हेरले /प्रतिनिधी
हेरले ( ता. हातकणंगले) येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या यांच्या वतीने ५ ते १२ डिसेंबर सात दिवसाचा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
११ डिसेबंर रोजी सायंकाळी चार वाजता ज्ञानेश्वरी पालकी व दिंडी सोहळा आयोजीत केला होता. गावातील प्रमुख मार्गावरून वारकरी माऊंलीनी ज्ञानेश्वर माऊली , विठू माऊलींचा जयघोष करीत टाळ मृदूंगाच्या गजरात भक्तीभावाने भक्ती रसात रंगले होते. प्रत्येक गल्लीमध्ये व प्रमुख मार्गावरून तरूण मंडळांनी व कॉलनीतील महिला वर्गांनी रांगोळी काढून फुलांनी सजावट करून पालकीचे स्वागत केले. या सोहळ्यात महिला अबाल वृध्द मोठ्या भक्तिभावांने सहभागी झाले होते.झेंडा चौक, पाटाची गल्ली,सुर्यगंगा तरुण मंडळापासून हजारी कोपरा ,चोगुले गल्ली ,जय विजय, गड्डा ग्रुप, करके गल्ली शेवट विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दिंडीच सोहळ्याचेे विसर्जन करण्यात आले.
१२ डिसेंबर रोजी महाप्रसाद वाटप श्री व सौ प्रदीप मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.महाप्रसादाचा लाभ गावातील व परिसरातील चार हजार लोकांनी घेतला. यावेळी हेरले व हेरले परिसरातील वारकरी भक्त मंडळी उपस्थित होते.
या पारायण सोहळ्यास विशेष सहकार्य माजी सभापती राजेश पाटील, पोलीस पाटील नयन पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दीपक जाधव यांनी केले.
या पारायण सोहळयाचे संयोजन दादा भोसले, जनार्धन कुलकर्णी, सतीश वड़ड़, अरुण पोतदार, धोडीराम मिरजे,वसंत कागले, केशव मिरजे,पोपट कोळेकर,इरप्पा जैन, संजय माने,प्रकाश माने,सुभाष जाधव, अजित पाटील,रामा कोळेकर, मुकुंद माने, दादासो कोळेकर, नाना कोळेकर, संजय उबारे, सौरभ निंबाळकर , सौरभ खुपिरे,उमेश वाघमोरे,किरण कुंभार,प्रधान मुंडे, सचिन माळी, सर्जेराव मोहिते, शामराव चौगुले, धनाजी कारंडे,बाळासो कोळी,महावीर कुरणे, बंटी जाधव, तुकाराम राठोड़, यांनी करून पारायण सोहळा यशस्वी केला.
फ़ोटो
हेरलेतील ज्ञानेश्वरी पालकी व दिंडी सोहळा
No comments:
Post a Comment