Monday, 30 December 2024

स्थलांतरित असाक्षर ऊसतोड कामगारांचेही अखंडित -शिक्षण - साखर आयुक्तांचे राज्यातील साखर कारखान्यांना आदेश


उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल.

कोल्हापूर / प्रतिनिधी

राज्यात गाळप हंगाम सुरू केलेल्या साखर कारखान्याच्या परिसरातील फडात अ,आ,ई अक्षरे गिरवली जाणार.

 राज्यात साखर कारखान्यांचे गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर ऊस तोडणीसाठी स्थलांतरित झालेल्या असाक्षर कामगारांचे शिक्षण अखंडित सुरू रहावे म्हणून कारखाना परिसरात त्यांच्यासाठी अध्ययन-अध्यापन वर्ग सुरू करण्याचे आदेश साखर आयुक्तांनी राज्यातील सर्व साखर कारखान्यांना दिले आहेत. त्यामुळे राज्यात गाळप हंगाम सुरू केलेल्या ९६ सहकारी व ९३ खाजगी अशा एकूण १८९ साखर कारखाना परिसरातील फडात ऊसतोडणी बरोबरच अ,आ,इ.. अक्षरे गिरवली जाणार आहेत.

केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम राज्यात २०२२ ते २०२७ या कालावधीत सुरू आहे. १५ व त्यापुढील वयोगटातील असाक्षरांसाठी प्रौढ शिक्षण ऐवजी 'सर्वांसाठी शिक्षण' या नावाने हा कार्यक्रम सुरू असून चालू शैक्षणिक वर्षात २४ डिसेंबर अखेरपर्यंत ४ लाख ९२ हजार इतक्या असाक्षरांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे.

या योजनेत शाळा हे एकक असून असाक्षर व त्यांना शिकवणाऱ्या स्वयंसेवकांची ऑनलाईन नोंदणी उल्लास मोबाईल ॲपवर शाळांनी नेमलेल्या सर्वेक्षकांद्वारे करण्यात येते. राज्यात प्रत्येक जिल्ह्यात गावोगावी असे वर्ग सुरू करण्यात आले आहेत. साखर कारखान्यांच्या गाळप हंगामासाठी स्थलांतरित व्हावे लागल्यास अशा असाक्षरांचे शिक्षण अखंडित सुरू रहावे म्हणून राज्य साक्षरता अभियान प्राधिकरणाचे सचिव तथा योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी साखर आयुक्तांना याबाबत पत्राद्वारे विनंती केली होती. त्यानुसार राज्याचे सहकार तथा साखर आयुक्त दीपक तावरे यांनी सर्व खाजगी व सहकारी साखर कारखान्यांना आदेशित केले आहे.

 देशातील साक्षरतेचा दर १०० टक्के साध्य करण्याचा उद्देशाने सर्व राज्यांमध्ये सन २०२२-२७ या कालावधीपर्यंत अंमलबजावणी करण्यात येत आहे. शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दि.१४.१०.२०२२ रोजीच्या शासन निर्णयानुसार, राज्य शासनामार्फत केंद्रपुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाची अंमलबजावणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यात सुरु आहे. त्यानुसार राज्य, जिल्हा, तालुकास्तरावर विविध समित्यांची स्थापना करण्यात येऊन त्यांचे मार्गदर्शन व निगराणीखाली सदर कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

 सध्या राज्यात ऊस लागवड क्षेत्रात ऊसतोडीचे काम तसेच साखर कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू आहे. त्यासाठी राज्याच्या विविध भागांतून ऊसतोड कामगारांचे ऊस तोड क्षेत्रात स्थलांतर होते. साधारणपणे ३ ते ४ महिने हे काम सुरू असल्याने स्थलांतरित ऊसतोड कामगार त्या ठिकाणी वास्तव्य करतात. हे ऊसतोड कामगार ज्या क्षेत्रातून स्थलांतरीत झालेले आहेत, त्या ठिकाणी असणाऱ्या शाळांतील मुख्याध्यापक तसेच शिक्षकांमार्फत सदर ऊसतोड कामगारांचे सर्वेक्षण करून आढळलेल्या असाक्षरांची उल्लास ॲपवर नोंदणी व स्वयंसेवकांबरोबर ऑनलाईन जोडणी  करण्यात आलेली आहे. तसेच सदर असाक्षरांच्या सोईच्या (उपलब्ध) वेळेनुसार त्यांना स्वयंसेवकांमार्फत अध्ययन-अध्यापन करण्यात येत आहे. स्वयंसेवकांना शासनामार्फत कोणत्याही स्वरूपाचे मानधन देण्याची तरतूद नाही. स्वयंसेवकांमार्फत स्वयंप्रेरणेने काम करण्यात येते.

