Tuesday, 7 May 2019

सेनापती कापशीत श्री राजाशिवछत्रपती ग्रुप आयोजित संयुक्तिक शिवजन्मोत्सव उत्साहात ! सर्व तरूण मंडळांचा उस्फूर्त सहभाग


सेनापती कापशी/ विजय मेस्त्री

            हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, युगपुरूष छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती(पंरपरेने) सेनापती कापशी (ता .कागल) सह संपूर्ण  परिसरात मोठ्या उत्साहात संपन्न झाली.सेनापती कापशी ही ऐतिहासिक व सरनौबत म्हाळोजी घोरपडे, सरसेनापती संताजीराजे घोरपडे, हुतात्मा करविरय्या स्वामी, हुतात्मा शंकरराव इंगळे, शहीद जवान सुभाष भोळे, महादेव तोरस्कर, धोंडीराम वेटाळे, वसंत जगदाळे, साताप्पा पाटील अशा  वीरांच्या बलिदानाने पावन झालेली भूमी.येथील  ऐतिहासिक स्वामी चौकात श्रीराजा शिवछत्रपती ग्रुप आयोजित संयुक्तिक शिवजयंती साजरी करण्यातआली.

        

        सकाळी ९ वा.किल्ले भुदरगड येथून शिवज्योतीचे कापशी नगरीत मोठ्या जल्लोषात आगमन झाले .१० वा. महिलांचा हळदी-कुंकू कार्यक्रम, ११ वा. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक व पाळणा गीते झाली. सायंकाळी ४ वा. कापशीतील मुख्य मार्गावरून मूर्तीची ढोल ताशाच्या पारंपारिक वाद्यांच्या गजरात व आतषबाजीच्या झगमगाटात रथातून भव्य आणि दिव्य    मिरवणूक काढण्यात आली.मिरवणूक मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती.यावेळी शिवमावळयांनी हातात भगवे झेंडे घेवून छत्रपती शिवाजी महाराज की जय,जय भवानी,जय शिवाजी ,धर्मवीर संभाजी महाराज की जय,हर हर महादेव अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.यावेळी बाल चमूंसह तरूणांनी पारंपारीक पोषाख परिधान केला होता.

             मंगळवार दि.७ रोजी सायंकाळी चिकोत्रा नदी घाट येथे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये कापशीतील श्री   राजा शिवछत्रपती ग्रुप, सेनापती कापशीकर ग्रुप , नवयुग तरूण मंडळ,शिवप्रतिष्ठाण, अष्टविनायक तरूण मंडळ,,श्री सिद्धिविनायक तरूण मंडळ,श्री गणश्री युवा मंडळ, क्रांती तरूण मंडळ  ,मोरया तरूण मंडळ, विरात्मज   तरूण मंडळ, चिकोत्रा तरूण मंडळ,       , जनसेवा मित्रमंडळ , शहामदार तरूण मंडळ     व श्री गणेश तरूण मंडळ या तरूण मित्र मंडळांबरोबरच गावातील बाल व अबालवृद्धांचाही  सहभाग मोठा होता.

Friday, 22 February 2019

घंटी लघुपटाचे प्रथम पोस्टर अनावरण.



सेनापती कापशी / वार्ताहर - 


              माऊली क्रिएशन प्रस्तुत अवधूत विलास मोहिते दिग्दर्शित घंटी या लघुपटा चे प्रथम पोस्टर चे अनावरण कार्यक्रम मांगणूर (ता - कागल ) येथे पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धनाजी तोरसकर होते तर प्रमुख उपस्थितीत गारगोटी चे माजी उपसरपंच अरुण शिंदे, चित्रपट लेखक संदीप मेंगाने, ग्रामपंचायत सदस्य अजित मोहिते होते.

