महाराष्ट्र राज्याचे आरोग्य राज्यमंत्री नामदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या सोशल फौंडेशन च्या वतीने कोरोना आपत्ती च्या पार्श्वभूमीवर शिरोळ तालुक्यातील संपूर्ण जनतेची थर्मल टेस्ट करण्याचा उपक्रम हाती घेतला आहे,
या तपासणी मुळे जागतिक आरोग्य संघटनेने घालून दिलेल्या प्रमाणकानुसार प्रत्येक व्यक्ती च्या शरीरातील तापमानाची तपासणी होते,अतिरिक्त तापमान असणाऱ्या माणसाला कोरोना ची इतर लक्षणे आहेत का याची पडताळणी करून त्यातून संशयित शोधण्यास मदत होते. येथील आरोग्य विभाग, ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स ,अंगणवाडी सेविका, यांच्या मदतीने संपूर्ण गावांतील लोकांची टेस्ट घेण्यात आली.यावेळी सरपंच हर्षदा पाटील ,उपसरपंच सुदर्शन भोसले, पोलिस पाटील सुनिता पाटील ,आरोग्य विभागाचे कर्मचारी, ग्रामपंचायत सदस्य ,माजी उपसभापती हरिश्चंद्र पाटील ,माजी सरपंच उमेश पाटील माजी उपसरपंच रणजीत पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.