Tuesday, 27 November 2018

पवित्र पोर्टल विरोधात शैक्षणिक संस्थांचा भव्य मोर्चा


कोल्हापूर प्रतिनिधी 

सुधाकर निर्मळे / भाऊसाहेब सकट /मिलींद बारवडे


   महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने शाळांमधील शिक्षकांची भरती शासनामार्फत करण्यासाठी पवित्र पोर्टल प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे .या आदेशामुळे महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षण संस्था चालकांच्यामध्ये असंतोष निर्माण झाला आहे. शासनाच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा शिक्षण संस्था संघ व शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला .

     

    सकाळी ११ वाजता दसरा चौकातून या  मोर्चाला सुरुवात झाली .मोर्चामध्ये शासनाच्या विरोधात घोषणा देण्यात आला .जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा आल्यानंतर मोर्चाचे सभेत रूपांतर झाले .यावेळी बोलताना एस.डी. लाड यांनी शासनाच्या शिक्षण विरोधी धोरणाचा तीव्र निषेध करताना ,सर्व अनुदानित शाळांना नियमितपणे वेतनेतर अनुदान मिळावे व २० टक्के अनुदान मिळणाऱ्या शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे मिळावेत . मूल्यांकन झालेल्या शाळांना त्वरित अनुदान मिळावे आणि जुनी पेन्शन योजना सुरू ठेवावी ,शिक्षकेतर सेवकांचा  सुधारित आकृतीबंध त्वरित लागू करावा व  बालवाडी शिक्षिका सेविकांना शासनाकडून वेतन मिळावे तसेच बालवाडी विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळावा आदी मागण्या केल्या  .  यावेळी जयंत आसगांवकर , भैय्या माने , क्रांतिकुमार पाटील आदींची भाषणे झाली . त्यानंतर निवासी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना संस्थाचालक संघ व व्यासपिठाच्या शिष्ठ मंडळाने निवेदन दिले . 

    

   शिक्षण तज्ञ डी.बी. पाटील ,  शिक्षण सभापती अमरीश घाटगे , एस. डी .लाड, जयंत आंसगांवर , वसंतराव देशमुख , डॉ. अभयकुमार  साळुंखे , भैय्या माने, आबिद मुश्रीफ, विरेंद्र मंडलिक, युवराज पाटील , क्रांतिकुमार पाटील ,शिवाजी  माळकर , हसन देसाई , सुंदर देसाई ,सुरेश संकपाळ , व्ही.जी. पोवार , आर. वाय. पाटील , बी.जी. बोराडे , आर.डी. पाटील , के.के. पाटील , उदय पाटील , सुधाकर निर्मळे , संदीप पाटील , मिलिंद बारवडे , भाऊसाहेब सकट , प्रा. समीर घोरपडे , एन.आर. भोसले , एम.एन. पाटील , संजय कलिगते , अशोक हुबळे , संतोष आयरे, बी.के. मोरे डी.ए. जाधव,,नंदकुमार इनामदार , शिवाजी कोरवी , श्रीपती  पोवार आदींनी नेतृत्व केले . 

                   फोटो 

शिक्षण संस्था संघ आणि शैक्षणिक व्यासपीठाच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांना निवेदन एस. डी .लाड, शिक्षण सभापती अमरिश घाटगे , विरेंद्र मंडलिक , जयंत आसगावकर, भैय्या माने ,वसंतराव देशमुख ,क्रांतीकुमार पाटील , व्ही.जी . पोवार , के .के .पाटील , उदय पाटील , सुधाकर निर्मळे व इतर

Wednesday, 21 November 2018

त्रिपुरारी पौर्णिमा आणि कार्तिक स्वामी दर्शन

आज कार्तिक शुद्ध पौर्णिमा आहे या पौर्णिमेला ‘त्रिपुरारी पौर्णिमा’ असं म्हणतात.याच दिवशी भगवान शंकारांनी त्रिपुरासुरांचा वध केला होता, अशी मान्यता आहे, म्हणूनच ते ‘त्रिपुरारी’ या नावानेही ओळखले जातात.

तसेच  "कार्तिक महिना, पौर्णिमा आणि कृत्तिका नक्षत्र" या तीन गोष्टी जेव्हा एकत्र येतात तेव्हा म्हणजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ज्या काळात कृत्तिका नक्षत्र असेल तेव्हा श्रीकार्तिकेयाचे दर्शन घेण्याचा शुभकाल मानला जातो. 

श्रीकार्तिकेय हे बल,बुध्दी,साहस आणि यशस्वितेचे प्रतिक मानले गेले आहे. तो शिवगणांचा सेनापती मानला जातो. त्यामुळे ज्ञानसंपन्नता, यशस्विता आणि इतर सर्व शुभगुणांचे अधिपत्य श्रीकार्तिकेयाकडे आहे. वर वर्णन केलेल्या पर्वणीकाळात त्याचे दर्शन घेणे हे "धनसंपत्तीकारक" ही मानले गेले आहे.

त्रिपुरारी पौर्णिमा मागची आख्यायिका 

पूर्वी तारकासुर नावाचा एक राक्षस होऊन गेला. प्रयागतीर्थाच्या ठिकाणी एक लाख वर्षे तारकासुराने तपश्चर्या केली. या ठिकाणी तपश्चर्या केल्यानंतर ब्रह्मदेव त्याला प्रसन्न झाले आणि कोणताही वर माग, असे म्हणाले. त्यावर देवता, मनुष्य, निशाचर किंवा रोग यांच्यापासून आपल्याला अभय असावे, असा वर त्याने मागितला. याचाच अर्थ त्याला मरण नको होते. त्यावर ब्रह्मदेवाने त्याला तथास्तु म्हटले. असा वर मिळाल्यानंतर मात्र त्या असुरातील उन्मत्तपणा वाढला. मिळालेला वर हा कल्याणासाठी वापरायचा असतो. पण या असुराने तसे केले नाही. तो देवदेवतांसह सा-यांनाच त्रास द्यायला लागला.

त्याने देवांच्या स्थापतीकडून म्हणजेच विश्‍वकर्म्याकडून अंतराळात तीन नगरे बांधून घेतली होती. लोखंड, तांबे आणि चांदीची ही नगरे सुंदर दिसत होती. ती त्याने आपल्या तारकाक्ष, विद्युन्माली आणि कमललोचन अशा तीन पुत्रांना दिली. हे तिघे राक्षसपुत्र प्रजेचा आणि संपूर्ण विश्‍वाचा छळ करणारे होते. उत्पात माजवणे आणि त्रास देण्यात ते आपल्या बापापेक्षा पुढे होते. त्यामुळे गांजलेल्या लोकांनी महादेवाला साद घातली. शंकर धाऊन आले. त्यांनी कार्तिक शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी या राक्षसांवर हल्ला केला. त्यांची तिन्ही पुरे भगवंतांनी उद्‌ध्वस्त केली आणि सर्व राक्षसांचा नायनाट केला. या दिवशी प्रदोषकाळी शिवाने त्रिपुरासुराचा वध करून देवदेवतांची त्रासातून सुटका केली. म्हणून हा दिवस त्रिपुरारी पौर्णिमा या नावाने साजरा करण्याची परंपरा सुरू झाली. त्रिपूर संहाराचा आनंद व्यक्त करण्यासाठी दीप पेटवून ही पौर्णिमा साजरी केली जाते. घरोघरी, शिवमंदिरातून आणि इतर देवालयांमधून दीपोत्सव साजरा करतात.

कार्तिक पौर्णिमेस प्रत्येक मंदिरातून विशेषतः शिवमंदिरातून त्रिपुर वाती लावतात. महाराष्ट्रातील सर्व मंदिर अशा तऱ्हेने उजळून निघतात जणू काही देवच दिवाळी साजरी करीत आहेत, देवांनींच मंदिरे प्रकाशमय केली आहेत. म्हणून या त्रिपुरी पौर्णिमेला “मोठी दिवाळी किंवा देव दिवाळी” असेही म्हण्तात.

जीवनात तेजोमय प्रकाशाची, भक्तीची, शांतीची प्रेरणा देणारी , मनाला आनंद देणारी, उत्साह देणारी, त्रिपुरारी आपणा सर्वांना फलदायी ठरो हीच त्या भगवान शिव-शंकरापाशी मागणी.

मंगळवार दि. २७ नोव्हेंबरला पाच जिल्हयातील शाळा बंद राहणार . कोल्हापूर विभागीय शिक्षण संस्था बैठकीत निर्णय




कोल्हापूर / प्रतिनिधी 

      मिलींद बारवडे

      

       शिक्षक भरतीसाठी आणलेल्या पवित्र पोर्टल प्रणालीला विरोध करणे   ,वेतनेतर अनुदान सरसकट सर्व शाळांना मिळावे  , शिक्षकेतर सेवक  आकृतीबंध त्वरित लागू करावा, जुनी पेन्शन योजना त्वरीत  लागू करावी   आदी मागण्यांसाठी कोल्हापूर विभागातील पाच जिल्ह्यांमधील सर्व माध्यमांच्या प्राथमिक ,माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा मंगळवार  दि. २७  नोव्हेंबर रोजी बंद ठेवण्याचा निर्णय़ आज कोल्हापूर विभागीय शिक्षण संस्था व  जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्या  राम गणेश गडकरी हॉलमध्ये झालेल्या बैठकीत घेण्यात आला .अध्यक्षस्थानी शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस .डी. लाड  होते .