             यावेळी अध्यक्षीय भाषणात बोलताना धनाजी तोरसकर म्हणाले, ग्रामीण भागातून अशा चांगल्या समाज प्रबोधनपर विषयांच्या लघुपटांची निर्मिती होत असून मला आज दिग्दर्शक व सर्व कलाकारांचा सार्थ अभिमान वाटत आहे. यापुढेही लघुपट करत करत तीन तासाच्या चित्रपटाची निर्मिती व्हावी व काही मदत लागल्यास आम्ही तुमच्या सोबत सदैव आहोत असेही ते यावेळी म्हणाले.

               यावेळी, अरुण शिंदे, अवधूत आठवले, अवधूत मोहिते यांनी मनोगते व्यक्त केली. दरम्यान गुरुप्रसाद जोशी यांनी घंटी या लघुपटाचा आशय व कथा कोणत्या विषयावर आधारित आहे याची संपुर्ण माहिती दिली.

                या लघुपटाचे संपूर्ण चित्रीकरण कॅमेरामन किरण पोवार व संकलन पॅडी पाटील यांनी केले आहे.

                यावेळी,  कलाकार रवींद्र सुतार, बालकलाकर समर्थ आठवले, प्रिया कोळी, अवधूत आठवले, धनाजी शिरगुप्पीकर, यशवंत बुवा, प्रशांत नांदेकर, सचिन सुतार, विश्वजित दोडमनी, गुरुप्रसाद जोशी, विजय मेस्त्री, भगवान गोरे, अमर सव्वाशे, क्रांती मंडळाचे सर्व सदस्य ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक मंडळांचे अध्यक्ष संजय तेलवेकर यांनी केले. 


फोटो  - मांगणूर ता - कागल येथे घंटी लघुपटाचे पोस्टर अनावरण प्रसंगी अरुण शिंदे, धनाजी तोरसकर, अवधूत मोहिते संदीप मेंगाने व सर्व कलाकार.

Tuesday, 19 February 2019

शिवरायांचे शेतीविषयक धोरण आज ही मार्गदर्शक ---अजितकुमार पाटील



 प्राथमिक शिक्षण समिती, संचलित मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11 ,कसबा बावडा मध्ये शिवजयंती उत्सव निमित्ताने भव्य निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेऊन साजरी करणेत आली. शाळा व्यवस्थापन समिती सदस्य रमेश सुतार,यांनी केंदमुख्याध्यापक अजितकुमार पाटील,सुशील जाधव,दीपक उलपे यांचे उपस्थितीत शिवरायांच्या प्रतिमेेस पुष्पहार घालून पूजन करणेत आले.कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा दीपक उलपे तर अध्यक्ष रमेश सुतार हे होते.शाळेतील व उलपे क्लास मधील विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत मोठया संख्येने सहभाग घेतला होता.

केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी शिवाजी महाराजांचे शेतीविषयक धोरण व पर्यावरण यावर विचार प्रकट करतांना म्हणाले आधुनिक युगात वावरत असतांना प्रत्येक व्यक्तीला आपल्या आरोग्याबद्दल काळजी वाटत आहे पण तो यावर उपाय किंवा खबरदारी घेतांना दिसून येत नाही यासाठी शिवरायांच्या काळातील शेती विषयक धोरण व पर्यावरण यांचा अभ्यास करून शेती करणे काळाची गरज आहे.शेतकऱ्यांनी एकच पीक न घेता विविध प्रकारची पिके घेतली जावी म्हणजे शेत जमिनीचे प्रदूषण होणार नाही.असे प्रतिपादन केले.


