कसबा बावडा प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यात सर्वत्र पाऊस सुरु असल्याने नद्या दुथडी भरून वाहू लागल्या आहेत. विशेषतः धरण परिसरात उत्तम पाऊस पडत आहे. पंचगंगा नदीवरील राजाराम बंधारा दुसर्यांदा पाण्याखाली गेला आहे. यापूर्वी 16 जूनमध्ये बंधाऱ्यावरुन पाणी वाहत होते. मध्यंतरी पावसाने उघडीप दिल्याने पाणी ओसरले होते. पण आज पुन्हा बंधारा पाण्याखाली गेला आहे. बंधाऱ्यावरुन वाहतूक बंदी घालण्यात आली आहे. यापूर्वी पाण्याखाली गेल्याने बंधाऱ्यावरील कॉंक्रीट रस्ता उखडला गेला असून वाहतूक करणे धोकादायक बनले होते आता पुन्हा पाणी आल्याने बंधारा रस्ता खराब होणार हे नक्की.