नेते दादासाहेब लाड, बी. जी. बोराडे, सचिव आर. वाय. पाटील, अनिल लवेकर, भरत रसाळे,प्रा.सी एम. गायकवाड, सुधाकर निर्मळे, राजेश वरक ,इरफान अन्सारी ,श्रीकांत पाटील, संजय पाटील, उदय पाटील, एम. जे. पाटील, एस. के.पाटील, पंडीत पवार, शिवाजी भोसले, एच. वाय. शिंदे, हेमंत धनवडे, बाजीराव साळवी, मदन निकम आदीसह शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
   फोटो 
शैक्षणिक व्यासपीठ व मुख्याध्यापक संघ संयुकत बैठकीत बोलतांना चेअरमन राहूल पवार शेजारी व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, बी.जी. बोराडे, दादासाहेब लाड,  आर. वाय. पाटील आदीसह अन्य मान्यवर.

बारावी रिपीटर विद्यार्थ्यांना सुवर्णसंधी ; पुरवणी परीक्षेच्या ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू



 
 कोल्हापूर/ प्रतिनिधी
  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी (इ.१२वी) फेब्रुवारी - मार्च २०२५ परीक्षेचा निकाल ५ मे रोजी ऑनलाईन जाहीर केला होता. या निकालानंतर आता जून - जुलै २०२५ मध्ये घेण्यात येणाऱ्या पुरवणी परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. 
या परीक्षेसाठी खालील प्रकारचे विद्यार्थी अर्ज करू शकतात - 
- फेब्रु-मार्च २०२५ परीक्षेत अनुत्तीर्ण झालेले विद्यार्थी
- पूर्वी परीक्षा फॉर्म भरलेले पण परीक्षेला अनुपस्थित राहिलेले खाजगी विद्यार्थी
- नवीन खाजगी उमेदवार ज्यांनी जून-जुलै २०२५ परीक्षेसाठी नावनोंदणी केली आहे
- श्रेणीसुधार योजना व तुरळक विषयांसाठी अर्ज करणारे विद्यार्थी
- औद्योगिक प्रशिक्षण संस्थेद्वारे "Transfer of Credit" घेतलेले विद्यार्थी
अर्ज भरल्यानंतर संबंधित शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयांनी कॉलेज लॉगिनद्वारे "Pre-List" डाउनलोड करून त्यातील माहिती जनरल रजिस्टरशी पडताळून घ्यावी आणि अचूक असल्याची खात्री करून विद्यार्थी व प्राचार्य यांच्या स्वाक्षऱ्या घ्याव्यात. अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी www.mahahsscboard.in या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज भरायचा असून त्याच्या तारखा खालीलप्रमाणे - 
महत्त्वाच्या सूचना - 
- अर्ज भरताना फेब्रु-मार्च २०२५ परीक्षेतील माहिती स्वयंचलितपणे उपलब्ध असेल.
- श्रेणीसुधार करणाऱ्या विद्यार्थ्यांना तीन संधी (जून-जुलै २०२५, फेब्रु-मार्च २०२६, जून-जुलै २०२६) उपलब्ध राहतील.
- शुल्क भरणे हे केवळ ICICI बँकेच्या व्हर्च्युअल अकाउंटमध्ये NEFT/RTGS च्या माध्यमातून करावे लागेल. जुन्या बँकांचे चलन वापरू नये व रोखीने भरणा स्वीकारला जाणार नाही.
- शुल्क भरल्याशिवाय प्रवेशपत्र दिले जाणार नाही.
- नियमित आणि विलंब शुल्काच्या तारखांमध्ये कोणतीही मुदतवाढ मिळणार नाही.
- अतिविलंब शुल्कासह अर्ज भरण्याच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील.

उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS/NEFT द्वारे रक्कम भरावयाची तारीख
शुकवार दि.२३/०५/२०२५ असेल
  उच्च माध्यमिक शाळा / कनिष्ठ महाविद्यालयांनी RTGS/NEFT पावती/चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व प्रिलिस्ट विभागीय मंडळाकडे जमा करावयाची तारीख
सोमवार दि.२६/०५/२०२५ असेल
  विद्यार्थ्यांनी आवेदनपत्रे भरावयाच्या तारखा
नियमित शुल्क भरावयाची तारीख बुधवार, दिनांक ०७/०५/२०२५ ते शनिवार, दिनांक १७/०५/२०२५ व
विलंब शुल्क भरावयाची तारीख रविवार, दिनांक १८/०५/२०२५ ते गुरूवार, दिनांक २२/०५/२०२५
पर्यंत असेल अशी माहिती प्रसिध्दीस कोल्हापूर मंडळ 
 विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.

वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे १२ वी परीक्षेतकला व विज्ञान शाखेत दैदिप्यमान यश



पेठवडगाव /प्रतिनिधी


 शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूर संचलित, वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेज वडगावचा १२ वी परीक्षेत विज्ञान शाखेचा निकाल ९८.९९ टक्के ,कला शाखेचा निकाल ८२.१४ टक्के इतका लागला असून ज्युनिअर कॉलेजचा एकूण निकाल ९० टक्के इतका लागल्याने ज्युनिअर कॉलेजने दैदिप्यमान यश संपादित केले आहे.
      विज्ञान शाखा यश संपादित विद्यार्थी                            प्रथम क्रंमाक कु.संस्कार रणजीत पाटील         (82.83% ),द्वितीय क्रमांक कु. अस्मी सचिन मोरे
  ( 81.33 ),तृतीय क्रमांक  कु. सानिया सुरेश अनुसे 
   ( 80% )
 कला शाखा यश संपादित विद्यार्थी
 प्रथम क्रमांक  कु. रिया गणपती बिद्रे (81.17% ),द्वितीय क्रमांक कु. आदिती अंकुश  सुतार 
(68.17% ), तृतीय क्रमांक  कु. सोनल विलास वागवे 
(  66.50% )
    या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षण प्रसारक मंडळ कोल्हापूरचे सेक्रेटरी प्रा.जयकुमार देसाई , अध्यक्षा श्रीमती शिवानीताई देसाई, उपाध्यक्ष शिवाजीराव सावंत, युवा नेते पेट्रन कौन्सिल मेंबर दौलतराव देसाई,  चेअरमन डॉ. सौ. मंजिरी मोरे- देसाई , प्रशासन अधिकारी पृथ्वीराज मोरे ,कौन्सिल सदस्य बाळ डेळेकर , कौन्सिल सदस्य ए. ए.पन्हाळकर, संस्थेचे मुख्य लिपिक  के. बी. वाघमोडे  यांचे प्रोत्साहन लाभले तर मुख्याध्यापिका  सौ. आर. आर. पाटील , उपमुख्याध्यापक  एस. एच. निर्मळे , पर्यवेक्षिका 
सौ. यु.सी. पाखरे, सर्व प्राध्यापक यांचे मार्गदर्शन लाभले. ज्युनिअर कॉलेजने बारावी परीक्षेतील निकालाची यशस्वी परंपरा कायमस्वरूपी ठेवल्याने सर्व विद्यार्थी व पालक वर्ग यांच्यातून वडगाव विद्यालय ज्युनिअर कॉलेजचे अभिनंदन होत आहे.

Tuesday, 6 May 2025

मौजे वडगांव येथे निराधारांना मंजूरी पत्राचे वाटप

हेरले (प्रतिनिधी )
 संजय गांधी निराधार अनुदान योजना हि आर्थिक दृष्ट्या कमकुवत, निराधार ,अपंग ,विधवा , व घटस्फोटित महिलांसाठी राबविली जाते . या उपक्रमामुळे अनेक कुटूंबांना आर्थिक दिलासा मिळणार असून त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होणार आहे .
     संजय गांधी निराधार योजना आणि श्रावणबाळ योजने अंतर्गत गावातील ४५ लाभार्थ्यांना मंजूरी पत्राचे वाटप सरपंच कस्तुरी पाटील व तलाठी सचिन चांदणे यांच्या हस्ते करण्यात आले . याकामी खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक,आमदार अशोकराव माने , संजयगांधी निराधार योजनेचे अध्यक्ष झाकीर भालदार यांचे मोलाचे सहकार्य लाभले .
       या कार्यक्रमास उपसरपंच स्वप्नील चौगुले, सुनिल खारेपाटणे , सुरेश कांबरे, रघूनाथ गोरड , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगेपाटील, सविता सावंत, सुनिता मोरे, सुवर्णा सुतार, दिपाली तराळ , अविनाश पाटील, तंटामुक्त अध्यक्ष मधुकर आकिवाटे , प्रकाश कांबरे, महमंद जमादार, महालिंग जंगम , यांच्यासह लाभार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते .