Wednesday, 30 November 2016

जिल्हा बँकांचे खाते व्यवहार सरकार तपासणार

५०० व १००० नोटाबंदीनंतर या नोटांची उलाढाल नक्की कशी झाली याबद्दल सरकार चौकशी करणार आहे. सहकारी बँकांमधली कर्जखाती आणि मोठ्या रकमेची खाती नक्की कुणाची आहेत, या खात्यांमधली रक्कम नक्की कुठून आली याचीही तपासणी करण्यात येणार आहे.
अनेकठिकाणी रोखपालाकडुन ५०० व १०००च्या नोटा धनदांडग्यांना मागिल तारखेवर बदलुन दिल्याचे आढळत आहे , काहीजनांना निलंबीतही करण्यात आले आहे
जर एखाद्याचं जिल्हा बँकेत खातं असेल तर त्या व्यक्तीच्या इतर बँकांच्या खात्यांचा तपशीलही तपासून घेतला जाणार आहे. वेगवेगळ्या खात्यांतून झालेला करोडोंचा व्यवहार नक्की कुणी आणि का केला याचीही माहिती तपासली जाईल. जिल्हा बँकांचे व्यवहार सरकारकडून तपासले जाणार असल्याने अनेकांचं धाबं दणाणलंय.

PayTM चा वापर म्हणजे अप्रत्यक्षपणे चीनला मदत

 नोटा बंदी नंतर संपूर्ण देशभरात कॅशलेसचे वारे वाहत असताना paytm , mobikwik सारख्या कंपन्यांनी याचा फायदा घेत e wallet च्या माध्यमातून आपले पाय घट्ट रोवले , पण एकदम ४०० टक्के वाढ होणारी paytm हि कंपनी वादात सापडली आहे कारण या कंपनीत चीनच्या अलीबाबा या मोठ्या कंपनीचा २५ टक्क्याहून अधिकच भाग आहे म्हणजेच paytm ची प्रगती हि अप्रत्यक्षपणे अलिबाबाची आणि चीनची प्रगती आणि फायदा ठरत आहे .paytm हि जरी भारतीय कंपनी असली तरी त्यात प्रथम अलिबाबाची ५७५ मिलिअन डॉलर गुंतवले आणि नंतर पार्टनर झाली आहे
bjp ला समर्थन देणारी स्वदेशी जनजागरण मंच या संघाच्या शाखेने paytm च्या व्यवहाराबद्दल शंका व्यक्त करत त्यावर आक्षेप घेतला आहे ,
paytm बद्दल अधिक माहिती https://en.wikipedia.org/wiki/Paytm या website वरून मिळवू शकता , पण एक मात्र नक्की शत्रूच्या मित्राला किंवा भागीदाराला मोठे करणे म्हणजे शत्रूला मोठे करणे , आणि हा शत्रू म्हणजे चीन आहे जो पाकिस्तानला मदत करत आहे , Paytm ला मोठे करायचे का नाही तुम्हीच ठरवा //en.wikipedia.org/wiki/Paytm

जिओ वापरताय सावधान तुम्हालाही येऊ शकते बिल

 तुम्ही जरा रिलायन्सचे जिओ सिम  वापरत असाल तर  सावधान तुम्हालाही येऊ शकते बिल , कारण बऱ्याच लोकांनी प्रीपेड व पोस्टपेड यातील फरक न जाणता फुकट मिळतंय म्हणून जिओ सिम घेतले आहे , जिओ सिमची वेलकम ऑफर संपल्यानंतर जर तुमचे पोस्टपेड सिम असेल तर तुम्हाला बिल अवश्य भरावे लागणार , जर प्रीपेड असेल तर रिचार्ज करावा लागणार आहे . नंतर डोक्याला हात लावण्याआधी आताच तुमचे कार्ड प्रीपेड का पोस्टपेड आहे हे खालील प्रमाणे कृती करून जाणून घ्या
सर्वप्रथम प्ले स्टोरीवरून MY JIO हे ऍप डाऊन्लोड करून घ्या नंतर त्यात साइन इन व्हा , लॉग इन झाल्यावर तुम्हाला VIEW BILL हा ऑप्शन आला आणि बिलाची रक्कम दिसली तर तुमचे पोस्टपेड कार्ड आहे , आता जरी बिल रक्कम ० रुपये दिसत असेल तरी तुम्हाला वेलकम ऑफर संपल्यावर बिल येऊ शकते , प्रीपेड कार्डाला BILL ऐवजी रिचार्ज ऑप्शन दिसेल या दोन्ही गोष्टी होत नसतील तर त्वरित जिओ स्टोरला भेट द्या आणि आपले कार्ड डिटेल्स जाणून घ्या

Saturday, 26 November 2016

गोवा होणार देशातील पहिलं कॅशलेस राज्य

 गोव्यामध्ये २६०००  व्यापाऱ्यांसह इतर १०००० दारु विक्रेत्यांवर कॅशलेस विक्री सुविधा देण्यावर सरकारकडून अधिक लक्ष दिलं जात आहे.त्यासाठी त्यांना कार्ड स्वाईप मशीन बसवण्याची सक्ती होऊ शकते , तसेच १०० रुपयांच्या वरील सर्व व्यवहार कॅशलेस करण्यासाठी जनजागृती करण्यात येणार आहे गोवा सरकार जर याला प्रत्यक्षात उतरवण्यात यशस्वी झाली तर गोवा हे देशातील पहिलं राज्य असेल ज्याची अर्थव्यवस्था ही कॅशलेस असणार आहे.

एक्स्प्रेसवेवर अपेक्षित रकमेची वसुली झाल्यानं हा टोल बंद करा

पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेवर 2869 कोटी रुपये टोलवसुली होणं अपेक्षित होतं.ही रक्कम 31 ऑक्टोबरलाच वसूल झाली आहे. त्यानंतरही पुढचे आठ दिवस आयआरबीनं बिनदिक्कत टोलवसुली केली. ज्यामुळं त्यांना अधिकच्या 7 कोटी रुपयांचा फायदा झाला. ज्याची माहिती कंत्राटदारानेच एमएसआरडीसीच्या वेबसाईटवर दिली आहे.”

एक्सप्रेस-वे वरील एकूण टोल वसुली

 

वर्ष    अपेक्षित टोलवसुली प्रत्यक्ष टोलवसुली
2004.    97 कोटी रुपये.  28.5कोटीरुपये
2005   120 कोटी रुपये   54.2 कोटी रुपये
2006   101 कोटी रुपये.  61.20 कोटी रुपये
2007   106 कोटी रुपये.  148 कोटी रुपये
2008.  132 कोटी रुपये.  187 कोटी रुपये
2009.  139 कोटी रुपये.  200 कोटी रुपये
2010.  145 कोटी रुपये.  214 कोटी रुपये
2011.  180 कोटी रुपये.  200 कोटी रुपये
2012.  189 कोटी रुपये.  275 कोटी रुपये
2013.  198 कोटी रुपये.  294 कोटी रुपये
2014.  246 कोटी रुपये.  360 कोटी रुपये
2015.  258 कोटी रुपये.  433 कोटी रुपये
2016.  271 कोटी रुपये.  413 कोटी रुपये
2017.  335 कोटी रुपये
2018.  352 कोटी रुपये.   एकूण2869 कोटी रुपये

2867 कोटी रुपये

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर अपेक्षित रकमेची वसुली झाल्यानं, हा अवैध टोल तातडीनं बंद करावा , कंत्राटदाराला यापुढं टोलवसुलीची मुभा देणं हे बेकायदेशीर आहे

सायरस मिस्त्रींचे साडेसातीतून सुटकेसाठी शनीला साकडे

टाटा सन्सच्या अध्यक्षपदावरुन हकालपट्टी झाल्यानंतर काल  सायरस मिस्त्रीना टाटा स्टीलच्या अध्यक्षपदावरुन काढून टाकण्यात आलं , हकालपट्टीच्या पार्श्वभूमीवर
शनी शिंगणापूरला जाऊन शनीचे दर्शन घेतल्याची चर्चा सुरु झाली आहे. तसंच साडेसातीतून सुटकेसाठी शनीला साकडे घातल्याचंही बोललं जात आहे.
आज शनी शिंगणापूरला  सायरस मिस्त्रींनी शनीला अभिषेक घालून पूजा केली आहे. सोबतच त्यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचं दर्शनही घेतलं आहे.
मनुष्य कितीही मोठा असो , त्याला संकटात देवाची आठवण येतेच हे खरे असल्याची प्रचिती आज आली

Friday, 25 November 2016

खून और पानी एक साथ नही बह सकता, पंतप्रधानांची कडक भूमिका

रक्त आणि पाणी सोबत वाहू शकत नाहीत, असा इशारा देत मोदींनी पाकिस्तानला धडकी भरवली आहे.

पंतप्रधान मोदींच्या हस्ते बठिंडामध्ये ‘एम्स’चं भूमीपूजन झालं. त्यानंतर मोदींनी रॅलीला संबोधित केलं.
यावेळी मोदींनी पंजाबच्या शेतकऱ्यांचं कौतुक केलं. “शेतकऱ्यांना पाणी मिळालं तर ते मातीतून सोनं पिकवतील. आमच्या शेतकऱ्यांचं सिंधू नदीच्या पाण्यावर पूर्ण अधिकार आहे. भारताच्या हक्काचं जे पाणी आहे, ते पाणी पाकिस्तानला जाणार नाही”, असं मोदींनी जाहिर केलं.

वर्ल्ड बँकेच्या मध्यस्थीनंतर साठच्या दशकात हा करार झाला आहे ज्यानुसार सिंधू खोऱ्याचे पूर्व आणि पश्चिम असे दोन भाग करण्यात आले. सतलय, बियास, रावी, या पूर्व खोऱ्यात तर सिंधु, झेलम, चिनाब या पश्चिम खोऱ्यात येतात.
यातल्या पूर्व खोऱ्यातल्या नद्यांचं पाणी हवं तितकं वापरण्याचा अधिकार भारताला आहे.
पश्चिम खो-यातल्या पाण्यावर मात्र काही बंधनं आहेत. पश्चिम खो-यातलं पाणी हे पाकिस्तानला जातं.

बेहिशेबी रोख रकमेवर 60 टक्के कर ?

10 नोव्हेंबर ते 30 डिसेंबर या काळात बँकेत जमा झालेल्या बेहिशेबी रोख रकमेवर 60 टक्के कर लावण्याचा सरकारचा विचार आहे. त्यासंदर्भात आयकर कायद्यात बदल करण्याचीही सरकारने तयारी केली आहे. काल संध्याकाळी झालेल्या कॅबिनेटच्या बैठकीत याविषयी चर्चा झाल्याची माहिती पुढे येत आहे.यामुळे नोटां बदलुन देण्याचा काळाबाजार करणार्यांना त्याच्या प्रत्येक भरणा रकमेचा विक्री तपशील नोटीशीनंतर सादर करावा लागणार आहे

Thursday, 24 November 2016

विरोधी पक्षांच्या ‘भारत बंद’ला जनतेचा तीव्र विरोध

नोटाबंदीवरून केंद्र सरकारला घेरण्यासाठी बहुतेक सर्व विरोधी पक्षांनी सोमवारी (दि. २८) ‘भारत बंद’चा नारा दिला असून त्याला जनसामान्यातुन अत्यंत तीव्र विरोध जाणवत आहे ,
लोकांना असे वाटते की सर्व विरोधी हे आपला भ्रष्टाचार व काळा पैसा लपवण्यासाठीच असले उद्योग करत आहेत ,
सोशल मीडियावर सर्वत्र याची खिल्ली उडवली जात असुन

" मी मोदींच्या नोटबंदी निर्णयाचे समर्थन करतो , माझा बंदला विरोध आहे "

"में उस दूकान से कभी खरीददारी नहीं करूंगा जो काले धन वालो के समर्थन में 28-11-2016 को बंद रहेगा
आप भी अगर काले धन के खिलाफ इस मुहिम में देश के साथ है तो इस मेसेज को फेला दे ताकि काले धन वालो को अलग थलक किया जा सके  ।"

२८ तारीख को जो करेगा बंद का ऐलान,
उसके डोके में कोल्हापुरी पायताण !