या सर्व बाबी विचारात घेता कामासाठी स्थलांतरीत झालेल्या व सध्या ऊसतोड व गाळप क्षेत्रातील सर्व कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या (अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत खंड पडलेल्या) असाक्षरांना साक्षर करण्यासाठी पुढाकार घेऊन कारखान्यांच्या परिसरात स्वयंसेवकांमार्फत साक्षरता वर्ग सुरू करण्यात यावे. जे असाक्षर अमराठी असतील त्यांच्यासाठी त्यांच्या मातृभाषेतून अध्यापनासाठी स्वयंसेवकांची स्थानिक स्तरावरून व्यवस्था करावी. अध्ययन-अध्यापनाबाबत अधिक मार्गदर्शनासाठी नजीकच्या शाळांशी संपर्क करण्यात यावा. तसेच कारखान्यांमध्ये गाळप हंगाम सुरू असेपर्यंत सदर असाक्षर ऊसतोड कामगारांसाठी सुरू असलेले अध्ययन-अध्यापन वर्ग सुरू ठेवण्यात यावा, जेणेकरून संबंधित असाक्षरांच्या अध्ययनात खंड न पडता, त्यांच्या शिक्षणात सातत्य टिकून राहील व काम संपल्यावर ते मूळ ठिकाणी परत गेल्यावर उल्लास परीक्षा देऊन उत्तीर्ण होतील.

तसेच ज्या ऊसतोड कामगारांची त्यांच्या मूळ गावी (जेथून ते ऊस तोडणीसाठी ते स्थलांतरित झाले आहेत) उल्लास मोबाईल ॲपवर नोंदणी झालेली नाही, अशांच्याही अध्ययन-अध्यापनाची व्यवस्था कारखाना परिसरात करावी व त्यांना मूळ गावी गेल्यानंतर तेथे नजिकच्या शाळेत जाऊन ऑनलाइन नोंदणी करून घेणेबाबत प्रवृत्त करावे.
 सर्व साखर कारखान्यांनी साक्षरता वर्ग व्यवस्थित सुरू ठेवावे व यासाठी स्थानिक शालेय शिक्षण व क्रीडा विभागाशी आवश्यक पाठपुरावा व समन्वय करावा, असे साखर आयुक्तांनी आदेशित केले आहे.

ठळक बाबी-
•राज्यात ९६ सहकारी तर ९३ खाजगी अशा १८९ साखर कारखान्याचा गळीत हंगाम सुरू.
•साक्षरता वर्गातील असाक्षरांची यादी, उपक्रमाची माहिती,फोटो जतन करण्याचे निर्देश.
•नोंदणीकृत असाक्षरांचे शिक्षण अखंडित सुरू रहावे यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल
•नोंदणी नसलेल्या असाक्षरांसाठीही वर्ग सुरू करण्याच्या सूचना, मूळ गावी परतल्यानंतर ऑनलाईन नोंदणी अपेक्षित. 
•स्वयंसेवक म्हणून स्थानिक सुशिक्षित बेरोजगार, महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवानिवृत्त व्यक्ती यांचा सहभाग अपेक्षित.
•ऑनलाइन/ऑफलाइन अध्ययन -अध्यापनासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेकडून साहित्य विकसित.
या योजनेत शिकवणाऱ्या स्वयंसेवकास मानधनाची तरतूद नाही. त्यामुळे लोकसहभाग व सामाजिक उत्तरदायित्व यावर या योजनेचे यश अवलंबून आहे. कामगारांसाठी निवारा, वीज, पाणी यासारख्या मूलभूत सुविधा देण्याबरोबरच साखर कारखान्यांना असाक्षरांच्या शिक्षणासाठीही लक्ष द्यावे लागणार आहे. स्थलांतरित ऊसतोड कामगारांच्या मुलांचे शिक्षण सुरू रहावे म्हणून यापूर्वी साखर शाळा सुरू करण्यात येत असत. त्या बंद करून आता लगतच्या स्थानिक प्राथमिक, माध्यमिक शाळेत त्यांना दाखल करून घेण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. 

