■कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपक्रम
येरला:- ग्रामपंचायत ढिवरी पिपरी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उल्लेखनीय कामगिरी करत गत एक महिन्यापासून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यामध्ये सकाळी संपुर्ण गाव ग्रामस्थांच्या मदतीने स्वछ करण्यात येते.त्याचप्रमाणे गावामध्ये कोरोना निगराणी पथकाची स्थापना करुन बाहेर जिल्ह्यातून आलेल्या व्यक्तीला दंड करणे, गावातील गरजू व्यक्तीला जीवनावश्यक वस्तूची मदत करणे तसेच 24 तास ग्रामस्थाच्या अडचणी सोडविणे.ग्रामपंचायत येथे मदत केंद्र उभारन्यत येवुन त्याच्या समस्या सोडविन्यात येत आहे.
याकरिता सरपंच सौ. हर्षदा कोरडे,सचिव जी.एन.भोयर, अरविंद कोरडे, निशा ताजणे, मधुकर ढ़वस, कॉम्प्यूटर ऑपरेटर विद्या जयंत कातरकर व ग्रामस्थानी सहभाग घेतला. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्याकरीता मा.जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये कोरोना निग्राणी पथक स्थापन करण्यात आले आहे. त्या पथकाच्या अन्तर्गत बाहेर जिल्ह्यातून व बाहेर गावावरूंन आलेला जो कोनी व्यक्ती असेल त्याची चौकशी करुन त्याचे कारण जर सकारात्मक असेल किवा कुठला परवाना असेल तर पुढिल प्रवासासाठी सोडण्यात येईल अन्यथा त्याचेवर दंडात्मक कार्यवाही ग्रामपंचायत स्तरावरुन करण्यात येईल.