विपक्ष ने २८ नोव्हेंबर ला "भारत बंद" करायच ठरवलं आहे....

"याच चोरांनी इतकी वर्ष आपल्याला रोज कण कण लुटलं आणि आता,
जेव्हा एका प्रामाणिक प्रधानमंत्री या चोरांच्या मुळावर उठला तेव्हा हेच चोर, आता जनतेचे कैवारी होण्याचा सोंग करायला "भारत बंद" करायला निघाले???
मी, २८ नोव्हेंबर ला या भारत देशाच्या प्रमाणिक प्रधानमंत्री मोदी यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना *समर्थन* तसेच या देशाला इतकी वर्ष लुटणा-या आणि आता "भारत बंद" चं सोंग करणा-या चोरांचा *निषेध* म्हणुन "भारत बंद" मध्ये सहभागी होणार तर नाहीच, उलट २८ नोव्हेंबर ला २ तास जास्त काम करून, या देशद्रोही चोरांना चपराक देणार आहे."

असे हजारो मेसेज स्वयंस्फुर्तीने लोक पाठवत आहेत

बुक माय छोटू

इंटरनेटचा अनेकजण मनोरंजनासाठीच वापर करतात , काहीजण माहिती , बातम्या मिळवण्यासाठी करतात पण असेही काही लोक आहेत जे योग्यप्रकारे कल्पकता वापरून चक्क लाखो करोडो रुपयाचा व्यवसाय करत आहेत , याचेच एक उदाहरण म्हणजे बुक माय छोटू हि वेबसाईट आहे . सत्यजित सिंग बेदी हे या वेबसाईटचे संचालक आहेत .त्यांनी  लोकांना किरकोळ कामासाठी तात्पुरता कामगार किंवा मदतनीस हवा असतो आणि ऐनवेळी असा मनुष्य मिळणे अवघड होते हे नेमके हेरले .त्यांनी बुक माय छोटूच्या माध्यमातून तात्पुरती सेवा देणाऱ्या मूलांची नोंद केली ,त्यांचे व्हेरिफिकेशन केले ,त्यांना प्रति तास मेहनताना ठरवला आणि आपल्या या कंपनीची सुरुवात केली छोटू या नावातूनच ही हेल्पर सेवा असल्याचं समजतं.सध्या हि कंपनी हरियाणा ,दिल्ली , उत्तर प्रदेश या ३ राज्यात सेवा देत आहे , ग्राहकांनी या वेबसाईटवर जाऊन छोटूची मागणी नोंदवल्यास त्यांना त्वरित सेवा दिली जाते

















हि सर्व माहिती आता देण्याचे कारण असे कि ८ नोव्हेंबरनंतर या कंपनीचा व्यवसाय कमालीचा वाढला , लोक पैसे बदलाच्या बँकाच्या रांगेत उभारण्यासाठी या छोटूची फार मोठ्या प्रमाणात मदत घेत आहेत ,

हे छोटू फक्त रांगेत उभं राहण्याचं काम करतात, अर्थात तुमचा नंबर लावून ठेवतात. एटीएम किंवा बँकेच्या रांगेत तुमचा नंबर जवळ आला की तुम्हाला फोन केला जातो. मग तुम्ही छोटूच्या जागी प्रत्यक्ष उभं राहायचं असतं. थोडक्यात बँक किंवा एटीएमचे प्रत्यक्ष व्यवहार तुम्हालाच करायचे असतात.






