Wednesday, 3 June 2020

mh9 NEWS

कोल्हापूरला दिलासा - आजअखेर 630 रूग्णांपैकी 282 रूग्णांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील


कोल्हापूर,दि. 3 जून 2020 

आजअखेर 630 रूग्णांपैकी 282 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आज सकाळी 10 वाजता 74 प्राप्त अहवालापैकी 73 अहवाल निगेटिव्ह (630 पैकी यापूर्वीच्या एकाचा दुसरा अहवालही पॉझिटिव्ह आहे, असे मिळून एकूण 74) तर आज सकाळपर्यंत एकही अहवाल पॉझीटिव्ह आलेला नाही. आजअखेर जिल्ह्यात एकूण 342 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली. 
 आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 50, भुदरगड- 65, चंदगड- 71, गडहिंग्लज- 67, गगनबावडा- 6, हातकणंगले- 6, कागल- 53, करवीर- 12, पन्हाळा- 24, राधानगरी- 63, शाहूवाडी- 167, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-21 असे एकूण 623 आणि पुणे -1, सोलापूर-3, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 इतर जिल्हा व राज्यातील सात  असे मिळून एकूण 630 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे. 
जिल्ह्यातील एकूण 630 रूग्णांपैकी 282 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 6 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 342 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

mh9 NEWS

About mh9 NEWS

Author Description here.. Nulla sagittis convallis. Curabitur consequat. Quisque metus enim, venenatis fermentum, mollis in, porta et, nibh. Duis vulputate elit in elit. Mauris dictum libero id justo.

Subscribe to this Blog via Email :