पेठ वडगांव
येथील डाॅ.सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, पेठ वडगांवला ‘ब्रिटिश कौन्सील’ हा आंतरराष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्राप्त झाला आहे. स्कूलने सादर केलेल्या अतिउत्कृष्ट प्रकल्पामुळे डाॅ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलला हा पुरस्कार प्राप्त झाला. हा पुरस्कार वितरण सोहळा मंगळवार दिनांक 17/11/2017 रोजी ताज हाॅटेल मुंबई येथे ब्रिटीश कौन्सीलच्या विभागीय संचालिका मिस हेलेन फिलविस्टर यांच्या हस्ते संपन्न झाला. मिस हेलेन फिलविस्टर यांच्या हस्ते स्कूलचे संचालक डाॅ. सरदार जाधव व माध्यमिक विभाग प्रमुख श्री. मारूती कांबळे यांना मानाचा किताब व प्रमाणपत्र देऊन अभिनंदन करण्यात आले.
विविध देशातील विद्यार्थ्यांशी प्रोजेक्टमधून संवाद साधता यावा, त्यांच्या विचारांची देवाण घेवाण व्हावी, आंतरराष्ट्रीय स्तरावरील मानवी जीवन, अन्य घटकांचा अभ्यास व्हावा हया हेतूने हे प्रोजेक्ट पाठवले गेले. डाॅ. सायरस पूनावाला स्कूलने एकुण 7 प्रोजेक्ट पाठविले होते. हयामध्ये आंतरराष्ट्रीय जगताची नैसर्गिक संपत्ती, दळणवळणाची साधने, आहार, जल व्यवस्थापन, संस्कृती, नियम, चालीरिती, सण इत्यादी विषयी प्रोजेक्टवजा माहिती श्रीलंका, अफगानिस्तान, पाकिस्तान, इजिप्त, नेदरलॅड, त्रिनीदाद व इराक हया देषामध्ये फेसबुक, व्हाॅटसअॅप, इमेल, व्हिडिओ काॅन्फरन्स द्वारे पाठवून हे प्रोजेक्ट पूर्ण केलेे.
हे प्रोजेक्ट परदेषात पाठविल्याने विद्यार्थ्यांची अध्ययनवृत्ती वाढली. तसेच परदेषातील विद्यार्थ्यांना ही याचा खूप फायदा झाला. आंतरराष्ट्रीय जगताशी ओळख होण्यास मदत झाली. हे प्रकल्प ब्रिटीश कौन्सीलने ठरवून दिलेल्या मूल्यांकन प्रणालीत पात्र झाल्याने शाळेला हा अॅवाॅर्ड मिळाला आहे.स्कूलने विद्यार्थ्यांची परिपूर्ण तयारी करून घेतली. सर्व विद्यार्थ्यांनी यासाठी चांगले योगदान दिले. प्रोजेक्ट सादरीकरण, त्याचा उपयोग, आंतरराष्ट्रीय दर्जा, शैक्षणिक उपयोग, विद्यार्थी सहभाग, तंत्रज्ञानाचा उपयोग, विचार संबंधता या घटकांचे उत्कृष्ट उपयोजन केल्याने स्कूलला हा पुरस्कार मिळण्यास मदत झाली आहे.
हे सर्व प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व विद्यार्थी, तसेच प्राचार्या सौ. स्नेहल नार्वेकर व शिक्षक श्री.जावेद नदाफ, श्री विनायक मोहिते, कु. सविता निकम, सौ. चित्रा हगलहोले, सौ. आरिफा शेख, श्री. विद्याधर कांबळे, सौ. माधवी कोतेकर, श्री राकेश ढवळे, श्री.संदिप बावचकर सौ. दिपाली चिर्कोडे यांनी मोलाचा वाटा उचलला. समन्वयक म्हणून श्री मारूती कांबळे यांनी ही जबाबदारी पार पाडली. ब्रिटीश कौन्सील प्रोजेक्ट साठी संस्थेचे अध्यक्ष श्री गुलाबराव पोळ, उपाध्यक्षा श्रीमती विजयादेवी यादव, स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्या पोळ यांचे प्रोत्साहन मिळाले.
Tuesday, 28 November 2017
डाॅ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल: ’इंटरनॅशनल स्कूल अॅवार्ड‘ ने सन्मानित !
Monday, 27 November 2017
संविधान म्हणजे मूलभूत हक्क व कर्तव्ये यांची सोनेरी गुंफण होय.-अजितकुमार पाटील...
*
कसबा बावडा;दि.२७:
संविधान दिन (राष्ट्रीय विधी दिन) हा २६ नोव्हेंबर रोजी भारतभर साजरा केला जातो. २९ ऑगस्ट १९४७ रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या राज्यघटनेच्या निर्मितीसाठी मसूदा समिती स्थापन झाली. अनेक बैठका व चर्चासत्रांनंतर या समितीने सादर केलेला अंतिम मसुदा २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान समितीने स्वीकारला होता.याच शुभप्रसंगाचे स्मरण होण्यासाठी व विद्यार्थ्यांना संविधानाचे महत्व समजण्यासाठी आज राजर्षी शाहू विद्यामंदिर मध्ये संविधान दिन मोठ्या उत्स्फूर्तपणे साजरा करण्यात आला.
सदर दिवशी शालेय आवारात निखिल सुतार,वेदांतीका पाटील,पीयूष सणगर,समर्थ कांबळे,जानवी कोरवी,चिन्मय पोवार, वैष्णवी ठोंबरे,या विद्यार्थ्यांनी संविधान प्रस्ताविकेचे मोठ्याने वाचन केले.त्याचबरोबर सर्व विद्यार्थ्यांनी संविधान वाचण्याचा संकल्प केला.तसेच सदर प्रसंगी मुख्याध्यापक अजितकुमार पाटील यांनी संविधान म्हणजे मूलभूत हक्क व कर्तव्ये यांची सोनेरी गुंफण आहे. संविधान म्हणजे देशाचा सर्वोच्च कायदा.या कायद्याचा आदर्श ठेवून विद्यार्थ्यांनी जीवन जगावे असा संदेश त्यांनी दिला.
सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवशंभू गाटे यांनी केले तर आभार अरुण सुनगार यांनी मानले. शाळा व्यवस्थापन समिती चे सदस्य रमेश सुतार,जेष्ठ शिक्षक उत्तम कुंभार, सुशील जाधव, जयश्री सपाटे,आसमा तांबोळी,कल्पना पाटील,सुलोचना चव्हाण,गायत्री प्रभावळे मॅडम , हेमंतकुमार पाटोळे मंगल मोरे तसेच भागातील बहुसंख्य पालक उपस्थित होते.
स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्य थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्या मुलांच्या साठी रक्तदान शिबीर
कोल्हापूर प्रतिनिधी
हिंदुह्रदय सम्राट शिवसेना प्रमुख मा . श्री बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्य थॅलेसेमियाग्रस्त चिमुकल्या मुलांच्या साठी रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. हे शिबीर शिवसेना कार्यालय , राजारामपुरी कोल्हापुर या ठिकाणी पार पडले. शिवसेना कोल्हापुर शहर प्रमुख श्री दुर्गेश लिंग्रस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधुन या शिबीराचे आयोजन करण्यात आले . याप्रसंगी शिक्षक सेना जिल्हा अध्यक्ष अरूण मुजुमदार , जिल्हा उपाध्यक्ष सतिश लोहार , गजानन जाधव , शहरप्रमुख संदीप भाट व समस्त शिवसेना पदाधिकारी यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. रक्तदान शिबीरामध्ये बहुसंख्य युवक, युवती , नागरीक ,शिवसैनिक , शिक्षक सेना पदाधिकारी, शिवसेना पदाधिकारी , यांनी रक्तदान केले .
Sunday, 26 November 2017
26/11 दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना रक्तदानाच्या माध्यमातुन आदरांजली !
कसबा बावडा प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील.
