Sunday, 25 February 2024

पेठ वडगावचे आदर्श गुरुकुल विद्यालय जिल्ह्यात आदर्श


मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमात जिल्ह्यात प्रथम
हेरले /प्रतिनिधी

पेठ वडगाव येथील आदर्श गुरुकुल विद्यालय व जुनिअर कॉलेज जिल्ह्यात आदर्शवत ठरली आहे. महाराष्ट्र शासनाकडून आयोजित केलेल्या मुख्यमंत्री "माझी शाळा सुंदर शाळा" या स्पर्धेमध्ये कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केला आहे.तसेच पुढील विभागीय स्तरावरती निवड झाली आहे.यापूर्वी केंद्र स्तरावर व तालुका स्तरावर प्रथम क्रमांक प्राप्त केला होता.या आय एस ओ मानांकन प्राप्त शाळेने आत्तापर्यंत महाराष्ट्र शासन शिवछत्रपती वनश्री पुरस्कार, १ लाख ४ हजार ४४४ सूर्यनमस्कार या अनोख्या उपक्रमाची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली आहे. शिव विचार दौड व ५५५ विद्यार्थ्यांच्या सहभागाने शिवचरित्र पारायण सोहळा साजरा केला या उपक्रमाची नोंद एशियन बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये झाली.मुख्याध्यापक संघाकडून स्वच्छ सुंदर शाळा पुरस्कार महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण समितीकडून इको फ्रेंडली व ग्रीन स्कूल अवॉर्डने सन्मानित केले आहे.कचऱ्यावर प्रक्रिया करून गांडूळ खत प्रकल्प, अपारंपारिक ऊर्जा निर्मिती प्रकल्प, रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प, वेस्ट वॉटर  पुनर्वापरासाठी E.T.P  प्रकल्प, मातृ- पितृ कृतज्ञता सोहळा माजी विद्यार्थी मेळावे, विविध देशी व विदेशी खेळांच्या मार्फत हजारो विद्यार्थी राज्य, राष्ट्रीय ,आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी झाले आहेत. स्कॉलरशिप एन. एम.एम.एस परीक्षा डाॅ.होमीभाभा बालवैज्ञानिक परीक्षा तसेच शाळा सिद्धि A1 ग्रेड प्राप्त, शैक्षणिक गुणवत्तेबरोबरच कला, क्रीडा, सांस्कृतिक अशा विविध क्षेत्रात शाळेतील विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केले आहे. तसेच शाळेच्या हजारो माजी विद्यार्थ्यांनी सामाजिक, राजकीय, शैक्षणिक, वैज्ञानिक, कृषी, संशोधन  अशा विविध स्तरावर यश संपादन केले आहे.

या यशस्वी कामगिरीसाठी संस्थापक अध्यक्ष डॉ. डी.एस.घुगरे मुख्याध्यापिका सौ.एम.डी घुगरे यांचे मार्गदर्शन व प्रेरणा लाभली.पर्यवेक्षक एस जी जाधव व प्रशासक ए.एस. पाटील तसेच सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

मुख्यमंत्री "माझी शाळा सुंदर शाळा" या अभियानांतर्गत आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रथम आलो आहोत ही बाब आनंदाची आहे.आम्ही राज्याची तयारी देखील केली आहे.आम्हाला आशा आहे की आम्ही राज्यात देखील यशस्वी कामगिरी करू

मुख्याध्यापिका
सौ.महानंदा घुगरे

Thursday, 22 February 2024

श्री निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मौजे वडगाव पदाधिकारी शिवशंकर चिंगळे यांची अध्यक्षपदी व जयसिंग टिकले यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड


हेरले /प्रतिनिधी
श्री निरंजन महाराज चॅरिटेबल ट्रस्ट मौजे वडगाव (ता. हातकणंगले)या संस्थेची विशेष सर्वसाधारण सभा विद्यमान अध्यक्ष  आबासाहेब देसाई यांच्या अध्यक्षतेखाली होऊन शिवशंकर चिंगळे यांची अध्यक्षपदी व जयसिंग टिकले यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड करणेत आली.
    बिनविरोध कार्यकारी मंडळ पुढील प्रमाणे संदिप थोरवत (सचिव),महेश भाणसे (खजानिस)  सदस्य आबासाहेब देसाई,संतोष माळी , अनिल थोरात, अरुण कोरे, विवेक धनवडे,अरविंद बाबर,बाळासाहेब जाधव   असी बिनविरोध निवड मठाधिपती श्री सदगुरु अदिनाथ महाराज यांनी जाहिर केली. त्यास सर्व सभासदानी टाळ्यांच्या गजरात पाठींबा दिला .  अध्यक्ष, उपाध्यक्षाचा सत्कारानंतर मठाधिपती श्री सद्गुरु अदिनाथ महाराजाचे आर्शिवचन होऊन सभा संपली .

