Friday, 30 July 2021

इनरव्हील क्लब ऑफ सनराईज, कोल्हापूर यांच्या वतीने ऑक्सिजन हिल उपक्रम

कोल्हापूर प्रतिनिधी. 
इनरव्हील क्लब ऑफ सनराईज, कोल्हापूर
यांच्या वतीने आज दिनांक 30 जुलै 2021 रोजी ऑक्सिजन हिल हा उपक्रम राबविण्यात आला.
ऑक्सिजनची आवश्यकता गेल्या काही काळामध्ये प्रकर्षाने जाणवत आहे. पर्यावरणाचा समतोल आणि ऑक्सिजन पुरवठा इत्यादी गोष्टींचा विचार करता सामाजिक बांधिलकी जपत कोल्हापूरच्या इनरव्हील क्लब ऑफ सनराईजच्या वतीने 500 झाडे 3 टप्प्यात लावण्याचा मानस क्लब अध्यक्षा सौ. शर्मिला खोत आणि सेक्रेटरी सौ. मनीषा जाधव यांनी घेतला आहे.
या पहिल्या टप्प्यात या कार्यक्रमाची सुरुवात करताना आज टेंबलाई हिलच्या परिसरात सुमारे ... ऑक्सिजन मुबलक प्रमाणात देणाऱ्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
या कार्यक्रमाची सुरुवात श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते करण्यात आली. वृक्षांची लागवड त्यासोबतच निगा राखण्याचे कार्य असेच अविरत घडले पाहिजे. तसेच कोल्हापूरच्या चारही बाजूंनी वेढलेल्या टेकड्यांवर असा पर्यावरणसहाय्यक उपक्रम राबविला पाहिजे, यासाठी सतत  प्रयत्नशील राहणे गरजेचे आहे, असे मत मालोजी राजे छत्रपती यांनी मांडले. तसेच पुढील निगडीत कार्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये सिंहाचा वाटा उचलण्याची त्यांनी ग्वाही दिली.
अध्यक्षा सौ. शर्मिला खोत यांनी पुढील टप्प्यात होणाऱ्या कार्याबद्दल थोडक्यात माहिती दिली. तसेच मालोजीराजे छत्रपती यांच्याकडून वेळोवेळी मिळणाऱ्या सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.

तसेच क्लबच्या सेक्रेटरी सौ मनीषा जाधव यांनी (मालोजीराजे छत्रपती, महापालिका उद्यान व्यवस्थापन समिती व कर्मचारी, व सहयोगी तरुण मंडळे यांचे)आभार मानले

यासाठी उपक्रमाच्या चेअरमन सौ स्मिता खामकर यांचे मार्गदर्शन लाभले. क्लब मेंबर्ससह कोल्हापुरातील तरुण मंडळे ....... यांचे सहकार्य लाभले.
महानगरपालिका उद्यान कमिटी/विभागाचे प्रमुख.... तसेच कर्मचारी यांचे सहयोग प्राप्त झाले.
यावेळी क्लब मेंबर्सनी स्वतः वृक्षारोपण केले. यावेळी...... उपस्थित होते.

महापूरात दिसला हिंदू आणि मुस्लिम बांधवांमधल्या मूलभूत ऐक्याचा आदर्श

हातकणंगले/ प्रतिनिधी
दि.30/7/21
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात कोसळत असलेल्या पावसाच्या निमित्ताने महापूरात हिंदू आणि मुस्लिम
बांधवांमधल्या मूलभूत ऐक्याचा आदर्श वस्तुपाठच समोर उभा राहिला आहे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मागील आठवड्यातील सलग चार  दिवस रात्र अतीवृष्टी झाल्यानंतर अख्खं शहर जलमय झाले . त्यामुळे शहरात जाणारी सर्वच वाहने शहराबाहेरच
थांबवण्यात आली होती. त्यामुळे या सरकारी आणि खासगी गाडयामधल्या प्रवाशांची अन्न पाण्याविना मोठी
आडचण झालेली असताना त्यांच्या मदतीला शिरोली गावामधील मुस्लिम बांधव पुढे आले . पुणे, देवगड,
औरंगाबाद, सोलापूर अशा विविध भागातून मोठया संख्येने अलेली वाहन महापूरामुळे पूणे-बंगळूर महामार्ग
बंद झाल्यानंतर शिरोली भागातच थांबवण्यात आली. त्यामुळे सरकारी एस. टी. बसेस आणि राज्याच्या विविध
भागातील १५ हून आधिक बसेस खासगी वाहने थांबवलेली होती . अनेक वाहनांच्या रांगा शिरोली भागातील
महामार्गावर लागल्यामुळे वाहनामध्ये अडकून पडलेल्या या ७ooहून प्रवाशांची तीन दिवस मोफत जेवणाची आणि निवासाची व औषध उपचाराची  सोय स्थानिक शिरोली मदरसा मध्ये केली. हाजी अस्लम सय्यद, हाजी इकबाल देसाई, मैनुददीन मुल्ला, हाजी शिकंदर सन्दे, जमीर मुल्ला, महमंद महात, मनजूर देसाई, सलिम महात, नजीर पेंढारी, याकूब मूल्ला, मोहिददन मुल्ला, शकिल्ल किल्लेदार, जूवरे मुल्ला, जहीर इनामदार, मोहसिन देसाई, जुवेर कुरणे,
साहेबलाल देसाई व समस्त मुस्लिम समाज यासर्व मंडळीनी सहाकार्य
केले.
    फोटो
शिरोली मदरसा येथे वाहन चालक व प्रवाश्यांना भोजन वाटप करतांना मुस्लिम बांधव.

