आरोग्य तपासणी साठी वडगांव पालिकेने दोन थर्मल स्क्रीनिंग मशिन खरेदी केले तर एक विजयसिंह यादव प्रतिष्ठानकडून भेट
पेठ वडगांव /वार्ताहर - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकाची आरोग्य तपासणी करण्यासाठी वडगांव नगरपालिकेने दोन थर्मल स्क्रीनिंग मशिन घेतली तर एक मशीन येथील विजयसिंह यादव प्रतिष्ठानकडून पालिकेला भेट देण्यात आले. यादव प्रतिष्ठानच्या प्रमुख व माजी नगराध्यक्षा विदया पोळ यांचे वतीने राजकुमार पोळ यांनी मुख्याधिकारी सुषमा कोल्हे शिंदे यांना हे मशिन देणेत आले.आता पालिकेकडे तीन मशिन आल्याने नागरिकांची आरोग्य तपासणी होणारअसून यामुळे शहरात समाधान व्यक्त होत आहे