Thursday, 28 July 2022

शैक्षणिक धोरणास न्याय देण्याचे कार्य शिक्षक करत आहेत - - केंद्रमुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील

*

दि 29 कसबा बावडा
 कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण संचलित मनपा राजश्री शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक 11 कसबा बावडा व यशवंतराव भाऊराव पाटील विद्यालय कसबा बावडा यांच्या संयुक्त विद्यमाने पहिली शिक्षण परिषद डॉक्टर डी वाय पाटील इंजीनियरिंग हॉल मध्ये संपन्न झाली कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे डॉ अजितकुमार पाटील होते शाळेच्या मुख्याध्यापिका छाया हिरगुडे व गौतमी पाटील यांच्या हस्ते तज्ञ मार्गदर्शक यांचा सत्कार करण्यात आला ,
कसबा बावड्यामध्ये केंद्रस्तरीय शिक्षण परिषदमध्ये शिवराज नलवडे ,विजय माळी, सुनिता कांबळे दत्तात्रय, डांगरे छाया पवार ,जे जे पाटील, अनिता नवाळे, टी आर पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शिक्षण परिषदेचे उद्घाटन झाले पहिल्या सत्रात व प्रास्ताविक मध्ये डॉ अजितकुमार पाटील यांनी निपुण भारत जीआर पायाभूत साक्षरता व संख्या ज्ञान अभियान यामध्ये त्यांनी
"  विद्यार्थी देशाचे भवितव्य आणि संपत्ती आहेत त्यांचा सर्वाधिक विकासासाठी पोषक वातावरण निर्माण करणे ही आपली सामग जबाबदारी आहे भारत सरकार च्या निपुण भारत हा राज्यात इयत्ता पहिली ते येणारे मुलांसाठी पहिले पाऊल शाळा पूर्वतयारी साठी राबवण्यात येत आहे मिळावे घेण्यात येत आहे विद्यार्थ्यांना भाषिक कौशल्य,भाषिक भाषा विकास उच्चार शास्त्राची जाणीव सांकेतिक भाषा शब्द संग्रह वाचन व आकलन वाचनातील  लेखन ,वाचन संस्कृती तसेच पायाभूत संख्या ज्ञान ,संख्या  व संख्यावरील क्रिया गणना करणे ,आकार व अवकाश समजावून घेणे यासाठी समावेशित शिक्षणा ची सुद्धा दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शासन हे उपक्रम राज्यातील तीन ते नऊ वर्ष वयोगटातील सर्व विद्यार्थ्यांसाठी राबवत आहे याची अंमलबजावणी शिक्षकांनी करून शैक्षणिक धोरण 2020 ला न्याय द्यायचं काम शिक्षकांनी करायचं आहे, असे प्रतिपादन केले
 शिक्षण परिषदेत तज्ञ मार्गदर्शक रामराजे सुतार नितीन खामकर, जयेंद्र बडद, साताप्पा पाटील, प्रदीप जानकर यांनी दुसऱ्या व तिसऱ्या सत्रात मार्गदर्शन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप पाटील व उत्तम कुंभार यांनी केले तर आभार चंद्रकांत कुंभार यांनी मानले शिक्षण परिषदेमध्ये 109 शिक्षक,मुख्याध्यापक उपस्थित होते.

Saturday, 23 July 2022

आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव '5 स्टार शाळा' नामांकन प्राप्त




हेरले प्रतिनिधी
 
आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव  '5 स्टार शाळा' नामांकन प्राप्त झाली आहे. तर ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूल व गुरुकुल प्राथमिक विद्यालय या शाळा जिल्हा परिषदचा 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२२' या जिल्हा स्तरीय पुरस्काराने सन्मानित झाल्या असून तर राज्यस्तरीय पुरस्कारासाठी निवड झाली आहे.


 स्वच्छ विद्यालय अभियान अंतर्गत जिल्हास्तर पुरस्कारप्राप्त शाळांना प्रमाणपत्र वितरण कार्यक्रम शाहू स्मारक भवन येथे संपन्न झाला. पुरस्कार वितरण कार्यक्रम जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण ,शिक्षणाधिकारी (प्राथमिक) आशा उबाळे , डायट प्राचार्य शेख, माध्य. शिक्षणाधिकारी आंबोकर यांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरीत करण्यात आले.

या पुरस्काराचे वेळी ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक आर.बी.शिवई,ग्रीनचे प्रशासक एम. एच चौगुले, आदर्श गुरुकुल प्रशासक एस .जी .जाधव, गिरीगोसावी मॅडम, पी.एस. पाटील सर, भांगरे सर व साै. एम .एस. पाटील उपस्थित होते.

या पुरस्कारासाठी आदर्श गुरुकुल संकुलाचे संस्थापक अध्यक्ष तथा कोजिमाशि पतसंस्थेचे चेअरमन प्राचार्य डॉ. डी. एस. घुगरे ,सचिवा तथा मुख्याध्यापिका सौ. एम.डी.घुगरे याची प्रेरणा लाभली. तसेच अनिवासी प्रमुख एस.ए.पाटील,  संकुलातील सर्व शिक्षक बंधू- भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

फोटो :जिल्हा परिषदेचा 'स्वच्छ विद्यालय पुरस्कार २०२२' हा जिल्हास्तरीय पुरस्कार स्वीकारताना ग्रीन व्हॅली पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक आर.बी.शिवई व शिक्षक, शिक्षिका

संजय घोडावत उद्योग समूहाच्या कब्बडी खेळाडूची महाराष्ट्र पुरुष वरिष्ठ संघाच्या कर्णधारपदी निवड

हेरले / प्रतिनिधी
महाराष्ट्र कबड्डी संघाच्या प्रातिनिधिक संघात संजय घोडावत उद्योग समूहाच्या कबड्डी संघाचे खेळाडू श्री शंकर गदई व श्री राहुल खाटीक यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघात निवड झाली. श्री शंकर गदई यांच्यावर  महाराष्ट्र संघाची कर्णधार पदाची धुरा सोपवण्यात आलेली आहे ही बाब इतिहासात प्रथमच घडली आहे. यामागील कारण त्याच्या कुशल नेतृत्वाखाली अहमदनगर जिल्ह्याने 69 व्या राज्य अजिंक्यपद पटकावले होते. यासाठी संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त श्री विनायक भोसले, कुलगुरू डॉ. अरुण पाटील, प्राचार्य श्री विराट गिरी व विद्यापीठ प्रशिक्षक श्री महेश गावडे यांचे वेळोवेळी या खेळाडूंना प्रोत्साहन व मार्गदर्शन मिळत असते. सदर खेळाडूंचे घोडावत ग्रुपचे चेअरमन मा श्री संजयजी घोडावत व श्रेणिकजी घोडावत यांनी ही विशेष अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. इतिहासात महाराष्ट्रमध्ये प्रथमच एकाच  संजय घोडावत उद्योग समूहाचे एवढ्या मोठ्या संख्येने खेळाडू राष्ट्रीय स्पर्धेत प्रतिनिधित्व  करीत आहेत  यावरून हे सिद्ध होते की घोडावत उद्योग समूह क्रिडा क्षेत्राला किती महत्त्व व प्रोत्साहन देत आहे.

Saturday, 16 July 2022

आष्टा मुस्लीम कब्रस्थान येथे १ हजार झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

हातकणंगले/ प्रतिनिधी

 माजी ग्राम विकास मंत्री हसन मुश्रीफ व नवीद मुश्रीफ यांच्या सौजन्याने व उदयोगपती संजय घोडावत फौंडेशनच्या सहकार्याने आष्टा मुस्लीम कब्रस्थान येथे १ हजार झाडे लावून वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न झाला.
   उद्योगपती संजय घोडावत फौंडेशन यांच्या कडून एक हजार झाडे भेट देऊन लावुन देण्यात आली. आष्टा मुसलीम ईदगाह व कब्रस्थानमध्ये झाडांची नितांत गरज होती . म्हणुन हसन मुश्रीफ फौंडेशन सांगली जिल्ह्याचे कार्यकर्ते जावेद मणेर, आमजद मुल्ला, रफीक व कब्रस्तान ईदगाह कमीटीचे सदस्य साजीद इनामदार यांनी मागणी करून पाठपुरावा केला होता.उद्योगपती संजय घोडावत फौंडेशन यांच्या कडून एक हजार झाडे भेट देऊन आष्टा येथील
 कब्रस्थानमध्ये लावुनही देण्यात आली.
आणि हा वृक्षरोपन कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी इरफान मुजावर (कागल )  मुसा मणेर
 बशीर जमादार  उसमान जमादार आदी मान्यवर उपस्थित होते.
     फोटो
आष्टा येथील कब्रस्थानमध्ये वृक्षारोपण करतांना जावेद मणेरसह कब्रस्थान ईदगाह कमिटीचे सदस्य.

Friday, 15 July 2022

छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन मध्ये गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी

* * 

हेरले प्रतिनिधी

सह्याद्री एज्युकेशन सोसायटी अंबप संचलित छत्रपती शिवाजी विद्यानिकेतन व जुनिअर कॉलेज पेठ वडगाव आणि दिशा इंग्लिश मीडियम स्कूल पेठ वडगाव या प्रशालेत गुरु पौर्णिमेचा कार्यक्रम उत्साहात पार पडला या कार्यक्रमासाठी  जयवंत खाडे माजी पोलीस उपनिरीक्षक, प्रा. प्रदीप तोडकर संचालक वारणा सहकारी साखर कारखाना प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व प्रशालेचे मुख्याध्यापक  राजेंद्र माने  यांनी भूषविले आणि संस्था उपाध्यक्ष  प्रदीप दरवान संस्था खजनिस  बापूसो माने इत्यादी मान्यवर मंडळी उपस्थित होती सुरुवातीला गुरुवंदना होऊन कार्यक्रमाची सुरुवात झाली त्याचबरोबर प्रशालेत आलेल्या मान्यवर पाहुण्यांचे स्वागत ,सत्कार  राजेंद्र माने  यांच्या हस्ते करण्यात आले तसेच इतर मान्यवरांचा देखील सत्कार करण्यात आला त्यानंतर विद्यार्थी व विद्यार्थिनी मनोगते झाली या मनोगतानंतर प्रमुख पाहुणे  जयवंत खाडे यांनी आपल्या मनोगतामध्ये आई-वडील हेच आपले खरे गुरु आहेत  असे  सांगत गुरूचे महत्व विशद केले तसेच  प्राध्यापक तोडकर  यांनी गुरू  परंपरा सांगून माणसांच्या जीवनात गुरुचे महत्त्व सांगितले व परिस्थिती ही गुरु आहे असे मत मांडले त्यानंतर अध्यक्षीय मनोगतामध्ये  राजेंद्र माने  यांनी भारतीय प्राचीन गुरुपरंपरा व मानवी जीवनातील गुरुचे महत्त्व सांगून आपल्या जीवनातील काही प्रसंग सांगत मुलांना मंत्रमुग्ध केले या कार्यक्रमासाठी प्रशालेचे सर्व विद्यार्थी विद्यार्थिनी, सर्व विभाग प्रमुख ,शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्ताविक  सासणे एस जे यांनी केले तर सूत्रसंचालन  एम आर पाटील यांनी केले तसेच कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन कांबळे एस बी यांनी मानले

Sunday, 10 July 2022

कोजिमाशि निवडणुकीत सत्ताधारी आघाडीने सर्व जागा जिंकल्या - विरोधी पॅनेलचा धुव्वा उडवून सलग चौथ्यांदा सत्तेवर

.
.

     कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार सत्ताधारी आघाडीने २१ पैकी २१ जागा जिंकत विरोधी आमदार जयंत आसगावकर यांच्या राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडी 
पॅनेलचा पुरता धुव्वा उडवून सलग चौथ्यांदा सत्ता संपादित केली.
रमणमळा येथील बहुउद्देशीय हॉलमध्ये रविवारी दि.१० रोजी  सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत  मतमोजणी झाली व निकाल जाहीर करण्यात आला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रदीप मालगावे यांनी काम पाहिले.
    दादासाहेब लाड यांच्या  नेतृत्वाखाली सत्ताधारी आघाडीने सलग चौथ्यांदा ही निवडणूक जिंकली. शिक्षक आमदार जयंत आसगावकर व शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्यादृष्टीने ही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली होती. या निवडणुकीत दादा लाड हे सरस ठरले. संपूर्ण निकाल जाहीर होताच सत्ताधारी आघाडीच्या समर्थकांनी कोजिमाशित 'एकच वादा लाड दादा ' घोषणा देत परिसर  दणानून सोडला. कोजिमाशिचे विद्यमान चेअरमन बाळ डेळेकर व संचालक राजेंद्र रानमाळे हे सलग तिसऱ्यांदा निवडून येत विजयाची हॅट्ट्रिक केली.संचालक अनिल चव्हाण दुसऱ्यांदा निवडून आले. शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांच्या पॅनेलचा धुव्वा उडाला. 
   कोजिमाशिच्या २१ जागेसाठी ४७ उमेदवार रिंगणात होते. कोजिमाशिची सभासद संख्या ८५२६ इतकी आहे. त्यापैकी ८१०६ सभासदांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतदानाची टक्केवारी ९५.०७ इतकी आहे. कोजिमाशिच्या निवडणुकीच्या निमित्ताने गेले महिनाभर माध्यमिक शिक्षण जगत ढवळले होते. आरोप-प्रत्यारोपांनी निवडणूक गाजली होती. आमदार आसगावकर व दादा लाड यांच्यासाठी ही निवडणूक अतिशय प्रतिष्ठेची बनली होती. कोजिमाशीमध्ये गेली १८ वर्षे दादा लाड यांची सत्ता आहे. यंदा सत्ताधारी आघाडी निवडणूक जिंकून विजय चौकार मारणार असा ठाम निर्धार दादा लाड यांनी प्रचारादरम्यान व्यक्त केला होता. दुसरीकडे आमदार आसगावकर यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडीने कोजिमाशीमध्ये परिवर्तन घडवायचे ‌ या इराद्याने प्रचार यंत्रणा राबवली होती. शनिवारी झालेल्या  मतदानात ९५.७%  इतके मतदान झाल्याने सभासद कोणाला कौल देणार याविषयी उत्कंठा वाढली होती. मतमोजणीच्या पहिल्या फेरीपासूनच दादा लाड यांच्या सत्ताधारी गटाने आघाडी घेतली. प्रत्येक फेरीनुसार ही आघाडी वाढत गेली आणि दादा लाड यांनी कोजिमाशिवर आपलेच वर्चस्व असल्याचे सिद्ध करून दाखवले.

सर्वसाधारण प्रतिनिधी
विजयी उमेदवारांचे नावे व मिळालेली मते 
 श्रीकांत कदम ( ४५४१ ),श्रीकांत पाटील  ( ४६३२),प्रकाश कोकाटे (४५०४),
 उत्तम पाटील  ( ४५९६),सुभाष खामकर  (४६३४),दीपक पाटील (४७२७),दत्तात्रय घुगरे ( ४५९७),मनोहर पाटील  (४३६३) 
अविनाश चौगले (४५६०),राजेंद्र पाटील  ( ४४९३),लक्ष्मण डेळेकर  (४५०५),राजेंद्र रानमाळे ( ४५४९)
,शरद तावदारे ( ४३२२),सचिन शिंदे  (४२७०),मदन निकम ( ४४५५)
,पांडुरंग हळदकर (४०४७)
अनुसूचित जाती/जमाती प्रतिनिधी
 अनिल चव्हाण ( ४६९१)
भटक्या जाती विमुक्त जमाती / विशेष मागासवर्ग प्रतिनिधी -जितेंद्र म्हैशाळे (४७८०),इतर मागास प्रतिनिधी -राजाराम शिंदे (४८३५),महिला राखीव प्रतिनिधी -
ऋतुजा पाटील (४६४१),शितल हिरेमठ (४६२४) आदी उमेदवार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झाले.
    राजर्षी शाहू लोकशाही विकास आघाडी सर्वसाधारण गट उमेदवारांची नावे व मिळालेली मते:  प्रविण आंबोळे ( ३१७७), विनोद उत्तेकर ( ३०१२), सहदेव केंगाळे ( २७७३), प्रकाश शंकर कोकाटे ( २७१२), अभिजित गायकवाड ( २९५४), श्रीधर गोंधळी ( ३१३५), बाळासाहेब चिंदगे (२८१७), उत्तम तिबिले ( ३१२६), पंडित पोवार ( २८५०), बाबासाहेब यशवंत पाटील (३०४२), युवराज पाटील ( २७९३), संजय बटकडली ( २९२०), संतोष भोसले ( २७०८), विक्रमसिंह मोरे
 ( २९२९), अमर सदलगे ( २६७०), अर्जुन होनगेकर ( २५७३) इतर मागासप्रवर्ग- यशवंत बाबुराव पाटील ( ३२०२), भटक्या विमुक्त जाती प्रवर्ग - शिवाजी कोरवी ( ३२५४), अनुसूचित जाती प्रवर्ग पांडूरंग राउसो कांबळे (३३५७ ), महिला प्रतिनिधी आक्काताई नलवडे (३२००), सीमा महेश सुर्यवंशी ( ३०४३)
      प्रतिक्रिया
   शिक्षक नेते दादासाहेब लाड
स्वाभिमानी सहकार आघाडीच्या सर्व २१ उमेदवार प्रचंड बहुमतांनी विजयी झाले. कोजिमाशि पतसंस्था शिक्षक - शिक्षेकेत्तर सभासदांच्या मालकीची आहे.
कोल्हापूर जिल्हयातील सर्व सामान्य सभासद ही एक शक्ती आहे आणि ती माझ्या सोबत आहे त्यामुळेच हा विजय सुकर झाला आहे. त्यांना राजकिय शक्तीचा प्रवेश मान्य नसल्यानेच माझ्या पाठीशी खंबर पणे राहून कोजिमाशिची चौथ्यांदा सत्ता हाती दिली आहे. निवडणूक संपली आहे.आता कोणी विरोधक नाही सर्वांना समान वागणूक देऊन सर्वांच्या हिताचे निर्णय घेऊन वचननाम्याची अमलबजावणी करून सभासदांची उन्नती साधली जाईल.
    कोल्हापूर जिल्हा माध्यमिक शिक्षण सेवकांच्या सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत शिक्षक नेते दादासाहेब लाड यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी सहकार सत्ताधारी आघाडीस विद्यमान चेअरमन बाळ डेळेकर, खंडेराव जगदाळे, मुख्याध्यापक संघ सचिव दत्ता पाटील, डॉ. डी.एस. घुगरे, व्हा.चेअरमन सुभाष पाटील, संजय परीट, राजेंद्र रानमाळे, कैलास सुतार, आदींसह कोल्हापूर जिल्ह्यातील विविध शिक्षक, शिक्षेकेत्तर संघटना, आजी माजी संचालक, मुख्याध्यापक,उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, शिक्षक व शिक्षकेत्तर सेवकांचे मोठे पाठबळ लाभले.