Tuesday, 27 July 2021

इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजचे कार्य कौतुकास्पद - डॉ अजितकुमार पाटील

*

कसबा बावडा : दि. 27
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समितीच्या मनपा राजर्षी शाहू विद्या मंदिर, भाऊसो महागावकर विद्यालय, प्रिन्स शिवाजी विद्यालय तसेच कसबा बावडा परिसरातील महापुरामुळे पूरग्रस्त म्हणून शाळेमध्ये वास्तव्यास असणाऱ्या पूरग्रस्तांना इनरव्हील क्लब कोल्हापूर सनराइज् च्या अध्यक्षा शर्मिला खोत,सेक्रेटरी मनीषा  जाधव व पदाधिकाऱ्यांनी जीवनावश्यक वस्तू कपडे, सॅनिटायझर, सॅनिटरी,हातरूमाल,मास्क साडी, साबण , तांदूळ,डाळ,बिस्किटे खाऊचे सोशल डिस्टन्स चे  पालन करून वाटप करण्यात आले
 शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ.अजितकुमार पाटील यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचे स्वागत केले व इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज चे आपत्तीकाळात पूरग्रस्तांना मदत करून देशाची  सेवा करत आहेत कार्य कौतुकास्पद असे गौरवोदगार काढले.

कसबा बावडा मधील जय हिंद स्पोर्ट, भारतवीर  मित्र मंडळ यांचे कार्यकर्ते सचिन चौगले, अनिकेत चौगले,अनिकेत कदम, मुरलीधर चौगले,कपिल पवार, ऋषिकेश चव्हाण, राजू शेख,नामदेव जाधव,अरविंद भोसले, मनोज कुरणे हे नगरसेवक सुभाष बुचडे यांच्या मार्गदर्शनाखाली काम करत आहेत.
भाऊसाहेब महागावकर च्या शिक्षिका वैशाली पाटील यांनी आभार मानले

Sunday, 25 July 2021

पूराच्या पाण्यामुळे रस्त्यावर अडकलेल्या ट्रकचालक व प्रवासी आदी दोनशे जणांना भोजन व नाष्टा वाटप

हेरले / प्रतिनिधी
दि.25/7/21
हेरले ( ता. हातकणंगले ) येथील दिशा पेट्रोलपंपच्या वतीने मालक माजी सभापती राजेश पाटील यांनी ट्रक चालक  व बस प्रवासी आदी दोनशे जणांना शनिवारी रात्री जेवण व रविवारी सकाळी नाष्टा वाटप करून सामाजिक बांधिलक जपली.
     सांगली -कोल्हापूर राज्यमार्गावर हेरले येथील देसाई मळा व हेरले गाव ओढयावर पूराचे पाणी दोन ते सहा फूट आले आहे. त्यामुळे हा मार्ग शुक्रवारी सायंकाळी सहा वाजल्यापासून बंद झाला आहे. या रस्त्यावरील वाहनचालक प्रवासी रस्त्यावर अडकून पडले आहेत. त्यांना शुक्रवार सायंकाळ पासून गावकरी जेवण - खाण्याची  मदत करीत आहेत.
          दिशा पेट्रोल पंपचे मालक माजी सभापती राजेश पाटील, महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती तथा जि प सदस्या डॉ. पद्याराणी पाटील, पोलिस पाटील नयन पाटील, रोहन पाटील , दिशा पेट्रोल पंपचे मॅनेजंर भरतेश चौगुले, सिनिअर मॅनेजंर अमर हांडे व कर्मचारी यांच्या वतीने  ट्रकचालक व प्रवासी आदी दोनशे जणांना भोजन व नाष्टा वाटप करण्यात आला.
       फोटो 
हेरले येथील दिशा पेट्रोल पंपच्या वतीने द वाहन चालक व प्रवाश्यांना जेवन वाटप करतांना माजी सभापती तथा जि.प. सदस्या डॉ. पद्माराणी पाटील व अन्य.