Wednesday, 23 November 2016

कार घेताय ,थोडे थांबा ,येतेय मारुतीची नवीन इग्निस कार

 मारुती सुझुकी एक नवीन कार इग्निस २०१७ च्या पूर्वार्धास लॉन्च करणार आहे पेट्रोल व डिझेल या दोन्ही प्रकारात हि कार मिळणार असून अनुक्रमे २० आणि २६ मायलेज असणार आहे किंमतही माफक म्हणजे ५ ते ७ लाख दरम्यान असण्याची शक्यता आहे या कारच्या टॉप मॉडेलमध्ये abs , एअर बॅग्स ,प्रोजेक्टर हेडलॅम्प्स , अलॉय व्हील्स ,ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल , कि लेस एन्ट्री , बटन स्टार्ट , नेव्हिगेशन अशी सर्व आधुनिक फीचर्स असणार आहेत , हि कार सर्व स्पर्धक कारच्या बाबतीत सरस ठरेल असा विश्वास तज्ज्ञांकडून व्यक्त केला जातोय

Maruti Ignis Dimensions 

Length3,700mm
Width1,660mm
Height1,595mm
Wheelbase2,438mm
Ground Clearance180mm
Kerb Weight880kgs – 920kgs
Boot Space258-litre (expandable up to 415-litre)
Seating Capacity5 passengers

Maruti Ignis Specifications

SpecificationsPetrolDiesel
Engine1.2-litre K-Series1.3-litre DDiS
Power84bhp @6000rpm73.9bhp @4000rpm
Torque115Nm @4000rpm190Nm @2000rpm
Transmission5-speed MT5-speed MT & AMT

भारतीय सेनेचे पाकला सडेतोड उत्तर, पाकिस्तानी कॅप्टन व दोघांना कंठस्नान

काश्मीरच्या माछिलमध्ये आज भारतीय सेनेने पाकिस्तानी लष्कराच्या तीन पाकिस्तानी सैनिकांना कंठस्नान घातले ,काल पाकिस्तानने केलेल्या भ्याड हल्ल्यात काल तीन भारतीय जवान शहीद झाले होते. त्याचाच भारताने आज सडेतोड बदला घेतला, पाकच्या ठार केलेल्यांमध्ये  कॅप्टन अधिकारीही  आहे.

2 जीबी 4G फ्री डेटा फक्त एका मिस्डकॉलवर एअरटेलची ऑफर

ग्राहकांना 4G कडे आकर्षित करण्यासाठी
एअरटेल कंपनीने प्रमोशनल ऑफर लॉन्च केली आहे.
2जी आणि 3जी यूजर्सना 2 जीबीपर्यंत 4G डेटा उपलब्ध केला आहे. एअरटेलचे यूजर्स जे सध्या 2जी किंवा 3जी सिमचा वापर करत आहेत. ज्यांना या ऑफरचा फायदा घ्यायचा असल्यास वेबसाईटवर जाऊन सिम 4G सिममध्ये अपग्रेड करावं लागेल.
सिमला 4G मध्ये अपग्रेड करण्यासाठी एअरटेलच्या वेबसाईटवर जाण्यासाठी एक फॉर्म भरावा लागेल. यामध्ये ईमेल, आयडी, फोन नंबर, पत्ता इत्यादी भरावं लागेल. यानंतर ‘सेंड मी 4G सिम’च्या पर्यायवर क्लिक करा. सिम अपग्रेड होण्यासाठी काही दिवस लागण्याची शक्यता आहे.
सिम अपग्रेडनंतर फ्री डेटा मिळवण्यासाठी मोबाईलवरुन यूझर्सने 52122 या नंबरवर मिस्ड कॉल द्यावा लागेल.
ही ऑफर प्रीपेड यूजर्ससाठीच आहे

Tuesday, 22 November 2016

नोटाबंदीवर आपले मत व्यक्त करा थेट नमो कडे

५०० व १००० च्या नोटाबंदीनंतर तुम्हाला काय वाटते , काही समस्या आहेत का ? ,

तुमचे यावर काही सुचना असतील तर
आता तुम्ही थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी संपर्क साधु शकता

