गांधीनगर प्रतिनिधी
एस एम वाघमोडे
हैदराबाद वरून गुरुवार ता. ३ रोजी अकराच्या विमानाने आलेला तीस वर्षीय विमान प्रवासी कोरोणा पॉझिटिव्ह आला आहे. सदर विमान प्रवासी मूळचा कानपूर चा रहिवासी असून तो दिल्लीतील एका कंपनीमध्ये अधिकारी पदावर कार्यरत आहे. कार्यालयीन कामकाजासाठी दिल्लीहून हैदराबाद मार्गे तो कोल्हापूर मध्ये ते दाखल झाल्यानंतर कोल्हापूर विमानतळावरून नेहमीप्रमाणेच सर्व विमान प्रवाशांना डी वाय पाटील हॉस्पिटल येथे पुढील तपासणीसाठी नेण्यात आले होते. त्यानंतर तो प्रवासी आयोध्या हॉटेल येथे क्वारंटाईन झाला होता. त्याच्या स्वॅबचा अहवाल शुक्रवारी प्राप्त झाला त्यावेळी तो कोरोणा पॉझिटिव्ह असल्याचे समजले.
या प्रवाशाने हैदराबाद ते कोल्हापूर हा प्रवास विमानातील टू सी या सीटवरून केला होता या सीटच्या आजूबाजूला व मागेपुढे कोणताही प्रवासी बसला नव्हता. तसेच सदरचे विमान निर्जंतुक करण्यात आले होते. कोल्हापूर विमानतळावर उतरल्यानंतर सामाजिक अंतर राखत तो डी वाय पाटील हॉस्पिटल व आयोध्या हॉटेल येथे जात असताना कोणाच्याही तीव्र संपर्कात आला नाही.
सर्व विमाने नियोजित वेळापत्रकाप्रमाणे
कोल्हापूर विमानतळावर आलेल्या प्रवासाचा कोरणा अहवाल पॉझिटिव्ह आला असला तरीही या प्रवासामुळे अन्य कोणालाही संसर्ग होण्याची शक्यता नसून विमानतळावर आवश्यक त्या सर्व खबरदारी घेण्यात येत आहेत त्यामुळे प्रवाशांनी घाबरण्याचे काही कारण नसून कोल्हापूर विमानतळावर नियोजित वेळापत्रकाप्रमाणे सर्व उड्डाणे होणार आहेत. अशी माहिती विमानतळ संचालक कमल कुमार कटारिया यांनी दिली.