Friday, 23 July 2021

मुडशिंगी येथील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

हेरले / प्रतिनिधी

दि.23/7/21
मुडशिंगी (ता. हातकणंगले ) येथील
जय भवानी कला क्रीडा सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून व दलितमित्र डॉ. अशोकराव माने सामाजिक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीमुळे गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्यचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ.अशोकराव माने  यांच्या हस्ते करण्यात आले.
    यावेळी मंडळाचे अध्यक्ष  शिवाजी अनुसे ,  अनिरुद्ध शिंदे , संतोष शिंगाडे,  शरद पवार, बाळासो हराळे,  शामराव अनुसे,  रावसाहेब अनुसे , शिधु मंडले,  सखुबाई मंडले, संजूबाई मंडले व मुडशिंगी मधील ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
     फोटो 
मुडशिंगी येथील गरजू कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करतांना हातकणंगले विधानसभा मतदारसंघाचे भाजपा-जनसुराज्यचे नेते तथा जिल्हा परिषद सदस्य दलितमित्र डॉ.अशोकराव माने शेजारी अन्य मान्यवर.

Monday, 19 July 2021

तन्वी आयरेला १० वी परीक्षेत १००% गुण

कोल्हापूर / प्रतिनिधी

श्रद्धा मॉडर्न स्कुल अँड ज्युनिअर कॉलेज कागल या शाळेतील विद्यार्थिनी कु.तन्वी संतोष आयरे हिने  इयत्ता १० वी सेमी इंग्रजी परीक्षेत १००% गुण प्राप्त केले. त्यामुळे सर्वत्र तिचे कौतुक होत असून तिला शाळेचे प्राचार्य सलीम मुजावर, शाळेतील सर्व शिक्षक, स्टाफ ,अभिनव क्लासेसचे  उत्तम साखरे तसेच आजी श्रीमती रेखा काटकर, आई विद्या आयरे व वडील संतोष आयरे यांचे मार्गदर्शन लाभले.

राजर्षी शाहू विद्या मंदिरमध्ये ऑनलाइन केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न

**

 कसबा बावडा दि : 19 ,

कोल्हापूर शिक्षण समिती महानगरपालिका अंतर्गत मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 मध्ये पी जी आय अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद ऑनलाइन कार्यशाळा संपन्न झाली या कार्यशाळेचे प्रास्ताविक व माहिती शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी सांगितले.जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे श्रावण कोकितकर सर यांनी या कार्यशाळेचे महत्त्व सांगितले.प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूरचे प्रशासन अधिकारी एस के यादव साहेब यांनी एकूण या कार्यशाळेत संदर्भात उद्देश सांगितला.या ऑनलाइन कार्यशाळेमध्ये जयश्री सावंत, साताप्पा पाटील मनीषा साळोखे, जयश्री पुजारी, रोहिणी शेवाळे,रोहिणी शिंगे मनीषा शिंदे यांनी तज्ञ मार्गदर्शन या कार्यशाळेमध्ये आपले पीजीआय संदर्भात ऑनलाइन मिटिंग मध्ये मार्गदर्शन केले.तंत्रस्नेही निखिल पाटील,शिवशंभू गाटे, तमेजा मुजावर यांनी काम पाहिले.
या शिक्षण परिषदेमध्ये शगुन पोर्टल, नॅशनल अचीवमेंट सर्वे, शाळासिद्धी,मध्यान भोजन,गुणवत्ता विकास कार्यक्रम,गणित पेटी विज्ञान पेटी,फिट इंडिया, विज्ञान प्रयोग शाळा विद्यार्थ्यांच्या स्वसंरक्षणाचे धडे, आपत्ती व्यवस्थापन डिजिटल लॅब, शाळेच्या भौतिक सुविधा,विज्ञान प्रयोगशाळा, ग्रंथालय, खेळ तसेच शाळेच्या पायाभूत सुविधा,वर्ग आंतरक्रिया, प्रवेश निष्पत्ती मानके, कार्यक्षेत्रे तसेच एकूण या कोरोनाकाळामध्ये चाललेल्या कामाची प्रक्रिया कशा प्रकारची असावी यासंदर्भात 11 ते 1 या वेळेमध्ये ऑनलाइन नेटवर केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली.
 या परिषदेसाठी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनअधिकारी एस के यादवसाहेब शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळीसाहेब ,बाळासाहेब कांबळेसाहेब,उषा सरदेसाई व जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्थेचे श्रावण कोकितकर,आसमा पठाण यांनी सहकार्य केले या कार्यशाळेमध्ये 32 शाळेचे मुख्याध्यापक व 118 ऑनलाईन प्रशिक्षण कार्यशाळांमध्ये शिक्षक सहभागी झाले होते या सर्वांचे आभार रोहिणी शिंगे मॅडम यांनी मानले.

Monday, 12 July 2021

हेरलेचे अलगीकरण केंद्र सर्वसामान्यांचे बनले आधारवड


हेरले / वार्ताहर

हेरले ( ता. हातकणंगले) येथील ग्रामपंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, मेडिकल असोसिएशन,केमिस्ट असोसिएशन, एमआर असोसिएशन, सर्व पक्षिय समिती व सामाजिक सेवा संस्था यांच्या  वतीने सुरू असलेले अलगीकरण केद्र व उपचार केंद्र गावातील सर्वसामान्य रूग्णांना आधारवड ठरत आहे.
    कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने कोल्हापूर जिल्ह्यात थैमान घातल्यानंतर  हेरले गाव यातून कसे वाचणार? त्यामुळे गावामध्ये कोरोनाचा शिरकाव झालाच. पण याला वेळीच आळा घालण्यासाठी व गावातच गोरगरीब रुग्णांना उपचार मोफत  होण्यासाठी वैद्यकिय अधिकारी डॉ.राहुल देशमुख यांनी सर्वांना आवाहन केले. त्याला योग्य प्रतिसाद देऊन ग्रामपंचायत व गावातील खाजगी डॉक्टर्स असोसिएशन व शासकीय मार्गदर्शका प्रमाणे  जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माजी सभापती डॉ. पद्माराणी पाटील,माजी सभापती राजेश पाटील,पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार,पोलिस पाटील नयन पाटील, प्रा.राजगोंड पाटील,सरपंच अश्विनी चौगुले, उपसरपंच सतीश काशिद, ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, तलाठी एस. ए.बरगाले,सर्व ग्रामपंचायत सदस्य आदींच्या पुढाकाराने व मेडिकल असोसिएशन, केमिस्ट असोसिएशन, एमआर असोसिएशन, सर्वपक्षिय समिती,सामाजिक सेवा संस्था यांचे सहकार्याने गावांमध्ये कोव्हिड १९ अलगीकरण केंद्र एक जून रोजी मराठी शाळेमध्ये सुरू करण्यात आले.
   या अलगीकरण केंद्र सोबत"ताप उपचार केंद्र व आरटीपीसीआर, अँटीजेन टेस्टिंग सेंटरची या ठिकाणी सुरुवात करण्यात आली. या कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना औषधे ग्रामपंचायतच्या पंधराव्या वित्त आयोगामधून मोफत दिली जात असून औषधोपचारासाठी चार लाख रूपयांचा निधी खर्च होत आहे. या औषधाचे वितरण व नोंद सुद्धा सामाजिक भावनेतून गावातील खाजगी औषध विक्रेते करत असून ना नफा ना तोटा तत्वावर  शंभर ते दिडशे प्रकारच्या औषधाचा पुरवठा करत आहेत.
ताप उपचार केंद्रामध्ये प्रा.आ.केंद्रांमधील एक आरोग्यसेविका,गावातील खाजगी डॉक्टर्स डॉ.आर. डी.पाटील, डॉ. महावीर पाटील, डॉ. इमरान देसाई, डॉ. सुरेखा आलमान, डॉ. अमोल चौगुले आदीसह १७ डॉक्टरांचे योगदान लाभले असून ते डॉ.देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली ताप उपचार केंद्र चालवत आहेत. सर्व खाजगी डॉक्टर यांचे दवाखान्यात येणारे तापाचे रुग्ण या ठिकाणी पाठवून त्यांची तपासणी करून तात्काळ अँटीजेन किंवा आरटीपीसीआर तपासणी करून घेत आहेत. रुग्ण पॉझिटिव्ह  असल्यास  तात्काळ अलगीकरण केंद्राच्या शासन मार्गदर्शक सूचनेप्रमाणे त्यांच्यावर उपचार केले जात आहेत. तपासणीमध्ये पल्स,बी.पी,ऑक्सिजनचे प्रमाण, जनरल तपासणी,रक्त लघवी तपासणी तसेच सहा मिनिटे चालून ऑक्सिजनचे प्रमाण मोजणे इत्यादी उपाययोजना करून जर रुग्णास गंभीर लक्षणे आढळल्यास संजय घोडावत कोव्हिड सेंटर किंवा आयजीएम रुग्णालयात प्रा.आ.केंद्राच्या रुग्णवाहिके- द्वारे मोफत पोहोचवण्याची सोय या ठिकाणी केली जाते.
           सर्वपक्षीय समितीचे समन्वयक प्रा.राजगोंड पाटील, अमित पाटील, मुनीर जमादार, कपिल भोसले, गुरूनाथ नाईक, वकील प्रशांत पाटील, दीपक जाधव, प्रशांत तोडकर, अभिनंदन करके, सुदर्शन पाटील आदीसह सहकारी संस्था, विकास सेवासंस्था, तरूण मंडळे व मान्यवरांनी उपकेंद्रास लाख रुपयाची आर्थिक मदत केली आहे.या सेंटरमध्ये सध्या दररोज  वैद्यकिय अधिकारी डॉ. देशमुख व एक खाजगी वैद्यकीय व्यवसायिक यांचे मदतीने उपचार होतात. आरोग्य सेवेमध्ये तीन  प्रशिक्षित नर्स, एक आरोग्यसेविका, रोटेशन द्वारे एक औषध निर्माण  अधिकारी,दोन लॅब टेक्निशियन, एक डेटा एन्ट्री ऑपरेटर, दोन ग्रामपंचायत कर्मचारी, दोन शिक्षक व ऍम्ब्युलन्सवर इंचलकरंजी एस टी आगाराचे वाहन चालक असे सेवाकार्य करीत आहेत. 
               
