कोल्हापूर / प्रतिनिधी
शिक्षण आयुक्त कार्यालय पुणे येथील शुक्रवार दिनांक ७ रोजी चे महाराष्ट्र राज्य अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात आले.या आंदोलनामध्ये महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यामधून जवळपास ५५० पर्यंत सेवानिवृत्त कर्मचारी,शिक्षक शिक्षकेतर बंधू-भगिनी, मयत कर्मचारी यांचे कुटुंबीय,उपस्थित होते.
या आंदोलनमध्ये मयत कर्मचाऱ्यांचे कुटुंबीयांना , सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना तसेच २००५ पूर्वी अंशतः अनुदानित शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना १९८२ची जुनी पेन्शन योजना लागू करावी याकरिता पुणे आयुक्त कार्यालय येथे तीव्र आंदोलन करण्यात येवून मागणीचे निवेदन देवून शिक्षण आयुक्त पुणे यांच्यासोबत चर्चा करण्यात आली. चर्चेमध्ये संघटनेचे राज्याध्यक्ष प्रा.विजय शिरोळकर, कार्याध्यक्ष प्रा.योगेश्वर निकम, उपाध्यक्ष प्रा. संपत कदम, राज्य संपर्क प्रमुख भास्कर देशमुख, पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. गोविंद गोडसे आदींनी
सहभाग घेतला. कुटुंब प्रमुख म्हणून पेन्शन विषयी तीव्र भावना शासनास कळविण्याचे शिक्षण आयुक्त यांनी आश्वासित केले.
राज्य कार्यकारणी सर्व पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष यांच्या वतीने धरणे आंदोलनआयोजित करण्यात आले होते. पुणे जिल्हाध्यक्ष प्रा. डॉ. गोविंद गोडसे आणि जिल्हा कार्यकारणीने आंदोलनाची तयारी उत्तम प्रकारे केली होती. राज्याच्या कानाकोपऱ्यामधून आलेले सर्व उपस्थित शिक्षक शिक्षकेत्तर बंधू-भगिनी त्यांनी एकत्र येऊन जुनी पेन्शन मिळाल्याशिवाय थांबायचं नाही अशा भावना मांडून निर्धाराने तीव्र आंदोलन छेडले. महाराष्ट्र राज्य सरकारने अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी जुनी पेन्शन बाबत निर्णय न घेतल्यास अर्थसंकल्पीय अधिवेशन कालावधीमध्ये आझाद मैदान येथे आमरण उपोषण छेडण्यात येईल असा निर्वाणीचा इशारा संघटनेचे अध्यक्ष प्रा. विजय शिरोळकर यांनी देवून आंदोलनाची सांगता करण्यात आली.
फोटो
प्रा. विजय शिरोळकर शिक्षण आयुक्त पुणे सचिंन्द्र प्रताप सिंह यांना निवेदन देताना शेजारी संघटनेचे पदाधिकारी.