Thursday, 10 November 2016

रेल्वे तिकीट बुकिंग करुन काळा पैसा बदलण्यासाठी लोकांच्या रांगा

500 व 1000 रुपयांच्या नोटा
चलनातून बाद केल्या जात असल्या तरी त्या रेल्वे बुकिंगसाठी (आरक्षण) स्वीकारल्या जातात ,
अनेकांनी गरज नसताना. काळ्या पैसा पांढरा करण्यासाठी रेल्वेची तिकिटे काढुन , ती रद्द करुन त्याचा रिफंड घेण्याचा निर्णय घेतला. तिकिटे रद्द केल्यावर केवळ एक टक्का रक्कम कापून घेतली जाते.याचा
गैरफायदा घेत देशभरात मोठ्या प्रमाणात ही युक्ती वापरात येत आहे.हे लक्षात आल्यावर रेल्वेने
तिकिटे रद्द केल्यानंतर ती रक्कम रोख रक्कमेच्या रूपात न देण्याचा निर्णय गुरुवारी घेतला. नव्या निर्णयानुसार ही रक्कम परताव्याच्या रूपाने संबंधित प्रवाशांच्या बँक खात्यात चेक वा ईसीएसच्या रूपाने जमा केली जाणार असल्याचे आदेश काढले आहेत.त्यामुळे काळ्या पैसा पांढरा करण्याच्या पर्यायास चाप लागला आहे

No comments:

Post a Comment