प्राथमिक शिक्षण समिती, मनपा कोल्हापूर संचलित मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर क्र.११ मध्ये दहशतवादी हल्ल्यातील शहिदांना रक्तदान च्या माध्यमातुन आदरांजली वाहण्यात आली. वेध फाऊंडेशन व राजर्षी शाहू विद्यामंदिर, शाळा क्र11 कसबा बावडा,कोल्हापूर यांच्या संयुक्तपणे रक्तदान शिबीर घेण्यात आले. नगरसेविका माधुरी लाड यांच्या अध्यक्षतेखाली खाली मुख्याध्यापक अजितकुमार पाटील, वेध फाऊंडेशन चे अध्यक्ष रुद्र पाटील, नगरसेवक अशोक जाधव,भारतवीर तरुण मंडळचे अध्यक्ष चेतन चौगले,अभिजीत जाधव,राहुल भोसले भोसले,यांच्या प्रमुख उपस्थितीत आदरांजली वाहण्यात आली.रक्तदान शिबीराच्या यशस्वीतेसाठी वैभवलक्ष्मी ब्लड बैंकेचे डॉ. मछिंद्र सावंत,सागर माळी,रेखा कुरणे,निलेश चौगुले,नीलम देवकर,माया निगडे,भारती लोकूर,अक्षय कारंडे,करणं घोलराखे,श्रुती शिंदे,अपूर्वा भोसले यांनी विशेष सहकार्य केले. उपस्थितांचे स्वागत मुख्याद्यापक अजितकुमार पाटील यांनी केले श्री.अरुण सुनगार यांनी रक्त व त्याची माहिती सांगितली, शिवशंभू गाटे यांनी आभार मानले.मृणाली दाभाडे,भक्ती चव्हाण,यश घाटगे,जे.बी.सपाटे,सौ.अर्चना कोरवी तसेच परिसरातील जेष्ठ नागरिक,भारतवीर तरुण मंडळाचे कार्यकर्ते ,माजी विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते..
Friday, 24 November 2017
हेरले येथे श्री हनुमान मंदिर जिर्णोध्दार समितीच्या वतीने पारायण सोहळ्यास सुरूवात
हेरले/ प्रतिनिधी दि. २४/११/१७
हेरले ( ता. हातकणंगले) येथे श्री हनुमान मंदिर जिर्णोध्दार समितीच्या वतीने पारायण सोहळ्यास सुरूवात झाली आहे. विविध धार्मिक कार्यक्रमासह मान्यवरांची प्रवचने व किर्तनांचे आयोजन केले आहे. कार्यक्रम वेळापत्रक पहाटे ४ते६ काकडा आरती, सकाळी ७ ते११ श्री ज्ञानेश्वरी पारायण, दुपारी ११.३०ते १२.३oगाथा भजन, सायंकाळी साडेचार ते साडेपाच वाजता हरिपाठ, साडेसहा ते साडेसात प्रवचन, रात्री साडे नऊ ते साडे अकरा किर्तन.
शनिवार दि. २५ रोजी सायंकाळी प्रवचन: श्री संदिप तळसकर महाराज ( मरळी), रात्रौ किर्तन : श्री पाटील महाराज ( देवाची आळंदी), रविवार दि.२६ रोजी सायंकाळी प्रवचन:श्री रंगनाथ नाईकडे बाबा ( पुणे), रात्रौ किर्तन: श्री गुरूवर्य तुकाराम एकनाथ ( शिरोळ), सोमवार दि. २७ रोजी सायंकाळी प्रवचन: श्री पांडुरंग काळे ( शिरोळ), किर्तन: श्री उमेश महाराज ( किर्दत), मंगळवार दि. २८ रोजी प्रवचन: श्री गुरुवर्य राणोजी मालक (पंढरपूर ), किर्तन: श्री बाळासो धर्माधिकारी महाराज ( इचलकरंजी ),
बुधवार दि. २९ रोजी प्रवचन: श्री रामचंद्र कोगेकर महाराज ( महे), किर्तन: श्री संदिप तळसकर महाराज ( मरळी) गुरुवार दि. ३० रोजी प्रवचन: श्री नारायण देवळे ( तांदुळवाडी), किर्तन: श्री वेदांतचार्य कृष्णानंद शास्त्री महाराज (गोकुळ शिरगांव), शनिवार दि. ३० रोजी दिंडी सोहळा व भव्य मिरवणूक आयोजित केली आहे., शुक्रवार दि. १ डिसेबंर रोजी सकाळी श्री हनुमंतास अभिषेक व श्री ज्ञानेश्वरी पारायण सांगता व श्रीपाद जाधव महाराज सातारा यांचे काल्याचे किर्तन होईल. दुपारी महाप्रसादाचे वाटप.
Thursday, 23 November 2017
विभागीय कला-उत्सव लोकनाट्य स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ विद्यालय प्रथम
हेरले/ प्रतिनिधी दि. २४/११/१७
विभागीय कला -उत्सवात लोकनाट्या स्पर्धेमध्ये श्री भैरवनाथ विद्यालयाने विभागात प्रथम येण्याचा बहुमान मिळविला.
मानव संसाधन विकास मंत्रालय व राष्ट्रीय माध्यमिक शिक्षा अभियान तसेच शिक्षण उपसंचालक कार्यालयाच्या वतीने आयोजित विभागीय कला -उत्सवात लोकनाट्य या कला प्रकारात स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये विभागातूनअनेक संघ सहभागी झाले होते.भुयेवाडीच्या श्री भैरवनाथ विद्यालयाने उत्कृष्ट सादरी करण केल्याने त्यांना प्रथम क्रमांक देण्यात आला . या यशाने संघाची पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय कला -उत्सव स्पर्धसाठी निवड झाली आहे . या स्पर्धसाठीचे स्क्रीप्ट लेखन व दिग्दर्शन जनार्दन पाटील यांनी तर ई - प्रोजेक्ट -एम् .आर. पाटील , रंगभूषा , वेषभूषा आमानावर व्ही .एम्. तसेच नैपथ्य एन् .आर. कांबळे यांनी काम पाहिले . सर्व यशस्वितांना मुख्याध्यापक पी .एम् . पाटील , डी .व्ही. पाटील व श्री भैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ पदाधिकारी यांची प्रेरणा व मार्गदर्शन लाभले .
फोटो - विभागीय विजेता श्री भैरवनाथ विद्यालय संघ मान्यवरांच्या हस्ते बक्षिस स्विकारतांना.
Saturday, 18 November 2017
डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूलमध्ये ‘‘ विद्यार्थी सुरक्षितता’’ या विषयावर कार्यशाळा संपन्न
पेठ वडगांव
येथील मिसेस विजयादेवी यादव प्री-प्रायमरी स्कूल, डॉ. सायरस पूनावाला इंटरनॅशनल स्कूल, डॉ. सायरस पूनावाला आय.आय.टी. व मेडिकल अॅकेडमी, डॉ. सायरस पूनावाला आर्मड् फोर्सेस प्रीप्रेटरी इन्स्टीटयुट पेठ वडगांव मध्ये शनिवार दिनाक 18/11/2017 रोजी प्री-प्रायमरी विभागापासून ते 11 वी पर्यतच्या सर्व पालकांसाठी स्कूलमध्ये ‘‘विद्यार्थी सुरक्षितता’’ या विषयावर कार्यशाळा संपन्न झाली.
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या च्या नवीन परिपत्रकानुसार ‘स्कूलमध्ये विद्यार्थ्यासाठी सुरक्षितते’बाबत काही सुचना दिल्या आहेत. विद्यार्थी वर्गाच्या सुरक्षिततेसाठी स्कूलने अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून देवून विद्यार्थी सुरक्षितता जपली आहे.
विद्यार्थी वर्गाची सुरक्षितता लक्षात घेवून स्कूलच्या आवारासह वर्गखोल्या, मैदान, प्रयोगशाळा , कॉरीडॉर्स अषा अन्य ठिकाणी एकूण 110 कॅमेरे बसविण्यात आले आहेत स्कूल अंतर्गत संवादासाठी टेलीकॉमची सोय करण्यात आली आहे. तसेच स्कूलच्या आवाराभोवती सुरक्षा भिंत घालून विद्यार्थ्यीची सुरक्षितता ख-या अर्थाने जपली जाते. तसेच दोन सिक्युरिटी गार्डस 24 तास सुरक्षितता जपत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुख्य गेट, रिसेप्शन , मुलींचे वस्तीगृह, मुलांचे वस्तीगृह हया ठिकाणी सेक्युरिटी सदैव तत्पर आहेत. सिक्युरिटी मुळे सुरक्षितता अधिक जपली जात आहे.
विद्यार्थ्याच्या दृष्टीस पडेल असे अत्यावश्यक फोन नंबर्स स्कूलमध्ये लावले आहेत. हया मध्ये पोलिस, अॅम्ब्युलन्स, आग, आपातकालीन स्थिती, एम.एस.ई.बी., अॅन्टी रॅगिंग हेल्पलाईन इ. प्रकारचे सर्व नंबर्स आहेत. तसेच आगीपासूनचे बचाव करण्याच्या हेतूने फायर एक्सटींविषर ची सोय केली आहे. विद्यार्थ्यीना फायर मॉक ड्रीलचे प्रात्येक्षिके देवून विद्यार्थ्याना त्याची माहिती करून दिली आहे. विद्यार्थी वाहतूक व्यवस्था ही सुरक्षित अषी आहे. बसेसमध्ये सी.सी.टी.व्ही. कॅमेरे ही आहेत स्कूलच्या बसेस आर टी ओ ऑफिसच्या मान्यतेच्या असून सर्व नियमांना बांधील आहेत.
स्कूल भेटीसाठी येणा-या जाणा-यासाठी आय.डी पासेसची ही सोय केली आहे तसेच विद्यार्थी वर्गाच्या शारीरिक दृष्टया विचार करून आर.ओ. चे शुद्ध पाणी स्कूलमध्ये पुरविले जाते. आपतकालीन व्यवस्थापनासाठी बाहेर जाण्याचा मार्ग ही दाखविला आहे. शाळेमध्ये पूर्णवेळ समुपदेशक व डॉक्टर नेमून विद्यार्थ्याची काळजी घेतली जाते. विद्यार्थी वर्ग, षिक्षक, प्राचार्याना कधीही येवून भेटू शकतात.
तसेच प्रत्येक स्टाफचे पोलिस व्हेरिफिकेशनसाठी घेतले जाते. चाईल्ड वेलफेअर कमिटीची स्थापना करून विद्यार्थ्यासाठी कल्याणकारी योजना राबवल्या जात आहेत. गेटपास ही शाळेची पहिल्या पासूनची पद्धती आहे पण नवीन संकल्पना म्हणून पॅरेन्ट स्मार्ट कार्ड सुविधा देण्यात येणार आहे पालकाकडे स्मार्टकार्ड असलेषिवाय विद्यार्थ्याला बाहेर सोडले जात नाही.
त्यामुळे विद्यार्थी वर्गाची सुरक्षितता लक्षात घेवून त्यांना सुरक्षितते बाबत जागृत केले आहे. वरील सर्व उपाय योजना व सुविधाच्या मुळे स्कूलमधील सर्व विद्यार्थी सुखरूप व सुरक्षित छताखाली ज्ञानार्जन करत आहेत. ही कार्यशाळा प्राचार्या स्नेहल नार्वेकर यांनी मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष श्री. गुलाबराव पोळ, स्कूलच्या अध्यक्षा सौ. विद्याताई पोळ, संचालक डॉ. सरदार जाधव, श्री भीमा गोणी, सर्व विभाग प्रमुख यांच्यासह शाळेचे सर्व शिक्षक, पालक उल्लेखनीय संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन चित्रा हगलहोले यांनी केले तर आभार प्रफुल्ल अडगळे हयांनी मानले व वंदे मातरम ने कार्यशाळेची सांगता झाली.
Wednesday, 15 November 2017
जागतिक मधुमेह दिनानिमित्त केळवकर मेडिकल सेंटर मार्फत रुग्णांसाठी मोफत मेळावा संपन्न
कोल्हापूर प्रतिनिधी - ज्ञानराज पाटील
14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी कोल्हापूर येथील केळवकर मेडिकल सेंटर ( डायबेटिस केअर व रिसर्च सेंटर) मार्फत मधुमेह रुग्णांकरीता मंगळवार दि 14 नोव्हेंबर 2017 रोजी मोफत मेळावा आयोजित करण्यात आला होता . सुरुवातीला केळवकर मेडिकल सेंटर पासून जनजागृती रॅली काढण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन अर्जुन माने (उपमहापौर कोमनपा) यांचे हस्ते करण्यात आले. सुरुवातीला प्रसिद्ध वक्ते विठ्ठल कोतेकर यांनी सकारात्मक दृष्टिकोन आणि आरोग्य या विषयावर व्याख्यान दिले. नंतर तज्ञ डॉक्टर्सकडून मार्गदर्शन केले गेले तसेच मधुमेह रुग्णांना तज्ञ वक्त्यांकडून आहार जीवन शैली व्यायाम याबद्दल मार्गदर्शन केले .
उपस्थित रुग्णांचे आहारापुर्वी व आहारानंतर अशी दोन वेळा रक्त शर्करा तपासणी केली . यावेळी अल्पोपहार सोय करण्यात आली होती . डॉ. प्रल्हाद केळवकर, डॉ. सिद्धी कुलकर्णी, डॉ. प्रांजली धामणे व इतर तज्ञ मंडळी चे मधुमेह समज - गैरसमज, मधुमेह व स्त्री आरोग्य, मधुमेह व आहार या विषयावर व्याख्यान झाले .
या मोफत आणि समाजोपयोगी कार्यक्रमात कोल्हापूर आणि परिसरातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने सहभाग घेतला . हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी केळवकर मेडिकल सेंटर, कोल्हापूर च्या वतीने सुनंदा पाटील , राजेंद्र नाईकवडी, पापालाल मेस्त्री, संदिप दाभाडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
Monday, 13 November 2017
जागतिक मधुमेह दिनानिमित्त रुग्णांसाठी मोफत मेळावा
कोल्हापूर प्रतिनिधी ज्ञानराज पाटील
14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिन म्हणून साजरा केला जातो या दिवशी कोल्हापूर येथील केळवकर मेडिकल सेंटर ( डायबेटिस केअर व रिसर्च सेंटर) मार्फत मधुमेह रुग्णांकरीता मंगळवार दि 14 नोव्हेंबर 2017 रोजी मोफत मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यासाठी तज्ञ डॉक्टर्सकडून मार्गदर्शन केले जाणार आहे तसेच मधुमेह रुग्णांना तज्ञ वक्त्यांकडून आहार जीवन शैली व्यायाम याबद्दल मार्गदर्शन केले जाणार आहे.
उपस्थित रुग्णांचे आहारापुर्वी व आहारानंतर अशी दोन वेळा रक्त शर्करा तपासणी केली जाणार आहे. यावेळी अल्पोपहार सोय करण्यात आली आहे. डॉ. प्रल्हाद केळवकर, डॉ. सिद्धी कुलकर्णी, डॉ. प्रांजली धामणे व इतर तज्ञ मंडळी चे मधुमेह समज - गैरसमज, मधुमेह व स्त्री आरोग्य, मधुमेह व आहार या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
या मोफत आणि समाजोपयोगी कार्यक्रमाचा लाभ घेता यावा यासाठी नावनोंदणी करणे आवश्यक आहे. यासाठी केळवकर मेडिकल सेंटर, कोल्हापूर फोन क्र. 0231 2660620, 2660621
तसेच सुनंदा पाटील 9130476060,
राजेंद्र नाईकवडी 9420130524
पापालाल मेस्त्री 9960067869
या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.
