तर अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना उणे 3 (-3) अप्रुवल रेटिंग पॉईंट्स मिळाले आहेत. 10 नेत्यांच्या या यादीमध्ये ट्रम्प आठव्या क्रमांकावर आहेत. कोरोना संकटाच्या वेळी जेव्हा प्रत्येक देश स्वतःबद्दल आणि आपल्या लोकांचा विचार करत असताना, अशा काळातही मोदींनी पुढे येऊन अमेरिकेसह इतर देशांनाही मदत केली. अत्यावश्यक औषधांच्या निर्यातीवरील बंदी काढून त्यांनी मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
Wednesday, 22 April 2020
कोरोना लढ्यात जगभरात मोदींचे स्थान अव्वल, ट्रम्प पोहोचले तळाला
संपूर्ण जगात कोरोना विषाणूंच्या लढाईत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Narendra Modi) वर्ल्ड लिडर्सला मागे टाकत पहिल्या क्रमांकावर पोहोचले आहेत. अमेरिकेतील ग्लोबल डेटा इंटेलिजेन्स कंपनी (Global Data Intelligence) मॉर्निंग कन्सल्ट पॉलिटिकल इंटेलिजेन्सने (Morning Consult Political Intelligence) एक रेटिंग यादी जाहीर केली आहे. कोरोना व्हायरस संकटाच्या पार्श्वभूमीवर जगातील नेत्यांची कार्य करण्याची क्षमता आणि त्यांच्यावरील लोकांचा विश्वास लक्षात घेऊन हे रेटिंग जाहीर करण्यात आलं आहे. मोदी यांचं अप्रुवल रेटिंग (Approval Rating) जगातील इतर सर्व नेत्यांहून सर्वात वरच्या क्रमांकावर आहे. या रेटिंगमध्ये नरेंद्र मोदी 68 अप्रुवल पॉईंट्ससह पहिल्या क्रमांकावर आहेत.
About mh9 NEWS
Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.