  निबंध स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धेत यश मिळविलेले विद्यार्थी

*वक्तृत्व स्पर्धा लहान गट*     

प्रथम क्रमांक -अवधूत शिंगे,द्वितीय क्रमांक-श्रेयागी पाटील,तृतीय क्रमांक- वेदिका पाटील

 *वक्तृत्व स्पर्धा मोठा गट* प्रथम क्रमांक - वैष्णवी पोवार,द्वितीय क्रमांक-सानिका उलपे 

 *लहान गट निबंध स्पर्धा*

 प्रथम क्रमांक- आशिषा गायकवाड,द्वितीय क्रमांक-अवधूत शिंगे,3 अमेय जाधव

 *मोठा गट निबंध स्पर्धा*  

  1वैष्णवी पोवार, 2 पार्थ पाटील,3 भूमी चौगले यांनी क्रमांक मिळवले.परीक्षक म्हणून सुशील जाधव यांनी काम पाहिले.यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य रमेश सुतार यांचे केले.देशासाठी शिका व देशाचे नाव उज्वल करा.देशामध्ये आज विचार केला तर देशभक्ती,राष्ट्रभक्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन या मूल्यांची गरज आहे ते अशा राष्ट्रीय कार्यक्रम, सण,जयंती या कार्यक्रमाचे माध्यमातून प्रेरणा देण्यासाठी उपयुक्त आहेत असा संदेश त्यांनी विजेत्यांना दिला.

  कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक उत्तम कुंभार, शिवशंभू गाटे,जे बी सपाटे ,आसमा तांबोळी,सुजाता आवटी,मृणाली दाभाडे, रसिका माळी, बापू गाढवे,अभिषेक बिरणगे,साईराज दाभाडे यांनी सहकार्य केले  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तमेजा मुजावर यांनी केले.

विकास कामापासून वंचित असणाऱ्या मौजे वडगांवास ११ कोटी रूपयांचा विकास निधी मंजूर - जि. प. अध्यक्षा शौमिका महाडिक

हेरले / प्रतिनिधी दि. १९/२/१९

अवधूत मुसळे


       विकास कामापासून वंचित असणाऱ्या मौजे वडगांवास ११ कोटी रूपयांचा विकास निधी मंजूर करून  विकास कामातून व सार्वजनिक सोयी सुविधांची सेवा पुरवून गावाचा कायापालट केला आहे. या गावची शान व मान राखता येईल असे सदैव कार्य असेल असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी केले. त्या मौजे वडगांव  (ता. हातकणंगले) येथील भव्य नागरी सत्कार व विविध विकास कामांचा शुभारंभ आयोजित कार्यक्रम प्रसंगी बोलत होत्या. प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सदस्य उत्तम सावंत यांची होती. प्रथमतः पुलवामा येथील भ्याड हल्यातील शहिद जवानांना श्रद्धाजंली वाहिली.

          पुढे त्या म्हणाल्या मौजे वडगांवच्या विकास कामासाठी भाजपा तालुका उपाध्यक्ष अविनाश पाटील ,स्वप्नील चौगुले, सुनिल खारेपाटणे यांचा सातत्याने पाठपुरावा असल्याने हे शक्य झाले आहे. माझ्या जिपच्या निवडणूकीत विजयी होण्यासाठी या गावचा सिंहाचा वाटा असल्याने कृतज्ञतापूर्वक शक्य तितकी  विकास कामे केली जातील. राज्य शासनाने रस्ते, पाणी, सार्वजनिक सोयीसुविधां नागरिकांना देण्यासाठी विकास निधी भरभरून दिला असल्याने दोन वर्षात ११ कोटीची विकासकामे करू शकलो आहे.

         महिलांसाठी बचत गटाच्या माध्यमातून विविध व्यवसाय व उदयोगांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा करण्यासाठी तत्पर आहे. प्लास्टिक मुक्त पर्यावरणासाठी कापडी पिशव्यांचा वापर वाढला आहे. म्हणून विविध कापडी पिशव्या तयार करण्याचे प्रशिक्षण आयोजित  करणार आहे. त्याचा लाभ महिला वर्गाने घेऊन व्यवसाय सुरू करावेत असे आवाहन केले.

