Friday, 30 December 2016

BHIM सर्वात सोपे upi app

भारतातल्या बहुतेक सगळ्या आघाडीच्या  बँकांनी UPI apps चालू केले आहेत
{अपवाद बैंक ऑफ इंडिया , यांना बहुतेक ग्राहकांची काळजी नसावी }
ज्याचा वापर करून तुम्ही समोरच्याच्या बँक अकाउंट मध्ये direct पैसे transfer करू शकता.

UPI apps साठी तुम्हाला payee register वगैरे करायच्या भानगडीतच पडायच नाहीये तर फक्त एक unique ID generate करून लगेच पैसे transfer होतात.
आता instant पैसे transfer करायचा अजून एक खूप छान option तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे आणि transfer केलेले पैसे कोणत्याही wallet मध्ये न जाता थेट जातील बँक अकाउंट मध्ये !

आतापर्यंत सर्व वेगवेगळ्या बैंकांची स्वतंत्र upi apps होती पण आता स्वत: नैशनल पेमेंट कारपोरेशन ऑफ इंडियाने विकसित केलेले  BHIM हे upi app गुगल प्ले स्टोअरवर उपलब्ध झाले असुन , वापरण्यास अत्यंत सोपे व सुटसुटीत आहे

BHIM app ची लिंक खाली आहे

https://play.google.com/store/apps/details?id=in.org.npci.upiapp

BHIM UPI अँप वापरायचंय कसं !

– BHIM UPI app स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करा.

- आपल्या बैंक खात्याला जो फोन नंबर दिला आहे त्या नंबरचेच इंटरनेट व sms सुरुवातीला फक्त एकदाच अकाउंट व्हेरीफिकेशन साठी वापरा , app साठी 4 अंकी पासवर्ड निर्माण करा

– त्या App शी आपलं बँक अकाउंट link करा.आपला ATM कार्ड नंबर लिंक करा

– App एक unique ID बनवेल ज्याला VPI म्हणतात उदाहरणार्थ sharad99 @upi ,

बस्स फक्त हा ID त्याच्याशी share करा ज्याच्याकडून तुम्हाला पैसे घायचे आहेत.

– तो त्याच्या UPI App मध्ये VPI ID टाकून पैसे transfer करेल आणि पैसे तुमच्या अकाउंट मध्ये लगेच जमा होतील.

भारतात खालील banks आहेत ज्या UPI payment support करतात.

•HDFC Bank
•State Bank of India
•Axis Bank
•ICICI Bank
•Andhra Bank
•Bank of Maharashtra
•Canara Bank
•Catholic Syrian Bank
•DCB Bank
•Karnataka Bank
•Union Bank of India
•United Bank of India
•Vijaya Bank
•Punjab National Bank
•Oriental Bank of Commerce
•TJSB
•Federal Bank
•UCO Bank
•South Indian Bank
•Standard Chartered Bank India

📝 ज्ञानराज पाटील

आणि हो हा लेख उपयुक्त वाटल्यास अवश्य शेअर करा संपूर्ण देशाला digital ECONOMY साठी आपल्या योगदानाची गरज आहे !

श्री सुरेश काटकर यांची पोर्ले तर्फ बोरगांवच्या "सरपंच" पदी अभिनंदनीय निवड

युवा नेतृत्व व कोल्हापूर जिल्हा केमिस्ट क्रेडीट सोसायटीचे व्हा़़ चेअरमन श्री सुरेश गणपतराव काटकर यांची पोर्ले तर्फ बोरगांव ता ़ पन्हाळा गावच्या "सरपंच" पदी निवड झाल्याबदल  हार्दिक शुभेच्छा..

Thursday, 29 December 2016

कोमनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 चा अपूर्व विज्ञान मेळावा उत्साहात संपन्न