रूग्ण बरे होण्याचा दर समाधानकारक

आज अखेर या अलगीकरण केंद्रामध्ये १४७ रुग्ण दाखल झाले असून १२o इतके रुग्ण उपचार घेऊन बरे होऊन घरी गेले आहेत. गंभीर लक्षणे असणारे १४ इतके रुग्णांना संदर्भ सेवा दिली आहे. तसेच या ठिकाणी आजपर्यंत २९७९ अँटीजेन चाचण्या  व ६४३ आरटीपीसीआर तपासण्या केल्या आहेत. यामध्ये २६७ अँटिजन व ७ आरटीपीसीआर चाचणीत  पॉझिटिव्ह रुग्ण सापडले. त्यामुळे त्यांच्यावर वेळीच या ठिकाणी उपचार केले गेले. त्यामुळे रुग्ण बरा होण्याचा दर समाधानकारक आहे. 

        
   रूग्णांनी मानले डॉक्टरांचे आभार

हेरले अलगीकरण केंद्रात गोरगरीब रुग्णांना वेळेत मोफत व गावातच उपचाराची सोय निर्माण झालेने बरे झालेल्या रुग्णांनी  डॉक्टरांचे व आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे आभार मानून सेंटरला उपयोगी विविध भेटवस्तू दिल्या. बऱ्याच रुग्णांनी आम्हाला कर्जबाजारी होण्यापासून व मृत्यूच्या दाढेतून बाहेर आणल्याबद्दल हेरले कोव्हिड सेंटरचे अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.

Thursday, 8 July 2021

गोकुळचे शासन नियुक्त संचालक मुरलीधर जाधव यांचा मौजे वडगाव शिवसेना व जय हनुमान दूध संस्थेच्या वतीने सत्कार


   हेरले /प्रतिनिधी
दि.8/7/21
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ या संस्थेच्या शासन नियुक्त संचालक पदावर शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांची नुकतीच निवड करण्यात आली.यावेळी त्यांचा श्री जय हनुमान सहकारी दूध संस्था मौजे वडगाव व शिवसेना शहर मौजे वडगाव यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 
        जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव म्हणाले की शिवसेनेमध्ये शहर प्रमुख ते जिल्हाप्रमुख व आत्ता कोल्हापूर जिल्ह्यात अग्रेसर असणाऱ्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ या संस्थेवर शासन नियुक्त संचालक म्हणून काम करण्याची संधी देऊन पक्षश्रेष्ठींनी माझ्यावर मोठी जबाबदारी दिली आहे .गेली वीस वर्षे शिवसेनेत प्रामाणिकपणे काम केल्याचे फळ मिळाले असून येथून पुढेही शिवसेना पक्ष,प्राथमिक दूध संस्थेच्या दूध वाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही दिली.
        यावेळी जय हनुमान सहकारी दूध संस्थेचे संस्थापक चेअरमन बाळासाहेब थोरवत, व्हा.चेअरमन नेताजी माने, शिवसेनेचे शहर प्रमुख सुरेश कांबरे, शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य अवधूत मुसळे ,संचालक महादेव शिंदे यांच्यासह दूध संस्थेचे पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 फोटो 
    गोकुळचे शासन नियुक्त संचालक मुरलीधर जाधव यांचा सत्कार करताना बाळासाहेब थोरवत, नेताजी माने ,सुरेश कांबरे, अवधूत मुसळे, महादेव शिंदे व इतर मान्यवर

Tuesday, 6 July 2021

राजर्षी शाहू मध्ये गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप.


