सैनिक टाकळी प्रतिनिधी
सलून व्यवसाय सुरु करणेस परवानगी द्या : खासदार धैर्यशील माने
गेल्या तीन महिन्यापासून बंद असलेला राज्यातील सलून व्यवसाय सुरु करणेस परवानगी देऊन, सलून व्यवसायिकांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी खासदार धैर्यशील माने यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
देशात पाचवा लॉकडाऊन जाहीर झाला. त्यात अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. परंतु कोरोनामुळे जाहीर टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सलून व्यवसाय गेल्या तीन महिन्यापासून बंद आहे. सरकारने दि. २२ मे २०२० पासून सरकारने नियमाच्या अधिन राहून सलून सुरु करण्यास परवानगी दिली होती. व्यावसायीकांनी सॅनिटायझर, स्वतंत्र पेपर नॅपकिन, स्वतंत्र कटिंग अॅपरन, प्रत्येकास मागणीप्रमाणे सलून किट, सोशल डिस्टन्स तसेच ग्राहकांवर येणारे बंधन यासाठी व्यवसायिकांनी दहा ते पचवीस हजार रुपये खर्च करून, व्यवसायिकांनी दुकान चालू केले ; मात्र सरकारने पुन्हा दि. ३० जून पर्यत सलून व्यवसाय बंद करण्यास सांगितले. त्यामुळे सूलन व्यवसायिक आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यामुळे सलून व्यवसायिकांना सलून सुरु करण्यास परवानगी द्यावी. तसेच त्यांना कर्नाटक शासनाच्या धर्तीवर व्यवसायिकांना नुकसानीच्या मोबदल्यात आर्थिक मदत द्यावी अशी मागणी खासदार माने यांनी केली आहे.