कांशीराम गोविंद जाधव,
B sc. D Ed.
मु. मानेवाडी. पो.कोतोली
ता.पन्हाळा. जि. कोल्हापूर
शाळा-कन्या वि. मं. पोर्ले/ठाणे
ता.पन्हाळा जि. कोल्हापूर.
दि.३१/५/२०२०हा दिवस म्हणजे सरांचा सेवा निवृत्तीचा दिवस.यानिमित्त सरांचा थोडासा परिचय.
सरांचा जन्म १९६२चा.त्यांची १०वी १९८० साली झाली. या नंतर त्यांच्या आयुष्यामध्ये बरेच चढ-उतार आले.याच कालावधीमध्ये त्यांनी B Sc.पूर्ण केली.यानंतर त्यांनी १९८९ला D Ed.पदवी घेऊन १९९०ला वि. मं. दळवेवडी ता. पन्हाळा.येथे नोकरीची सुरवात केली.येथे त्यांनी ३वर्षे चालत येऊन-जाऊन सेवा बजावली.यानंतर त्यांची बदली आळवे. ता.पन्हाळा येथे बदली झाली. या त्यांच्या शिवशेजारील गावामध्ये १८वर्षे आपले कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडले.यानंतर त्यांची बदली पुनाळ ता.पन्हाळा येथे झाली.येथे त्यांनी कशीबशी १वर्ष सेवा बजावली आणि त्यांची२०१२साली प्रशासकीय बादली पाटीलवाडी ता.शाहूवाडी येथे झाली.या कालावधीत त्यांना मणक्याच्या त्रास जाणवू लागला. मणक्याचे शस्त्रक्रिया झाली.फक्त याच कालावधीत सरांनी १५दिवसाची दिर्घ मुदतीची रजा खर्च केली.याव्यतिरिक्त कधीच दिर्घ मुदतीची रजा कधीही खर्च केलेली नाही व पूर्ण सेवेत हक्काच्या वर्षांच्या किरकोळ १२रजा पण कधी संपवलेल्या नाहीत.असं बोलण्याच्या ओघात सांगितले.हे त्यांचं वागणं म्हणजे शिक्षकी पेशाबद्दल असणारी निष्ठा किती तिव्र आहे हे आमच्या लक्षात येत.
जाधव सर,आजची दि.३१/५/२०२०तुमची सेवानिवृत्ती ही मनाला चटका लावणारी आहे. याची कारणेही अनेक आहेत.आजपासून तुमच्यासारखी वडीलधारी माणसे आमच्यामध्ये नसणार याची खंत वाटते.ज्यावेळी या शाळेमध्ये हजर झालो त्यावेळी तुमची नोकरी उणीपुरी २वर्षे राहिली होती. त्यावेळी मनामध्ये सहज विचार आला,आता हा माणूस आपल्या शिल्लक राहिलेल्या रजा संपवण्याच्या नादाला लागणार.परंतु प्रत्यक्षात अनुभव मात्र उलटाच आला.हा माझ्यासाठी झालेल्या नोकरीतला धक्काच होता.
दुसरी गोष्ट म्हणजे रिटायरमेंटची अवघी दोन वर्षे शिल्लक राहिली असताना स्टाफ भरपूर असताना,सर्वात जेष्ठ असताना, कोणताही एक वर्ग घेण्यासाठी कायम आघाडीवर राहिला तो घेतला आणि त्या वर्गांची सर्व कामे सर्वांच्या अगोदर पूर्ण करून दिली.या गोष्टीचा माझ्यासारख्यालाअभिमान वाटतो.
तसेच शाळेत एखादी अडचण निर्माण झाली तर अगदी इतिहास मधील शेलारमामा सारख पुढं येऊन ती अडचण स्वत: अंगावर घेऊन त्यामधून शाळेतील स्टाफ ची सुटका करताना मी तुम्हाला पाहिलंय.
शाळेमध्ये इंग्रजी चे अध्यापन करताना तुम्ही वैष्णवी हुपरे,अर्पिता पाटील,सनावी ससाणे या मुलींना दिलेले सहा-सातशे इंग्रजी शब्दांचा संग्रह वह्या मी पाहिलेल्या आहेत.त्या त्यांनी जपून पण ठेवलेल्या आहेत.
हे सर्व तुमचं कार्य माझ्यासारख्याला अभिमानास्पद वाटत.आजकाल चरण स्पर्श करावे म्हटलं तर असे चरण शोधावे लागतात.पण तुमच्यासारखी व्यक्ती समोर आली तर,आमचे हात तुमच्या चारणाकडे गेल्याशिवाय राहणार नाहीत.
धन्यवाद सर.
तुमचे आयुष्य सुख, समृद्धीने भरून जावो.हीच ईश्वर चरणी प्रार्थना......