हेरले / प्रतिनिधी
हेरले येथील हेरले मौजे वडगाव रस्त्यावरील पाटील मळ्याजवळील विहिरीला संरक्षक कठडा बांधण्याची आवश्यकता आहे या ठिकाणी विहिरीला चार ते पाच वर्षापासून तात्पुरत्या स्वरूपात पत्र्याची पाने लावून संरक्षण भिंत उभी केली आहे त्यामुळे या ठिकाणी कोणत्याही क्षणी वाहन विहिरीत कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे.रस्ता एका बाजुला खचला आहे, त्यामुळे अधिक धोका निर्माण झाला आहे. येथील मार्गावरून पेठवडगाव, शिरोली एमआयडीसी व पुढे महामार्गाला जाणाऱ्या वाहनांची मोठी वर्दळ असते शिवाय या मार्गावरून स्कूलबसेसची नेहमी ये जा चालू असते तरी सदर विहिरील कठडा बांधून घेणे अथवा लोखंडी ग्रील लावणे आवश्यक आहे या बाबत जिल्हा परिषद बांधकाम विभागाने वेळीच खबरदारी घेऊन या विहिरीला संरक्षक कठडा बांधून घ्यावा अशी नागरिकांच्यातून मागणी होत आहे.