कंदलगाव ता .१७ ,
शेती उत्पादन व भाजीपाला शहरात विक्रीसाठी आणताना कणेरी , गो . शिरगाव मार्गे कसरत होत असून कंदलगाव मार्गे कोगील केएमटी बस सुरू करावी . अशी मागणी अनेक वर्षापासून शेतकरी वर्गाची असून या मागणीकडे मात्र प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे .
कंदलगाव , कोगील सह कंदलगाव कोडी व गिरगाव येथील शेतकऱ्यांची शेती मोठ्या प्रमाणावर असल्याने शेती उत्पादनाची ओझी घेऊन किमान चार कि.मी. अंतर चालत गाठावे लागते . या रूटवर केएमटी बस सेवा सुरू झाली तर शेतकऱ्यांची कसरत कमी होऊन वेळही वाचेल .
कोट - कंदलगावापासून सुमारे ४ कि .मी. वर कोगील असून या ठिकाणी सर्व शेतकरी वर्ग आहे . शेती उत्पादन वाहतूक करताना मोठी कसरत होते . कंदलगाव मार्गे बस सेवा सुरू केल्यास त्रास होणार नाही .
शिवाजी रणदिवे , माजी सरपंच
No comments:
Post a Comment