         यावेळी बोलताना एस डी लाड म्हणाले , २०  टक्के अनुदानावरील शाळांना पुढील अनुदानाचे टप्पे मिळावेत, जुनी पेन्शन योजना पुन्हा सुरू करावी यासह अन्य मागण्यांसाठी दि .२७ रोजी दसरा चौकातून सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे .  शिक्षण क्षेत्रातील समस्या महाराष्ट्र शासनाने त्वरित सोडवाव्यात यासाठी पाठपुरावा करण्याचे यावेळी ठरले .कोल्हापूर विभागातील कोल्हापूरसह, सांगली ,सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील सर्व शाळा दि .२७ रोजी  बंद राहतील  .या बैठकीस विभागीय अध्यक्ष शिवाजीराव माळकर ,वसंतराव  देशमुख, प्रा.जयंत आसगांवकर, डॉ.ए.एम.पाटील,आर.डी. पाटील, पी.एस. हेरवाडे, के.एच. भोकरे, सुधाकर निर्मळे, मिलींद बारवडे, भाऊसाहेब सकट, बी.जी. बोराडे ,बी.बी. पाटील, प्रतापराव देशमुख, शिवाजी माळकर, संजय पाटील, संजय कडगावे, एम.एन. पाटील, संदीप पाटील , प्रा. समीर घोरपडे , गजानन काटकर आदी उपस्थित होते .आभार प्रा.सी.एम. गायकवाड यांनी मानले.

              फोटो 

कोल्हापूर :  शैक्षणिक व्यासपिठाच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष एस.डी. लाड सोबत जयंत आसगांवकर , शिवाजीराव माळकर ,जयंत आसगांवर, जयवंत  देशमुख व इतर

Tuesday, 20 November 2018

वाहन चालकांनो सावधान ! पुढे ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली आहे, वाहने जपून चालवा.


हेरले/ प्रतिनिधी

        सलीम खतीब


       वाहन चालकांनो सावधान ! पुढे ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली आहे, वाहने जपून चालवा अन्यथा अपघाताने जीवघेणी ठरू शकेल. नोव्हेबंरपासून साखर कारखाने सुरू झालेने ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली यांची सांगड रस्त्यावरून ऊस वाहतूक करीत असतांना वाहतूकीचा तरी बोजवारा उडतोच मात्र संभाव्य अपघातातून जीवघेणी सापळा ठरत असतो. त्यामुळे वाहन चालकांनी सतर्कता बाळगणे महत्त्वाचे आहे.

        कोल्हापूर जिल्हा सधन असल्याने ऊस उत्पादनात अग्रेसर ठरत आहे. ऊस उत्पादनास पोषक हवामान,अन्य अनुकूल घटक आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रमुख नगदी पिक ठरले आहे. जास्तीत जास्त क्षेत्र या पिकाचे असल्याने सहकारी साखर कारखानदारी विकसीत झाली आहे. सालाबादप्रमाणे नोव्हेबंरच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवडयामध्ये ऊस गाळप हंगामास सुरूवात होऊन साखर कारखाने सुरू होतात. सर्वत्र ऊस तोडणीची लगबग सुरू झाली आहे.

       वीस किमीच्या क्षेत्रात ऊस उत्पादन नजीक साखर कारखाने स्थापन झाले असल्याने ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉली या वाहनातून परवडणारी असल्याने सर्रास केली जाते. मात्र या वाहतूकीकडून काही वेळेला नियमांचे उल्लघंन होत  असल्याने अपघातास कारणीभूत ठरून गळीप हंगामात जीवघेणी ठरत आहे.असे अनेक अपघात होऊन स्पष्ट झाले आहे. प्रत्येक सालामध्ये अनेक अपघात होऊन प्रचंड जिवीत व वित्तहानी झाली आहे.

       दूचाकी , चारचाकीसह अन्य वाहनधारकांनी गळीत हंगाम बंद होईपर्यंत प्रवास करीत असतांना समोर ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ट्रॉली पासून सावधानता बाळगणे महत्वाचे आहे.ट्रॉलीतून रस्त्यावर ऊसाच्या मोळ्या पडणे, ट्रॅक्टर ट्रॉली रस्त्यात उलटणे,रस्त्यात पंक्चर होणे , ट्रॅक्टरास एकच हेडलाईट असणे,आदी कारणे अचानक अपघात होण्यास कारणीभूत ठरत असतात. त्यामुळे सर्वांनी अपघात होऊ नये यासाठी काळजी घ्यावी.