मौजे वडगांव येथे रस्ते कामाचा शुभारंभ


हेरले (प्रतिनिधी ) गट तट न मानता गावाच्या विकासासाठी एकत्र येऊन राजकारणासाठी कोणीही गावाचा विकास थांबवू नये . माझ्याकडे कोणतेही अधिकार नसतांना गावा गावात निधी दिला आहे. एकवेळ आमदार करून काम करण्याची संधी दया विकास कामासाठी आणखी निधी खेचून आणतो असे मत हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे भाजपा जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते दलितमित्र अशोकराव माने ( बापू ) यांनी व्यक्त केले . ते मौजे वडगाव (ता हातकणंगले) येथे रस्ते कामाच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते . कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच कस्तुरी पाटील होत्या .
           दलितमित्र अशोकराव माने ( बापू ) यांच्या २५/ १५ फंडातून ५ लाख रुपये रकमेचा आर सी सी रस्ता मंजूर केला असून त्यांच्या हस्ते रस्ते कामाचा शुभारंभ करण्यात आला .
             यावेळी उपसरपंच सुनिल खारेपाटणे , ग्रा प . सदस्य सुरेश कांबरे , रघूनाथ गोरड , सविता सावंत , सुनिता मोरे, दिपाली तराळ, सुवर्णा सुतार, श्रीकांत सावंत , रावसाहेब चौगुले, सतिश चौगुले, ॲड .विजय चौगुले, धोंडिराम चौगुले, जितेंद्र चौगुले, अमोल झांबरे , मनोहर मगदूम , सखाराम मगदूम, बबनराव चौगले, सुभाष वाकरेकर , योगेश चौगुले , अमर थोरवत , भिमराव चौगुले, यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते . स्वागत स्वप्नील चौगुले यांनी केले तर आभार अविनाश पाटील यांनी मानले .

फोटो 
मौजे वडगाव येथे आर सी सी रस्ते कामाचे उदघाटन प्रसंगी दलितमित्र अशोकराव माने ( बापू ) यांचा सत्कार करतांना सरपंच कस्तुरी पाटील व ग्रा.पं पदाधिकारी व मान्यवर .

Saturday, 17 February 2024

विद्यार्थ्यांचे क्रीडा कौशल्य व शारीरिक विकास ही काळाची गरज - शिक्षणाधिकारी मीना शेंडकर


कोल्हापूर / प्रतिनिधी
शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद कोल्हापूर व मानदेशी फाउंडेशन म्हसवड तालुका मान जिल्हा सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत जिल्हा परिषद कोल्हापूर कडील आदर्श शाळेतील शिक्षकांना निवासी क्रीडा प्रशिक्षण दिनांक 12 फेब्रुवारी ते 16 फेब्रुवारी  अखेर कनेरी मठ येथे निवासी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. सदरचे प्रशिक्षण हे दोन टप्प्यात होत असून यावेळी बोलत असताना शिक्षण अधिकारी मीना  शेंडकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शिक्षण अधिकारी यांनी राज्याच्या व कोल्हापूर जिल्ह्याचा तुलनात्मक आढावा घेत कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची गुणवत्ता त्यांचे योगदान एकंदरीत सर्व शैक्षणिक कामकाजाची कौतुक केले तसेच आपण स्वतः जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेतले चा अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले.
   जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नाविन्यपूर्ण उपक्रम अंतर्गत   मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील  यांच्या प्रेरणेतून माझी शाळा आदर्श शाळा अंतर्गत क्रीडा शिक्षकांना पायाभूत प्रशिक्षण मानदेशी फाउंडेशन मसवड यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले आहे .शिक्षकांनी आपल्या कौशल्याच्या जोरावर शाळेच्या गुणात्मक व भौतिक विकासासाठी प्रयत्न करावेत प्रशासन सदैव आपल्या पाठीशी राहू असे आश्वासन यावेळी त्यांनी दिले. सदर प्रशिक्षण अंतर्गत शिक्षकांना कबड्डी, खो-खो, ऍथलेटिक्स फील्ड, पोक्सो सामाजिक जाणीव पूरक व पोषक आहार खेळातून विकास यांचे प्रशिक्षण एन आय एस कोचमार्फत देण्यात आले.
     कार्यक्रमाचे प्रास्ताविक रामचंद्र कांबळे शिक्षण विस्तार अधिकारी यांनी केले. या प्रास्ताविकामध्ये त्यांनी माझी शाळा आदर्श शाळा या उपक्रमाचा उद्देश व प्रत्यक्ष कार्यवाही याचा आढावा सादर केला प्रशिक्षण काळातील आपले अनुभव तुषार पाटील,उमा लोणारकर ,गुरव मॅडम यांनी व्यक्त केले प्रशिक्षण काळात मानदेशी फाउंडेशन यांच्यावतीने विविध क्रीडा प्रकारात विशेष  नैपुण्य दाखवणाऱ्या शिक्षक खेळाडूंना पुढील प्रशिक्षणासाठी निवडण्यात आले प्रशिक्षण पूर्ण करण्यासाठी काम करणारे  ओंकार गोजारी व त्यांचे सर्व सहकारी मानदेशी फाउंडेशन, काशिनाथ कुंभार 'हरिदास रणदिवे 'अरुण गायकवाड यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
   समारोप कार्यक्रमासाठी शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांचे सोबत समग्र शिक्षा कार्यक्रम अधिकारी शशिकांत कदम मठाचे व्यवस्थापक प्रल्हाद जाधव शिक्षण विस्तार अधिकारी  रामचंद्र कांबळे यांचेसोबत मठाचे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील गुरव यांनी केले तर आभार तुषार पाटील यांनी मानले.
फोटो 
जिल्हा परिषद कोल्हापूर कडील आयोजित आदर्श शाळेतील शिक्षकांचे निवासी क्रीडा प्रशिक्षण प्रसंगी बोलतांना प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना  शेंडकर

Friday, 16 February 2024

हेरले येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे भूमिपूजन

हेरले / प्रतिनिधी
श्री. छत्रपती शिवाजी महाराज स्मारक समिती हेरले (ता. हातकणंगले) यांच्या वतीने जाणता राजा, युगपुरुष हिंदवी स्वराज्याचे संस्थापक श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचा  भूमिपूजन सोहळा गुरुवार दि. १५  रोजी सकाळी ७.०० वा. हनुमंतास महाअभिषेक घालून दुपारी १२ वा. ४५  झेंडा चौक येथे  भूमिपूजन कार्यक्रम हेरवाडकर मामा यांच्या हस्ते संपन्न झाला.
   या प्रसंगी माजी सभापती राजेश पाटील,कामधेनू समुह नेते चेअरमन आदगोंडा पाटील, पोलीस पाटील नयन पाटील, सरपंच  राहुल शेटे, उपसरपंच बक्तियार जमादार,सर्व ग्रामपंचायत सदस्य,बटूवेल कदम, सुकुमार लोखंडे, मज्जित लोखंडे, विनोद वड्ड, निलेश कोळेकर आदी मान्यवर उपस्थित होते.
    या प्रसंगी विजय कारंडे, विजय भोसले,सरपंच राहुल शेटे, माजी सभापती राजेश पाटील, चेअरमन आदगोंड पाटील, कपिल भोसले यांनी मनोगते व्यक्त केली. कार्यक्रमाचे नियोजन विजय कारंडे, विजय भोसले, संतोष भोसले, बाजीराव हवलदार, बबलू निंबाळकर, कपिल भोसले, राहुल कराळे,गणेश ढेरे,नंदू माने, विजय पाटील, प्रवीण सावंत, दीपक जाधव, मंदार गडकरी, सौरभ भोसले,अदीक इनामदा, कृष्णात खांबे, राजू कागले,सचिन थोरवत,सयाजी गायकवाड, भोपाल रुईकर, बंडू खांडेकर, ऋषिकेश लाड  यांनी केले. या प्रसंगी मोठ्या संख्येंनी ग्रामस्थ उपस्थित होते.
    फोटो 
हेरले येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ स्मारकाचे भूमिपूजन  झेंडा चौक येथे करतांना  हेरवाडकर मामा व अन्य मान्यवर.

Thursday, 15 February 2024

तालुका पुरवठा अधिकार्‍यांची स्वस्त धान्य दुकानांना भेटी

शिरोली/ प्रतिनिधी
शासनाच्या मोफत धान्य वाटपापांसून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही. याची स्वस्त धान्य दुकानदारांनी गांभीर्याने काळजी घ्यावी. असे मत तालुका पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांनी व्यक्त केले. ते पुलाची शिरोलीतील धान्य दुकान भेटी प्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी शिरोली विकास सोसायटीचे चेअरमन धनाजी पाटील हे होते.
श्री काळगे यांनी गावातील सर्व स्वस्त धान्य दुकानांना भेटी दिल्या. यावेळी त्यांनी धान्य वाटप लाभार्थींना धान्य पुरवठा व्यवस्थित होतो की नाही. या अनुषंगाने दप्तर तपासणी, धान्य साठपाची गोडावून ,स्वच्छता, वजनमापे आदींची तपासणी करण्यात आली.
यावेळी काळगे यांचा शिरोली विकास सोसायटीच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी व्हा.चेअरमन मदन संकपाळ, संचालक सतिश पाटील, संजय पाटील,शब्बीर देसाई, विश्वास गावडे, रावसो सोडगे, अमित मुखरे, शिवाजी करपे, पुरवठा विभागाचे राजू पाटील,सेल्समन राजू सुतार, क्रूष्णात वंडकर, सुनिल कुराडे, सुर्यवंशी मँडम, सुतार मँडम आदी उपस्थित होते.
स्वागत धनाजी पाटील यांनी केले, आभार सेक्रेटरी नंदकुमार पाटील यांनी मानले.
                 
लाभार्थी लोकांच्या हाताचे ठसे घेवून धान्य वाटप केले जाते. पण यासाठी वापरले जाणारे पाँश मशिन सुरुवातीच्या काळात दिलेली जूनीच आहेत. त्यामुळे अनेकांचे ठसे मिळत नाहीत. परिणामी त्यांना परत जावे लागते. हि गैरसोय टाळण्यासाठी नवीन मशिन उपलब्ध करुन देण्याची मागणी लाभार्थी करीत आहेत.
फोटो.....
पुलाची शिरोलीत पुरवठा अधिकारी चंद्रकांत काळगे यांचा सत्कार करताना चेअरमन धनाजी पाटील,प्रसंगी मदन संकपाळ, संजय पाटील, सतिश पाटील, शब्बीर देसाई आदी

Tuesday, 13 February 2024

राजर्षी शाहू विद्यामंदिर सी आर सी 7 अंतर्गत नवभारत साक्षरता अभियान

कोल्हापूर प्रतिनिधी 
राजर्षी शाहू विद्यामंदिर सी आर सी 7 अंतर्गत शाळांमधील नवभारत साक्षरता अभियानाचे सुरू असलेले कामकाज पाहण्यासाठी माननीय प्रशासनाधिकारी एस के यादव साहेब यांनी असाक्षरांच्या वर्गास भेटी दिल्या.
त्याप्रसंगी असाक्षरांची मनोगते व अभ्यासातील समाधानकारक प्रगती पाहून समाधान व्यक्त केले.

यावेळी केंद्रमुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी प्रशासनाधिकारी एस के यादव यांचे स्वागत केले. प्रसंगी मुख्याध्यापक बसवराज वस्त्रद आणि मगदूम हायस्कूल व न्यू पॅलेस विद्यामंदिर चे शिक्षक उपस्थित होते.
वर्ग सुरू असल्याबद्दल स्वयंसेवकांचे अभिनंदन करण्यात आले.

Saturday, 10 February 2024

वडगाव विद्यालयात सारथी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव !


पेठवडगाव /प्रतिनिधी

पेठवडगाव  -एन एम एम एस परीक्षा पास झालेल्या मराठा, मराठा- कुणबी विद्यार्थ्यांना सन 2023 24 मध्ये सारथी शिष्यवृत्ती मिळाली या विद्यार्थ्यांचा वडगाव विद्यालय वडगावमध्ये प्रशालेचे मुख्याध्यापक लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे, पर्यवेक्षिका सौ आर आर पाटील, परीक्षा विभाग प्रमुख डी ए शेळके, ज्येष्ठ शिक्षक श्री डी एस कुंभार ,ज्येष्ठ शिक्षिका सौ एस एस चव्हाण, एन एम एम एस परीक्षा प्रमुख श्री एम व्ही कुलकर्णी, श्री एस व्ही चव्हाण यांच्या अमृत हस्ते सारथी शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
   ते विद्यार्थी खालील प्रमाणे मानसी पाटील, स्वरांजली पाटील ,तनुजा पाटील ,अनुजा पाटील, समीक्षा पाटील ,श्रेया पाटील ,भक्ती सूर्यवंशी ,साहिल पाटील ,श्रेयस पाटील ,अथर्व कोकाटे, रितेश कुमार पाटील, आर्या चव्हाण, आदिती पाटील, दर्शनी पाटील ,आदिती पाटील ,स्वयंसिंह चव्हाण ,रविराज पाटील ,प्रज्वल जासूद ,अनुष्का निकम ,समीक्षा कोळी (एन एम एस शिष्यवृत्तीधारक) या सर्व विद्यार्थी विद्यार्थिनींना प्रत्येकी 9600 प्रमाणे शासनाची सारथी शिष्यवृत्ती एकूण रुपये 1,82,000त्यांच्या वैयक्तिक खाते क्रमांक वर जमा झाली आहे. या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांना प्रशालेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक पर्यवेक्षिका परीक्षा व प्रमुख एन एम एम एस विषयाचे मार्गदर्शन करणारे सर्व मार्गदर्शक शिक्षक एन एम एम एस परीक्षा प्रमुख श्री एम व्ही कुलकर्णी यांचे सहकार्य लाभले.
      फोटो 
वडगाव विद्यालयात सारथी शिष्यवृत्ती मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करतांना मुख्याध्यापक लक्ष्मण उर्फ बाळ डेळेकर, उपमुख्याध्यापक सुधाकर निर्मळे, पर्यवेक्षिका सौ आर आर पाटील अन्य पदाधिका�

Saturday, 3 February 2024

रामभक्त निवास पाटील यांचा संकल्प अभिमानास्पद : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

     
हेरले / प्रतिनिधी                 
  तब्बल ३१ वर्ष राम मंदिरासाठी अनवानी राहिलेल्या रामभक्त निवास पाटील यांचा संकल्प अभिमानास्पद आहे,असे गौरवोद्गगार  मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काढले.
श्री शिव प्रतिष्ठान, हिंदुस्तानचे संस्थापक संभाजीराव भिडे (गुरुजी) यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित  आयोजित श्री रायरेश्वर ते श्री प्रतापगड गडकोट मोहिमेच्या समारोपाच्या  कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रतापगड येथे आले होते.
      शिये (ता. करवीर ) येथील रामभक्त निवास पाटील हे राम मंदिर व्हावे म्हणून तब्बल ३१ वर्ष अनवानी राहिले होते. आणि त्यांचा हा संकल्प २२ जानेवारीला राम लल्लांची मूर्ती प्रतिष्ठा झाल्याने पूर्णत्वास आला.आणि २८ गडकोट मोहिमेत अनवाणी सहभाग घेतला याबाबतची माहिती धारकरी महेश राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना दिली.यावर मुख्यमंत्री म्हणाले, तुम्ही संकल्प केला आणि तो पूर्णत्वास  आला हे तुमचे भाग्य आहे.आणि तुमच्या या संकल्पचा आम्हाला ही अभिमान आहे.
 यावेळी महेश पाटील,संग्राम पाटील, आशिष पाटील, सिंघण जाधव,महादेव पाटील, गजानन मोरे, बाबासो काशिद, कार्तिक राऊत  हे धारकरी  उपस्थित होते

...........................................

फोटो : 
शिये : येथील रामभक्त  निवास पाटील यांचे संकल्प पूर्तीबद्दल कौतुक करताना मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे.