गडमुडशिंगीत उद्योजकाकडून
300 कुटुंबांना धान्यवाटप
गांधीनगर : प्रतिनिधी
लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर हातावरचे पोट असणाऱ्या गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील 300 कुटुंबाना उद्योजक अभिजीत जाखले यांनी अन्नधान्य व भाजीपाला वाटप केले.
कोरोनो संकटामुळे मजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या कुटुंबापुढे अन्नधान्याचा प्रश्न निर्माण झाला होता. अशा गरजू कुटुंबांचा शोध घेऊन अभिजीत जाखले यांनी स्वखर्चातून अन्नधान्य व भाजीपाला वाटप केले. दहा दिवस पुरेल इतक्या धान्याचे व भाजीपाल्याचे वाटप केले. यावेळी एस पी स्पोर्टचे सदस्य व उपसरपंच तानाजी पाटील, वैभव गवळी, संतोष मेहतर, आबा पाटील, संजय सातपुते, प्रमोद शिरगावे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
.......फोटो
गडमुडशिंगी (ता. करवीर) येथील उद्योजक अभिजीत जाखले यांनी गरीब व गरजू कुटुंबियांना अन्नधान्य व भाजीपाल्याचे वाटप केले.