      प्रथमतः जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिकांच्या हस्ते विविध ठिकाणी विकास कामांचा शुभारंभ करण्यात आला. त्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. त्यांचा नागरी सत्कार ग्रा.पं. सदस्या माधुरी सावंत, सरिता यादव, मायावती तराळ, सुनिता मगदुम यांच्या हस्ते मानपत्र, शाल श्रीफळ, बुके देऊन झाला. त्यांचा गावातील विविध संस्थांच्या वतीने पदाधिकाऱ्यांने सत्कार केला.पं.स. सदस्य उत्तम सावंत यांचा सत्त्कार रावसाहेब चौगुले यांच्या हस्ते करण्यात आला.

     गायरान बचाव कृती समितीचे समन्वयक माजी उपसरपंच शिवसेना शहरप्रमुख  सुरेश कांबरे यांचा सत्कार अध्यक्षा शौमिका महाडिक यांच्या हस्ते झाला.यावेळी अवधूत मुसळे, अवीनाश पाटील,सतीश चौगुले, प्रदीप लोहार, श्रीकांत सावंत यांनी मनोगते व्यक्त केली.

     प्रस्तावित रिंगरोड नागांव ते मौजे वडगांव फाटा रस्ता ( ५ कोटी ४० लाख रू.), सार्वजनिक बांधकाम विभागामार्फते मौजे वडगांव ते पेठ वडगांव रस्ता ( 3 कोटी रू. ) राष्ट्रीय पेयजल योजना  (९१.९९ लाख रू.), तांडा वस्ती योजनेअंतर्गत धनगर गल्ली येथे रस्ता व गटर्स ( ७ लाख रु.),२५ /१५ फंडातून नरसिंह मंदिर सभागृह ( ५ लाख रू.) नाविण्यपुर्ण योजनेतून दलित वस्तीमध्ये पाणी शुध्दीकरण उपकरण ( ३ लाख ५ हजार रू.), नविन वसाहत  व चर्मकार समाज डांबरीकरण ( १०लाख रू.) गावातील अंतर्गत पाईपलाईन बदलणे ( ७ लाख) सार्वजनिक स्मशानभूमी संरक्षक भिंत  (५ लाख)  आदी विकास कामे सुरू आहेत.

          यावेळी ग्रामसेवक व्ही.व्ही. कांबळे, अॅड. विजय चौगुले, अवधूत मुसळे, धोंडिबा चौगुले, बाळासो चौगुले, माजी सरपंच यासीन मुल्ला, संजय सावंत, अविनाश पाटील, सुनिल खारेपाटणे, आनंदा थोरवत आदीसह ग्रा.पं. सदस्या व मान्यवरांसह ग्रामस्थ मोठ्या संख्येनी उपस्थित होते.स्वागत स्वप्नील चौगुले यांनी केले.   

     फोटो

मौजे वडगांव मध्ये जि.प. अध्यक्षा शौमिका महाडिक यांचा नागरी सत्कार करतांना ग्रामपंचायत सदस्या व मान्यवर

Friday, 25 January 2019

रा.शाहू विद्यामंदिर क.बावडा येथे राष्ट्रीय मतदार दिन उत्साहात साजरा


मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक 11 ,कसबा बावडा मध्ये 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिन साजरा करण्यात आला शाळेचे मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी प्रास्ताविक मध्ये राष्ट्रीय मतदार दिनाचे महत्व पटवून सांगितले. मृणाली दाभाडे या विद्यार्थिनीने मतदान प्रतिज्ञा विद्यार्थ्यांना सांगितली. मतदान अधिकारी अनिल पाटील यांनी राष्ट्रीय मतदार दिन व मतदान का करावे त्याचे महत्व सांगितले . सुजाता आवटी मॅडम यांनी मुलींनीसुद्धा आपल्या भागामध्ये आपल्या आई-वडिलांना पालकांना व मंडळांना मतदान दिनाचे महत्त्व समजून सांगावे असे आवाहन केले. 