        

    ट्रॅक्टर ट्रॉलीस रिप्लेक्टर नसतात.

ट्रॅक्टर ट्रॉलीस पाठीमागील बाजूस अन्यवाहना प्रमाणे सावधानता बाळगणेसाठी दिवे नसतात. म्हणून लाल रेडीअमचे रिफ्लेक्टर लावायचे असतात. त्यामुळे पाठीमागून येणाऱ्या वाहनांना पुढील वाहन दिसेल आणि सावधनता बाळगून ओव्हरटेक करीता येईल. किंवा थांबलेले दिसून येईल. मात्र ऊस वाहतूक करणाऱ्या बहुसंख्य वाहनांना रिफ्लेक्टर लावलेले नसलेने अन्य वाहनांना अंदाज येत नाही. परीणामी भिषण धडक होऊन अपघातास सामोरे जावे लागते. मग चूक कोणाची दंड कोणाला अशी दयनीय  अवस्था निर्माण होते.

       

ऊसाचा क्षमतेपेक्षा जास्त लोड भरला जातो.

    ऊसाची दोन्ही सांगडमध्ये जास्तीत जास्त वाहनास न पेलणारा क्षेमतेपेक्षा जास्त लोड भरून मुख्य रस्त्यावरून वाहतूक केली जाते. काही वेळेस लोड व्यवस्थीत न भरलेने किंवा रस्त्याच्या खबडबमुळे अचानक ट्रॉली उलटतात. त्यामुळे अन्य गाडीवरती ऊसाच्या मोळ्या पडणे तसेच पाठीमागील वेगाने येणाऱ्या वाहनाची धडक होऊन अपघात झालेची अनेक उदाहरणे ताजी आहेत.

         

अचानक वळण घेतल्याने रस्ता अडविला जातो.

ट्रॅक्टर दोन ट्रॉली घेऊन ऊस वाहतूक करीत असतात. त्यांची लांबी जास्त असते. त्यांची गती दुसऱ्या वाहनापेक्षा कमी असते.काही वेळेस रस्त्याच्या वळणावर अथवा दुसऱ्या रस्यावरून जाणेसाठी वळण घ्यावे लागते. त्या प्रसंगी अन्यवाहना प्रमाणे सहजगतीने टर्न बसत नसलेने पाठीमागून येणाऱ्या वाहनास अडथळा निर्माण होऊन जलदगतीमुळे टक्कर होऊन अपघात होतात.

                  चौकट 

 मुलांना चालत्या ट्रॉलीतून ऊस काढण्यास रोखा.

मुलांना ऊस खाण्यास आवडतो. गावातील रस्त्यावरून ही वाहने जात असतांना ऊस काढण्यासाठी ट्रॉलीच्या मागे मुले धावत असतात. त्यावेळी तोल जाऊन ट्रॉलीच्या खाली पडण्याची शक्यता असते. तरी आपल्या मुलांना धावत्या ट्रॉलीतून ऊस काढण्यासाठी मज्जाव करा.

                

सायकलस्वारांनी ऊस ट्रॉलीतील ऊस धरून जाऊ नये.

कामगार, मजूर आपल्या कामावर जाणेसाठी सायकलवरून प्रवास करीत असतात. गळीत हंगाम सुरू झाले नंतर काहीजण ऊस ट्रॉलीतील ऊसास धरून सायकल न मारता पाच पंचवीस किमी सहज प्रवास करीत असतात. मात्र काही वेळला अचानक ट्रॅक्टर थांबला, हातातील ऊस सुटला, ट्रॉलीतील मोळ्या डोक्यात पडल्या या कारणामुळे अपघात होऊन सायकल स्वारास जिवघेणी ठरू शकते.

                चौकट

पेालीस दलाने ट्रॅक्टर ट्रॉली वाहतूकीस शिस्त लावावी.

कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच रस्त्यावरून ऊस वाहतूक ट्रॅक्टर ट्रॉली वाहनातून होत आहे. बारा तालूक्यातील पोलीस ठाण्यांनी आपल्या अधिकार क्षेत्रातील ऊस वाहनास रिफ्लेक्टर लावले आहेत का? ट्रॅक्टरास दोन हेडलाईट आहेत का? टेपचा मोठया कर्कश  आवाजात  वाहतूक करणाऱ्या या तीन घटकाची तपासणी करून नियमांचे उल्लघंन करणाऱ्या वाहनांवरती कायदेशीर कारवाई करून वाहतूकीस शिस्त लावावी. त्यामुळे संभाव्य अपघात टळू शकतील. साखर कारखान्याकडून ट्रॅक्टर ट्रॉलीस रिफ्लेक्टर वितरीत करून वाहनास लावण्यास अनिवार्य करावे.

उत्कृष्ट खेळाडू बनल्यास सरकारी नोकरी बरोबरच जीवनही यशस्वी - सपोनि अस्लम खतीब

हेरले / प्रतिनिधी दि.२०/११/१८


    कबड्डी खेळातून उत्कृष्ट खेळाडू बनल्यास सरकारी नोकरी मिळवता येतेच त्याचबरोबर प्रो कबड्डीच्या यशापर्यंत जाऊ शकतो . यासाठी जिद्द,चिकाटी, कष्ट करण्याची तयारी आवश्यक असते. खेळातून जीवनातील यश फलीती होऊ शकतो. असे मत कबड्डीपट्टू सहाय्यक पोलीस निरीक्षक अस्लम खतीब यांनी व्यक्त केले. ते हेरले  (ता. हातकणंगले) येथील हेरले क्रीडा मंडळाच्या वतीने पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी शाहिर कुंतिनाथ करके होते.

     सपोनि अस्लम खतीब पुढे म्हणाले की , हेरले क्रीडा मंडळाच्या माध्यमातून कबड्डीपटू बनलो. आर्थिक स्थिती हालाकीची, मार्गदर्शन अभाव यामुळे चार वेळा पोलीस भरतीमध्ये एक, दोन गुणामध्ये यश दूर राहिले. मात्र जिद्द चिकाटी वर्दी मिळविण्याची महत्त्वकांक्षा बाळगत पहिल्याच प्रयत्नात पीएसआय झालो. यासाठी मला प्रा.मुल्ला, इम्तियाज शेख यांचे मार्गदर्शन लाभले. हेरले परिसरातील खेळाडू, मुले मुली यांना पोलीस भरतीचे मार्गदर्शन मिळून निश्चित यश मिळावे. म्हणून पोलीस भरतीचे प्रशिक्षण केंद्र स्थापन केले आहे. क्रीडा मंडळाच्या वतीने पोलीस भरतीपर्यंत प्रशिक्षक राष्ट्रीय खेळाडू इम्तियाज शेख व रुद्र पाटील आपणास शारिरीक चाचणीचे खेळ व लेखी परीक्षेची तयारी करून घेणार आहेत. त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असे आवाहन केले.

    शाहिर कुंतिनाथ करके म्हणाले की, तरुणाई ड्रिंक, ड्रग्ज, डान्स, ड्रायव्ह या चार डी मध्ये अडकली आहे. यातून बाहेर पडावे. सपोनि अस्लम खतीब यांनी पोलीस अधिकारी होऊन गावातील तरूणांना योग्य करिअरची दिशा देण्यासाठी या अॅकॅडमीची स्थापना जननी भूमीची कृतज्ञता व्यक्त करणेसाठी केली आहे.  तुम्हीही जननी भूमीची सेवा करण्यासाठी प्रशिक्षणाचा लाभ घेऊन जीवनात यशस्वी बनून गावाचे नाव लौकिक करा.

      सामाजिक कार्यकर्त्या निलोफर खतीब म्हणाल्या आपण स्वप्न पाहत असतांना बंद डोळे करून न पाहता उघडया डोळ्यातून पहा नक्की स्वप्न सत्यात उतरेल.  दुसऱ्याच्या हेटाळणीकडे लक्ष न देता  कष्ट करण्याची जिद्द ठेवावी.आपल्या बुद्धीच्या जोरावर कर्तृत्वान बनू शकतो याची उदाहरणे म्हणजे भारतातील राष्ट्रपुरुष होय.

    या प्रसंगी वेद अॅकॅडमिचे इम्तियाज शेख, रुद्र पाटील,प्रा. भाऊसाहेब वड्ड, मार्गदर्शक केशव मिरजे,अध्यक्ष विनोद वड्ड, उपाध्यक्ष प्रकाश खुपिरे, खजानिस जयकुमार करके, माजी सरपंच रियाज जमादार, डॉ.युवराज वड्ड, गोविद आवळे, ग्रा.पं. सदस्य राहुल शेटे, सतिश काशिद, रंजित इनामदार आदीसह मंडळाचे कार्यकर्ते , महाविद्यालयीन विद्यार्थी,तरुण मंडळाचे सदस्य, युवक  उपस्थित होते.

      फोटो 

हेरले (ता. हातकणंगले ) येथे सपोनि अस्लम खतीब बोलतांना शेजारी इम्तियाज शेख, रुद्र पाटील,राहूल शेटे व अन्य मान्यवर.

