कोल्हापूर, दि. 22 : जिल्ह्यातील सर्व बेकरी, फरसाण व मिठाई दुकाने पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष दौलत देसाई यांनी आज दिले.
जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्ग वाढू नये म्हणून विविध प्रतिबंधात्मक योजना करण्यात येत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये म्हणून जिल्हा हद्दीत विविध प्रतिबंधात्मक आदेश तसेच जीवनावश्यक वस्तू व अत्यावश्यक सेवा वगळून इतर सर्व उद्योग व सेवा पुरविणाऱ्या आस्थापनांना बंदी घालण्याबाबतचे आदेश निर्गमित करण्यात आलेले आहेत.
'त्यानुसार जिल्ह्यातील सर्व बेकरी, फरसाण व मिठाई दुकाने पुढील आदेश होईपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या आदेशाचे पालन न करणाऱ्या कोणतीही व्यक्ती अथवा संस्थेवर भारतीय दंड संहिता 1860 (45) याच्या कलम 188 अन्वये व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदी प्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल, असेही या आदेशात म्हटले आहे.