Sunday, 29 April 2018

औरंगाबाद येथे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने विराट मोर्चा 

प्रतिनिधी दि. २९/४/१८


फोटो 

औरंगाबाद येथील सभेत बोलतांना  शिक्षक नेते संभाजी थोरात, शेजारी मोहन भोसले, राज्य कोषाध्यक्ष जनार्दन नेऊगरे, जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील सह इतर मान्यवर.

   शिक्षक व शिक्षक पती पत्नी एकाच मुख्यालयामध्ये  नोकरीस असणे आवश्यक आहे. तरच आनंददायी अध्ययन अध्यापन घडते. मात्र राज्य शासनाच्या चुकीच्या बदली धोरणामुळे शिक्षकांची मानसिक स्थिती बिघडली आहे. चुकीच्या बदली धोरणामुळे शिक्षकांचे आरोग्य धोक्यात आले असून त्याचे विपरीत परीणाम शरीरावर होत आहेत. शिक्षकांच्या सर्व मागण्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शंभर वर्षापासून सोडविल्या जात आहेत व यापुढे ही सर्व प्रश्न व समस्या सोडविल्या जातील असे प्रतिपादन शिक्षक नेते संभाजी थोरात यांनी केले. ते औरंगाबाद येथील महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने विराट मोर्चा काढला त्या प्रसंगी ते बोलत होते.


   प्राथमिक शिक्षकांच्या बदली धोरणात दुरुस्ती करावी यासह राज्यस्तरीय विविध मागण्यासाठी  २९ एप्रिल रोजी  महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने औरंगाबाद येथील विभागीय आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्हयातील प्राथमिक शिक्षकांनी मोठया संख्येनी या मोर्चात सहभाग घेतला.

       २७ फेब्रुवारी २०१७ च्या आदेशान्वये राज्य शासनाने जे बदली धोरण जाहीर केले आहे. त्या बदली धोरणामुळे ग्रामीण भागातील प्राथमिक शाळेवर प्रतिकूल परिणाम होणार असल्याने या धोरणात बदल करावा यासह विविध मागण्याचे लेखी निवेदन राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांनी ओरंगाबाद विभागीय आयुक्त कार्यालय तहसिलदार श्रीराम बेंडे यांना शिष्टमंडळा समवेत दिले.

     शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात यांच्या नेतृत्वाखाली व शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे यांच्या मार्गदर्शनाखाली निघणाऱ्या या मोर्चात राज्यभरतील प्राथमिक शिक्षक सहभागी झाले, मोर्चा क्रांती चौकातून निघाला.मोर्चातील प्रमुख मागण्या बदली धोरणात बदल करून शिक्षकांच्या बदल्या सेवाजेष्टतेनुसार तालुका अंतर्गतच करण्यात याव्यात,प्रशासकीय बदल्याची टक्केवारी असावी, बदल्याची खो पद्धती बंद करण्यात यावी, एकदा बदली झाल्यावर पुन्हा ५ वर्षे बदली करण्यात येवू नये ,विनंती बदल्या मागणी नुसार कराव्यात या दुरुस्ती सुचवण्यात आल्या आहेत. तसेच दि.२३/१०/२०१७ च अन्यायकारक शासन निर्णय रद्द करून १२ वर्षे सेवा झालेल्या शिक्षकांना पूर्वीप्रमाणेच वरिष्ठ वेतन श्रेणी देण्यात यावी,

१ नोवेंबर २००५ नंतर सेवेत दाखल झालेल्या शिक्षकासह सर्व कर्मचाऱ्याना जुनी पेन्शन योजना लागू करावी, शासन निर्णयाप्रमाणे ३० सप्टेंबर च्या पट संख्येनुसार शिक्षक पदनिर्धारण करावे. सातवी पर्यंतच्या सर्व प्राथमिक शाळेला मुख्याध्यापक व सामाजिक शास्त्र विषयाचे पदवीधर शिक्षक पद मान्य करावे, सर्व पदवीधर शिक्षकांना पदवीधर शिक्षकाची श्रेणी देण्यात यावी, जिल्हा परिषदेच्या १०० टक्के विध्यार्थ्यांना मोफत गणवेश  देण्यात यावा, संगणक प्रशिक्षण मुदतवाढ देवून सुरु केलेली वसुली थांबवण्यात यावी, पट संखेअभावी राज्यातील बंद केलेल्या प्राथमिक शाळा सुरु करण्यात याव्यात, अंतर जिल्हा बदलीची प्रक्रिया जलद राबवून त्वरित कार्यवाही पूर्ण करावी. या प्रमुख मागण्या पूर्ण कराव्यात अशी मागणी मोर्चात करण्यात आली .

     महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने राज्याध्यक्ष बाळकृष्ण तांबारे, कार्याध्यक्ष अंबादास वाजे, सरचीटनिस अप्पासाहेब कुल, महिला आघाडी प्रमुख श्रीमती अनुराधा तकटे, कोषाध्यक्ष जनार्दन नेऊंगरकरे , शिक्षक नेते मोहन भोसले आदी मोर्चाचे नेतृत्व केले. 

   कोल्हापूर जिल्हयातून जिल्हा अध्यक्ष रविकुमार पाटील, स्वाभिमानी शिक्षक संघ अध्यक्ष सुधाकर निर्मळे, जयवंत पाटील, शिवाजी ठोंबरे, रघुनाथ खोत, सरचिटणीस सुनील पाटील,  सुरेश कांबळे,मधुकर येसणे ,बाळासाहेब निंबाळकर ,प्रकाश खोत, सुनील एडके ,प्रकाश सोहनी ,अशोक चव्हाण, इंद्रजीत कदम, हेमंत भालेकर , तानाजी जत्राटे ,अशोक पाटील , विक्रम पोतदार ,प्रसिद्धी प्रमुख किरण शिंदे , विजय भोसले, पी.के. कांबळे, प्रकाश मगदूम, किरण पाटील, उत्तम कोळी, शशिकांत पाटील, रावसाहेब मोहीते, प्रकाश सोनी, शिवाजी रोडे पाटील,आदी पदाधिकारीसह शेकडो शिक्षक उपस्थित होते.

    

No comments:

Post a Comment