Tuesday, 13 November 2018

औचित्य वाढदिवसाचे, पण पिंड सेवेचा.


   

 माजगाव प्रतिनिधी:—

   दि.०६/११/

२०१८.

          सध्याच्या धावपळीच्या युगात भगवान खवरे,पोर्ले/ठाणे.ता.पन्हाळा.जि.कोल्हापूर,डिजीटल पेंटिंग व्यावसाईक हे आपल्या वाढदिवसाचे निमित्त साधुन आपल्या वर्षभराच्या उत्पन्नातील एक महिन्याचे उत्पन्न सामाजिक बांधीलकी म्हणुन सामाजिक कार्यावर गेले तीन वर्षे खर्च करतात.

        या सालात त्यांनी आपल्या वाढ दिवसानिमित्त खाजगी शाळांच्या तुलनेत जिल्हा परिषदांच्या शाळेत सुविधा उपलब्ध असाव्या त म्हणुन व शाळेतील मुलांना स्वच्छ पानी मिळावे या हेतूने अॅपो/आरओ चा बारा लिटर क्षमतेचा फिल्टर कुमार व कन्या शाळेस भेट दिला.

   यावेळी कन्या शाळा व्यवस्थापण समिती अध्यक्ष रामभाऊ चेचर,कन्या चे  मुख्याध्यापक नरहरी पाटील,मांडवकर सर नामदेव पोवार सर पठाण सर व पालक उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे सुत्रसंचालन पठाण सर यांनी केले व आभार पोवार सर यांनी मानले.

|| तिमिरातूनी तेजाकडे ||

   माजगांव प्रतिनिधी.

  दि.०६/११/२०१८.

           'तिमिरातूनी तेजाकडे' हे व्रत घेवून शैक्षणिक व्यासपीठ मलकापूर ता.शाहुवाडी.च्या वतीने विविध दात्यांच्या सहकार्यातून यंदाची दिवाळी धोंडेवाडी(सोनुर्ले)ता.शाहुवाडी जि.कोल्हापूर व नांदारी धनगरवाडा ता. शाहुवाडी.जि.कोल्हापूर.या दुर्गम,डोंगराळ, दुर्लक्षित,वाड्या—वस्त्यावरील,पालांवरील लोकांसोबत दिवाळी साजरी केली. गावातील सर्व कुटुंबांना दिवाळी किट दिले.पावनखिंड युवा मंचचे अध्यक्ष अनिकेत हिरवे यांनी सी.पी.एल.फौडेशन पुणे यांच्या सहकार्याने अनेक वर्षे अंधारात राहिलेल्या कुटुंबांना उजेडात आणले.लख्ख प्रकाशात आनंदमय दिवाळी साजरी करताना लोकांच्या चेहर्‍यावर वेगळेच तेज तरळत होते.लोकांच्या चेहर्‍यावरील तेज पाहून कार्यकर्त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद हा अवर्णनिय व अमुल्य असाच होता. 

       गेलेदोन दिवस घरची दिवाळी,घरात जमलेले नातेवाईक व घरांतील लोकांच्यामध्ये वेळ न घालवता शैक्षणिक व्यासपिठाच्या आनंदमय दिवाळी या उपक्रमात सर्व कार्यकर्ते सहभागी झाले.खर्‍या अर्थाने देण्याचा आनंद उपभोगणार्‍या सर्व दात्यांचे व या कामी अठवडाभर फराळ साहित्य पॅकिंग करुन ते वाडी—वस्तीवरील कुटुंबांना वाटप करणेपर्यत योगदान देणारे व्यासपिठाचे सर्व कार्यकर्ते....राज्य आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त विनायक हिरवे सर व कुटुंबीय,उमेद फौडेशनचे प्रकाश गाताडे,सचिन कुंभार,सोनुर्ले केंद्रातील शिक्षक परिवार,सुशांत कुंभार,संतोष शेलार,भुसावळ येथे कार्यरत असणारे माने साहेब,दत्तात्रय सोनटक्के,अशोक माने,तुकाराम पाटील,अनिल अंगठेकर,सागर वरपे,सर्जेराव पाटील,संभाजी सुतार,अजित बंगे,सरदार कुंभार,सर्जेराव लोहार,सुनिल सुतार,रामचंद्र बोरगे,चंद्रकांत मुगडे,युवराज काटकर,अशोक पाटील व शिवाजी माने या सोनुर्ले केंद्रातील मावळ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Monday, 5 November 2018

दिवाळी स्वराज्याच्या गडकोटांसोबत' या उपक्रमाअंतर्गत किल्ले पन्हाळगडाच्या पदभ्रमंती चे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन

                    पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा यांच्या वतीने 'ही दिवाळी  स्वराज्याच्या गडकोटांसोबत' या उपक्रमाअंतर्गत किल्ले पन्हाळगडाच्या पदभ्रमंती चे 11 नोव्हेंबर रोजी आयोजन केले आहे .

