Wednesday, 9 November 2016

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची टोल नाके 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंदची घोषणा

500 आणि 1000 च्या नोटा बंद झाल्याने
टोलनाक्यांवर रोजचा व्यवहार यामुळे अडचणीत सापडला. सुट्टे पैसे नसल्यामुळे टोलनाक्यांवर मोठी कोंडी झाली. त्यामुळे आता नितीन गडकरी यांनी दोन दिवस सर्वसामान्यांना दिलासा दिलाय. 11 नोव्हेंबरपर्यंत देशभरातले टोलनाके बंद राहणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील टोलनाके बंद राहणार आहे , टोलनाक्यांवर पैसे घेतले जाणार नाहीये. वाहतुकीला अडथळा येऊ नये यासाठी हा निर्णय घेतलाय अशी माहिती गडकरींनी दिलीये. गडकरींच्या निर्णयापाठोपाठ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही टोल नाके 11 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत बंद राहणार आहे अशी घोषणा केली आहे

No comments:

Post a Comment