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मतदान अधिकारी  संजय शेळके,बाळासो पाटील,श्रीमती ओंबासे मॅडम यांनी सहकार्य केले, कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शिक्षक उत्तम कुंभार,सुशील जाधव शिवशंभू गाटे,जे बी सपाटे ,आसमा तांबोळी, तमेजा मुजावर, मंगल मोरे, हेमंतकुमार पाटोळे यांनी सहकार्य केले  कार्यक्रमाचे आभार सहावी ची विद्यार्थिनी निशिका शिंदे यांनी  मानले .प्रणव शिंदे ,यश घाडगे, दिशा कांबळे यांनी राष्ट्रीय मतदान च्या घोषणा दिल्या

Wednesday, 9 January 2019

चिमुकल्यांनी भरवला बाजार


आज प्र . चिखली ता . करवीर या गावात प्रथमच बाजार भरला तो बाजार छ . शिवाजी हायस्कुल मध्ये शिकणाऱ्या चिमुरड्यांनी भरवला, काही विदयार्थी भाजी विक्रते होते , काही फळे विक्रते होती , काही खमंग कोल्हापुरी खादय पदार्थांचे स्टॉल  लावले होते , काही मनोरंजनात्मक खेळाचे  स्टॉल होते , या उपक्रमाला गावकऱ्यांनी मोठ्ठा प्रतिसाद दिला , 


या बाजाराला शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा . श्री एस के पाटील, गावचे सरपंच , माजी सरपंच ग्रामपंचायत सदस्य , गावातील वरिष्ठ मंडळी , महिला वर्ग , युवक  वर्ग , यांनी  भेटी दिल्या व गरजेच्या वस्तु खरेदी केल्या, यातुन मुलांना व्यवहारज्ञान , संवाद कौशल्य , आकडेमोड याचे ज्ञान होते असे शाळेचे मुख्याध्यापक श्री डी एस नारकर सर यांनी सांगितले या कार्यक्रमासाठी विदयार्थ्यांचे पालक , गावातील नागरीक , ग्रामपंचायत चिखली , शाळेतील शिक्षक श्री राजमाने सर, श्री आर .एस . पाटील सर , सौ बोरूडे मॅडम , श्री ए .एस  पाटील, सौ चौगुले मॅडम , सौ गायकवाड मॅडम , श्री चेचर सर ,श्री सतिश लोहार सर , श्री विरकर सर, लक्ष्मी विदयालय मुख्या . सौ पोवार मॅडम, सौ पाटील मॅडम , सौ . माने मॅडम , श्री अतिश लादे सर व शिक्षक इतर कर्मचारी श्री बिरांजे , श्री माने , श्री मांगलेकर यांचे सहकार्य या उपक्रमास लाभले एक वेगळा आनंद गावकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता .

Thursday, 3 January 2019

"खिद्रापूर" येथे रविवार १३ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन


अवधूत मुसळे


      हेरले / प्रतिनिधी दि. २/१/१९

  कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन (सलंग्न मराठी पत्रकार परीषद) च्या वतीने शिरोळ तालुक्यातील "खिद्रापूर" येथे रविवार १३ जानेवारी रोजी पत्रकार दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

     या पत्रकार दिन कार्यक्रमाचे अध्यक्षपद श्रीमंत शाहू छत्रपती महाराज भूषवणार आहेत. प्रमुख पाहुणे पद्ममश्री डॉ. शिवराम भोजे आहेत. प्रमुख उपस्थिती मराठी पत्रकार परीषद विभागीय सचिव समीर देशपांडे, जिल्हा अध्यक्ष चारूदत्त जोशी, पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे, उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थित होणार आहे. 

    या कार्यक्रमाचे संयोजन कौन्सिल मेंबर दगडू माने, शिरोळ तालुका अध्यक्ष संतोष तारळे , कार्याध्यक्ष संतोष बामणे , विनोद पाटील यांनी केले आहे. प्रथम सत्रात सकाळी ११ वाजता सभासद नोंदणी, खिद्रापूर पर्यटन स्थळास भेट व स्नेहभोजन, द्वितीय सत्र १.३० वा."जागल्या" स्मरणिकेचे प्रकाशन, जिल्हा  व  तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार वितरण मान्यवरांचे हस्ते व त्यांचे मौलीक मार्गदर्शन आदी कार्यक्रम संपन्न होणार आहेत . 