नरेंद्र मोदी नावाचे official app प्ले स्टोरवरुन

https://play.google.com/store/apps/details?id=com.narendramodiapp

डाउनलोड करुन घ्या , रजिस्टर करा व सर्वे पुर्ण करा

या व्यतिरिक्त तुम्हाला काही तक्रार किंवा सुचना मांडायची असेल तर तशी फीडबेक द्या

भारतीय इतिहासातील प्रथमच पंतप्रधान आहेत की जे अशाप्रकारे जन भावना जाणुन घेण्याचा प्रयत्नशील आहेत तेव्हा एक जबाबदार भारतीय नागरिक म्हणुन तुम्ही तुमच्या भावना या एपच्या माध्यमातुन अवश्य पोहचवा

Monday, 21 November 2016

Zero S बाईक देणार 250 Km मायलेज

एका अमेरिकन ऑटोमोबाईल कंपनीने नवीन बाईक विकसित केली आहे जिचे मायलेज आहे 250 Km / charge
पुर्ण इलेक्ट्रिक असलेल्या बाईकला एकदा १० तास चार्ज केल्यावर ती 250 Km अंतर आरामात कापते , या बाईकचे नाव Zero S असे आहे
आतापर्यंतच्या इलेक्ट्रिक स्कुटरमध्ये टॉप स्पीड फक्त 40 km/ hr असायचे पण या बाईकमध्ये 140 km/hr आहे
सध्यातरी ही बाईक अमेरिकन बाजारपेठेत लॉंच होत असुन तिच्या यश अपयशावर ती जागतिक बाजारात उपलब्ध होणार आहे

नोटाबंदीवरून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचे ४ दिवस वाया

नोटाबंदीच्या मुद्यावरून विरोधकांनी संसदेतला गोंधळ सुरूच ठेवलाय.

सर्व विरोधक मोदी सरकारच्या विरोधात एकवटलेत. पण या राजकीय वादावादीत अधिवेशनाचं महत्त्वाचं कामकाज वाया जातंय, जनतेला या गोंधळाचा फायदा नाही , काही महत्वाची विधेयके चर्चेसाठी प्रलंबित आहेत त्यांचं काय ? हा खरा सवाल आहे.

बँकांतील बोगस रांगा

सध्या ५०० व १००० च्या जुन्या नोटा बदलण्यासाठी सर्वत्र लांबच लांब रांगा लागत आहेत , मिडीया चैनलवाले लाईव्ह मुलाखती घेउन लोकांना नोटाबंदीचा किती त्रास होत आहे हे टाहो फोडून सांगत आहेत ,पण या रांगामागील सत्य जाणुन घेतल्यास तुम्ही आश्चर्यचकित व्हाल

काही ठिकाणी रोज तेच ते चेहरे नोटा बदलुन घेण्यासाठी रांगेत दिसतात , एका बँकेच्या रांगेत सामाजिक कार्य म्हणून काही व्यकतींनी या लोकांना सलग ४ दिवस मोफत सरबत व पाणी वाटप केले त्यावेळी त्यांना हा अनुभव आला की रोज ठराविक लोक नेहमी सकाळी रांगेत नंबर लावतात

एका झेरॉक्स सेंटर चालकाने सांगितले काही युवक व स्त्रिया ओळखपत्रांच्या १० ते २० झेरॉक्स प्रती घेऊन जातात आणि रोजंदारीवर रांगेत उभारुन नोटा बदलुन देण्याचा धंदा करतात

प्रत्यक्ष रक्कम खात्यावर जमा करण्यासाठी लोकांची संख्या कमी असुन नोटा बदलुन घेण्यासाठी जास्त गर्दी आहे असे बँक कर्मचार्यांचे सुद्धा निरीक्षण आहे

ऑनलाईन पेमेंट सोपे तितकेच धोकादायक

पेटीएम, फ्रीचार्ज, मोबिक्विक असे ऑनलाईन पेमेंट
करताना यूआरएल बॅाक्समध्ये एचटीटीपीस बरोबरच उजव्या बाजूला ' लॅाक आयकॉन ' {कुलुपाचे चिन्ह }असेल तर ती वेबसाईट सुरक्षित आहे... आणि जर नसेल तर अशा वेबसाईटवरून ऑनलाईन ट्रान्झॅक्शन धोकादायक ठरू शकतं.
पेमेंट केल्यानंतर लगेच ब्राऊजरमधील कॅश ट्रान्सफर हिस्ट्री क्लियर करा, जर आपली ट्रान्सफर कॅश हिस्ट्री स्मार्टफोनमध्ये सेव्ह असेल, तर आपल्या कॅश संदर्भातील माहिती हॅकर्सला लगेच उपलब्ध होईल.

सॅाफ्टवेयर अपडेट नसेल तसेच इंटरनेट स्लो असेल तर हॅकर्ससाठी आपण सॅाफ्ट टार्गेट आहोत.

५०० आणि १००० च्या नोटबंदीनंतर मोठ्याप्रमाणावर ऑनलाइन पेमेंट करण्यात येत आहे परंतु वरील सावधगीरी न बाळगल्यास हॅकर्सच्या माध्यमातून
कोणत्याही क्षणी आपले ऑनलाईन अकांऊट हॅक होऊ शकते.

Sunday, 20 November 2016

व्हॉट्सऍप व्हिडिओ कॉलिंग व फ्री लिंक्समधुन फसवणूक

काही व्हॉट्सऍप वापरकरत्यांना ग्रुप व्हिडिओ कॉलिंगसाठी लिंक्स पाठवल्या जात असून , त्यावर क्लिक केल्यानंतर युजर्सची माहिती हॅक करण्याचा प्रयत्न होत आहे .
असाच प्रकार डाटा फ्री , रिचार्ज फ्री , मोबाईल , led tv फ्री , रिबॉक , नाईके शुज या प्रसिद्ध कंपन्यांची नावे वापरुन बोगस लिंक पाठवुन केला जात आहे

एकाने असा मेसेज मिळाला की कोणतीही खातरजमा न करता दुसर्याला पाठवला जात आहे त्यामुळे असे बोगस मेसेज फोफावत असुन सोशल मिडीयावरील तथाकथीत सुशिक्षित मंडळी त्याला खतपाणी घालत आहेत , हा एक सायबर क्राईम आहे

समाजविघातक शक्तींकडून यासाठीच्या लिंक्स युजर्सना पाठविल्या जात असून , या लिंकवर क्लिक केल्यानंतर युजर्सना त्यांच्या कॉन्टॅक्टमधील युजर्सनाही यासाठी आमंत्रित करण्यास सांगितले जात आहे ; तसेच या लिंकवर क्लिक केल्यानंतर आपली सर्व वैयक्तिक माहिती आणि अन्य तपशील गोळा केला जात आहे . यामध्ये कॉन्टॅक्टसोबत ई - मेल्स आणि पासवर्ड , नेट बेंकींग , फोटो अन्य गोष्टीही हॅक केल्या जाण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे .

लोकांनी अशा लिंक्सच्या बनावाला बळी पडू नये हा सावधानतेचा इशारा

पी.व्ही.सिंधूने चायना ओपन सुपर सीरिज चे जेतेपद पटकावले

पी.व्ही.सिंधूने चीनच्या आठव्या मानांकित सून यू हिचा 21-11, 17-21 आणि 21-11 असा पराभव करत चायना ओपन सुपर सीरिज चे जेतेपद पटकावले , ती भारताची ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती बॅडमिंटनपटू खेळाडू आहे सिंधूचे सुपर सीरिज स्पर्धेतील हे पहिलेच जेतेपद आहे. तसेच हे जेतेपद पटकावणारी तिसरी बिगर चीनी खेळाडू ठरलीये. ऑलिम्पिक सिल्व्हर मेडल जिंकल्यानंतर सिंधूनं चायना ओपन जिंकत आणखी एक सुपर पराक्रम केला आहे तिने चीनला भारताचा हिसका दाखवला आहे