   कोल्हापूर mh9Live न्यूज प्रतिनिधि
   
        कोल्हापूर  महानगरपालिकेच्या राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र.11 कसबा बावडा या शाळेत अपूर्व विज्ञान मेळाव्याचे उदघाटन माननीय महापौर हसीना फरास यांच्या शुभहस्ते व माननीय उपमहापौर अर्जुन माने यांच्या उपस्थितीत झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रभागाच्या नागरसेविका  माननीय सौ.माधुरी लाड या होत्या. माननीय नगरसेवक श्री.सुभाष बुचडे , मा. श्री.मोहन सालपे, शैक्षणिक पर्यवेक्षक श्री विजय माळी , उषा सरदेसाई,क्रीडा निरीक्षक सचिन पांडव,अपंग मार्गदर्शक राजेंद्र आपुगडे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला.
                      सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेच्या झान्ज पथकाच्या गजरात विद्यार्थ्यांनी केले. शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या 150 विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन वेगवेगळया विषयांवर आधारित 75 प्रयोग मांडले होते. यामध्ये पाण्यावर तरंगणारा बटाटा, गायब होणारे नाणे,ज्वलनासाठी ऑकसिजनची गरज,आजीबाईचा बटवा,गरम हवा वर जाते,सौरऊर्जा काळाची गरज इत्यादी प्रयोगांचे सादरीकरण केले. या विद्यार्थ्यांना शाळेतील सर्व शिक्षक स्टाफचे मार्गदर्शन लाभले.
         कार्यक्रम प्रसंगी सर्व मान्यवरांचे स्वागत शाळेचे मुख्याध्यापक श्री.अजितकुमार पाटील यांनी गुलाबपुष्प व रोप देऊन केले.माननीय महापौर यांनी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या व वेगवेगळ्या प्रयोगांचे निरीक्षण करून त्यांचे कौतुक केले. शाळेतील दिव्यांग विद्यार्थ्यांना वाहतुक  व मदतनीस भत्यांचे धनादेश देण्यात आले.  करवीर काशी या साप्ताहिकाचे संपादक श्री. सुनीलकुमार सरनाईक यांनी शाळेच्या ग्रंथालयाला 50 पुस्तके भेट दिली. त्याचबरोबर दानोळी येथील तांबोळी वस्रनिकेतनचे  श्री. रजाक  तांबोळी यांनी शाळेस वैज्ञानिकांची माहिती पुस्तके भेट दिली.
        या अपूर्व विज्ञानमेळाव्यास विद्याथ्यांचे सर्व पालक, परिसरातील विज्ञानप्रेमी नागरिक,भारतवीर मित्रमंडळाचे कार्यकर्ते, परिसरातील शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक यांनी भेट दिली. बालवाडीच्या सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष अस्लम पठाण ,सदस्य रमेश सुतार ,वैशाली करपे ,सुनीता पाटील, रजनी सुतार,वाकोजी पाटील,शाळेचे शिक्षक उत्तम कुंभार ,सुजाता आवटी,जे. बी. सपाटे, अरुण सूनगार ,प्राजक्ता कुलकर्णी,आसमा तांबोळी, सेवक मंगल मोरे,हेमंतकुमार पाटोळे तसेच भागातील पत्रकार उपस्थित होते.
                       कार्यक्रमाचे प्रास्ताविक डी.एस.तळप तर सूत्रसंचालन सुशील जाधव यांनी केले व आभार शिवशंभू गाटे यांनी मानले.

Wednesday, 28 December 2016

31 डिसेंबरच्या कत्तलीसाठी मारुती व्हॅनमधुन २२ रेडके व वासरे नेताना एकाला पकडले


कोल्हापूर प्रतिनिधि { संदीप पोवार }

31 डिसेंबरला  हॉटेलमध्ये नॉनव्हेज खाणार असाल तर सावधान कदाचित मटनामध्ये वासरे , बैल , म्हैस , गाय यांच्या मांसाची भेसळ असु शकते , याचेच एक उदाहरण काल पहायला मिळाले
  काल सायंकाळी पाच च्या सुमारास एक पांढर्या रंगाची मारुती ओम्नी गाडी रमनमळा ड्रीम वर्ल्ड ते कसबा बावडा मार्गावरून जात असता कार च्या डिकीतुन एक तोंड बांधलेल्या अवस्थेतील वासरू खाली पडले , मागून येणाऱ्या वाहन चालकांनी ओम्नीला थांबण्याचा प्रयत्न केला मात्र ओम्नी भरधाव वेगात पुढे निघून गेली.

याच दरम्यान ट्राफिक पोलीस विजय पाटील आपल्या दुचाकी वरून कसबा बावडा कडे जात होते त्यांना या प्रकारा बाबत संशय आल्याने त्यांनी पाठलाग करून ओम्नी ला थाबवले. गाडी थांबताच चालकाच्या शेजारी बसलेल्या इसमाने कार मधून पळ काढला.पाटील यांनी चालकाला पकडून त्याची चौकशी केली असता त्याचे नाव शब्बीर बेपारी  {वडगाव } असल्याचे समजले

तोपर्यंत जमा झालेल्या अन्य नागरिकांनी गाडीची झडती घेतली असता त्या मध्ये मागील बाजूस २२ वासरू आणि रेडकू अक्षरशः कोंबून भरलली आढळली .जनावरे ओरडू नयेत या साठी त्यांची तोंडे दोरी व सुतळीने बांधली होतीे. वासरे हालचाल करु नये म्हणुन त्याच्या अंगावर मोठा टायर ठेवला होता त्यामुळे त्यांचा गुदमरून मृत्यू झाला होता.या बाबत लोकांनी  बेपारी कडे चौकशी केली असता त्यान हि जनावरे बालिंग्या हून पेठवडगाव ला कत्तली साठी नेत असल्याच सांगितल.पेठवडगाव मधून त्याचा हॉटेल व्यावसायिकाना पुरवठा केला जात असल्याची धक्कादायक माहिती त्यान दिली.

हा प्रकार ऐकताच नागरिक आवक झाले यातील काहींनी आपली संतप्त भावना व्यक्त करत त्याची धुलाई केली.हि जनावरे 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर हॉटेल कत्तली साठी नेत असल्याचा संशय आल्याने जमाव अधिकच संतप्त झाला.त्यांनी आक्रमक होत ओम्नीची तोडफोड केली.
दरम्यान या घटनेची माहिती शाहुपुरीन पोलिसांना मिळाल्यावर त्यांनी शब्बीर बेपारी ला ओम्नीसह ताब्यात घेतलं.पोलीस ठाण्याच्या आवारात वासरू आणि रेडकांची सुटका केली.मरणासन्न अवस्थेत असलेल्या या जनावरांना  पोलीसांनी पांजरपोळकडे सोपवले पण गुदमरल्याने २ ते ३ वासरे दगावली

मारुती सुझुकीची ब्रिझा इंडियन कार ऑफ द ईअर

मारुती सुझुकीच्या  ब्रिझाला  इंडियन कार ऑफ द ईअरचा पुरस्कार प्राप्त झाला आहे .२००५ पासून नवीन लाँच होणाऱ्या सर्वोत्कृष्ट कारला हा  कार ऑफ द ईअर पुरस्कार देण्यात येतो , यंदा या पुरस्काराच्या शर्यतीत असणाऱ्या टोयोटा इनोव्हा क्रिस्टा , ह्युंदाई टॅक्सनं , फोर्ड इंडेवर , स्कोडा सुपरब या तगड्या प्रतिस्पस्पर्ध्यांचे आव्हान मोडत ब्रिझाने हा पुरस्कार पटकावला . स्टाईल , मायलेज , किंमत , सुरक्षा सुविधा , परफॉर्मन्स , VALUE फॉर मनी , ग्राहक प्रतिसाद या निकषांवर या कारला हा पुरस्कार मिळाला आहे , मार्च २०१६ मध्ये ब्रीझा लाँच झाल्यापासून ७०००० कार विक्री झाली आहे , अजूनही या कार ला वेटिंग आहे हे विशेष

Tuesday, 27 December 2016

कैशलेस पेमेंट चा पहिला लकी ड्रॉ जाहिर

९ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर दरम्यान जवळपास ८ कोटी ऑनलाइन पेमेंट ट्रांझाक्शन झालीत , त्यातील १५ हजार लकी विजेत्यांना प्रत्येकी १ हजार रुपये त्याच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहेत , हा पहिला लकी ड्रॉ काल जाहिर झाली
आपले नाव लकी ड्रॉ मध्ये अाहे का हे पाहण्यासाठी

https://digidhanlucky.mygov.in या वेबसाइटवर पहावे

Monday, 26 December 2016

अग्नी -५ ची अंतिम चाचणी यशस्वी

संपूर्ण स्वदेशी 'अग्नी-५' या क्षेपणास्त्राची आज अंतिम चाचणी करण्यात आली. जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या आण्विक सक्षम या अंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी ओडिशाच्या व्हिलर बेटावर करण्यात आली.
'अग्नी-५' या क्षेपणास्त्राच्या आतापर्यंत तीन चाचण्या घेण्यात आल्या आहेत. ही शेवटची आणि अंतिम चाचणी ठरली, असे संरक्षण संशोधन आणि विकास संस्थने (डीआरडीओ) सांगितले.
पहिली चाचणी १९ एप्रिल २०१२ मध्ये घेण्यात आली होती. तर दुसरी चारणी १५ सप्टेंबर २०१३ आणि तिसरी चाचणी ३१ जानेवारी २०१५ मध्ये घेण्यात आली होती. या तीन्हीही चाचण्या यशस्वी झाल्या होत्या.
'अग्नी-५' हे क्षेपणास्त्र जमिनीवरून जमिनीवरच मारा करणारे आहे. ५० टन वजन असणाऱ्या १७ मीटर लांबीच्या या क्षेपणास्त्राची क्षमता ५ हजार किमी अंतरापर्यंत व आहे.

