कसबा बावडा प्रतिनिधी
दिनांक 4 जुलै 2020
कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा मनपा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र. 11 कसबा बावडा कोल्हापूर या शाळेत इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईज यांच्यावतीने कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी व विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी म न पा राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्र 11 कसबा बावडा, कोल्हापूर या शाळेतील सर्व मुलांना मास्क व सॅनिटायझर, सॅनिटायझर स्टँड वितरित करणेत आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे केंद्र मुख्याध्यापक श्री. अजितकुमार पाटील यांनी केले.
'विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी व सक्षम विद्यार्थी घडण्यासाठी इनरव्हील क्लब ऑफ सनराईज चे सामाजिक कार्य प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी,विद्यार्थी दर्जेदार शिकण्यासाठी सतत शैक्षणिक कार्य करत आहेत.क्लबच्या माध्यमातून महिलांसाठी योगासन वर्ग,मराठी शुद्धलेखन,शुद्ध इंग्रजी उच्चारण वेग,यासारखी शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येत असतात.भागातील नगरसेविका माधुरी लाड यांनी शाळेसाठी 10 लाखाचा निधी मंजूर केल्यामुळे शाळेच्या भौतिक शैक्षणिक सुविधा पूर्ण झाल्या आहेत.एकविसाव्या शतकातील विद्यार्थी घडत असताना त्यासाठी त्या नवीन संकटांना समर्थपणे सामोरे जाण्यासाठी शाळा आज सुसज्ज झाली आहे.तीन लाखाचा डिजिटल वर्ग,वर्क फ्रॉम होम,च्या शैक्षणिक विचारधारेवर व्हर्च्युअल क्लास चे व्हिडीओ सुरू करण्यात आले आहेत त्याचा उपयोग पालकांनी आपल्या विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी करावा असे प्रास्तविक मध्ये मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमासाठी उपस्थित इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या अध्यक्षा रितू वायचळ यांनी कोरोनाच्या संकटावर मात करण्यासाठी सॅनिटायझर व मास्क वापरणे गरजेचे आहे.समाजामध्ये वावरत असतांना विद्यार्थ्यांनी व पालकांनी वैयक्तिक आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे आहे.कोरोना सारख्या अज्ञात विषाणू विषयी मानवास धोका आहे.हे एक जगावर संकट आहे.त्यावर आपण सर्वांनी खबरदारी घेतली पाहिजे.असे प्रतिपादन केले.
कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती प्रशासनाधिकारी एस. के. यादव यांनी विद्यार्थ्यांनी ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे अनौपचारिक पद्धतीने शिक्षण घ्यावे. प्राथमिक शिक्षण समिती लर्न फ्रॉम होम याचा वापर करण्यास सांगितले.त्यांच्या हस्ते इयत्ता 1 ली च्या सेमी इंगजी पाठयपुस्तकांचे वाटप करण्यात आले.
नगरसेविका सौ.माधुरी लाड यांनी विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक विकास यावर मार्गदर्शन केले. कार्यक्रम प्रसंगी प्राथमिक शिक्षण समिती प्रशासनाधिकारीसो एस. के. यादव, शैक्षणिक पर्यवेक्षक विजय माळी, नगरसेविका माधुरी लाड, इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या अध्यक्षा रितू वायचळ, गीतांजली ठोमके, ममता गदरे, स्मिता सावंत, मनीषा जाधव, वृषाली बाड , गीतांजली घाडगे, सुरेखा माने, केंद्र मुख्याध्यापक अजितकुमार पाटील, उत्तम कुंभार, सुशील जाधव,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार,उपाध्यक्षा अनुराधा गायकवाड,दीपाली चौगले इतर सदस्य उपस्थिती होते.बालवाडी शिक्षिका कल्पना पाटील व सावित्री काळे, मंगल मोरे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तमेजा मुजावर व शिवशंभु गाटे यांनी आभार मानले.