Friday, 10 November 2017
“१२ नोव्हेंबर २०१७ रोजी हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे एक दिवशीय कृषी पर्यटन प्रशिक्षण आयोजित”
कोल्हापूर प्रतिनिधी - कृषी पर्यटन विकास संस्थेच्या सहकार्यातून , महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने नुकतेच कृषी पर्यटन धोरण -२०१७ जाहीर केले आहे, कृषी पर्यटन व्यवसायाला कृषी पूरक व्यवसाय म्हणून मान्यता मिळाली असून, कृषी पर्यटन संकल्पना आता चांगल्या पद्धतीने शेतकरी वर्गाला फायद्याची होत आहे . कृषी पर्यटन सुरु करण्यासाठी शेतकरी बंधू भगिनींना मार्गदर्शन मिळावे, यासाठी कृषी पर्यटन विकास संस्था पुणे यांच्या प्रयत्नातून १२ नोव्हेंबर २०१७ रोजी हॉटेल सयाजी, कोल्हापूर येथे एक दिवशीय कृषी पर्यटन प्रशिक्षण आयोजित केले आहे.
महाराष्ट्र राज्यात कृषी पर्यटन संकल्पना खूप चांगल्या पद्धतीने विकसित झाली असून आज मितीस ३६५ कृषी पर्यटन केंद्र महाराष्ट्रात कार्यरत आहे. मागील तीन वर्षांत संपूर्ण महाराष्ट्रातील कृषी पर्यटन केंद्रांना १७ लाख पर्यटकांनी भेटी दिल्या असून व यातून ३५ कोटी रुपये इतकी आर्थिक उलाढाल झाली आहे. कृषी पर्यटनाच्या माध्यमातून १०००० लोकांना रोजगार मिळाला आहे.
कोल्हापूर, सातारा, सांगली, या जिल्ह्यामध्ये कृषी पर्यटन संकल्पनेला चांगला वाव आहे. उत्तम प्रकारे नवनवीन प्रयोग करून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती केली जाते, मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतले जात आहे, ऊस, भाजीपाला, फळे, फुले, तसेच शेतीला जोड व्यवसाय म्हणून गूळ , दुग्ध व्यवसाय, कुकुटपालन, शेळी पालन , रोपवाटिका हे जोड व्यवसाय केले जातात. पर्यटनासाठी धार्मिक, सांस्कृतिक, नैसर्गिक दृष्ट्या मोठा वाव या सगळ्या जिल्यात आहे. मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. या सर्व गोष्टींचा विचार करून शेतीला जोड व्यवसाय म्हणून कृषी पर्यटन शेतकऱ्यांच्या शेतावर चालू करणे. शेतात उत्पादित झालेला शेतीमाल आपल्याच शेतावर विकला जावा, परिसराची , गावाची ओळख संपूर्ण महाराष्ट्राला व्हावी , शेतकरी बंधू भगिनींना कृषी पर्यटनातून आर्थिक उत्पन्न मिळावे व कृषीला पूरक व्यवसाय मिळावा यासाठी एक दिवशीय कृषी पर्यटन प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
अधिक माहितीसाठी 8390906677 या क्रमांकावर संपर्क साधावा.
आपणास विनंती की आपल्या आसपासच्या शेतकऱ्यांना याचा लाभ घ्यायला सांगा.
Tuesday, 7 November 2017
हेरले ( ता. हातकणंगले) येथे ९ नोव्हेंबर रोजी भव्य करबल दंगल स्पर्धांचे आयोजन
हेर्ले/ वार्ताहर दि. ८/११/२०१७
हेरले ( ता. हातकणंगले) येथील हजरत पीर माँसाहेब व हजरत पीर जबरबेग साहेबवली यांच्या वतीने गुरूवार ९ नोव्हेबंर रोजी भव्य करबल दंगल स्पर्धा आयोजित केल्या आहेत.
भव्य करबल दंगल स्पर्धा झेंडा चौक येथे रात्रौ ९.3oवाजता सुरू होतील. प्रवेश फी ५००रू. असेल. स्पर्धेस अनुक्रमे प्रथम ७००१, द्वितीय ६००१, तृतीय ५००१, चतुर्थ४००१,पाचवा ३०o१, सहावा २oo१, सातवा १o०१ याप्रमाणे रोख रूपये व ढाल बक्षिसे आहेत. स्पर्धेचे उदघाटन पोलीस निरीक्षक सी.बी. भालके, शाहिर कुंतिनाथ करके,लोकनियुक्त सरपंच अश्विनी संदिप चौगुले, बाबासो खांबे, मुनिर जमादार , माजी सरपंच झाकीर देसाई, अब्दूलगणी देसाई, सुरेश पाटील ,रियाज जमादार आदींच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे. तरी कोल्हापूर जिल्ह्यातील स्पर्धकांनी या स्पर्धेचा लाभ घ्यावा असे आवाहन करबल दंगल कमिटीकडून प्रसिध्दी पत्रकाद्वारे केले आहे.
मौजे वडगांव( ता. हातकणंगले ) येथील विद्या मंदिर मराठी शाळेत विद्यार्थी दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न
हेर्ले / वार्ताहर दि. ८/११/१७
मौजे वडगांव( ता. हातकणंगले ) येथील विद्या मंदिर मराठी शाळेत विद्यार्थी दिन विविध कार्यक्रमांनी संपन्न झाला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ७ नोव्हेबंर १९०० साली सातारा येथील हायस्कूलमध्ये प्रवेश घेतला होता. त्यांचे स्मरण व्हावे या उद्देशाने संपूर्ण महाराष्ट्रभर हा दिवस विदयार्थी दिन म्हणून साजरा करण्यात आला. या निमित्ताने शाळेत अखंड सप्ताहामध्ये विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते.
पी.के.सामाजीक सेवा ग्रुप यांचे मार्फत डॉ. बाबासाहेब आंबेडकर या विषयावरती सकाळी ११ वाजता निंबध स्पर्धा सुरू करण्यात आली. कार्यक्रम कॉ. प्रकाश कांबरे यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाला. स्पर्धेत उत्कृष्ट निंबध लिहणारे विद्यार्थी व वकृत्त्व स्पर्धात प्राविण्य मिळवणारे विद्यार्थी यांना परिक्षा पॅड, वह्या, पेन आदी साहित्य व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले.
यशस्वी विदयार्थी निंबध स्पर्धा मोठा गट :प्रथम कु .गायत्री सकटे,द्वितीय कु.गायत्री अकिवाटे,तृतीय कु.वैष्णवी चौगुले ,लहान गट प्रथम कु.रहमत बारगीर,द्वितीय कु .श्रेया कांबळे,तृतीय कु.समर्थ गोरड,वकृत्व स्पर्धा मोठा गट प्रथम समृध्दी लोहार ,द्वितीय कु.शामबाला तराळ,तृतीय कु.श्रेया कांबळे,लहान गट प्रथम कु.वैष्णवी शेडगे, द्विवितीय कु. समीक्षा लंबे,तृतीय कु.भार्गवी कांबळे.आदींनी यश मिळविले
यावेळी कॉ. प्रकाश कांबरे, शालेय कमिटी अध्यक्ष संतोष मोरे, सचिन लोहार, पवन जाधव, दिपक लोहार, प्रसन्न कांबरे, शाळेचे मुख्याध्यापक आनंदा पाटील, श्रुती गोखले, शिवाजी पाटील, शिवाजी लोखंडे,अरूणा कोठावळे,
रझिया नदाफ, अविष्कार कांबळे, प्रशांत पाटील, शिक्षकवृंद उपस्थीत होता. आभार माणिक पाडळकर यांनी मांनले.
फोटो - मौजे वडगांव ( ता. हातकणंगले) येथील विद्यामंदिर मधील विविध स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थीसह शिक्षकवृंद