Friday, 23 December 2016

नाताळ सुट्टीमुळे कोल्हापूर पर्यटकांनी फुलले

नाताळ सुट्टीमुळे कोल्हापूर पर्यटकांनी फुलले

{ कोल्हापूर प्रतिनिधि  संदीप पोवार }

शनिवार , रविवार व नाताळच्या सलग सुट्ट्यांमुळे पुणे ,मुंबई तसेच परराज्यातील पर्यटकांच्या गर्दीने कोल्हापूर फुलुन गेले आहे , महालक्ष्मी मंदीरात दर्शनासाठीची रांग रस्त्यावर गेली आहे , परिसरातील यात्री निवास , हॉटेल्स , दुकानें पर्यटकांनी गजबजली आहेत
न्यु पेलेस , कणेरी मठ , रंकाळा , पन्हाळा , नरसिंहवाडी , जोतिबा ही ठिकाणेदेखील पर्यटकाचा आकर्षण बिंदु आहेत
बहुसंख्य पर्यटक कोल्हापूरची सहल १ ते २ दिवसात आवरुन पुढे गोवा किंवा कोकणात जाण्याच्या तयारीत आहेत

Thursday, 22 December 2016

ऑनलाईन शॉपिंगचा फंडा , ग्राहकाला गंडा





सध्याच्या आधुनिक काळात ऑनलाईन शॉपिंगने चांगलेच बाळसे धरले आहे , डिसकाऊन्टच्या  ऑफर्सचे आमिष दाखवत नवनवीन ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यात चांगलेच यश आले आहे , पण या ऑनलाईन शॉपिंगने कित्येकांना गंडवले पण आहे
नुकतेच एकाने आपल्या बाळासाठी खेळणे ऑर्डर केले होते त्यासाठी १५० रु ऍडव्हान्स पेमेंट केले होते पण त्याला पार्सलमधून खेळण्याऐवजी रद्दी कागदाचा कचरा मिळाला , यापूर्वीही कोल्हापुरात एका व्यक्तीला स्मार्टफोनऐवजी त्याच वजनाची आणि मापाची काच पार्सलमधून देऊन फसवले होते

अश्या घटना टाळण्यासाठी खालील सूचना पाळा

१ ऑनलाईन शॉपिंग अधिकृत व मान्यताप्राप्त वेबसाइट्वरुनच करा

२ ऑनलाईन पेमेंट ऐवजी कॅश ऑन डिलिव्हरीचा पर्याय निवडा

३ आलेले पार्सल डिलिव्हरी बॉय च्या समोरचा खोला व खराब किंवा तूट फूट असेल तर पार्सल व डिलिव्हरी बॉय चा फोटो काढा

४ कोणतीही तक्रार त्वरित नोंदवा

५ शॉपिंग करताना प्रत्येक वास्तूचे वर्णन बारकाईने अभ्यासा , ग्राहकाचे त्या वस्तूंबद्दलचे अभिप्राय वाचा

६ शक्यतो ब्रँडेड वस्तू खरेदी करा व त्याच्या गॅरंटी ची माहिती कस्टमर केअर ला विचारून घ्या

७ काही कंपन्या शिपिंग चार्जेस जादा लावतात ते अवश्य पहा 

Monday, 19 December 2016

नवीन वर्षात BSNL अनलिमिटेड फ्री कॉलिंग देण्याची शक्यता


येत्या नवीन वर्षात BSNL ते इतर मोबाइलला  अनलिमिटेड  फ्री कॉलिंग देण्याची शक्यता आहे , भारत सरकारचा उपक्रम असणाऱ्या या कंपनीचे स्थान ६ व्या क्रमांकावर घसरले आहे , त्यात सुधारणा होण्यासाठी BSNL ने चांगलीच कंबर कसल्याचे वृत्त आहे , जिओ च्या धर्तीवर BSNL हि इतर नेटवर्क ला अनलिमिटेड फ्री कॉलिंग देण्याच्या तयारीत असल्याचे समजते , तसेच 3G डेटा हि कमी किमतीत अनलिमिटेड देणार असल्याचे समजते 


Sunday, 18 December 2016

आरोग्य विमा अत्यंत आवश्यक , का ?, कशासाठी ? अवश्य वाचा

आरोग्य विमा संबंधित एक आवश्यक टिप नेहमी आपण ऐकतो.
‘आरोग्य विमा त्यावेळी करा जेव्हा तुम्हाला त्याची आवश्यकता नसेल’.
याचे कारण हे आहे की, याला संभाव्यता त्यावेळी प्राप्त करु शकत नाहीत, जेव्हा याची गरज असेल.

आरोग्य विम्यात आजारात किंवा अपघातात वैद्यकीय किंवा औषधांचा खर्च परत मिळवण्यासाठी भरत असतो. तसेच यात रुग्णालयात दाखल करण्यापासून, डॉक्टरांची आकारणी, औषधे व इतर सेवा खर्चाचा समावेश असतो. सहसा आरोग्य विम्याध्ये रोजच्या म्हणजेच नित्यनेमाची औषधे किंवा नित्यनेमाचे वैद्यकीय उपचार यासाठी लागू होत नाही.

उदाहरणार्थ, जर आपल्याकडे एक लाख रुपयांचा आरोग्य विमाअसेल, आपण आजारी पडलेलो असलो तर आपणास विमा कंपनीकडून एक लाखापर्यंत परतफेड मिळू शकते. जर आपणा अशा वेळेस कमी आवशक्ता असेल तर विमा कंपनी आपणास गरजेनुसार हप्त्यात रक्कम देते.

आरोग्य विमाकरिता भरण्यात येणारा प्रिमियम भारतीय आयकर कायदा अधिनियम कलम ८०डीच्या अंतर्गत कर सवलतीमध्ये येतो.

आरोग्य विमा जीवनाच्या सुरुवातीलाच घ्या
जेव्हा तुम्ही तरुण किंवा तंदुरुस्त असता तेव्हा आरोग्य विमा  खरेदी करणे जास्त महाग नसते. त्यावेळी विम्याचा प्रिमियम कमी असतो आणि तुम्ही या अवस्थेमध्ये प्रौढावस्थेच्या पॉलिसीपेक्षा व्यापक श्रेणीचे छत्र प्राप्त करु शकतो.
वय वाढण्याबरोबरच प्रिमियम देखील वाढतो

‘फॅमिली फ्लोटर प्लॅन’ :
हा आरोग्य विमाचा अधिक चांगला प्रकार आहे. विमा रक्कम कुटुंबातील सदस्यांमध्ये तो अंतर्भूत होतो. जसे की, ही योजना स्विकारणारा प्रत्येक सदस्य या विम्याच्या अंतर्गत येतो. ‘फॅमिली फ्लोटर प्लॅन’करिता प्रिमियम कुटुंबाच्या वेगळ्या विमा योजनेकरिता सामान्यत यापेक्षा कमी आहे. उदाहरण जर तुमच्या कुटुंबामध्ये ४ सदस्य आहेत तर तुम्ही एकूण ५ लाख रुपयांचा ‘फॅमिली फ्लोटर प्लॅन’ खरेदी करु शकता. आता कुटुंबाचा कोणताही सदस्य ५ लाख रुपयांपर्यंतचा दावा करु शकतो. जर कुटुंबातील एक सदस्य रुग्णालयातमध्ये भरती झाला आणि खर्च ३ लाख रुपयांपर्यंत येत असेल तर तो दिला जातो आणि त्यानंतर या विशिष्ट वर्षांकरिता २ लाखांपर्यंत छत्र कमी होईल. ‘फॅमिली फ्लोटर’ एका कुटुंबाकरिता तर्कसुसंगत आहे. कारण कुटुंबाचा प्रत्येक सदस्य एका योजनेच्या अंतर्गत एक मोठे छत्र प्राप्त होते. त्याच वर्षी एकापेक्षा जास्त सदस्य रुग्णालयात भरती होण्याची संभाव्यता कमी राहते.

घेतल्या वर्षापासून वय ८० पर्यंत नियमित प्रिमियम भरून चालू ठेवता येते.

वय ३५ पर्य़ंत कोणत्याही मेडिकल टेस्ट शिवाय पॊलिसी मिळते

३५-४५ मध्ये मेडिकल टेस्ट देऊन मग थोड्या हाय प्रिमियम वर पॉलिसी घेता येते

४५ नंतर मात्र सहसा तुमचे पॉलिसी ऍप्लिकेशन रिजेक्ट होते किंवा प्रिमियम अत्यंत जास्त असतो.

६० च्या पुढे नवीन पॉलिसी घेता येत नाही.

कोणतेही पुर्वीचे आजार हे पहिले ३ वर्षे पॉलिसी मध्ये कव्हर नसतात, चौथ्या वर्षानंतर मात्र तेही कव्हर होतात.

आपल्या आयुष्यात कोणताही अडथळा न येता आपले आयुष्य सुरळीत राहो हा सकारात्मक दृष्टिकोन असतो पण दुरदृष्टी ठेऊन केलेल्या या नियोजनामुळे आपण भविष्यातील नकारात्मक शक्यतांना काही प्रमाणात मात करु शकतो. म्हणूनच आपला व आपल्या कुटुंबियांचा आरोग्य विमा करुनच घ्यावा.

Friday, 16 December 2016

‘डिजिटल पेमेंट’ करणार्‍या ग्राहकांना एक हजार रुपयांपासून एक कोटी रुपयांची बक्षिसे



आता ‘डिजिटल पेमेंट’ करणार्‍या ग्राहकांना एक हजार रुपयांपासून एक कोटी रुपयांची  बक्षिसे मिळणार आहेत , डिजिटल पेमेंट’ला प्रोत्साहन देण्यासाठी आयोगाने लॉटरी योजना जाहीर केली असून त्यामध्ये दैनंदिन, साप्ताहिक आणि बंपर ड्रॉ काढण्यात येणार आहेत. या लॉटरीअंतर्गत एक हजार रुपयांपासून एक कोटी रुपयांच्या बंपर बक्षिसाचा समावेश आहे. सामान्य जनतेसाठी ‘लकी ग्राहक योजना नाताळ (दि. 25 डिसेंबर) ते पुढील वर्षी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (दि. 14 एप्रिल 2017) पर्यंत सुरू राहणार आहे. या योजनेसाठी यूपीआय, आधार कार्डवर आधारित पेमेंट सिस्टीम (एईपीएस) आणि रूपे कार्डधारक पात्र असतील.50 रुपये ते तीन हजार रुपयांपर्यंत ‘डिजिटल पेमेंट’ करणार्‍या ग्राहकांना बक्षिसे मिळणार आहेत. समाजातील सर्व घटकांना रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहित करण्यासाठी ही योजना आखली आहे. 

Thursday, 15 December 2016

कॅशलेस होण्याचा सोपा मार्ग यू पी आय ऍप





भारतातल्या बहुतेक सगळ्या बँकांनी UPI apps चालू केले आहेत ज्याचा वापर करून तुम्ही समोरच्याच्या बँक अकाउंट मध्ये direct पैसे transfer करू शकता.
आता तुम्ही म्हणाल यात काय एवढा ते तर मी IMPS किंवा NEFT वापरू देखील करू शकतो पण  याला एक दिवस वेळ लागतो ,
 UPI apps साठी तुम्हाला payee register वगैरे करायच्या भानगडीतच पडायच नाहीये तर फक्त एक unique ID generate करून लगेच पैसे transfer होतात.
आता instant पैसे transfer करायचा अजून एक खूप छान option तुमच्यासाठी उपलब्ध झाला आहे आणि transfer केलेले पैसे कोणत्याही wallet मध्ये न जाता थेट जातील बँक अकाउंट मध्ये ! 
या नवीन सेवेचं नाव आहे Unified Payment Interface !
RBI चे आधीचे गव्हर्नर रघुराम राजन ह्यांनी chashless economy ला प्रोत्साहन देण्यासाठी या वर्षीच एप्रिल मध्ये ह्या सिस्टिमचं उद्घाटन केलं होतं.पण बँक अधिकाऱ्यांनी सर्वसामान्यांना याची माहिती होऊ दिली नाही 
पंतप्रधान मोदीजींनी ५०० आणि १००० च्या जुन्या नोटा बंदिनंतर बरीचशी मंडळी cashless economy कडे वळत आहेत. बऱ्याचश्या व्यापाऱ्यांनी आता paytm ,freecharge सारख्या wallet सेवेमधून पैसे स्वीकारण्यास सुरुवात केली आहे.पण याला चार्जेस बसतात , व हि सगळी खासगी ऍप्स आहेत तर  UPI हे सरकारी अँप असून कोणतेही चार्जेस नाहीत 

UPI अँप  वापरायचंय कसं 

– आपल्या बँकेचं UPI app  स्मार्टफोन मध्ये डाउनलोड करा.
– त्या App शी आपलं बँक अकाउंट link करा.आपला ATM कार्ड नंबर लिंक करा 
– App एक unique ID बनवेल ज्याला VPI म्हणतात उदाहरणार्थ  sharad99 @axisbank ,
 बस्स फक्त हा ID त्याच्याशी share करा ज्याच्याकडून तुम्हाला पैसे घायचे आहेत.

– तो त्याच्या UPI App मध्ये VPI  ID टाकून  पैसे transfer करेल आणि पैसे तुमच्या अकाउंट मध्ये लगेच जमा होतील.

 भारतात खालील banks आहेत ज्या UPI payment support करतात.

•HDFC Bank (Payzapp)
•State Bank of India (SBI Pay)
•Axis Bank (Axis Pay)
•ICICI Bank (IMobile and Pockets App)
•Andhra Bank
•Bank of Maharashtra
•Canara Bank
•Catholic Syrian Bank
•DCB Bank
•Karnataka Bank
•Union Bank of India
•United Bank of India
•Vijaya Bank
•Punjab National Bank
•Oriental Bank of Commerce
•TJSB
•Federal Bank
•UCO Bank
•South Indian Bank

•Standard Chartered Bank India

बजाजची नवीन बाईक डॉमिनर 400

बजाजने  नवीन बाईक डॉमिनर 400 नुकतीच लॉन्च केली आहे खास तरुणाईसाठी हि बाईक तयार करण्यात आली आहे .


 KTM DUKE  390 आणि रॉयल एन्फिल्ड या दोन तगड्या प्रतिस्पर्ध्यांना टक्कर देण्यासाठी 400 CC चे 3 प्लग इंजिन ,  35 BHP ताकद , खास LED लॅम्प्स , डिजिटल मीटर , 148 टॉप स्पीड असणारी बाईक प्रत्यक्षात जानेवारी 2017 पासून उपलब्ध होणार आहे , तिची एक्स शोरूम किंमत 1 ,36000 रु पासून पुढे असणार आहे 


2017 मध्ये कारच्या किमती वाढणार





टाटा मोटर्स , हुंदाई मोटर्स , टोयोटा या लोकप्रिय वाहन निर्मात्या कंपन्यांनी 2017 मध्ये आपल्या  कारच्या किमती वाढणार असल्याचे संकेत दिले आहेत , या कंपन्यांनी डिसेंबर 2016 मध्ये जुन्या किमतीवर खास डिस्काउंट ऑफर्सही दिल्या आहेत मारुती वॅगन आर स्टिंग रे वर 80000 , आय 10 वर 53000 , निसान मायक्रा वर 85000 , ह्युंडाई इऑनवर 65000 चा एक्सट्रा डिस्काउंट आहे


.चालू आर्थिक वर्षात कार निर्मितीसाठी लागणाऱ्या कच्च्या मालाच्या किमतीत वाढ झाल्याने जानेवारी 2017  पासून   टोयोटा 3  टक्के , टाटा 5000 ते 25000 तर ह्युंदाई 1 लाख पर्यंत किमतीत वाढ करणार असल्याचे सूत्रांकडून समजते

Tuesday, 13 December 2016

दत्त अवतार जन्मकथा

आज दत्त जयंती त्या निमित्ताने हा दत्त जन्म कथेचा खास लेख

 त्रेतायुगात अत्रीऋषींची पत्‍नी अनसूया ही पतीव्रता  होती. पातीव्रत्यामुळे तिच्या अंगी एवढे सामर्थ्य आले की, इंद्रादी देव घाबरले आणि ब्रह्मा, विष्णु व महेश यांकडे जाऊन म्हणाले, ``अनुसयेच्या सामर्थ्यामुळे तिला देवपण मिळेल ,तिच्या वराने कोणालाही देवांचे स्थान मिळू शकेल ; म्हणून तुम्ही काहीतरी उपाय करा, नाहीतर आम्ही तिची सेवा करू.'' हे ऐकून त्रिमूर्तीनि तिची  सत्व परीक्षा पाहण्याचे ठरवले   

        एकदा अत्रीऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेल्यावर अतिथींच्या वेशात त्रिमूर्ती आले व अनसूयेकडे त्यांनी भिक्षा मागितली. त्यावर अनसूयेने सांगितले, ``ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले आहेत. ते येईपर्यंत थांबा.'' तेव्हा त्रिमूर्ती अनसूयेला म्हणाले, ``ऋषींना परत यायला वेळ लागेल. आम्हाला खूप भूक लागली आहे. लगेच अन्न द्या, नाहीतर आम्ही दुसरीकडे जाऊ. `आश्रमात आलेल्या अतिथींना तुम्ही इच्छाभोजन देता', असे आम्ही ऐकले आहे; म्हणून इच्छाभोजन करण्यास आम्ही आलो आहोत.'' मग अनसूयेने त्यांचे स्वागत केले व जेवायला बसण्याची विनंती केली. त्याप्रमाणे ते जेवायला बसले. ती जेवण वाढायला आल्यावर ते म्हणाले, ``तुझे सुंदर रूप पाहून आमच्या मनात अशी इच्छा झाली आहे की, तू विवस्त्र होऊन आम्हाला वाढावेस.'' 
त्यावर `अतिथीला विन्मुख पाठविणे अयोग्य होईल. माझे मन निर्मळ आहे, मग कामदेवाची काय बिशाद आहे ? माझ्या पतीचे तपफळ मला तारील', असा विचार करून ती अतिथींना म्हणाली, ``मी तुम्हाला विवस्त्र होऊन वाढीन. तुम्ही आनंदाने भोजन करा.'' 

मग स्वयंपाकघरात जाऊन पतीचे चिंतन करून तिने विचार केला की, `अतिथी माझी मुले आहेत' व विवस्त्र होऊन वाढायला आली. पहाते तो अतिथींच्या जागी रडणारी तीन लहान बाळे ! 
त्यांना कडेवर घेऊन तिने स्तनपान करविले व बाळांचे रडणे थांबले.

             इतक्यात अत्रीऋषी आले. तिने त्यांना सर्व वृत्तान्त सांगितला. ती म्हणाली, ``स्वामिन् देवेन दत्तं ।'' याचा अर्थ असा आहे - `हे स्वामी, देवाने दिलेली (मुले).' यावरून अत्रींनी त्या मुलांचे नामकरण `दत्त' असे केले. त्यानंतर अत्रीऋषींनी अंतर्ज्ञानाने बाळांचे खरे रूप ओळखून त्यांना नमस्कार केला. बाळे पाळण्यात राहिली आणि ब्रह्मा, विष्णु व महेश त्यांच्यासमोर उभे राहिले व प्रसन्न होऊन `वर मागा', असे म्हणाले. अत्री व अनसूयेने `बालके आमच्या घरी रहावी', असा वर मागितला. तो वर देऊन देव आपापल्या लोकात गेले. पुढे ब्रह्मदेवापासून चंद्र, विष्णूपासून दत्त व शंकरापासून दुर्वास झाले. तिघांपैकी चंद्र व दुर्वास तप करण्यास जाण्यासाठी परवानगी घेऊन अनुक्रमे चंद्रलोकी व तीर्थक्षेत्री गेले. तिसरा दत्त विष्णुकार्यासाठी भूतलावर राहिला. हेच गुरूंचे मूळपीठ.



Monday, 12 December 2016

साई संस्थान कडून आता दर्शनासाठी टाइम स्लॉट , आगाऊ नोंदणी बंधनकारक



आजपासून शिर्डी साईबाबा मंदिरामध्ये भक्तांना  दर्शनाकरिता दर्शन पास सुविधा मिळणार आहे , त्यामुळे भक्तांना आगाऊ नोंदणी करून पास घेतल्यावर आपल्याला रांगेत किती वाजता प्रवेश मिळणार आहे हे समजेल  .दर्शन  नोंदणी केल्यानंतर पासच्या प्रवेश वेळेनुसार प्रवेशानंतर  आता भक्तांना फक्त १५ मिनिटात साईबाबांचं दर्शन घेता येणार आहे.या सुविधेमुळे भक्तांची रांगेतील अनावश्यक प्रतीक्षा कमी होईल ,नोंदणी करण्यासाठी संस्थानाच्या परिसरात १० काउंटर्स उघडण्यात आले आहेत. नोंदणी केल्यानंतर संस्थानातर्फे एक कार्ड देण्यात येईल ज्यावर तुम्ही कधी दर्शन करू शकता याची वेळ दिलेली असेल.

Sunday, 11 December 2016

जयललितांच्या निधनाच्या धक्क्याने आतापर्यंत ४७० लोकांचा मृत्यू

जयललितांच्या निधनाची वार्ता तामिळनाडूच्या लोकांना अजूनही खरी वाटत नाही , जयललिताना देवा पॆक्षाही जास्त मानणारे लोक तामिळनाडूमध्ये आहेत , त्याच्या निधनाचा धसका घेतल्याने कित्येकजण मेले आहेत ,तर अनेकांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे , आजअखेर ४७० लोक मेले आहेत असे समजते तर अण्णा द्रमुक पक्षाच्या वतीने मृत १९० लोकांची अधिकृत यादीच जाहीर केली असून प्रत्येक मृतामागे परिवाराला ३ लाख देण्याची घोषणा करण्यात आली आहे ,या व्यतिरिक्त अनेक लोकांनी दुःखामुळे अंगठा कापून श्रद्धांजली वाहिली आहे अश्याना ५० हजार देणार आहेत

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनची सभा संपन्न

      कोल्हापूर Mh9Live news Reporter संदीप पोवार

 कोल्हापूर जिल्ह्यातील शहरी व ग्रामिण पत्रकारांना  संघटीत करुन  सर्वांच्या अनुमतीने पत्रकार संघ स्थापन करण्याची विचार प्रकट झाल्याने कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेलफेअर असोसिएशनची स्थापना करण्यात आली आहे.
       या पत्रकार संघाची ध्येय धोरणे निश्चित करणे ,सभासद नोंदणी व ६ जानेवारी पत्रकार दिन व्यापक स्वरूपात संपन्न करणेचे नियोजन आदीसाठी रविवार दि.११ रोजी दुपारी १ वाजता शिरोली एमआयडीसी स्मॅकभवन येथे सभा आयोजित केली होती.
        अध्यक्ष श्री सुधाकर निर्मळे यांनी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स असोसिएशनच्या स्थापनेमागची पार्श्वभुमी सांगुन संघटनेची ध्येय धोरणे विशद केली , पत्रकारांना येणार्या अडचणी सोडवण्यासाठी संघटना कटीबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले
यावेळी खजानीस पोपटराव वाकसे , सचिव सुनिल कांबळे , उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी आदिंनी आपले मनोगत व्यक्त केले , या सभेसाठी जिल्ह्यातील बहुसंख्य पत्रकार सदस्य उपस्थित होते