Wednesday, 10 October 2018

108 रुग्णवाहिका पुन्हा ठरली जीवनदायी - जोतिबा रस्त्यावर टेम्पो पलटी, अपघातग्रस्तांना मिळाली तात्काळ मदत

पन्हाळा- जोतिबा डोंगरावरून रस्त्यावर पांढरे पट्टे मारण्यासाठी गेलेला ठेकेदाराचा टेम्पो उलटून टेम्पोत असलेला एक कामगार जखमी झाला तर अन्य दोघे जण बचावले आहेत. रस्त्यावर पांढरे पट्टे रण्यासाठीचे रसायन रंग आणि ज्वलनशील पदार्थ असलेला हा टेम्पो जोतिबा डोंगरावरून केर्लीच्या दिशेने जात असताना एका वळणावर पलटी झाला. यामधील गॅस टाकी लिक झाली होती. त्यामुळे अपघातग्रस्तांना धोका निर्माण झाला होता. 


पण महाराष्ट्र शासनाच्या १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने तातडीने घटनास्थळी जावून टेंम्पोत अडकलेल्यांची सुटका केली, तसेच रुग्णवाहिकेसोबत असलेले डॉ. अभिजित जाधव आणि रुग्णवाहिकेच्या चालकाने प्रसंगावधान राखून टेम्पोतील ज्वलनशील पदार्थ बाजूला काढले त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. लक्ष्मण प्रल्हाद कांबळे- (२२) मुळ गाव पुसद जिल्हा यवतमाळ सध्या राहणार वडगाव हा तरुण जखमी झाला तर अन्य दोघेजण सुदैवाने बचावले. जखमींना रुग्णवाहिकेतून कोल्हापूरच्या छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

No comments:

Post a Comment