*
उदगीर प्रतिनिधी:- गणेश मुंडे
कोरोणा सारख्या जागतिक महामारी व लॉकडाऊन मूळे दिव्यांग नागरीकावर आर्थिक अडचणीची सामणा करत होते अश्या वेळी त्यांना आर्थिक मदतीची गरज होती तेव्हा त्यांना कोणीतरी सहकार्य मदत केली पाहिजे या भावनेने विश्व हिंदू परिषद व जनाग्र संघटनेच्या वतीने पिंपरी,व डोंगर शेळकी ता.उदगीर या दोन गावात एकूण ५० दिव्यांग लाभार्थ्यांना जीवनावश्यक धान्य किट चे वाटप करण्यात आले यावेळी विश्व हिंदू परिषदेचे विभागीय सेवा सह प्रमुख संतोष जी कुलकर्णी,लातूर जिल्हा मंत्री विलासराव खिंडे,लातूर जिल्हा सेवप्रमुख जी.टी.मुंडे, जनाग्र संघटनेचेअॅड.नरेश सोनवणे,प्रा.नाभदे सर,प्रा.मुसळे,पिंपरीचे सरपंच विलास बिरादार,चेअरमन शिवशंकर पांडे.राम खरोबे.डोंगरशेळकीचे सरपंच ज्ञानोबा मुंडे,धोंडूतात्या मंदिर चे विश्वस्थ व्यंकराव मुंडे,युवा कार्यकर्ते शांताप्पा मठपती,दत्ता मुंडे,मारोती केंद्रे, कृष्णकांत मुंडे,पांडुरंग मिरकले व दत्ता कांबळे आदी उपस्थित होते.यापूर्वी ही विश्व हिंदू परिषदेने लाॅकडाऊन काळात अनेक सेवाकार्य केले आहे.आतापर्यंत बावन गावात दीव्यांग व विधवांना धान्याचे किट वाटप करण्यात आले, अडकलेल्या शेकडो प्रवाशांना चहा नाष्टा देण्यात आला तसेच वाहनांची सोय नसल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांना त्यांच्या गावी जाण्यासाठी वाहनाची व्यवस्था करून देण्यात आली.विश्व हिंदू परिषद केवळ धर्म व संस्कृती चे कार्य करत नसुन सामाजिक कार्यातून समाजाच्या सुख दुखात ही सहभागी होते हेच या कार्यातून शिद्ध होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जी.टी.मुंडे यांनी केले तर विलास खिंडे यांनी लाॅकडाऊनच्या काळात विश्व हिंदू परिषदेने केलेल्या सेवाकार्याची सविस्तर माहिती सांगितली.