Thursday, 28 October 2021

मौ.वडगाव पाणीपुरवठा संस्था चेअरमनपदी धोंडीराम चौगुले तर व्हा. चेअरमनपदी आनंदा जाधव

                  चेअरमन धोंडीराम चौगुले
         हेरले / प्रतिनिधी 
दि.28/10/21
मौजे वडगाव (ता. हातकणंगले) येथील श्री गणेश सहकारी पाणीपुरवठा संस्थेच्या चेअरमन पदी धोंडीराम चौगुले तर व्हा.चेअरमन पदी आनंदा जाधव यांची एक मताने बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून   सहाय्यक निबंधक हातकणंगले येथील मकसूद शिदी व  धनाजी पोवार यांनी काम पाहिले .
    यावेळी आघाडीचे नेते सतीश कुमार चौगुले, सुरेश कांबरे, अँड. विजय चौगुले, सतीश वाकरेकर, अविनाश पाटील, बाळासो थोरवत, महादेव शिंदे, सुनील खारेपाटणे, स्वप्नील चौगुले, अमोल झांबरे, सचिव प्रकाश वाकरेकर, यांच्यासह नूतन संचालक व सभासद उपस्थित होते. निवड होताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतषबाजी करून आनंद व्यक्त केला.

                  व्हा.चेअरमन आनंदा जाधव

Wednesday, 27 October 2021

हेरले ऊसउत्पादक शेतकऱ्यांचा ऊस तोडणी संदर्भात निर्णय एकमताने


हेरले / प्रतिनिधी
दि.28/10/21
हातकणंगले तालुक्यातील हेरले गावातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या सभेमध्ये गावातील ऊस तोडणी संदर्भात सर्वांच्या वतीने सर्वसमावेषक कृषी संवर्धन कमिटी स्थापन करून खालील निर्णय एकमताने घेण्यात आले आहेत. ही सभा शेतकरी सोसायटीमध्ये संपन्न झाली.स्वागत व प्रास्ताविक माजी उपसरपंच राहुल शेटे यांनी केले.
      ऊस तोडणीसाठी कोणत्याही शेतकऱ्याने मजुरांना व कारखाना कर्मचाऱ्यांना पैसे द्यायचे नाहीत, 
 जर पैशाची मागणी केली तर शेतकऱ्यांनी कमिटीशी किंवा कारखाना व्यवस्थापन समितीस संपर्क साधावा, 
 ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला  जेवण किंवा दोनशे रुपये द्यावे,जादा पैशाची मागणी केल्यास कमिटीशी संपर्क साधावा, शेतकऱ्याला ऊस तोडताना एक कोयत्याला ५पेंढी प्रमाणे वाढे देने बंधनकारक राहील, शेतामध्ये वाट करून द्यायची जबादारी शेतकऱ्यावर राहील, ट्रॅक्टर ट्रॉली अडकलेस ओढण्यासाठी दुसरा ट्रॅक्टर आणनेची जबाबदारी शेतकऱ्यावर राहील, वाहतूक करून ऊस भरणेसाठी संबंधित मुकादम व शेतकरी आपापसात ठरवतील,साखर कारखाना व्यवस्था पणाने पूरग्रस्त भागातील ऊस जिल्हाधिकाऱ्यांनी ठरवलेल्या ७० :३० फॉर्म्युल्या प्रमाणे तोडावे, कारखाना कर्मचाऱ्यांनी क्रमपाळी प्रमाणे ऊसतोड देने बंधनकारक राहील,वरील सर्व गोष्टी बद्दल तक्रार असतील तर गावातील कमिटीशी संपर्क साधावा. असे आव्हान कमिटीच्या वतीने करण्यात आले.
       ही सभा माजी उपसभापती अशोक मुंडे  यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या प्रसंगी जवाहर कारखान्याचे संचालक   आदगोंड पाटील, पंचगंगा कारखान्याचे संचालक , लक्ष्मण निंबाळकर,             प्रा. राजगोंड पाटील , माजी सरपंच  झाकीर देसाई , अशोक चौगुले  यांनी मार्गदर्शन केले.यावेळी माजी उपसरपंच संदीप चोगुले, उपसरपंच फरीद नायकवडी, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे बाळगोंड पाटील, सुरेश चौगुले , गुरुनाथ नाईक,  दादासो कोळेकर , मजीद लोखंडे, राजू खोत, पांडुरंग चौगुले, राहुल जाधव, अल्लाउद्दीन खतीब, सुरज पाटील, सिद्धार्थ पाटील,प्रदीप सुरवशी,सर्व कारखान्याचे प्रतिनिधी,   तोडणी वाहतूकदार, मुकादम व ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते.
    फोटो 
हेरले येथे शेतक-यांच्या सभेत बोलतांना जवाहर कारखान्याचे संचालक आदगोंड पाटील  व अन्य मान्यवर.

Sunday, 24 October 2021

मौजे वडगावमधील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाणपासून करावा, शेतकऱ्यांची आक्रमक मागणी.



हातकणंगले / प्रतिनिधी
दि.24/10/21


हातकणंगले तालुक्यातील मौजे वडगाव येथील गावठाण ते पाझर तलाव रस्ता गावठाण पासून सुरू करावे या मागणीचे लेखी निवेदन शेतक-यांनी जिल्हा परिषद कोल्हापूरच्या बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र क्षीरसागर यांना दिले.
    लेखी निवेदनातील आशय असा की, गावठाण ते पाझर तलाव  रस्त्यालगत आमच्या जमिनी आहेत सदर रस्त्याची सुधारणा ही गेल इंडिया कंपनीच्या सीएसआर फंडातून होत आहे याकरिता शेतकऱ्यांनी विनामोबदला आपल्या मालकीच्या जमिनी बक्षीसपत्रांनी दिले असून ग्रामपंचायतच्या ठरावानुसार गावठाण ते पाझर तलाव रस्ता करण्याचे ठरले असून सदर कामाची वर्कऑर्डर तशीच आहे. असे असताना सदर कामाचे ठेकेदार व गावातील तथाकथित पुढारी यांनी सदर रस्त्याचे काम अंदाजे गावठाण पासून ५०० ते ७०० मीटर अंतर सोडून सूरू केले आहे. त्यामुळे सुरुवातीचा रस्ता सोडून पुढे रस्त्याचे काम चालू केले आहे. त्यामुळे शेतकरी वर्गात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यामुळे ठेकेदारांनी ग्रामसभेचे ठरावानुसार वर्कऑर्डर प्रमाणे रस्त्याचे काम करावे. तसे काम न झाल्यास शेतकऱ्यांकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही. 
    या लेखी निवेदनावर बाळासाहेब थोरवत, विलास सावंत, गुणधर परमाज,जयवंत चौगुले, सतीश चौगुले, सुरेश कांबरे,अविनाश पाटील, अवधूत मुसळे,विलास भोसले, सुनील खारेपाटणे, अमोल झांबरे,  विजय चौगुले,अविनाश कांबळे, धोंडीराम काकडे, भाऊसो वाकरेकर, राजू हजारी, मधुकर अकिवाटे आदीसह ७० शेतकऱ्यांच्या सह्या या निवेदनावर आहेत.

            
रस्त्याचे काम करताना सुरवातीचा भाग ती लांबी अन्य लांबीच्या मानाने सुस्थितीत होती. त्यामुळे खराब भागाचे काम  सुरुवातीस चालू केले आहे. ग्रामस्थांच्या गरजेनुसार सर्व लांबीमध्ये निधी उपलब्धतेनुसार रस्त्याचे काम हाती घेण्याचा कार्यालयाचा प्रयत्न असणार  आहे.
       महेंद्र क्षीरसागर 
कार्यकारी अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग कोल्हापूर

     
गावठाण ते पाझर तलाव या रस्त्यासाठी शेतक-यांनी विना मोबादला जमिनी दिल्या आहेत. गावाच्या सुरुवाती पासून जो पर्यंत रस्ता होत नाही. तो पर्यंत शेतकऱ्यांच्याकडून कोणतेही सहकार्य मिळणार नाही. अशी मागणी माझ्यासह सर्व शेतकऱ्यांची आहे.
        शेतकरी- मनोहर चौगले
        माजी पोलिस पाटील मौजे वडगाव

        फोटो 
कोल्हापूर जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता महेंद्र    क्षीरसागर यांना लेखी निवेदन देतांना मौजे वडगावचे शेतकरी बाळासाहेब थोरवत अविनाश पाटील सुरेश कांबरे व शेतकरी

Saturday, 23 October 2021

शाहू स्मारक भवन येथे आदर्श शिक्षक व कोव्हीड योद्ध्यांचा दिमाखदार सोहळा संपन्न

कोल्हापूर प्रतिनिधी 

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ शहर शाखा कोल्हापूरच्या वतीने प्राथमिक शिक्षण समिती कोल्हापूरकडील आदर्श शिक्षकांना व कोव्हीड योद्ध्यांना  गौरव चिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात आले. 
कोव्हीड काळात अखंडपणे सेवा बजावून समाजसेवेचे वृत्त अंगी बाळगणार्‍या *सेवाभावी शिक्षकांना* कोव्हीड योद्धा म्हणून त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच ज्यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडवण्यासाठी अहोरात्र कष्ट घेऊन आपल्या कार्याचा ठसा उमटवून स्वतःचे व शाळेचे नाव सर्वदूर पसरवले अशा आदर्श शिक्षकांना सुद्धा गौरव चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी श्री व्ही. एम. पाटील प्राचार्य न्यू कॉलेज कोल्हापूर, श्री एस डी लाड, मुख्याध्यापक संघ संस्था अध्यक्ष, श्री राजाराम वरुटे राज्याध्यक्ष, श्री एस के यादव प्रशासनाधिकारिसो, श्री नामदेव रेपे महासचिव शिक्षक संघ, श्री वसंत चव्हाण शिक्षक नेते व  सेवानिवृत्त संस्था अध्यक्ष, श्री बरगे सर माजी शै. पर्यवेक्षक, श्री सुनिल गणबावले शहर नेते, डॉ.अजितकुमार पाटील राज्य प्रतिनिधी, श्री मनोहर सरगर शहर अध्यक्ष, श्री दिलीप माने उपाध्यक्ष, श्री संदीप सुतार सरचिटणीस,श्री राजेंद्र पाटील कोषाध्यक्ष,श्री  विजय सुतार शहर संघटक,सुभाष मराठे सर,जोतीबा बामणे सर,श्री कमलाकर काटे कार्याध्यक्ष,श्री विजय माळी, सौ सरदेसाई शै. पर्यवेक्षक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रावसो कांबळे व प्रियांका साजने यांनी केले. तर कार्यक्रमाचे नियोजन व आभार  किरण पाडळकर यांनी केले.
◆━━━━━▣✦▣━━━━━━◆

Friday, 22 October 2021

हेरले उपसरपंच पदी फरीद नायकवडी


हेरले / प्रतिनिधी
दि.22/10/21

    हेरले (ता. हातकणंगले)येथील नूतन उपसरपंच पदी फरीद बादशहा नायकवडी यांची निवड झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच आश्विनी चौगुले होत्या.
    स्वाभिमानी गावविकास आघाडी अंतर्गत ठरल्याप्रमाणे उपसरपंच सतीश काशीद यांनी राजीनामा दिला त्यामुळे उपसरपंच पदाची निवडणूक घेण्यात आली. आज शुक्रवार उपसरपंच पदाकरिता स्वाभिमानी गावविकास आघाडी कडून फरीद नायकवडी यांनी अर्ज दाखल केला तर विरोधी आघाडी कडून बथुवेल कदम यांनी अर्ज दाखल केला.
         अर्ज माघारीच्या मुदतीत माघार न झाल्याने उपसरपंच पदाकरिता    निवडणूक घेण्यात आली. यामध्ये फरीद नायकवडी यांना १३ व बथुवेल कदम यांना ५ मते मिळाली. यामध्ये फरीद नायकवडी विजयी झाल्याची घोषणा सरपंच आश्विनी चौगुले यांनी केली.४० वर्षानंतर स्वाभिमानी गावविकास आघाडीकडून मुस्लीम समाजास उपसरपंच पदाची संधी मिळाली आहे.निवडीनंतर स्वाभिमानी गावविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करून फटाक्यांची आतषबाजी केली.
    यावेळी आघाडीचे नेते माजी सभापती राजेश पाटील, जिल्हा परिषद सदस्या डॉ. पद्माराणी पाटील,मुनिर जमादार ग्रामपंचायत सदस्य राहुल शेटे,विजय भोसले, आशा उलसार, अपर्णा भोसले, विजया घेवारी, शोभा खोत, स्वरूपा पाटील, मजिद लोखंडे, रिजवाणा पेंढारी, सतीश काशीद,मिना कोळेकर  ,निलोफर खतीब, बथुवेल कदम,शरद आलमान,आदिक इनामदार, आरती कुरणे ग्रामविकास अधिकारी संतोष चव्हाण, संदिप शेटे आदी  उपस्थित होते.

Wednesday, 20 October 2021

स्वाभिमानी पक्ष हातकणंगले तालुक्यातील सर्व जागा लढवणार - राजेश पाटील

हातकणंगले / प्रतिनिधी
दि.20/10/21
  आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका स्वाभिमानी पक्ष हातकणंगले तालुक्यातील सर्व जागा लढवणार असून सध्या तरी वैयक्तिक व स्वबळावर लढण्यास तयार असून त्या त्या परिस्थितीनुसार स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात येईल. तसेच कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुका लढण्याचे निश्चित केले असून अंतिम निर्णय निवडणूक जाहीर झाल्यानंतर घेण्यात येईल.
    कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँक भटक्या-विमुक्त प्रवर्ग जातीतून संदीप कारंडे यांच्यासाठी आम्ही आग्रही असून वडगाव कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी देखील पाच जागा आम्ही लढणार आहोत अशी माहिती प्रसिध्दीस माजी सभापती 
 राजेश पाटील यांनी दिली आहे.

Monday, 18 October 2021

कोल्हापूर महानगरपालिका व श्री दत्ताबाळ मिशन डीव्हाईन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेचे आयोजन

एकच मिशन 100 टक्के लसीकरण, कोरोना विरुद्धचा लढा

कोल्हापूर प्रतिनिधी 

कोल्हापूर महानगरपालिका व श्री दत्ताबाळ मिशन  डीव्हाईन यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीदत्ताबाळ हायस्कूल कसबा बावडा, कोल्हापूर या ठिकाणी कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचे उद्घाटन कोल्हापूर महापालिका उपायुक्त श्री. रविकांत अडसूळ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. निखिल पाटील, लसीकरण मोहिमेचे नोडल अधिकारी डॉ अजितकुमार पाटील, श्री दत्ताबाळ मिशन डीव्हाईनच्या अध्यक्षा व माजी नगरसेविका सौ. पल्लवी देसाई, संस्थेचे सेक्रेटरी व माजी नगरसेवक श्री. निलेश देसाई, हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री सचिन डवंग, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका कु. रोहिणी शेवाळे इंग्लिश मिडीयम च्या मुख्याध्यापिका सौ. कीर्ती मिठारे आरोग्य कर्मचारी सौ. दिपाली उलपे सौ. मनीषा धनवडे, सौ मंदाकिनी कांबळे, श्री मच्छिंद्र दाते उपस्थित होत्या.      यावेळी उपायुक्त अडसुळे साहेब यांनी सर्वांनी मिळून 100 टक्के लसीकरण पूर्ण करु या व संकल्प पूर्ण करू या असे आवाहन केले. 
                        प्रास्ताविक मध्ये नोडल अधिकारी डॉ अजितकुमार पाटील यांनी 100 टक्के लसीकरण पूर्ण होण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी,पालकांनी या देशाच्या अभियानास कर्तव्यदक्ष राहून लसीकरण करून घेऊन आपण सर्वजण कोरोनाकाळात कोरोनामुक्त राहून आरोग्य चांगले कसे राहिल याकडे लक्ष दिले पाहिजे तरच आपण एकविसाव्या शतकातील आदर्श नागरिक म्हणण्यास पात्र आहोत.सर्वांनी आरोग्यबद्दल जागरूक राहणे महत्त्वाचे आहे.विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दल सहकार्य करावे असे मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन श्री बालाजी मुंडे यांनी केले तर आभार श्री गौरव काटकर यांनी मानले.

Sunday, 17 October 2021

हेरले येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

हेरले / प्रतिनिधी
दि.17/10/21

हेरले (ता. हातकणंगले) येथील माळभाग बिरदेव मंदिर परिसरामध्ये जिल्हा परिषद सदस्या डॉ.पद्माराणी पाटील यांच्या फंडातून पाच लाख रुपयांच्या विकास निधीतून मंदिराच्या परिसरात प्लेविंग ब्लॉक, बाग बगीचा वृक्षारोपण करून सुशोभिकरण आदीच्या विकास कामाचे उद्घाटन माजी सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले.
       या प्रसंगी सरपंच अश्विनी चौगुले, पोलिस पाटील नयन पाटील, माजी उपसरपंच संदीप चौगुले, उपसरपंच सतीश काशीद, माजी उपसभापती अशोक मुंडे, माजी उपसरपंच विजय भोसले, राहुल शेटे, फरिद नायकवडी, दादासो कोळेकर, अरविंद कोळेकर आदीसह ग्रामपंचायत सदस्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
       फोटो 
हेरले: येथील माळभाग बिरदेव मंदिर परिसरात विकास कामाचे उद्घाटन करतांना माजी सभापती राजेश पाटील व इतर मान्यवर.

बालगृहातील विद्यार्थ्यांना शालेय दप्तर भेट देत आभाळमाया संस्थेने लुटले नव चैतन्याचे सोने.

इचलकरंजी /प्रतिनिधी
दि.17/10/21
समाजातील वंचित निराधार लोकांना मायेचा आधार देत सामाजिक बांधिलकी जपत आभाळमाया संस्था कार्यरत आहे. या संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा लक्ष्मीताई पाटील या संस्थेच्या माध्यमातून त्या विविध कार्यक्रमाद्वारे समाजभान जपत आदर्शवत कार्य करत आहेत.नवचैतन्य बालगृहातील विद्यार्थ्यांनी स्वच्छ आचरण स्वकर्तृत्‍वातून स्वतःच्या जीवनाचे नंदनवन फुलवावे असे मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य प्रा. मधुकर पाटील व्यक्त केले.दसऱ्याच्या शुभ मुहूर्ताचे औचित्यसाधतआभाळमाया शैक्षणिक सामाजिक सेवा संस्थेने नवचैतन्य बालगृह इचलकरंजी येथील ६० गरजू होतकरू मुलांना शालेय दप्तर शैक्षणिक साहित्य खाऊ वाटप केला या  कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. 
     संस्थेच्या अध्यक्षा लक्ष्मीताई पाटील म्हणाल्या की, समाजातील जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांना शालेय दप्तर व शैक्षणिक साहित्य भेट देऊन आभाळमाया संस्था त्यांना शिकण्याचे बळ देण्याचे कार्य करीत  असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष रवीकुमार पाटील यांनी बालगृहातील विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा देत समाजातील होतकरू गरजू मुलांकरिता समाजातील दानशूर हातांनी पुढे येऊन मदत केली पाहिजे असे मत व्यक्त केले.
      यावेळी राजू बिद्रेवाडी , सुनील एडके ,तुषार पाटील, रमेश पाटील,संतोष कोळी, बाळासाहेब नंदगावकर ,अजित वारके ,सविता पाटील, शुभांगी सुतार ,उषा नंदगावकर, बाजीराव पाटील, यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शालेय दप्तर वह्या खाऊ भेट देण्यात आला. तुषार पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
      फोटो 
नवचैतन्य बालगृहातील विदयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करतांना

Saturday, 16 October 2021

हेरलेत दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा



हेरले / प्रतिनिधी
दि.16/10/21
हेरले (ता. हातकणंगले ) येथे कोरोना  नियमावलीचे काटेकोर पालन करीत दसरा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शमीचे पूजन माजी सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
   बुधवारी सायंकाळपासून गावातील सर्व ग्रामदेवता मंदिरामध्ये विधीवत देव - देवतांची पूजा आर्चा करून रात्र जागवण्याचा जागरणाचा कार्यक्रम संपन्न झाला. गुरुवारी सकाळी ग्रामस्थांनी खंडीचे पूजन करून ग्रामदैवत हनुमान मंदिर, महादेव मंदिर, बिरोबा मंदिर, मरगुबाई मंदिर, गणेश मंदिर आदीसह अन्य मंदिरातील समईमध्ये तेल घालण्याचा कार्यक्रम संपन्न झाला
     शुक्रवारी सायंकाळी ग्रामस्थांनी आपली दुचाकी,तीनचाकी, चारचाकी वाहने सजवून माळभाग सीमोल्लंघन कार्यक्रमाच्या ठिकाणी उपस्थिती लावली. या प्रसंगी गावातून बिरोबादेवाचा पालखी सोहळा सवाद्य सीम्मोलंघ्घन स्थळी आला. बिरोबादेवाची विधीवत पूजा आर्चा झालेनंतर माजी सभापती राजेश पाटील यांच्या हस्ते शमीचे पूजन करण्यात आले. तदनंतर ग्रामस्थांनी सीमोल्लंघन कार्यक्रम संपन्न केला. यावेळी सरपंच अश्विनी चौगुले, पोलिस पाटील नयन पाटील, माजी उपसरपंच संदीप चौगुले, उपसरपंच सतीश काशीद, माजी उपसरपंच विजय भोसले, राहुल शेटे, आदीसह ग्रामपंचायत सदस्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
     'सोने घ्या सोन्यासारखे रहा ' असे प्रत्येकास शुभेच्छा देत ग्रामस्थांनी सर्व ग्रामदैवतांना सोने वाहिले. गावांमध्ये सोशल डिस्टन्स पाळत, गर्दी होणार नाही याची काळ्जी घेत कोरोना नियमावलीचे काटेकोर पालन होऊन मोठ्या आनंदात व उत्साहात दसरा सणाचा कार्यक्रम संपन्न झाला.
      फोटो 
हेरले : येथे सीम्मोलंघ्घन उत्सव प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील शमीपूजन करतांना.

Saturday, 9 October 2021

शिक्षक संघाचं काम कौतुकास्पद - पालकमंत्री ना. सतेज उर्फ बंटी पाटील

कोल्हापूर प्रतिनिधी 

हाराष्ट्र राज प्राथमिक शिक्षक संघ शाखा अहमदनगर जिल्हा यांच्या वतीने महानगर पालिका व करवीर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्याना शिक्षक वर्गणीतून शैक्षणिक साहित्याचे किट कोल्हापूर येथे मा.ना. सतेज उर्फ बंटी पाटील साहेब, पालक मंत्री तथा गृह राज्यमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. यावेळी महानगर पालिका व करवीर तालुक्यातील पूरग्रस्त भागातील ३०० विद्यार्थ्याना शैक्षणिक किटचे वाटप करणेत आले . या संघटनेने कोरोना काळातही कोरोना सेंटर उभा करुन ही सामाजिक काम केले आहे . याशिवाय त्यानी सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून पूरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याच्या किटचे वाटप केले . हा एक कौतुकास्पद उपक्रम आहे. .
     यावेळी राज्याध्यक्ष राजाराम वरुटे, नगर जिल्हा संघाचे अध्यक्ष माधवराव हसे, सदिच्छा मंडळाचे अध्यक्ष नारायण राऊत, रहिमान शेख, राजेंद्र कुदनूर, कैलास वर्पे, शिवाजी आव्हाड, अनिल आंधळे सर, नेते रवि पिंपळे, उद्धव मर्कट, पोपट काळे, दादा सोनवणे,नगर जिल्हा संघाचे पदाधिकारी, कोल्हापूर जिल्हा संघाचे अध्यक्ष संभाजी बापट, शिक्षक बँकेचे चेअरमन आण्णासो शिरगांवे, व्हा.चेअरमन बाजीराव कांबळे, संचालक जी.एस. पाटील, साहेब शेख, प्रशांत पोतदार, तुकाराम राजूगडे , महानगरपालिका संघाचे अध्यक्ष मनोहर सलगर, राज्य उपाध्यक्ष डॉअजितकुमार पाटील, संदीप सुतार, राजेंद्र पाटील, सर आदि उपस्थित होते .

Wednesday, 6 October 2021

राजर्षी शाहूंचा ऐतिहासिक वारसा लाभलेली गुणवंतांची खाण म्हणजे राजर्षी शाहू विद्यामंदिर शाळा क्रमांक अकरा कसबा बावडा.

     
  ----- एकविसाव्या विज्ञानयुगात टिकण्यासाठी व राजर्षी शाहूंचा ऐतिहासिक वारसा लाभलेली तसेच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करणारी गुणवंतांची खाण म्हणजे राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्रमांक आकरा कोल्हापूर होय. या शाळेची स्थापना 21 ऑगस्ट 1871 मध्ये झाली ही शाळा पूर्वी लक्ष्मी विलास पॅलेस कसबा बावडा येथे घोड्याच्या पागेत सुरू करण्यात आली होती असे पूर्वीचे रेकॉर्डवरून दिसून येते त्या शाळेच्या शताब्दी महोत्सव तीन फेब्रुवारी 1975 रोजी लोकनेते बाळासाहेब देसाई, प्राचार्य आमदार एन डी पाटील ,आयुक्त द्वारकानाथ कपूर शिक्षण सभापती हिंदुराव साळोखे, कार्याध्यक्ष बा, द, पाटील,तेव्हाचे मुख्याध्यापक विश्वास जोदाळ यांच्या पुढाकाराने नवीन वास्तूत शाळा बांधण्यात आली होती. या शाळेत पद्मश्री डॉक्टर डी, वाय, पाटील, अडव्होकेट सुरेश आळवेकर ,शामराव पाटील प्रकाश जाखलेकर, इंजिनियर सलीम मुजावर, शिक्षण तज्ञ ग.रा. जाधव ,इलाई मुजावर आर. एल .पाटील व शासकीय सेवांमध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून पांडुरंग आळवेकर, आरती पिंगळे ,अवधूत पिंगळे, प्राध्यापक बाळकृष्ण चौगुले, शाहीर यशवंत कोळी, श्रीराम सोसायटी चे माजी सभापती बापुसो लाड, कोल्हापूर नगर परिषदेचे पहिले नगराध्यक्ष धोंडीराम रेडेकर तसेच पहिले  उपमहापौर शत्रुघ्न पाटील, मुख्याध्यापक आनंदराव पोवार ,शिक्षण सभापती अशोक जाधव इत्यादींनी योगदान दिलेले आहे.
 या शाळेमधील बहुसंख्य विद्यार्थी सामान्य कुटुंबांमधील कष्टकरी मोलमजुरी करणारे व शेतकरी वर्गातील आहेत. शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी शाळेतील विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकाला सामोरे जाण्यासाठी दर्जेदार शिक्षण देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे .विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सुसज्ज मैदान, सुंदर शालेय परिसर, संगणकीय शिक्षण, डिजिटल वर्ग एज्युकेशन दिल्ली यांच्यामार्फत क्लास  सुरू आहे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी शालेय विविध स्पर्धा माध्यमातून सांस्कृतिक स्पर्धा, कवायत स्पर्धा, भाषण स्पर्धा सामाजिक राष्ट्रीय प्रश्नावर समाज प्रबोधन करण्यासाठी विविध प्रश्नावर पथनाट्य सादरीकरण करत असतात त्यामध्ये मुलींचे शिक्षण, साक्षरता अभियान, स्वच्छता अभियान, ध्वनी प्रदूषण, हवा प्रदूषण, मतदार राजा जागा हो, पल्स पोलिओ लसीकरण, महास्वच्छता अभियान ,प्लास्टिक बंदी, स्वच्छ पाणी तसेच एम टी एस परीक्षा ,भारती विद्यापीठ इंग्रजी परीक्षा, हिंदी राष्ट्रभाषा परीक्षा, शासकीय शिष्यवृत्ती परीक्षा, केटीएस, नवोदय परीक्षा मध्ये प्रेरणा थोरबोले, दिशा कांबळे यांची निवड झाली आहे या माध्यमातून जवळजवळ दरवर्षी शंभर विद्यार्थी स्पर्धा परीक्षेला बसतात. 
मुलीचे शिक्षणासाठी मीना मंचच्या माध्यमातून किशोरी मेळावा आयोजित करण्यात येतो त्यामध्ये कराटे च्या माध्यमातून मोफत प्रशिक्षण देण्यात येते .1मे ते 5 मे या दिवशी शाहू संस्कार शिबिराचे आयोजन करण्यात येते की यामध्ये योगासने, ध्यानधारणा, लाठीकाठी, शुद्धलेखन, कूटप्रश्न ,इंग्रजी स्पष्ट वाचन स्पर्धा, बौद्धिक खेळ ,सूर्यनमस्कार, गणित कार्यशाळा ,कागदी पिशव्या यांची कार्यशाळा, सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा ,मनशांती कार्यशाळा प्रभावी व्यक्तिमत्व कसे असावे यांची कार्यशाळा त्या माध्यमातून करण्याचे ध्येय साकार करण्याचा प्रयत्न करत आहेत .दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती समाज कल्याण शिष्यवृत्ती, मोफत पाठ्यपुस्तक मोफत गणवेश, उत्कृष्ट पोषण आहार, दूरच्या विद्यार्थ्यांसाठी केएमटी मोफत पास योजना हे सर्व शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येतात. प्रभागातील नगरसेविका माधुरी  संजय लाड यांच्या अथक प्रयत्नातून अकरा लाखाचे निधी शाळेसाठी भौतिक सुविधा साठी आणून शाळा सुसज्ज तयार केली आहे.भारतवीर मित्र मंडळाचे सुद्धा योगदान या शाळेसाठी आहे त्यामध्ये कार्यशाळा, वनसंरक्षण दिन, सांस्कृतिक कार्यक्रम यासाठी ते सतत शाळेला भौतिक सुविधा पुरवत असतात.      
   शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी प्रेरणा देणारे ह्या शाळेत पहिली ते सातवी  शिकलेले विद्यार्थी अजितकुमार पाटील हे या शाळेचे सध्याचे केंद्रमुख्याध्यापक पदावर आहेत .त्यांनी विविध पथनाट्याच्या माध्यमातून पर्यावरण जागृती ,प्लास्टिक बंदी, पाणी वाचवा ,जीवन वाचवा, पक्ष्यांसाठी घरटी, ध्वनी प्रदूषण, विज्ञान शिबिर ,शुद्ध लेखन कार्यशाळा, शैक्षणिक साहित्य निर्मिती कार्यशाळा, या प्रकारचे विविध शैक्षणिक उपक्रमात व माध्यमातून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी कटिबद्ध आहेत. त्यांचे प्राथमिक शिक्षण राजर्षी शाहू मध्ये झाले आहे .माध्यमिक शिक्षण छत्रपती राजाराम हायस्कूल येथे झालेले आहे महाविद्यालयीन शिक्षण शहाजी कॉलेज येथे झाले आहे .त्यांची शैक्षणिक अहर्ता पाहिली तर एम ए मराठी, इतिहास, समाजशास्त्र, शिक्षणशास्त्र, एम एड याच वर्षी त्यांनी मराठी विज्ञान साहित्य पीएचडी संपादन केलेले आहे .त्यानी आतापर्यंत 119 चर्चासत्रांमध्ये सहभाग घेतले. त्यापैकी 18 आंतरराष्ट्रीय चर्चासत्र ,45 राष्ट्रीय संशोधन निबंध मराठी, इतिहास, पर्यावरण शास्त्र,समाजशास्त्र, राज्यशास्त्र,भूगोल, अर्थशास्त्र ,संख्याशास्त्र, हिंदी या विविध विषयावर शोधनिबंध सादर केले आहेत. त्यांची चार पुस्तके, अठरा वैचारिक ,लेख दोन हस्तलिखितं या लेखणीच्या माध्यमातून समग्र साहित्याचे दर्शन दिसून येते.        
               कोल्हापूर महानगरपालिकेच्या इतिहासामध्ये एक प्राथमिक शाळेतील विद्यार्थी व त्याच शाळेत उच्चविद्याविभूषित विद्यावाचस्पती ही पदवी संपादन करून एक अलौकिक असा इतिहास घडविला आहे .एकूणच शाळेच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाळेतील शिक्षकांनी राजर्षी शाहू महाराजांच्या प्रश्नमंजुषा स्पर्धा,महात्मा गांधी ऑनलाइन भाषण  स्पर्धा यासारख्या ऑनलाईन व ऑफलाईन स्पर्धा घेऊन विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न केला आहे. प्रशासनाधिकारी एस. के .यादव यांच्या प्रेरणा व मार्गदर्शनाखाली शाळेचा दर्जा उच्च ठेवण्याचे कार्य सर्व शिक्षक वृंद करत आहेत. " विद्यार्थी हेच दैवत " हे ब्रीदवाक्य मानून शाळेचे केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, इंग्रजी पदवीधर शिक्षक उत्तम कुंभार, टेक्नोसॅव्ही शिक्षक सुशील जाधव,अप निर्मितीचे प्रशिक्षण देणाऱ्या तमेजा मुजावर, गणित तज्ञ आसमा तांबोळी, मीना मंचच्या प्रमुख सुजाता आवटी, व्हिडिओ निर्मिती करणारे शिवशंभू गाटे, स्कॉलरशिप तज्ञ विद्या पाटील, बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष रमेश सुतार ,उपाध्यक्ष अनुराधा गायकवाड, भारतवीर मित्र मंडळाचे सर्व पदाधिकारी ,शाळेचे माजी विद्यार्थी पालक व मित्रांचचे सहकार्यातून हे ऐतिहासिक वारसा लाभलेली शाळा विद्यार्थ्यांना एकविसाव्या शतकातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आदर्श नागरिक घडवत आहे.

Monday, 4 October 2021

शिक्षण हेच परिवर्तनाचे साधन - - डॉ आय सी शेख.

*                     कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण संचालित राजर्षी शाहू विद्या मंदिर शाळा क्र 11कसबा बावडा अंतर्गत केंद्रस्तरीय शिक्षण परिषद संपन्न झाली या शिक्षण परिषदेमध्ये डायट चे प्राचार्य आय सी शेख, ज्येष्ठ अधिव्याख्याता विजयकुमार भिसे,केंद्र मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील, तज्ञ मार्गदर्शक सारिका पाटील, दिपाली पाटील, उन्नती शिरगावकर व टी आर पाटील अनिल सरक ,विद्या पाटील, छाया हिरगुडे यांच्या सहकार्याने संपन्न झाले. शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे साधन आहे व शिक्षणाशिवाय समाज परिवर्तन अशक्य आहे असे मत डायट चे प्राचार्य आय सी शेख यांनी मनोगतामध्ये व्यक्त केले तसेच ज्येष्ठ अधिव्याख्याते विजयकुमार भिसे यांनी स्वाध्याय उपक्रम, दिशा प्रश्नपेढी ,शाळा सिद्धि या विषयावर तुलनात्मक अभ्यासाची गुणवत्ता कशी असते हे उदाहरण सांगितले नास परीक्षा ही स्वाध्याय उपक्रमावर आधारित असून त्याचे महत्त्व पालकांना समजावून सांगा असे आवाहन केले .दिपाली पाटील यांनी शाळा सिद्धि चे क्षेत्र व मानके यांचे विश्लेषणात्मक उदाहरणे सांगितले. सारिका पाटील मॅडम यांनी दिशा प्रश्न पेढी यावर प्रश्न कशा प्रकारचे आधारित आहेत व उपयोजनात्मक अशा प्रकारचे आहेत व त्याचा व्यवहार वापर कसा होणार आहे असे समजून सांगितले तसेच प्रश्नपेढी चे उद्दिष्टे व महत्व समजावून सांगितले. तज्ञ मार्गदर्शिका उन्नती शिरगावकर यांनी स्वाध्याय उपक्रम आज संदर्भात माहिती दिली. 

केंद्रशाळेचे मुख्याध्यापक डॉ अजितकुमार पाटील यांनी केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेचे उद्दिष्टे व महत्त्व समजावून सांगितले.कोरोनाकाळात विद्यार्थी व पालक अस्थिर झाले आहेत त्यांना आपण सर्वांनी स्थिरता येण्यासाठी मदत करूया असे सांगितले. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीला विज्ञानाच्या उपयोजित व्यवहारज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांनी केला तरच तो समर्थपणे आव्हाने पेलू शकणार आहे असे प्रतिपादन केले.              
    कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जयश्री सावंत, उत्तम कुंभार, रामराजे सुतार ,रोहिणी शेवाळे,वंदना खोत,प्रकाश गावडे व डाएटचे विषयतज्ञ आसमा पठाण, श्रावण कोकितकर,तमेजा मुजावर,अशोक जाधव सर ,ए के कांबळे सर यांचे सहकार्य लाभले व आभार पी आर पाटील यांनी मानले केंद्रस्तरीय शिक्षण परिषदेमध्ये 32 शाळेचे मुख्याध्यापक व 122  शिक्षक उपस्थित होते.

Saturday, 2 October 2021

समाजकल्याण शिष्यवृत्ती बाबत समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाची यशस्वी चर्चा: - - लक्ष्मी पाटील

कोल्हापूर / प्रतिनिधी
दि.2/10/21
 महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ कोल्हापूर विद्यार्थी समाज कल्याण शिष्यवृत्ती बाबत समाजकल्याण विभागास दिलेल्या निवेदन संबंधी  चर्चा करण्यासाठी जिल्हा परिषद कोल्हापूरचे समाजकल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी शुक्रवारी शिक्षक संघाच्या शिष्टमंडळास निमंत्रित केले होते.  शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष  रवीकुमार पाटील, संचालिका शिक्षक बँक व महिला अध्यक्षा लक्ष्मी पाटील कोल्हापूर, जिल्हा शिक्षक संघाचे शिष्टमंडळ यांनी सविस्तर चर्चा केली.  समाजकल्याण विभागामार्फत राबवण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती बाबत खुलासा करून जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांना दिलासा देणारे अनेक निर्णय घेतले.
   शिक्षक संघाने मागणी केल्याप्रमाणे कोणत्याही बँकेचे खाते या शिष्यवृत्तीसाठी चालेल असे लेखी पत्र संघटनेला दिले यापूर्वी फक्त नॅशनलाईज बँकेत खाते चालेल असे पत्र होते मात्र संघटनेच्या मागणीवरून आयएफसी कोड असलेल्या व नेफ्ट किंवा ट्रान्सफर ऑनलाईन होणाऱ्या कोणत्याही बँकेतून ही सुविधा शिष्यवृत्ती साठी देण्याचे मान्य केले.
   विद्यार्थ्यांना मिळणार्या शिष्यवृत्ती रकमेपेक्षा बँकेत खाते काढण्यास खर्च अधिक येतो . वर्षातून एखादे वेळेस काहीशी रक्कम जमा होते. त्यामुळे बँक हे खाते इन ऑपरेट आहे असे मानतात. त्यामुळे झिरो बॅलन्स खाते काढण्यासाठी बँकांना  पत्र काढावे. यावर  जिल्हा अधिकारी यांच्याशी चर्चा करून सर्व बँकांना तसे पत्र काढण्याची कार्यवाही करू,जिल्हा परिषद शाळेतील शिष्यवृत् जिल्हा परिषदेचा स्वतंत्र कॅम्प लावावा व माध्यमिक विभागाचा स्वतंत्र कॅम्प लावा अशी मागणी केली होती. ती जिल्हा समाजकल्याण अधिकाऱ्यांनी मान्य केली ४ तारखेपासून शाळा सुरू होत असल्यामुळे दिवाळीनंतर पुन्हा हे कॅम्प घेण्यात येतील व जिल्हा परिषद तसेच माध्यमिक शाळेसाठी स्वतंत्र कॅम्प घेतले जातील असे अभिवचन त्यांनी दिले.
    विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीसाठी कोणत्याही जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय शिष्यवृत्तीसाठी विध्यार्थ्यांच्या जातीच्या दाखल्यांची सक्ती केली गेली नाही . भारत सरकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मॅट्रिकपूर्व  शिष्यवृत्ती या केंद्र पुरस्कृत शिष्यवृत्तीकरिता विद्यार्थी जातीच्या दाखल्याची मागणी केली आहे.तरीही आपल्या संघटनेची दाखले बाबत मागणी लेखी स्वरूपात वरिष्ठांना कळवितो व त्यांच्या मंजुरीनंतर विद्यार्थ्यांच्या दाखल्यावर जी पालकांचे दाखले ग्राह्य धरण्याची प्रक्रिया करू असे आश्वासन शिक्षक संघाच्या शिष्टमंडळाला दिले. यावेळी जिल्हा नेते रघुनाथ खोत,  जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील , बाळासाहेब निंबाळकर, सुनील एडके, राजेंद्र माने, शुभांगी सुतार आदी पदाधिकारी उपस्थित होते.
        फोटो 
समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे प्राथमिक शिक्षक संघास चर्चेनंतर निर्णय झालेले लेखी पत्र  जिल्हाध्यक्ष रविकुमार पाटील महिला आघाडी अध्यक्षा लक्ष्मी पाटील व शिष्टमंडळ यांना देतांना

Friday, 1 October 2021

हालोंडी येथे पाणंद रस्त्याच्या कामाचे उद्घाटन

हेरले / प्रतिनिधी
दि.2/10/21
हालोंडी (ता.हातकणंगले) येथे आमदार  राजूबाबा आवळे जि.प.सदस्या डॉ.पद्माराणी पाटील व  पंचायत समिती सदस्य  मेहरनिगा जमादार यांच्या फंडातून मंजूर झालेल्या पाणंद रस्त्याच्या कामाचे उद्घाटन  आमदार  राजूबाबा आवळे, माजी सभापती राजेश पाटील व पंचायत समिती सदस्या मेहरनिगा जमादार यांच्या हस्ते संपन्न झाले.
        हालोंडी गावांमध्ये शेती व्यवसाय प्रामुख्याने केला जातो व ऊसाचे नगदी पिक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. या गावात पावसाळ्यात सर्वत्र नदीचे पाणी येत असल्याने  शेतक-यांना शेतीकडे जाणे कठीण होते. त्यामुळे गावांतील पाणंद रस्त्यांचे मुरुमीकरण करणे आवश्यक होते. शेतकऱ्यांच्या विकासासाठी व उन्नतीसाठी आमदार राजूबाबा आवळे यांनी आपल्या फंडातून पाच लाख रुपये जि प सदस्या डॉ.पद्माराणी पाटील यांच्या फंडातून पाच लाख रुपये  व हातकणंगले पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार यांच्या फंडातून दोन लाख रुपये असे बारा लाख रुपये पानंद रस्ता मुरूमीकरणासाठी विकास निधी मंजूर करून कामास सुरुवात केली आहे. तसेच उर्वरीत गावातील शेतीकडे जाणारे  पाणंद रस्त्याचे पुढील काळात मुरुमीकरण करण्यासाठी प्रयत्नशील राहू असे  लोक प्रतिनिधी यांनी ग्वाही दिली.
                     या प्रसंगी सरपंच जयश्री कोळी,उपसरपंच महावीर पाटील, सुनिल पाटील, मुनिर जमादार ,अजित पाटील, दिपक शेटे, चंद्रकांत माने, किरण कांबळे,  बदाम पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
      फोटो 
हालोंडी येथे ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार राजूबाबा आवळे, माजी सभापती राजेश पाटील, पंचायत समिती सदस्या महेरनिगा जमादार यांचा सत्कार करतांना सरपंच उपसरपंच व मान्यवर