लॉक डाऊन वाढल्याने शेतीच्या औताचे दर झाले दुप्पट, मजुरीचेही दर वाढले शेतकरी चिंतेत
देशात लॉक डाऊन सुरू होऊन तेरा दिवस झाले. पण पुन्हा लॉक डाऊन वाढल्याने त्याचा परिणाम शेती वर झाला आहे. शेतीच्या मशागती साठी उसाच्या भरणी साठी बैल जोडीचे औत घ्यावे लागते त्याचे दर आता दुप्पट झाले आहेत.
शेतीच्या कामासाठी मजूरही मिळेनासे झाले आहेत. मजूरही घरातून बाहेर पडण्यासाठी घाबरत आहेत. मजुरीचे दर ही वाढले आहेत भांगलनी साठी आता ५० रुपयावरून ( आठ बारा साठी ) आता ७० रूपये मजुरी झाली आहे. कोरोना च्या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी देशात लॉक डाऊन करण्यात आला आहे त्यामुळे पेट्रोल, डिझेल सहजा सहजी उपलब्ध होत नाही त्यामुळे शेतीच्या मशागती साठी वापरण्यात येणारे पॉवर टिलर, ट्रॅक्टर यांचेही भाडे वाढले असून तेही शेतकऱ्यांना लवकर उपलब्ध होत नाही.
काही दिवसांपूर्वी बैलाच्या औताचा दर दिवस भरासाठी ७०० रुपये होता तो आता १२०० ते १५०० रुपयांपर्यंत गेला आहे निगवे खालसा गावात परिसरात तालुक्यात हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच शेतकऱ्यांकडे बैल जोड्या आहे. त्यामुळे बैलाच्या औताला आता खेडेगावात चांगलाच भाव आला आहे. एखाद्याला औत पाहिजे भरणी साठी तर औत असणाऱ्या शेतकऱ्याच्या घराच्या चकरा माराव्या लागतात.
मार्च एप्रिल मे च्या दरम्यान उसाच्या भरणीचे काम मोठ्या प्रमाणात सुरू असते उसाच्या सरी मधील अंतर लहान असेल तर शेतकऱ्याला उसाची भरणी करण्यासाठी बैलाचे औत घेण्याशिवाय पर्याय च नसतो तिथे पॉवर टिलर ही चालत नाही. त्यामुळे शेतऱ्यांना भरणी करण्यासाठी तिष्ठत बसावे लागत आहे
एप्रिल महिन्या च्या अखेरीला खरिपाच्या कामाला खऱ्या अर्थाने जोर येणार आहे नांगरट करणे, फळी मारणे, जमीन तयार करणे या सारखी शेतीची कामे सुरू होणार आहेत. ३० एप्रिल नंतर लॉक डाऊन चे काय होणार याचा अंदाज येत नसल्याने पुढे होणार तरी काय? याने शेतकऱ्याच्या चिंतेत भर पडली आहे.