कसबा बावडा : दि 5 

कोल्हापूर महानगरपालिका शिक्षण समितीचे संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 मध्ये राजेंद्र आपुगडे समन्वयक समावेशीत शिक्षण कोल्हापूर व केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांच्या हस्ते व तानाजी पाटील ( T. R ) यांच्या प्रमुख उपस्थितीत 1 ली ते 7 वी च्या विद्यार्थ्यांच्या पालकांना शोशल डिस्टन्स च्या नियमाचे काटेकोरपणे पालन करून गणवेश व पाठ्यपुस्तक वाटप करण्यात आली.
राजेंद्र आपुगडे यांनी कोरोनाकाळात पालकांनी विद्यार्थ्यांना योग्य प्रकारे काळजी घेऊन ऑनलाइन शिक्षण व ऑफलाईन शिक्षण ची व्यवस्था करून देऊन दररोज वेळ द्यावा.शिक्षणाचे शिक्षकांनी तयार केलेले व्हिडीओ, सेतू अभ्यासक्रम नियमितपणे घ्यावा व विद्यार्थ्यांना घरीच अभ्यास पूर्ण करून घ्यावा असे प्रतिपादन केले.
शाळेचे केंद्रमुख्याध्यापक डॉ.अजितकुमार पाटील यांनी शुद्ध हवा , पाणी, आरोग्याची गुरुकिल्ली आहे. स्वच्छता केल्यामुळे आपले आरोग्य चांगले राहते. महात्मा गांधीजी यांनी आपल्या वर्धा साबरमती आश्रमात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला ते स्वच्छतेचे महत्व व स्वावलंबी शिक्षणाचे धडे देत असत. कोरोना काळात अगदी प्रत्येक माणूस अस्थिर झालेला दिसून येत आहे. त्यासाठी वैयक्तिक स्वच्छता प्रत्येकाने राखली पाहिजे. गर्दीच्या ठिकाणी, बाजार पेठेत, भाजीपाला मंडई, दुकानामधील दैनंदिन जीवनावश्यक वस्तू खरेदी करतांना सुद्धा स्वच्छतेची खबरदारी घ्यावी. दररोज योगासने, प्राणायाम , सूर्य नमस्कार , ताजी फळे, भाजीपाला , कडधान्ये यांचा वापर आहारात करावा व जागरण टाळावे असे प्रतिपादन केले.ऑनलाइन व सेतू अभ्यासक्रम यावर पालकांनी विद्यार्थ्यांना मदत करावी.असे प्रतिपादन केले.
तानाजी पाटील सर यांनी विद्यार्थी व पालक यांनी समन्वय साधून एक मैत्रीपूर्ण,सहकारी मित्र या भावनेने आपल्या पाल्याशी नाते ठेवून त्यास अभ्यास करण्यासाठी प्रेरणा द्यावी असे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे नियोजन तमेजा मुजावर मॅडम, विद्या पाटील मॅडम यांनी केले होते.सूत्र संचालन सुजाता आवटी मॅडम व आसमा तांबोळी मॅडम यांनी केले होते.
 शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा अनुताई गायकवाड, अध्यक्ष रमेश सुतार, शिक्षणतज्ञ इलाई मुजावर सर,सुशिल जाधव,उत्तम कुंभार, सरदार पाटील, यांनी उपस्थित राहून सहकार्य केले.
शिवशंभू गाटे यांनी आभार मानले.

Monday, 5 July 2021

मंगल मोरे यांचा सेवानिवृत्तीबद्दल सत्कार


कोल्हापूर दि.4/07/2021

कसबा बावडा ऊलपे हॉल येथे सौ.मंगल आनंदा मोरे यांचा सेवानिवृत्तीचा कार्यक्रम संपन्न झाला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक उत्तम कुंभार यांनी केले.मंगल मोरे या मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेत  6 वर्ष  कार्येरत होत्या. त्यांची एकूण सेवा 30 वर्ष झाली आहे.त्या शाळेत नेहमी वक्तशीर असायच्या त्या स्वच्छता आणि टापटिप पणा यात खूप अग्रेसर होत्या. कार्यालयीन कामकाजात देखील कार्यतत्पर असायच्या. त्या जितक्या कडक तितक्या मायाळूपण आहेत असे स्वभाव वैशिष्टे आणि त्यांच्या कार्याची महती सांगणारे मनोगत  राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार भिमराव पाटील, उत्तम कुंभार सर आणि सुजाता अवटी यांनी व्यक्त केले.
त्यांना सर्व शिक्षक स्टाफकडून भावी आयुष्याच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यानंतर मंगल मोरे यांचा शाळेमार्फत शाल, श्रीफळ आणि ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमप्रसंगी राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळेचे मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार भिमराव पाटील, उत्तम कुंभार, सुजाता अवटी, सुशील जाधव, शिवशंभू गाटे, आसामा तांबोळी, तमेजा मुजावर, बालवाडी मुख्याध्यापिका कल्पना पाटील, सावित्री काळे, रजाक तांबोळी ,प्रिन्स शिवाजी शाळेच्या मुख्याध्यापिका छाया पवार, शाहजी पाटील, जोतिबा बामणे आदि उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार  शिवशंभू गाटे यांनी मानले.

Saturday, 3 July 2021

शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आश्वासित प्रगत योजनेचा लाभ द्यावा - बाबा पाटील

हेरले / प्रतिनिधी
दि.4/7/21
          कोल्हापूर जिल्हा शिक्षेकेतर कर्मचाऱ्याच्या विविध मागण्याचे निवेदन पूणे विभाग शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना देण्यात आले .
  या लेखी निवेदनामध्ये प्रामुख्याने  राज्यातील सर्व कर्मचाऱ्याना 10:20:30 च्या आश्वासित  प्रगत योजनेचा लाभ मिळत असून फक्त शिक्षेकेतर कर्मचाऱ्यांना अध्याप लाभ मिळत नाही तो मिळावा, चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्याची भरतीबंदी उठवून शाळा संहिते प्रमाणे कर्मचारी भरती सुरु करावी, अतिरिक्त वरिष्ठ लिपिकांना वेतनश्रेणीस संरक्षण देवून निवृत्तीपर्यंत तेथेच सेवेची संधी द्यावी,नवीन मंजूर शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांना  शालार्थ आय.डी .नंबर द्यावेत या मागण्याचे निवेदन शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना देणेत आले.या मागण्यासाठी पाठपुरावा करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री वर्षाताई गायकवाड यांचे समवेत सर्वअधिकाऱ्या समवेत बैठक लावण्याचे आश्वासन आमदार जयंत आसगावकर यांनी दिले .
            यावेळी शाळा कृती समितीचे प्रदेश कार्याध्यक्ष  बाबा पाटील      शिक्षेकेत्तर संघटनेचे प्रदेश ऑडिटर संजय पाटील,सचिव चंद्रकांत लाड, अविनाश ढोणे, सुरेश कारदगे, उदय पाटील, के. के.पाटील, अभिजित गायकवाड, अशोक पाटील, वजीर मकानदार, मनोहर जाधव, संजय कांबळे, योगेश शेटे,प्रसाद जोशी, समीराज नलवडे, अतुल ठाकूर, अरविंद गवळी, राजू लंबे, बसू कोळी, सर्जेराव चोपडे, रुकडिकर, प्रल्हाद खाडे आदी उपसस्थित होते .
       फोटो 
शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांना लेखी निवेदन देतांना बाबासाहेब पाटील व इतर पदाधिकारी

पं.समिती हातकणंगले व कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमाने कृषी दिन संपन्न

हेरले / प्रतिनिधी
दि.3/7/21

 महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त पंचायत समिती हातकणंगले व कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने  
१जुलै रोजी कृषी दिन कार्यक्रम राज्य पातळी सोयाबीन पिक स्पर्धा सन - २०१८ प्रथम क्रमांक प्राप्त शेतकरी बाळासो बाबगोंडा पाटील किणी        ( ता. हातकणंगले) यांच्या शेतामध्ये आयोजित केला होता.  
   कार्यक्रमाची सुरवात कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतीमेस पुष्पहार अर्पण करून व दीप प्रज्वलनाने करणेत आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष पंचायत समिती हातकणंगलेचे सभापती डॉ. प्रदीप पाटील होते. प्रमुख पाहुणे जिल्हा परिषद सदस्या  पुष्पा आळतेकर व प्रमुख उपस्थिती पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी होत्या.
कृषी अधिकारी अभिजीत घोरपडे  यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. राजर्षी शाहू कृषी महाविद्यालयाचे सेवा निवृत्त सहयोगी प्राध्यापक  एम.ए.पाटील यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये सोयाबीन पिकावरील कीड रोग नियंत्रण व उत्पादन वाडीसाठी मार्गदर्शन केले. तालुका कृषी अधिकारी अभिजीत गडदे यांनी कृषी विभागाकडील योजनांची सविस्तर माहिती दिली व कृषीसंजीवनी सप्ताह बाबत माहिती दिली.
    पंचायत समिती सभापती डॉ. प्रदीप पाटील यांनी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती एक उद्योग म्हणून करण्याचे आवाहन शेतक-यांना केले. त्याच बरोबर पंचायत समिती व कृषी विभागामार्फत
केलेल्या अथक परिश्रमामुळेच हातकणंगले तालुक्यातील सन - २०१७ राज्य पातळी सोयाबीन प्रथम क्रमांक,
सन - २०१८ राज्य पातळी सोयाबीन प्रथम व द्वितीय क्रमांक, सन २०१९ राज्य पातळी सोयाबीन प्रथम,द्वितीय, तृतीय क्रमांक हातकणंगले तालुक्यातील शेतक-यांना प्राप्त झालेले आहेत. त्या बद्दल पंचायत समिती कृषी विभागाचे विशेष कौतुक केले.
   गट विकास अधिकारी डॉ. शबाना मोकाशी यांनी आपल्या मार्गदर्शनामध्ये शेतक-यांनी सेंद्रीय शेती करून स्वत:चे व इतरांचे आरोग्य सदन राखणेसाठी सहकार्य करणेचे आवाहन केले.
प्रगतशील शेतकरी  कृष्णाची आनंदा मसुरकर ( पट्टणकोडोली) यांनी कार्यक्रमाचे आयोजन शेतक-यांच्या
बांधावर केले बद्दल प्रशासनाचे आभार मानले व पुढील वर्षीचा कार्यक्रम त्यांच्या शेतावर आयोजित करणेची प्रशासनाला विनंती केली.
    अभिनव उपक्रमाचे सदस्य सुनील काटकर यांनी शेतक-यांनी पिकवलेला माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी व शेती उत्पादन खर्च कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले.ग्रामपंचायत व संजय पाटील फौंडेशन किणी यांच्या वतीने किणी गावामध्ये सेंद्रिय शेती, पशुपालन, व डेअरी उद्योगामध्ये उल्लेखनीय काम करणा-या शेतक-यांचा सत्कार केला व त्यांना प्रोत्साहन दिले. नेसरी कृषी
विद्यालय येथून किणी येथे दाखल झालेल्या कृषीकन्या टीमने वृक्ष लागवड करून उपस्थितांना माहिती दिली.
   पंचायत समिती हातकणंगले यांच्या वतीने तालुका पातळी खरीप सोयाबीन पिक स्पर्धा सन - २०२० मध्ये
आनंदा हरिभाऊ मसुरकर ( पट्टणकोडोली) प्रथम क्रमांक,  बाजीराव पांडुरंग पाटील (लाटवडे)द्वितीय क्रमांक,  भीमराव नानासो देसाई  (पाडळी ) तृतीय क्रमांक,  तानाजी रघुनाथ पाटील (पाडळी ) चतुर्थ क्रमांक तसेच जिल्हा पातळी खरीप सोयाबीन पिक स्पर्धा सन २०२०  सारिका वसंत पाटील (लाटवडे) द्वितीय क्रमांक,  भाऊसो दादा पाटील ( आळते) तृतीय क्रमांक,  रमेश बाबगोंडा पाटील ( किणी )चतुर्थ क्रमांक मिळविले बद्दल त्यांना शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ, रोप, सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
तालुका कृषी अधिकारी कार्यालय मार्फत तालुका पातळी रब्बी ज्वारी पिक स्पर्धा सन - २०२०/२०२१ मध्ये
विजेते शेतक-यांचा  सत्कार करून  सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. तसेच उत्कृष्ठ पत्रकारिते बद्दल कृषिमित्र पुरस्कार प्रस्ताव शासनास सादर केलेले पत्रकार  नंदू साळूंखे यांचाही सत्कार करणेत आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  कृषी विस्तार अधिकारी  शुभांगी कार्वेकर व कृषी सहाय्यक संतोष पाटील यांनी केले. कार्यक्रमाचे  नियोजन कृषी विस्तार अधिकारी सर्जेराव शिंदे व  कनिष्ठ सहाय्यक संभाजी साजणे यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन  कृषी अधिकारी तथा सहाय्यक गट विकास अधिकारी सतिश देशमुख यांनी केले.
    या कार्यक्रमास ग्रामपंचायत किणी चे सरपंच ,उपसरपंच,सदस्य,  ग्रामविकास अधिकारी व ग्रामपंचायत सर्व कर्मचारी यांनी सहकार्य केले. या प्रसंगी मंडल कृषी अधिकारी  नंदकुमार मिसाळ कृषी पर्यवेक्षक, कृषी सहाय्यक,शेतकरी उपस्थित होते.