             इतिहासात प्रथमच शिवछत्रपतींच्या पदस्पर्शाने पुनीत झालेल्या राजमार्गावरून या सफरीची सुरुवात होणार आहे . या मध्ये पन्हाळ्याचा दुर्लक्षित भाग ,गडाच्या वाटा - चोरवाटा , व्यापारी मार्ग , फरसबंदी मार्ग ,दुर्लक्षित समाध्या ,येथे घडलेल्या लढायांची भौगोलिक आणि ऐतिहासिक दृष्टीने मांडणी पन्हाळ्यावर अभ्यास करणारे पन्हाळा इतिहास संशोधन मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद शेवाळे करणार आहेत . त्याचबरोबर या पदभ्रमंती मध्ये इतिहास अभ्यासक श्री. सतीश वाकसे यांचे "स्वराज्याचे साक्षीदार उपेक्षित नरवीरांचा इतिहास" या विषयावर व्याख्यान आयोजित केले आहे .

          या भटकंतीची सुरुवात शिवा काशीद समाधी स्थळापासून होणार असून रेडिघाटी , ब्रिटिशकालीन स्मशानभूमी परिसर ,काली बुरुज , राणमंडळ , अंधारबाव ,कोकण दरवाजा , अंबरखाना मार्गे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजवाड्याच्या अवशेषांच्या जवळ सांगता होणार आहे . या मोहिमेत चहा  ,जेवण (झुणका भाकरी) व सहभाग प्रमाणपत्र देण्यात येणार असून 7 नोव्हेंबर पर्यंत नावनोंदणी करणे आवश्यक आहे . नावनोंदणीचे अर्ज सह्याद्रीसाहित्ययात्रा ,भवानी मंडप येथे पवन निपाणीकर व बिंदू चौक येथे प्रशांत आंबी यांच्याकडे उपलब्ध आहेत . अधिक माहितीसाठी 7350407969 या क्रमांकावर संपर्क साधून जास्तीत जास्त शिवप्रेमींनी सहभागी होण्याचे आवाहन या मोहिमेचे संयोजक सुदर्शन पांढरे व प्रशांत आंबी यांनी केले .

                

पन्हाळा इतिहास संशोधन मंडळ ,

नागपूर रत्नागिरी महामार्ग महामार्ग सर्वेक्षण प्रसंगी अधिकारी व शेतकरी यांच्यात वादावादी

हेरले / प्रतिनिधी दि. ५/११/१८

अवधूत मुसळे

            नागपूर ते रत्नागिरी रस्त्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे . यासाठी मौजे वडगाव  (ता.हातकणंगले)गावातील शेतकऱ्याची जवळ जवळ २१ एकर बागायती शेतजमीन , २ विहिरी ,छप्पर वजा घरे , बोअरवेल , फळझाडे , इतके भुसंपादकरूण रस्त्यामध्ये जाणार असल्याने गावातील शेतकरी  भुसंपादन होऊ नये यासाठी आंदोलनाच्या पवित्र्यात होते . त्यामुळे मोजणीसाठी येणाऱ्या अधिकाऱ्यांनी मोठा पोलिस बंदोबस्त मागविला होता . यावेळी आधिकारी व शेतकरी यांचे मध्ये सुरुवातीला थोडा शाब्दीक वाद होऊन नंतर सामोपचाराने शेतकऱ्यांनी मदत केली.

        नागपूर ते रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग १६६याचे सर्वेक्षण शेतकऱ्यानी रोखण्याच्या प्रयत्नात होते . पण भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे जनरल मॅनेजर बी .एस. साळूखे व भुसंपादन अधिकारी अभियंता बशीर भाई यांनी शेतकऱ्यांचे म्हणने ऐकूण त्यावर योग्य मार्ग काढला . आम्ही फकत सर्वेक्षण करणार असून आजून तुम्हाला तुमचे म्हणने मांडण्यास वेळ आहे तसेच त्यावर हरकती घेऊ शकता.  यामुळे सर्वेक्षण होऊ दया असे या अधिकाऱ्यांनी पटवून दिले . 

    शिवसेना शहरप्रमुख सुरेश कांबरे,अॅड. विजय चौगुले व शेतकऱ्यानी आपली बाजू मांडत तालूक्यातील ६ गावांचा समावेश असून प्रत्येक गावाचा रेडिरेकनर दर वेगळा आहे . त्यामुळे ६ही गांवांना एकाच रेडिरेकनरच्या ४ते ५ पट मोबदला मिळावा अशी आग्रही मागणी केली. शेतकऱ्यात सर्वानुमते चर्चा झाली व जागेची मोजणी करू देण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला .

        पण तत्पुर्वी या मार्गाच्या सर्वेक्षणासाठी अधिकारी येणार अशी चर्चा व महमंद जमादार कोतवाल यांनी आगोदर नोटिस बजावल्याने शेतकरी मोठया प्रमाणात जमा झाले होते . त्यामुळे हे अधिकारी सर्वेक्षणासाठी पोलिस बंदोबस्तासह दाखल झाले . यामुळे शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची या अधिकाऱ्यानी समाधानकारक उत्तर देऊन शेतकऱ्यांना शांत केले.कोणाचीही अडचण नाही असे विचारूण मोजणी करण्यास सुरुवात केली . त्यामुळे मोजणीचे कामकाज सांय .६पर्यत सुरू होते. 

      यावेळी तलाठी संभाजी घाटगे , कोतवाल महमंद जमादार , अॅड . विजय चौगुले , स्वाप्निल चौगुले , शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे , जयेंद्र सावंत , तानाजी थोरवत , मधुकर आकिवाटे , कॉ.प्रकाश कांबरे , संतोष थोरवत , बबन सावंत , तसेच गावातील शेतकरी मोठया संख्येने उपस्थित होते . यावेळी शिरोली पो . ठाण्याच्या वतीने पोलीस उपनिरिक्षक सुर्यकांत शिरगुपी यांनी दंगल नियंत्रण पथकासह चोख बंदोबस्त ठेवला होता .

     फोटो 

 मौजे वडगाव येथे रस्ता सर्वेक्षणासाठी आलेले राजमार्ग प्राधीकरणाचे जनरल मॅनेजर बी .एस. साळूंखे ,  शिवसेनेचे शहरप्रमुख सुरेश कांबरे , अॅड. विजय चौगुले, स्वप्नील चौगुले , व शेतकरी पोलीस कर्मचारी

Friday, 2 November 2018

एम्पथी फौंडेशन मुंबई.यांच्या मार्फत ९१संगणक संच प्रदान.



       माजगाव  प्रतिनीधी:— दि.२/११/२०१८

      एम्पथी फौंडेशन मार्फत ११ शाळांना ९१ संगणक  संचाचे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये वाटप करण्यात आले.यामध्ये कुमार व कन्या विद्या मंदिर पोर्ले/ठाणे ता.पन्हाळा —१७,जिजाबाई हायस्कूल माजगांव ता.पन्हाळा—९ दळवेवाडी ता.पन्हाळा—५, कळकुंद्री ता.चंदगड—५, आंबवडे ता.पन्हाळा—६, सरस्वती ज्युनियर कॅलेज.कळकुंद्री ता.चंदगड—१४,न्यु इंग्लीश 

स्कुल बहिरेश्वर ता.करवीर—८. कोतोली जि.प शाळा ता.पन्हाळा—१२,जोतिबा(वाडी रत्नागीरी)ता.पन्हाळा—१५.

         या प्रसंगी दिनेश झोरे प्रोजेक्ट मॅनेंजर,एम्पथी फौंडेशन,मुंबई. संदिप दगडे समन्वयक,एम्पथी फौंडेशन मुंबई.उज्वल कदम सहाय्यक एम्पथी फौंडेशन मुंबई,प्रकाश (अण्णा) पाटील,प्रकाश उर्फ(गणा) जाधव,सरपंच पोर्ले/ठाणे,संभाजी जमदाडे तंटामुक्त समिती अध्यक्ष पोर्ले/ठाणे, कन्या शाळा मुख्याध्यापक नरहरी पाटील सर,कुमार शाळा  मुख्याध्यापक सी.डी.सावंत सर, माजी पंचायत समिती सदस्य शिवाजी चेचर, माजी ग्राम पंचायत सदस्य दाजी चौगलै, ग्राम पंचायत सदस्य नारायण धनगर, रामराव चेचर, संभाजी खवरे अध्यक्ष,शाळा व्यवस्थापन समिती  कुमार पोर्ले,रामभाऊ चेचर.अध्यक्ष,शाळा.व्यवस्थापन समिती,कन्या पोर्ले,अनिल पाटील,बाबुराव जंगम,डुबल सर,कुंभार सर,मांडवकर सर,गुरव सर,गवळी सर,पोवार सर,जाधव सर,खोत सर,उबाळे सर,आरगे मॅडम इत्यादी उपस्थित होते.

         कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पठाण सर यांनी केले व कदम सर यांनी आभार मानले.