"मुलांबरोबर असाक्षर पालकांचेही शिक्षण सुरू रहावे, यासाठी राज्यस्तरावरून उचललेले हे प्रगतिशील पाऊल ठरेल, मात्र त्यात साखर कारखाने कितपत सक्रियपणे सहभाग देतात, यावर त्याचे यशापयश अवलंबून आहे.
-राजेश क्षीरसागर, राज्य समन्वयक 'उल्लास' तथा विभागीय अध्यक्ष,कोल्हापूर मंडळ

"अध्ययन-अध्यापन वर्ग कारखान्यांमार्फत सुरू झाल्यास लगतच्या स्थानिक शाळांकडून आवश्यक ते सहकार्य करण्याबाबत क्षेत्रिय अधिकाऱ्यांमार्फत शाळांना सूचना देण्यात येत आहेत.
- डॉ. महेश पालकर, सदस्य सचिव, राज्य साक्षरता अभियान प्राधिकरण,पुणे

Sunday, 29 December 2024

हेरले हायस्कूल केंद्र शाळा,शाळा नंबर दोन व कन्या शाळा येथे निर्भया पथकाद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन


हेरले /प्रतिनिधी

हेरले:-हेरले हायस्कूल केंद्र शाळा नंबर दोन व कन्या शाळा येथे निर्भया पथकाद्वारे विद्यार्थ्यांना पोलिसांच्या निर्भया पथकाने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. 
        सर्व शाळेच्या मुख्याध्यापक  यांनी निर्भया पथक प्रमुख पीयसआय नानासाहेब पवार,पोलिस नाईक शैलेश पाटील, चंदू मोरे,रजनीकांत वाघमोरे  त्यांचे स्वागत केले. 
       यावेळी  मार्गदर्शन करताना पीएसआय नानासाहेब पवार म्हणाले  की, कुठलाही अन्याय होत असेल, कुणी छेडछाड करत असेल, पाठलाग करत असेल किंवा मोबाइलद्वारे अश्लील बोलत असेल तर अशा गोष्टींकडे दुर्लक्ष न करता घरी आई वडिलांना, शाळेत असाल तर शिक्षकांना किंवा पोलिसांच्या दिलेल्या हेल्पलाइन नंबर किंवा ११२ नंबरवर न घाबरता तक्रार करा. तुम्हाला निश्चितपणे मदत मिळेल. यावेळी कायद्याचे विशिष्ट कलम व त्या अंतर्गत होणारी शिक्षा यांचीही माहिती सांगितली. यावेळी शाळेतील मुलींनीही पथकातल्या सभासदांशी मुक्त संवाद साधला.
    यावेळी सरपंच राहुल शेटे,तंटामुक्ती समिती अध्यक्ष अमर वड़ड,हेरले हायस्कूल मुख्याध्यापक पी आर शिंदे, केंद्रप्रमुख शहाजी पाटील, केंद्र शाळा मुख्याध्यापक संजय दाभाडे,कन्या शाळा मुख्याध्यापिका भारती कोरे, शाळा नंबर दोन मुख्याध्यापक प्रभाकर चौगुले आणि माजी केंद्रप्रमुख आर.बी. पाटील शिक्षक शिक्षिका विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.


फ़ोटो:- हेरले (ता. हातकणंगले) येथे निर्भया पथक प्रमुख पीएसआय नानासाहेब पवार यांनी हेरले हायस्कूल हेरले येथे विद्यार्थी विद्यार्थिनी यांना मार्गदर्शन करत असताना.

Friday, 27 December 2024

मिशन विद्याभूमी' अंतर्गत जिल्हा परिषद शाळा मालमत्ता सुरक्षा उपक्रमपरिषद कोल्हापूर तर्फे मिशन विद्याभूमी उपक्रम


कोल्हापूर / प्रतिनिधी




आपल्या मालमत्तेची काळजी घेणे हे कोणत्याही व्यवस्थापनेचे आद्य कर्तव्य आहे. प्रशासक म्हणून निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य असले तरी जबाबदारी वाढ़ते हे लक्षात घेता मागील वर्षभरात काम करत असताना शाळांच्या बाबतीत देखभाल दुरुस्ती व नवीन बांधकाम या दोन्ही लेखाशिर्ष अंतर्गत काम करताना शाळांच्या मालकी हक्काचे दस्तऐवजीकरण करण्याची गरज लक्षात आली. यामध्ये खाली बाबी निदर्शनास आलेल्या आहेत.

1) शाळा इमारत दुस-याच्या मालकीची असल्यामुळे दुरुस्तीसाठी निधी देता येत नाही.

2) मुळ वर्गखोली धोकादायक असल्याने निर्लेखन करण्याची परवानगी दिली असता नविन बांधकामाच्यावेळी मुळ मालक बांधकाम सुरु करु देत नाहीत

3) हद्द निश्विती नसलेने, संरक्षक भिंत नसल्यास अतिक्रमण होण्याची शक्यता असते.

4) आवश्यकतेपेक्षा जास्त वर्गखोल्या उपलब्ध असल्यास इतर विभांगाना त्याचा वापर करता येतो.

त्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या मालमत्तेचे संरक्षण व संवर्धन होणेसाठी शिक्षण विभाग (प्राथमिक), जिल्हा

परिषद कोल्हापूर तर्फे मिशन विद्याभूमी उपक्रम राबवणेत येत आहे.

मिशन विद्याभूमी उपक्रमाची उद्दिष्टे :-

१) शिक्षण विभाग (प्राथमिक) अंतर्गत असलेल्या सर्व शाळांच्या मालमत्तांची माहिती उपलब्ध होणार आहे,

२) किती शाळांची मालकी मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर याची माहिती उपलब्ध होणार आहे.

३) मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नावे नसलेल्या शाळांच्या मालमत्तेची माहिती उपलब्ध होणार आहे तसेच सदर मालको कोणाची आहे याची माहिती उपलब्ध होणार आहे.

४) शाळांच्या जागेची मोजणी झाली अथवा नाही हे कळेल.

५) शाळांच्या जागेचा मोजणी नकाशा उपलब्ध होईल, नसल्यास जागेची मोजणी करुन घेण्यासाठी कार्यवाही करता येईल.

६) सर्व शाळांची मोजणी झाल्यानंतर अतिक्रमण केले असल्यास त्याची माहिती मिळेल,

७) अतिक्रमण हटवण्यासाठी कार्यवाही करता येईल,

८) सर्व शाळांची जागा मोजणी करुन हद्द निश्चिती झाल्यामुळे त्यानुसार संरक्षक भिंत बांधता येईल,

वरील उद्दिष्टें साध्य करणे अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांनी सहभाग घ्यावयाचा आहे. प्रथम टण्यामध्ये जिल्हा परिषद शाळेच्या जागेसंबंधीची माहिती गुगल लिकव्दारे दिनांक १५/०१/२०२५ पर्यंत जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापक यांनी वस्तुनिष्ठ व अचूक भरणेबाबतच्या सूचना देणेत आलेल्या आहेत.अशी माहिती प्रसिद्धीस जिल्हा परिषद कोल्हापूर शिक्षणाधिकारी प्राथमिक मीना शेंडकर यांनी दिली.

Wednesday, 25 December 2024

परीक्षा केंद्रांवरील भौतिक सुविधांची पाहणी



बोर्ड परीक्षेची पूर्वतयारी,
कोल्हापुरात २११ परीक्षा केंद्रे.

कोल्हापूर / प्रतिनिधी

चालू शैक्षणिक वर्षात फेब्रुवारी- मार्चमध्ये होणाऱ्या इयत्ता दहावी बारावी बोर्ड परीक्षेच्या सुरळीत संचालनासाठी कोल्हापूर विभागीय शिक्षण मंडळाने परीक्षा केंद्र असलेल्या शाळांमधील भौतिक सुविधांची पाहणी मोहीम सुरू केली आहे.

चालू वर्षाकरिता कोल्हापूर विभागीय मंडळाने इयत्ता दहावी परीक्षेसाठी ३५७,तर बारावी परीक्षेसाठी १७६ अशी एकूण ५३३ केंद्रे निश्चित केली आहेत. त्यात दहावीसाठी सातारा ११६, सांगली १०३, कोल्हापूर १३८ परीक्षा केंद्रे आहेत. बारावीसाठी सातारा ५२,सांगली ५१, कोल्हापूर ७३ अशी परीक्षा केंद्रे असणार आहेत.

परीक्षा केंद्र निश्चित करताना प्रविष्ट होणारी विद्यार्थी संख्या, आवश्यक भौतिक सुविधांसह इतर परीक्षा केंद्रांवर परिणाम होणार नाही अशा बाबी यासह इतरही निकष विचारात घेतले जातात.

परीक्षेच्या सुलभ संचालनासाठी, सुयोग्य पद्धतीने परीक्षेचे कामकाज हाताळण्यासाठी परीक्षा केंद्र असलेल्या शाळेस संरक्षक भिंत, परीक्षार्थी संख्येच्या प्रमाणात वर्गखोल्या, बेंचेस, पिण्याच्या पाण्याची सुविधा, मुला-मुलींसाठी स्वच्छतागृहे, पंखे, वीज दिवे, सुस्थितीतील दारे, जाळी लावलेल्या खिडक्या, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी व्यवस्था, वीज गेल्यास पर्यायी व्यवस्था म्हणून मा. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जनरेटर अथवा इनव्हर्टर इत्यादी भौतिक सुविधा असणे आवश्यक आहे.

यातील काही सुविधा नादुरुस्त अथवा अपूर्ण असू शकतात त्यामुळे परीक्षा संचालनात अडचणी येऊ शकतात. परीक्षा केंद्रास मान्यता मिळाल्यानंतर, काही कालावधी उलटल्यानंतर अशा सुविधांमध्ये कमतरता अथवा त्रुटी असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी १८ डिसेंबर रोजीच्या पत्रानुसार जिल्हा माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांना आपल्या अधिनस्त अधिकाऱ्यांमार्फत केंद्राची पाहणी करण्याबाबत लेखी निर्देश दिले आहेत. 

"आवश्यक सुविधांची पाहणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण अधिकारी यांना १० जानेवारीपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परीक्षार्थी संख्येच्या प्रमाणात त्रुटी अथवा अपूर्णता आढळल्यास शाळांना या कालावधीत पूर्तता करावी लागणार आहे.
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ.

•सीसीटीव्ही बाबत•
बदलापूर येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने शालेय विद्यार्थी व विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेकरता २१ ऑगस्ट २०२४ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे शाळा व परिसरात पर्याप्त संख्येत सीसीटीव्ही लावून वेळोवेळी त्यांचे फुटेज तपासण्याबाबत शाळांना निर्देश दिलेले आहेत. कोल्हापूर विभागीय मंडळाने कॉपीमुक्त व गैरप्रकार मुक्त परीक्षा आयोजन करण्याच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्र असलेल्या शाळेत, शाळा परिसरात व ज्या शाळांना शक्य आहे, त्या शाळांनी प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याबाबत सूचना दिल्या आहेत. तसेच परीक्षा काळात वेळोवेळी बॅकअप घेण्याबाबतही सुचित केले आहे. शाळा व परिसरात सीसीटीव्ही असणे शासन निर्णयानुसार आवश्यक आहे, मात्र परीक्षेसाठी प्रत्येक वर्ग खोलीत सीसीटीव्ही कॅमेरे बसवणे अनिवार्य (सक्तीचे) केलेले नाही, असे विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी स्पष्ट केले.

अखिल महाराष्ट्र माध्य.व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे 61 वे मुख्याध्यापक शैक्षणिक.संमेलन दि.28 व29 डिसेंबरला लातूरला

हेरले / प्रतिनिधी
अखिल महाराष्ट्र माध्य.व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संयुक्त महामंडळाचे 61 वे मुख्याध्यापक शैक्षणिक.संमेलन दि.28 व29 डिसेंबर  2024 या कालावधीत लातूर येथील औसा रोडवरील थोरमोटे लाॅन्स येथे आयोजित करण्यात आले आहे .राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना.दादाजी भुसे यांची उपस्थिती राहणार आहेत तर सकाळी 10.30 वा.सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील यांच्या शुभहस्ते उद्घाटन होईल स्वागताध्यक्ष पदी माजी मंत्री दिलीपराव देशमुख तर संमेलनाध्यक्ष म्हणून मा.प्राचार्य बाबूराव जाधव  व कार्याध्यक्ष पदी हनुमंत साखरे यांची निवड झाली आहे लोकनेते स्व.विलासराव देशमुख नगरीत पार पाडणाऱ्या संमेलनास खा.डाळ.शिवाजीराव काळगे ,खा.ओमराजे निंबाळकर  ,मा.मंत्री अमित देशमुख, मा.मंत्री संभाजी पाटील निलंगेकर, मा.मंत्री आ.संजय बनसोडे ,आ.विक्रम काळे ,आ.अभिमन्यू पवार, आ.सतीश चव्हाण, आ.धीरज देशमुख, आ.जयंत आसगावकर आदी उपस्थित राहणार आहेत या संमेलनात विविध  शैक्षणिक.विषयावर व्याख्यान व शोधनिबंध सादर होणार आहेत. तरी प.महाराष्ट्रातील तमाम मुख्याध्यापक बंधुभगिनी उपस्थित रहावे असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रावसाहेब  आवारी,राज्य अध्यक्ष केरभावु ढोमसे, उपाध्यक्ष नंदकुमार बारावकर ,.महाराष्ट्र माध्य.व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ अध्यक्ष डी.पी.कदम ,उपाध्यक्ष मनोहर पवार, संमेलन संघटक विनोद पाटील, माजी.संमेलनाध्यक्ष खंडेराव जगदाळे ,संघटक बबन काटकर ,सुरेश वनमोरे, सोपान कदम ,सांगलीकर स ईद अहमद ,सुभाष कोळेकर  ,जे.के.पाटील, जे.डी.जाधव ,श्रीम.रोहिणी निर्मळे अर्जुन सांवत नेमाडे सर व प्रसिद्धी प्रमुख सुधाकर निर्मळे यांनी आवाहन केले आहे

शैक्षणिक धोरण व पायाभूत शिक्षणाची भूमिका.-- डॉ अजितकुमार पाटील कोल्हापूर.

