उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
दरवर्षी 5 जून हा दिवस जागतिक पर्यावरण दिन म्हणून साजरा केला जातो. परिसर हा शब्द सर्वांनाच परिचित आहे.घराच्या आजूबाजूचा परिसर,शाळेचा परिसर,बाजाराचा परिसर, गावचा परिसर आपण सर्वजण मिळून स्वच्छ ठेवला पाहिजे.याच परिसरातील सूर्यप्रकाश,हवा,पाणी,माती,वनस्पती व प्राणी आशा अनेक घटकांचा आपल्या जीवनाशी संबंध असतो .
आपल्या जीवनाशी संबंध असलेले परिसरातील सगळे घटक मिळून पर्यावरण बनते .पृथ्वीवर असंख्य प्रकारचे सजीव आढळतात.
पर्यावरणातील सजीव आणि निर्जीव घटकांचे एकमेकांशी संबंध असतात.
आपला भारत देश जगात कृषीप्रधान देश म्हणून ओळखला जातो .हे जग विविध निसर्ग सौंदर्याने भरभरून नटलेलं आहे.त्यात झाडे वेली पशू - पक्षी ,नदया,डोंगर,पर्वत,नद्या समुद्रकिनारा या सर्वांनी भारताची तसेच जगाची जणु सुंदर सजावटच आपणास पहायला मिळते पण मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा ,पाणी,जमीन आशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत.शेती,वसाहती, उद्योगधंदे, रस्ते, लोहमार्ग तयार करण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड होत आहे.जलप्रदूषणामुळे त्यात वाढणाऱ्या वनस्पती व जलचरांना धोका पोहचतो आहे. तसेच ध्वनिप्रदूषण,भूप्रदूषणही खूप मोठ्या प्रमाणात होत आहे.मानव हा पर्यावरणात वावरणारा एक बुद्धिमान प्राणी आहे.लोकांच्या हव्यासामुळे पर्यावरणाचा वेगाने ऱ्हास होत आहे.मानव हा निसर्गाचाच एक भाग आहे.निसर्गाचा समतोल बिघडला तर त्याचा आपल्यालाही परिणाम होणार आहे.म्हणून मानवाच्या हस्तक्षेपामुळे ढळत चाललेले पर्यावरणाचे संतुलन आपणच रोखले पाहिजे.जून महिन्यात पावसाळ्याची सुरुवात होते त्या अनुषंगाने आपण सर्वजण मिळून पर्यावरणाची शोभा अधिकाधिक वाढविण्यासाठी जागोजागी खड्डे खोदून फळझाडे.फुलझाडे आजुबाजूच्या परिसरात लावून सुंदर बनविण्याचा प्रयत्न करू या.
याचबरोबर आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये तसेच जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी आपण सर्वजण मिळून प्रयत्न करूया.निसर्गाचा समतोल राखण्यासाठी अंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जात आहेत. तसेच हवा, पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करत आहेत. आपले आयुष्य सुंदर आणि सुखकर बनवायचे असेल तर पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी सर्वानीच प्रयत्न करायला हवा ..!
नादरगे चंद्रदीप बालाजी
श्री पांडुरंग विद्यालय,कल्लूर
ता.उदगीर,जि. लातूर