Wednesday, 29 April 2020

चिंचवाड ग्रामपंचायतीस थर्मल गन भेट

चिंचवाड ग्रामपंचायतीस थर्मल गन भेट
गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
ता. २९ 
जगभर व संपूर्ण भारतात थैमान घातलेल्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आपल्या गावास कोरोना पासून सुरक्षित राखण्यासाठी  बुधवार
 (ता.२९) रोजी ग्रामपंचायत चिंचवाड येथे गावातील सामाजिक कार्यकर्ते व प्रतिष्ठित नागरिक वसंत आण्णाप्पा आंबी यांनी कोरोना प्रादुर्भाव टाळण्यसाठी बॉडी टेम्प्रेचेर चेक करण्यासाठी थर्मल गन  ग्रामपंचायतीस भेट दिली. यामुळे गावातील नागरिकांचे बॉडी टेम्प्रेचेर सुरक्षित अंतर ठेवून चेक करणे सोपे झाले आहे. सदर थर्मल गण ग्रामपंचायतीस भेट दिल्याबद्दल ग्रामस्थांच्या वतीने वसंत आंबी यांचे आभार व्यक्त करण्यात येत आहे. गन ग्रामपंचायतीस प्रदान करताना वसंत आंबी ,अमोल आंबी, सरपंच सुदर्शन उपाध्ये ,उपसरपंच बाबुराव कोळी, प्रकाश पाटील, शितल पाटील, ग्रा. पं.सदस्य, ग्रा. वि. अ.विजय माळी ,आरोग्य सेवक राकेश घोडके, आरोग्य सेविका वर्षा पाटील, आशा वर्कर्स ,ग्रा. पं.कर्मचारी उपस्थित होते.

फोटो 
चिंचवाड ( ता. करवीर) ग्रामपंचायतीस थर्मल गन प्रदान करताना वसंत आंबी, सरपंच सुदर्शन उपाध्याय व मान्यवर

3 comments: