हेरले (प्रतिनिधी )
मौजे वडगांव (ता . हातकणंगले) येथील ग्रामपंचायतीच्या वतीने १५वा वित्त आयोग या निधीतून महिला व किशोरवयीन मुलींना कौशल्य विकास योजनेअंतर्गत ज्ञानदिप बहुउद्देशीय संस्थेमार्फत
शिवण क्लास व विविध कौशल्य विकास प्रशिक्षण शिबिराचे आयोजन ग्रामपंचायतीच्या हॉल मध्ये करण्यात आले होते.
यावेळी ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे पाटील यांनी महिला व किशोरवयीन मुलींना कौशल्य विकासातून स्वयंरोजगार व स्वच्छतेसंबंधी मार्गदर्शन केले तर आरोग्य अधिकारी जाधव मॅडम यांनी कॅन्सर व टिबी सारख्या आजारा संदर्भात माहिती दिली . सदर शिबिरामध्ये १५० हून अधिक महिला व किशोरवयीन मुली उपस्थित होत्या .
सदर कार्यक्रमात महिलांनी मिळविलेल्या यशाचे कौतूक केले . आशा प्रकारच्या उपक्रमाची सातत्याने आवश्यकता असल्याचे उपस्थितांनी अधोरेखित केले . या ग्रामपंचायतीच्या पुढाकारामुळे महिलांना स्वावलंबनाचे बळ मिळत आहे . या कार्यक्रमाच्या यशस्वीतेमुळे उपस्थित महिलांनी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले व भविष्यात देखील आशा प्रकारचे उपक्रम राबवावीत अशी अपेक्षा व्यक्त केली . यावेळी हळदी कुंकू व प्रशिक्षणार्थी महिलांना प्रमाणपत्र व ग्रामपंचायतीच्या वतीने हॅन्डवॉश भेट देऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली .
यावेळी सरपंच कस्तुरी पाटील , उपसरपंच रघूनाथ गोरड , ग्रामपंचायत अधिकारी भारती ढेंगे पाटील, सविता सावंत, सुनिता मोरे , सुवर्णा सुतार, दिपाली तराळ , मधुमती चौगुले, मिनाक्षी आकिवाटे, सुरेश कांबरे , सुनिल खारेपाटणे, स्वप्नील चौगुले , नितिन घोरपडे, अविनाश पाटील , डॉ. पंकज पाटील , जाधव मॅडम , यांच्यासह आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रा पं . कर्मचारी व बचत गटाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .