Wednesday, 17 June 2020

शेंडापार्कात पावसाचे पाणी रस्त्यावर , नालेसफाईचा अभाव ..

कंदलगाव ता .१७ , 
      गेल्या आठवड्या पासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे शेंडा पार्क परिसरातील रस्त्यावरून पाणी वाहत असून पदचारी व दुचाकी धारकांची कसरत होत आहे .
      या परिसरात पावसाळ्या पूर्वीची नालेसफाई झाली नसून नाल्यामध्ये कचरा व झुडपांची अडचण झाल्याने पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहत आहे . या रस्त्यावरून वाहणांचा वेग भरधाव असल्याने पाणी आंगावर येईल या भितीने पदचारी व दुचाकी धारकांची कसरत होत आहे .
        संबधीत प्रशासनाचे वेळीच लक्ष घालून परिसरातील नाले स्वच्छ करून घ्यावेत अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे .

- नोकरदारांना व महिलांना या रस्त्यावरील वाहणाऱ्या पाण्यामुळे मोठी कसरत होत असून महापालिकेने नाले स्वच्छ करून नागरीकांची कसरत कमी करावी .

 आय्याज डांगे , स्थानिक प्रवाशी


फोटो  -शेंडा पार्क येथे नालेसफाई अभावी रस्त्यावर वाहणारे पाणी .
( छायाचित्र - प्रकाश पाटील )

No comments:

Post a Comment