किसान विकास संस्थेची शंभर टक्के कर्ज वसुली



हेरले /प्रतिनिधी
 मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील किसान सेवा संस्था मर्यादित, मौजे वडगाव या संस्थेची चालू वर्षी सभासद पातळीवर शंभर टक्के कर्ज वसुली झाली असल्याची माहिती संस्थेचे चेअरमन संग्राम सावंत व व्हा. चेअरमन शब्बीर हजारी यांनी दिली.
       या कामी संस्थेचे संस्थापक श्रीकांत सावंत व मार्गदर्शक रावसाहेब चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेची चालू वर्षाची संस्था पातळीवरील कर्ज वसुली शंभर टक्के झाली असून सभासदांनी संस्थेच्या विविध योजनेचा लाभ घ्यावा अशी माहिती संस्थेचे चेअरमन संग्राम सावंत यांनी व्यक्त केले.
      यावेळी श्रीकांत सावंत, रावसाहेब चौगुले, सचिव आदगोंड पाटील, संभाजी सावंत, धनाजी सावंत, विक्रम सावंत, सविता सावंत, सरिता सावंत, सुशीला सावंत, अनिता पाटील, अविनाश कांबळे, अर्जुन भेंडेकर, यांनी परिश्रम घेतले.

बॅरिस्टर खर्डेकर विद्यालयात मराठी हस्ताक्षर कार्यशाळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी 

 कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण संचलित बॅरिस्टर खर्डेकर विद्यालयात सुंदर हस्ताक्षर कसे काढावे या संदर्भात मराठी विषयावर कार्यशाळा संपन्न झाली कार्यशाळेचे उद्घाटन शाळेचे मुख्याध्यापक नामदेव वाघ यांचे हस्ते झाले प्रास्ताविक व सूत्रसंचालन सुभाष मराठे यांनी केले आभार राजमाने मॅडम यांनी मानले.
 कार्यशाळेचे नियोजन किरण पाडळकर यांनी केले होते प्रमुख मार्गदर्शन डॉ अजितकुमार पाटील यांनी विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर कसे काढावे या संदर्भात आनंददायी शिक्षणातून प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांच्या करवी सुंदर हस्ताक्षर कशा प्रकारचे असावे याचे मार्गदर्शन केले. 
उभी रेघ, आडवी रेघ, तिरकी रेघ, अर्धा गोल, पूर्ण गोल व लेखन करत असताना ताठ बसावे, पायाची हालचाल करू नये, डोळे व वही यामध्ये योग्य अंतर ठेवावे, पेन पकडण्याची प्रक्रिया व्यवस्थित असावी सतत पेन हलवू नये, शांत एकाग्रपणे लेखन करावे, लेखन करत असताना पूर्ण लक्ष लेखनकडे द्यावी अशा प्रकारचे छोटे छोटे नियम व प्रात्यक्षिक सादर करून विद्यार्थ्यांना सुंदर हस्ताक्षर हसत हसत खेळत शिकवली त्यांचे आभार शाळेचे मुख्याध्यापक नामदेव वाघ यांनी शैक्षणिक धोरण 2020 हे पुस्तक देऊन मानले.कार्यशाळेत 1 ली ते 7 वी मधील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

Thursday, 7 July 2022

छत्रपती राजश्री शाहू पुरस्काराने डॉ .दीपक शेटे सन्मानित

         
हेरले / प्रतिनिधी
छत्रपती शाहू फाउंडेशन यांच्या वतीने छत्रपती राजश्री शाहू राज्यस्तरीय पुरस्कार डॉक्टर दिपक मधुकर शेटे यांना देण्यात आला .छत्रपती शाहू महाराजांचे विचार विद्यार्थ्यांच्या पर्यंत पोहोचावेत यासाठी ते सातत्याने प्रयत्न करत  असतात . अंधश्रद्धा निर्मूलन व वैज्ञानिक दृष्टिकोन समितीचे कोल्हापूरचे विद्यमान  जिल्हाध्यक्षपद भूषवताना वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांच्यामध्ये जागृत व्हावा यासाठी त्यांचा सातत्याने प्रयत्न असतो . त्यांनी गणित रंजक व सुलभ करण्यासाठी  दिपक शेटे  अत्यंत दुर्मिळ वजन मापनाचा संग्रह असलेले असलेली स्वमालकीची गणित लॅब , गणितावर आधारित सात पुस्तके व दोन नाटके, गणितामधील विविध उपक्रम व आज अखेर दहावीचा शंभर टक्के निकालची परंपरा जपून योगदान दिले आहे.शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात ही दीपक शेटे आग्रही भूमिका बजावत आहेत त्यांच्या या सामाजिक व शैक्षणिक कार्याबद्दल त्यांचा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले . त्यांचे  शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातुन कौतुक होत आहे . त्यांना शाळेचे प्राचार्य डॉ. डी. एस. घुगरे, सचिव एम.ए. परीट यांचे मार्गदर्शन लाभते .
फोटो 
मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारततांना डॉ. दीपक शेटे

Tuesday, 5 July 2022

डॉ. विजय गोरड राजर्षी शाहू गौरव पुरस्काराने सन्मानित.

     हेरले / प्रतिनिधी
 शाहू महाराज जयंती निमित्त "अविष्कार सोशल अँड एज्युकेशनल फाउंडेशन, कोल्हापूर यांच्यावतीने इचलकरंजी येथे झालेल्या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक  किसनराव कुऱ्हाडे व डॉ. सुमित्रा पाटील यांच्या हस्ते राज्यस्तरीय लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार २०२२ व मानपत्र देऊन डॉ. विजय शामराव गोरड यांना सन्मानित करण्यात आले. 
 यावेळी फाउंडेशनचे अध्यक्ष  संजय पवार  यांनी डॉ. विजय गोरड हे करीत असलेल्या त्यांच्या सामाजिक व आरोग्य क्षेत्रातील कामगिरीबद्दल तसेच संजय गांधी व श्रावण बाळ पेन्शन योजनेमधील सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. पुरस्काराला उत्तर देताना डॉ. गोरड म्हणाले की,हा पुरस्कार म्हणजे आपण करीत असलेल्या कामाची पोचपावती आहे. दीनदुबळ्यांची,  अपंगांची, ज्येष्ठांची आणि निराधारांची सेवा करणे हे पुण्याईचे काम असून ते मी यापुढेही निस्वार्थीपणे व अविरतपणे करत राहीन, आणि म्हणूनच हा पुरस्कार मी निराधार, वृद्ध, अपंग तसेच विधवा महिला यांना समर्पित करीत असल्याचे डॉ. गोरड यांनी सांगितले. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना शाहू पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
     फोटो 
ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक  किसनराव कुराडे  व डॉ. सुमित्रा पाटील यांच्या हस्ते लोकराजा राजर्षी शाहू गौरव पुरस्कार स्वीकारताना डॉ. विजय गोरड. शेजारी फाउंडेशनचे अध्यक्ष संजय पवार

Friday, 1 July 2022

मौजे वडगाव येथून पायी दिंडीचे पंढरपूर कडे प्रस्थान


 हेरले (प्रतिनिधी) 

मौजे वडगाव( ता. हातकणंगले) येथून ह. भ. प .प्रकाश वाकरेकर ( महाराज ) यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशी निमित्त मौजे वडगाव व संभापूर येथील वारकरी संप्रदायातील बांधवांनी श्रीक्षेत्र पंढरपूर कडे प्रस्थान केले .गावातील मुख्य रस्त्यावरून टाळ व मृदंगाच्या गजरात  विठ्ठल रखूमाई मारुती मंदिरात एकत्र जमा होऊन गावातील मान्यवर व भाविकांच्याकडून निरोप देण्यात आला. यावेळी दिंडी चालक प्रकाश वाकरेकर म्हणाले, की मौजे वडगाव व संभापूर या दोन्ही गावातील मिळून शंभर हून अधिक वारकऱ्यांनी या दिंडी सोहळ्यात सहभाग घेतला आहे. या दिंडी सोहळ्याचे यंदाचे आठवे वर्ष असून प्रत्येक वर्षी दिंडीतील वारकऱ्यांची संख्या वाढत आहे.
            यावेळी दिंडी चालक ह. भ. प. प्रकाश वाकरेकर (महाराज) आण्‍णासो  थोरवत, तुकाराम झांबरे, बबन सावंत ,मालन गरड, कल्पना लोखंडे, संगीता तेली, तर संभापूर येथील अरविंद जाधव, अशोक झिरंगे, नितीन मोहिते, प्रवीण मेथे, यांच्या यांच्यासह वारकरी संप्रदायातील भजनी मंडळ व भक्त मंडळी हजर होते.

"घोडावत" च्या प्रदीप गिलची पश्चिम महाराष्ट्रमधून सेबी परीक्षेमध्ये एकमेव निवड


हेरले प्रतिनिधी

     संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेस (SGIAS) च्या बँकिंग अकॅडमीचा विद्यार्थी प्रदीप गिल याची सिक्युरिटी अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी/SEBI) "ग्रेड अ" पदी निवड झाली. ही निवड संपूर्ण भारतातून निवडलेल्या 80 विद्यार्थ्यांमधून पश्चिम महाराष्ट्रातील एकमेव निवड आहे. 

SGIAS च्या विद्यार्थ्यांनी निकालाची परंपरा कायम राखत एमपीएससी, बँकिंग, परीक्षेबरोबरच सेबी परीक्षेत ही उत्तुंग यश संपादन केले आहे. 
    
    SGIAS ने सन 2022 मध्ये एमपीएससी परीक्षेतमधून  ४ विद्यार्थी, बँकिंग परीक्षेमधून  २०पेक्षा अधिक विद्यार्थी तसेच विविध स्पर्धा परीक्षाच्या क्षेत्रातून आपली निकालाची परंपरा कायम राखली आहे. 
        
       संजय घोडावत इन्स्टिट्यूट फॉर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्विसेसने आजवर अवघ्या तीन ते चार वर्षांमध्ये  १७५हून अधिक विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध अधिकारी पदांवर तसेच राष्ट्रीयकृत बँकेच्या उच्च पदावर नोकरी मिळविण्यासाठी मोलाचे योगदान दिले आहे.     

          अलीकडेच या इन्स्टिट्यूटबाबत विद्यार्थ्यांना अधिकारी बनवण्याबाबत सखोल व योग्य मार्गदर्शन, मार्गदर्शक करत असल्यामुळे हा यशाचा चढता आलेख वाढत असताना दिसतो आहे.

           विद्यार्थ्यांची अधिकार पदावर निवड हेच अंतिम ध्येय घेऊन या क्लासची निर्मिती झाली आहे तो हेतू व प्रयत्न आता पूर्ण होत असताना दिसत आहे.
   
         वरील सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना संजय घोडावत ग्रुपचे चेअरमन मा. श्री संजय घोडावत, विश्वस्त मा. श्री विनायक भोसले, संचालक मा. श्री विराट गीरी यांचे मार्गदर्शन लाभले.
          
            तसेच सदर विद्यार्थ्यांना सेंटर हेड अक्षय पाटील, ब्रॅच मॅनेजर अमोल पाटील, बँकिंग हेड प्रा.जी. एस. पवार, प्रा. सचिन शिलवंत, प्रा. संग्राम पाटील, ब्रॅच मॅनेजर सूर्यकांत कांबळे व   बीडीएच प्रा.भरत साबळे यांचे मार्गदर्शन लाभले.