Tuesday, 27 May 2025

संदीप पुजारी यांची जिल्हा कोतवाल कर्मचारी पतसंस्थेच्या संचालकपदी निवड

पुलाची शिरोली/ वार्ताहर
 येथील गाव कामगार तलाठी कार्यालयातील कोतवाल संदीप धोंडीराम पुजारी यांची कोल्हापूर जिल्हा कोतवाल कर्मचारी सहकारी पत संस्थेच्या संचालक पदी निवड झाली आहे.
 संदीप पुजारी गेली अनेक वर्षापासून कोतवाल म्हणून काम पाहत आहेत. शासनाच्या विविध योजना, महसुली विभागाचे कामकाज, महामार्ग आंदोलन, पूर परिस्थिती,कोरोना संकट, नैसर्गिक आपत्ती यासारख्या अनेक सामाजिक व शासकीय कामांमध्ये पुजारी यांचे उल्लेखनीय काम आहे. या त्यांच्या कामाची पोचपावती म्हणून त्यांना जिल्ह्याच्या संस्थेवर काम करण्याची संधी मिळाली आहे.
या निवडीसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभले.

No comments:

Post a Comment