   जिल्हा व तालुका उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार प्राप्त पत्रकार खालीलप्रमाणे आहेत.

    जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार -नंदकुमार राजाराम कांबळे (कागल ),महालिंग दत्तात्रय पाटील ( जि. बेळगांव) जिल्हा उत्कृष्ट सेवा पुरस्कार - प्रा.रवींद्र  बाबासो पाटील (कबनूर)

       तालुका उत्कृष्ट पत्रकार - संपत रामाणा पाटील (चंदगड ) मुकुंद चंद्रकांत पवार  (शाहुवाडी)इकबाल महंमदहनिफ रेठरेकर --(गगनबावडा) डॉ. निवास महादेव वरपे  (करवीर),  प्रकाश आनंदराव खतकर (भुदरगड)मधुकर शिवाजी किरुळकर  (राधानगरी)विवेक यशवंत दिंडे (हातकणंगले)विनायक हिंदुराव पाटील  (गडहिंग्लज)धनाजी सदाशिव गुरव  (पन्हाळा) संतोष सुभाष बामणे  (शिरोळ ) समीर जीवनराव कटके (कागल )रमेश श्रीपती चव्हाण (आजरा)अनिल राजू तोडकर  (हातकणंगले)

      कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशच्या पत्रकार दिनाच्या कार्यक्रमास जिल्हयातील सर्व पत्रकारांनी उपस्थित राहावे. असे आवाहन संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.

Wednesday, 2 January 2019

हेच ते डायलॉग्ज ज्यांनी कादर खान अजरामर झाले

मुक़द्दर का सिकंदर - 1978

। 'सुख तो बेवफ़ा है आता है जाता है, दुख ही अपना साथी है, अपने साथ रहता है। दुख को अपना ले तब तक़दीर तेरे क़दमोंं में होगी और तू मुक़द्दर का बादशाह होगा।'. 


कुली - 1983. 

 - 'बचपन से सर पर अल्लाह का हाथ और अल्लाहरख्खा है अपने साथ, बाजू पर 786 का है बिल्ला, 20 नंबर की बीड़ी पीता हूं और नाम है 'इक़बाल'।'. 


सत्ते पे सत्ता- 1982

'दारू पीता नहीं है अपुन, क्योंकि मालूम है दारू पीने से लीवर ख़राब हो जाता है ! 


अग्निपथ- 1990


'विजय दीनानाथ चौहान, पूरा नाम, बाप का नाम दीनानाथ चौहान, मां का नाम सुहासिनी चौहान, गांव मांडवा, उम्र 36 साल 9 महीना 8 दिन और ये सोलहवां घंटा चालू है। '


अंगार - 1992. 

'ऐसे तोहफ़े (बंदूकें) देने वाला दोस्त नहीं होता है, तेरे बाप ने 40 साल मुंबई पर हुकूमत की है इन खिलौनों के बल पर नहीं, अपने दम पर। '


बाप नंबरी बेटा दस नंबरी 

  • लानत है, ना पेट में दाना है, ना लोटे में पानी है, ना बंडल में बीडी है, ना माचिस में तीली है- 

मुकद्दर का सिकंदर

जिंदा हैं वो लोग जो मौत से टकराते हैं। मुर्दों से बदतर हैं वो लोग जो मौत से घबराते हैं।

अपन फेमस आदमी। बड़ा-बड़ा पेपर में अपनका छोटा-छोटा फोटो छपता है। लकी मैन। 

ऐसा तो आदमी लाइफ में दोईच टाइम भागता है, ओलिंपिक का रेस हो या पुलिस का केस हो...'

कादर खान यांना श्रद्धांजली !