Monday, 13 February 2017

अफजलखनाच्या कबरजवळची अतिक्रमणे शिवजयंतीपूर्वी हटणार काय ?



प्रतापगडाच्या खाली अफजलखनाची कबर असलेल्या ठिकाणी व त्याच्या आसपासच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर अतिक्रमणांचा विळखा झालेला आहे. या प्रकरणी दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनीवणीदरम्यान हायकोर्टाने लवकरात लवकर ही अतिक्रमणे काढण्याच्या सूचना वन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. वारंवार आदेश देऊनही पालन होत नसेल तर अशा अधिकाऱ्यांची तुरुंगात रवानगी करण्याचा इशारा हायकोर्टाने दिला आहे.
 या पूर्वीही न्यायालयाच्या आदेशाचे पालन झाले नसल्याने कोर्टात अवमान याचिका दाखल करण्यात आली होती, याचिकेदरम्यान अतिक्रमणे वन विभागाची मालकी असलेल्या जागेवरअसल्याचे सांगण्यात आले असून अधिकारी अतिक्रमणे काढत नसतील तर त्यांची रवानगी तुरुंगात रवानगी करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला होता ,अतिक्रमणे काढण्यासाठी दोन आठवड्यांत न्यायालयाने दिली होती , हि मुदत लवकरच पूर्ण होत असून आता तरी वनविभागाच्या अधिकारी वर्गाकडून शिजयंतीपूर्वी हि अतिक्रमणे हटवली जातील काय असा सवाल शिवप्रेमी व नागरिकांतून विचारला जात आहे 

Thursday, 9 February 2017

बोगस पॅथॉलॉजी लॅबचे फुटले पेव

बोगस पॅथॉलॉजी लॅबचे जाळे राज्यभर पसरले आहे. प्रत्येक लॅबमध्ये पॅथॉलॉजिस्टची नियुक्ती करणे कायद्याने बंधनकारक आहे;हा पॅथॉलॉजिस्ट एम डी वा त्याहून अधिक पात्रतेचा असावा अशी कायदेशीर तरतूद आहे  पण महाराष्ट्रात  अनेक ठिकाणी केवळ डिप्लोमाधारक टेक्निशियनची नियुक्ती करून पॅथॉलॉजी लॅब सुरू आहेत. कोणत्याही पॅथॉलॉजी लॅबमध्ये टेक्निशियनने सहायकाचे काम करणे कायद्याने बंधनकारक आहे; पण अनेक लॅबमध्ये टेक्निशियनच वैद्यकीय चाचण्यांचे अहवाल तयार करून त्यावर एम डी  पॅथॉलॉजिस्टच्या सह्या घेतात.
  पॅथॉलॉजी लॅबमध्ये ब्लड , युरीन , स्पुटम इत्यादींचे नमुने घेतले जातात ., काही ठिकाणी डॉक्टरांच्या स्वतःच्या अनधिकृत लॅब आहेत यात फक्त डीएमएलटी किंवा इतर अर्हताधारक व्यक्ती पगारावर नेमून त्यान्च्याकडून हे नमुना तपासणीचे काम करून घेतले जाते याच कारणावरून एका डॉक्टरने प्रमाणित केलेल्या चाचण्या दुसऱ्या डॉक्टरांकडे गेल्यास परत करण्यास सांगितले जाते कारण एका डॉक्टरचा दुसऱ्यावर विश्वास नसतो मात्र यात विनाकारण रुग्ण भरडला जातो
  तसेच कमिशनसाठी विनाकारण चाचणी करायला हा प्रकार आता भलताच वाढीला लागला आहे यात डॉक्टरांना भरघोस कमिशन मिळत असल्याने अनेक डॉक्टर पेशंटला तपासण्याआधीच अमुक अमुक चाचणी करणे गरजेचे आहे , उगाच रिस्क नको अशी भीती घालतात
 वैद्यकीय सेवेचे व्यवसायीकरण झाल्याची ओरड सुरू असताना बोगस पॅथॉलॉजी लॅबचालकहि आता यात सामील झाले आहेत खरी वैद्यकीय सेवा लोप पावत आहे हि शोकांतिका आहे 

Sunday, 5 February 2017

आरटीओ ऑफिसमधील लिपिकांचा गलथान कारभार

आरटीओ ऑफिसमध्ये ग्राहकांना नवीन लायसन्स बनवणे , वाहन नोंदणी करणे , वाहन हस्तांतरण करणे  इत्यादी कामी मिळणाऱ्या कॉम्प्युटर प्रिंटमध्ये स्पेलिंगच्या चुका आढळून येत आहेत   लिपिकांच्या  गलथान कारभारामुळे  आधार कार्ड ,मतदान कार्ड किंवा नाव व पत्त्याचा इतर कागदपत्र पुरावा स्पष्ट जोडला असूनही आरटीओ ऑफिसकडून मिळणाऱ्या कॉम्प्युटर प्रिंटमध्ये नावांच्या व पत्त्यांच्या स्पेलिंगमध्ये अक्षम्य चुका आढळत आहेत , त्यामुळे ग्राहकांना सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडूनही विनाकारण मनस्ताप व भुर्दंड सोसावा लागत आहे असाच एक किस्सा नुकताच घडला एका प्रतिष्ठित व्यक्तीला निव्वळ लायसन्समधील स्पेलिंगमध्ये चूक असल्याने पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट मिळवताना अडचण आली तर एकाला व्हिसा मिळाला नाही . प्रत्येक ठिकाणी आरटीओ तर्फे मिळालेल्या प्रतीमध्ये व इतर ओळखपत्रामध्ये काही ना  काही स्पेलिंग चुका आढळून येत आहेत . आरटीओ ऑफिसमध्ये अधिकारी वर्गाने यात त्वरित लक्ष्य घालून लिपिकांना  टायपिंग सुधारण्यास सांगावे नाहीतर अशा ढिसाळ कर्मचाऱ्यांकडून हे महत्वाचे काम तरी काढून घ्यावे  अशी मागणी नागरिकांतून होत आहे

Saturday, 4 February 2017

जनता आणि कार्यकर्ते उपाशी , नेते सोन्याच्या ताटात जेवतात तुपाशी


नुकतेच  महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी एका राष्ट्रीय पक्षाचे विधान सभा नेते , ज्येष्ठ नेते , आमदार आदी  दुष्काळी भागातील एका जिल्ह्यात आले होते , त्याप्रसंगी सभेआधी एका कार्यकर्त्याच्या घरी या  नेत्यांसाठी शाही जेवणाचा बेत आखण्यात आला होता.सध्या विरोधी पक्षात असलेल्या या नेते मंडळींचा शाही जेवणाचा बेत सत्ताधार्यांनाही लाजवेल असा होता , जनता दुष्काळात होरपळत असताना , कार्यकर्ते उपाशीपोटी रात्रंदिवस प्रचार करत असताना नेते मंडळी मात्र चक्क सोन्याचा मुलामा देण्यात आलेल्या ताट-वाट्यामधून शाही भोजन करण्यात मग्न होते ,  कॅटरर्सकडून ही खास सोन्याचा मुलामा असलेली भांडी मागवण्यात आली होती , म्हणूनच जनता आणि कार्यकर्ते राहतात उपाशी मात्र नेते मंडळी सोन्याच्या ताटात शाहीभोजन करतात तुपाशी असे म्हटल्यास वावगे ठरू नये ,

 लोकशाहीची याहून अधिक मोठी शोकांतिका ती काय !

Wednesday, 1 February 2017

६७ व्या आंतरशालेय क्रीडा स्पर्धाअंतर्गत कवायत स्पर्धेत राजर्षि शाहू विद्यामंदिर तृतीय

प्राथमिक शिक्षण समिती, महानगरपालिका , कोल्हापूर मार्फत गांधी मैदान येथे आयोजित केलेल्या मनपा शाळेच्या सामुदायिक कवायत स्पर्धा अतिशय उत्साहात नुकत्याच संपन्न झाल्या , त्यामध्ये मुली विभागात राजर्षि शाहू विद्यामंदिर कसबा बावडा यांनी तृतीय क्रमांक पटकावला .  मुख्याध्यापक अजितकुमार पाटील , सुशील जाधव , आवटी , सुनगार , मयूर दाभाडे या शिक्षकांचे विशेष मार्गदर्शन लाभले ,

आंतरशालेय असणाऱ्या  अतिशय शिस्तबद्ध रितीने व नीटनेटक्या नियोजनाद्वारे पार पडलेल्या या कवायत स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्राथमिक शिक्षण समितीकडील क्रीडा निरीक्षक श्री. सचिन पांडव, प्रशासनाधिकारी मा.सौ. प्रतिभा सुर्वे, सर्व शैक्षणिक पर्यवेक्षक व कर्मचारी,सर्व मध्यवर्ती व विभागीय सेक्रेटरी, कामगिरी सेवक यांनी अथक परिश्रम घेतले...
सर्व मनपा शिक्षक यांच्या सहकार्याने या स्पर्धा यशस्वी झाल्या...