*
कसबा बावडा:
कसबा बावड्यातील प्रतिष्ठित डॉक्टर श्रीकांत सुर्यवंशी यांचा डॉक्टर दिनानिमित्त गुलाब पुष्प देऊन केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील व कुमार पोवार यांच्या हस्ते गौरव करण्यात आला.
यावेळी मनोगत व्यक्त करताना डॉ. सुर्यवंशी म्हणाले,
नागरिकांनी आरोग्याबद्दल जागरुकता पाळणे गरजेचे आहे.वैयक्तिक स्वच्छता व परिसरातील स्वच्छता राखावी.घरातील पिण्याचे पाणी, स्वछतागृह ,वैयक्तिक कपडे,हातरुमाल,स्वच्छता असणे महत्त्वाचे आहे.कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्क स्वच्छ वापरावे. दुकानामध्ये,बाजारातील वस्तू किंवा भाजीपाला आणताना सोशल डिस्टन्स पाळावे.साधा ताप, खोकला,डोकेदुखी असेल तर दुर्लक्ष करू नये.
डॉक्टरांना शुभेच्छा देताना भागातील अनिकेत कदम, अमर माने, सामाजिक कार्यकर्ते कृष्णात गवळी, विकी खामकर, सत्यजित आगळे, सदाशिव सुतार, सुदाम पोवार, अजित पाटील, वसंत पोवार इत्यादी उपस्थित होते.