----------------------------एकविसाव्या शतकामध्ये दळणवळण आणि माहिती तंत्रज्ञानाची अभूतपूर्व स्वागत होत आहे. त्यामुळे शिक्षणावर दोन प्रमुख जबाबदाऱ्या येऊन पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिक्षणाने सक्षमपणे व मोठ्या प्रमाणावर नव्याने निर्माण होणाऱ्या ज्ञानाचे व स्वीकारलेल्या ज्ञानाचे व संस्काराचे संक्रमण केलेच पाहिजे .कारण भविष्यातील कौशल्यांचा तो पाया ठरत असतो. भविष्याच्या दृष्टिकोनातून पाहता पारंपारिक शिक्षणाचे प्रतिसाद हे संख्यात्मक आणि ज्ञानावर आधारित असतात हे उपयुक्त ठरू शकत नाहीत . कारण प्रत्येक लहान मुलाला त्याच्या जीवनात अगदी लहान वयात सर्व प्रकारचे ज्ञान व ज्ञानाचे भांडारे उपलब्ध  करून देणे इतकेच पुरेसे नाही तर त्यास आचरण करणे शिक्षणाची संधी घेण्यासाठी आपण सज्ज राहिले पाहिजे त्याने त्याच्या स्वतःच्या ज्ञानाचे कौशल्याचे व सतत बदलणाऱ्या अनेक घटकांचा संबंध आपल्या सभोवताली असलेल्या व इतर जगाशी संबंध जुळवून घेत त्या गोष्टी त्याला शिकल्या पाहिजे आहेत.शैक्षणिक धोरण मध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होण्यासाठी शिक्षणाच्या चार स्तंभांचा अभ्यास करणे महत्त्वाचे आहे.शिक्षण तज्ञ डॉलर्स कमिशन यांनी शिक्षणाचे चार स्तंभ मानलेले आहेत त्यामध्ये पहिला आहे.
 १)माहितीसाठी अध्ययन 
2)कृतीसाठी अध्ययन 3 )एकीच्या भावनेने जगण्यासाठी अध्ययन 4 )मानव बनण्यासाठी अध्ययन.
हा स्तर मानत असताना प्रत्येक व्यक्तीच्या सर्वांगीण विकासामध्ये त्याच्या मनाचा शरीराचा ,बुद्धिमत्तेचा ,संवेदनशीलतेचा ,सौंदर्यदृष्टीचा तसेच व्यक्तिगत जबाबदारीचा आणि अध्यात्मिक मूल्यांचा विकास समाविष्ट केला आहे.एकूणच एकविसाव्या शतकातील आदर्श नागरिक बनवणे याला फार महत्व दिले आहे. तसेच मानवता नष्ट होणार नाही याचीही काळजी घेतली आहे. सध्या समाजाकडे डोळे उघडून पाहिले तर संवेदनशीलता सौंदर्यदृष्टी यांचे अस्तित्वच माणसामधून निघून जात आहे अशी भावना दिसत आहे. म्हणून शिक्षणाने ज्याप्रमाणे प्रत्येक व्यक्तीचा विचार त्याचे मत,भावना आणि कल्पना यांच्या स्वातंत्र्याचा वापर करणे हे शिकवणे जसे गरजेचे आहे तसेच त्याने आपली बुद्धिमत्ता सामाजिक आणि आर्थिक विकास साधण्याकडे लक्ष दिले पाहिजेत त्यासाठी बालकाचा पायाभूत स्तर हा अत्यंत शैक्षणिक धोरणामध्ये व पूर्वीपासून मानला गेला आहे त्याच्या जीवनातील पहिली आठ वर्षे मेंदूच्या विकासासाठी करतील साठी विचार करण्यात आला आहे 80 ते 85 % पेक्षा जास्त विकास वयाच्या सहाव्या वर्षापर्यंत होतो वयाची तीन वर्षे पूर्ण केल्यानंतर लहानपणके आपल्या आयुष्यातील महत्त्वपूर्ण कार हा बालवाडी किंवा अंगणवाडी म्हणजेच पूर्व प्राथमिक शाळा यामध्ये घालवतो वयाच्या तिसऱ्या वर्षा पर्यंत त्याच्या सभोवतालची घरातील वातावरण हे प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन व शिक्षण यांचा पाया तयार करते तसेच पोषक आहार आरोग्याच्या चांगल्या सवयी सुरक्षा आणि संरक्षण इत्यादी त्याची संस्कार पूर्ण पायाभरणी होत राहते खेळ हालचाल संगीत ध्वनी दृष्टी स्पर्श प्रेरणा म्हणजेच बौद्धिक विकास बोधात्मक विकास सामाजिक भावनिक संख्यात्मक व संख्याज्ञान यांचा सर्वांगीण विकास त्यात अभिप्रेत केला आहे. पायाभूत स्तरावर बालके हे शिकत असताना क्रियाशील असतात.
नवीन शिक्षण व ज्ञान घेण्यास उत्कृष्ट असतात उत्सुक असतात बालकांकडे सभोवताची जग जाणून घेण्याची उपयुक्तता असते कुवत असते, उत्सुकता असते त्याच्या अंतरिक मनातून तो प्रश्न विचारतो नाविन्याचा शोध घेतो त्यामधून त्याचे शिकणे सुरूच राहते बालके ही करती आणि खेळातूनच आनंद घेत असतात पायाभूत स्तरावर पायाभूत स्तरावरील बालकांचे अध्ययन त्याचे असंभव होत आले असणारे व्यक्ती मित्राच्या संबंधित निगडित असते म्हणून तो हितसंबंध जो पणे आवश्यक गरजेचे आहे असे वाटते त्यामुळे बालके स्वतःला सुरक्षित समजतात तसेच ते जिज्ञासु, आशावादी व सुसंवादी विचार प्रक्रियेमध्ये राहतात. बालकांना खेळ आवडतो त्या खेळाच्या माध्यमातून तो सामाजिक संवाद साधण्यास व अध्ययन सक्षम होण्यास त्याला संधी मिळते खेळाच्या माध्यमातून खेळत असताना त्याची ध्येय खेळाचे आश्चर्य तो केंद्रित करत असतो खेळातील आनंद हा बालकांना स्वतःमध्ये आनंदी राहण्यासाठी व खेळण्यासाठी अतुर असतात बारके जे करतात ते आवडीने करतात त्यामधून अर्थपूर्ण सामाजिक आंतरक्रिया घडून येण्यास मदत होते त्यास अनेक संधी मिळत राहतात बालके ही स्वतःमध्येच आनंदी राहत असतात आणि खेळत असतात ते खेळताना कोणतीही क्रिया करताना आवडीने करतात त्यामुळे त्याची सामाजिक आंतरक्रिया घडवून येत राहते या कृती मधून त्याला जगाची जाणीव होऊन तो स्वतःबद्दल शिकतो भाषा गणित या सर्व गोष्टी शिकत असताना अध्ययन आणि विकास यांचा केंद्रबिंदू खेळ आहे.
अध्ययन कल्पनाशक्ती, सर्जनशीलता, नवनिर्मिती व समस्या निराकरण यांना नैसर्गिक व वास्तववादी साहित्यांच्या वापराने विकसित होण्याची संधी दिल्यामुळे त्यांचे खेळणे आणि खेळकरपणा अधिक समृद्ध होतो.
पायाभूत स्तरावरील बालकांचे अध्ययन त्यांच्या सभोवताली असणाऱ्या व्यक्ती सोबतच्या हितसंबंधांशी निगडित असते, म्हणून असे हितसंबंध जोपासणे आवश्यक असते. यामुळे बालके स्वतःला सुरक्षित समजतात, तसेच ते आशावादी, जिज्ञासू व सुसंवादी होतात.
*विद्यार्थी जीवनात खेळाचे महत्त्व*
बालकांना निसर्गतः खेळायला आणि त्यात सक्रिय राहायला आवडते. खेळणे आणि शिकणे ही द्विमार्गी परस्परावलंबी प्रक्रिया आहे. खेळामुळे बालकांना इतर प्रौढांशी आणि बालकांशी सामाजिक संवाद साधण्यास व अध्ययन सक्षम होण्यास संधी मिळते.
जेव्हा आपण खेळात गुंतलेली बालके पाहतो, तेव्हा आपल्या लक्षात येते, की :
अ) खेळात पर्यायांची निवड करण्यास वाव आहे बालके जेव्हा खेळत असतात, तेव्हा ती त्यांचे ध्येय निवडतात व त्याची निश्चिती करतात. (उदा., मला कोडे पूर्ण करायचे आहे, ब्लॉकचा टॉवर बनवायचा आहे किंवा बाहुलीघरात चहा बनवायचा आहे). या प्रकारे निवड त्यांना सक्रिय आणि व्यस्त ठेवते.
ब) खेळात आश्चर्य आहे खेळ हे बालकांना विचार करण्यास आणि लक्ष केंद्रित करण्यास सक्षम करतात. (उदा. फुगा इतका मोठा होत आहे, पतंग आकाशात किती दूर गेला आहे, रुमाल कुठे गायब झाला आहे ही जादू आहे का?).
क) मुले आनंदाने खेळ खेळत असतात. बालके ही स्वतःमध्येच आनंदी रहात असतात आणि खेळण्यासाठी आतुर असतात. बालके जे जे करतात, ते आवडीने करतात. त्यातून अर्थपूर्ण सामाजिक आंतरक्रिया घडून येतात व शिकत राहण्याची इच्छा वृद्धिंगत होते. या कृतींमधून, बालके जगाची जाणीव करून घेणे, समस्या सोडवणे, स्वतःबद्दल शिकणे, इतरांबद्दल शिकणे आणि भाषा व गणित या सर्व गोष्टी शिकत असतात. अशा प्रकारे बालकांचे अध्ययन आणि विकास यांचा केंद्रबिंदू खेळ हा आहे. विकासाची सर्व क्षेत्रे व अभ्यासक्रमाची सर्व उद्दिष्टे पूर्ण करण्यासाठी खेळ हे बालकांना अनेक संधी उपलब्ध करून देतात. निवड, आश्चर्य आणि आनंद हे बालकांच्या खेळाचे प्रमुख पैलू आहेत. निवड, आश्चर्य आणि आनंद या तीन पैलूंच्या आधारे बालकांची वर्गांतर क्रिया अधिक उत्तम होणे सुलभ होईल.
बालके खेळताना सक्रिय असतात: सभोवतालच्या जगाशी आंतरक्रिया करून त्याची अनुभूती घेत असताना, माहितीची मांडणी करतात, नियोजन करतात, कल्पना करतात, बदल सुचवितात, परस्परांबद्दल मते मांडतात, विस्तार करतात, शोध घेतात आणि नवनिर्मिती करतात.
खेळताना बालके एक योजना बनवितात आणि त्याचे अनुसरण करतात मला माझे घर आणि कुटुंबाचे चित्र काढायचे आहे ते कसे दिसेल आणि मी चित्रात कोणाचा समावेश करावा?
 प्रयत्नप्रमाद, कल्पनाशक्ती आणि समस्या निराकरणाची कौशल्ये वापरून शिकतात माझा मनोरा सतत पडतोः कदाचित मला तळात आणखी ठोकळे ठेवण्याची गरज आहे का?
प्रमाण, विज्ञान आणि हालचाल या संकल्पनांचे वास्तविक जीवनात उपयोजन करतात वाळूत बोगदा करण्यासाठी मला वाळूत किती प्रमाणात पाणी घालावे लागेल. तयार केलेल्या बोगद्यातून पाय किती हळूवार काढून घ्यावा लागेल,
तर्कसंगत, विश्लेषणात्मक पद्धतीने कारणमीमांसा करतात चित्रकोडी सोडवताना, प्रथम चौकटीवरील तुकड्यांपासून सुरुवात करणे चांगले असू शकते.
मित्रांशी संवाद साधतात, त्यांच्याशी आंतरक्रिया करतात आणि नव्या दृष्टिकोनातून मतभेदांवर चर्चा करतात यावेळी मला डॉक्टरची भूमिका करायची आहे, कदाचित पुढच्या वेळी तुम्ही ही भूमिका करू शकता? 
मुलांना कामातून किंवा कार्यपूर्ततेतून समाधान मिळवतात मी माझ्या मित्रासोबत हा वाळूचा किल्ला पूर्ण केला
सर्जनशील होतात जेव्हा मी लाल आणि निळा रंग मिसळतो, तेव्हा जांभळा रंग तयार होतो, जेव्हा मी हिरवा आणि निळा रंग मिसळून तेव्हा काय होईल ?
 खेळा‌द्वारे अध्ययन
राज्य अभ्यासक्रम आराखडा, हा अभ्यासक्रम रचनेच्या पद्धती, अध्यापनशास्त्र, वेळ, आशय संघटन आणि बालकाच्या एकूण अनुभवांसाठी संकल्पनात्मक, क्रियात्मक आणि व्यवहारात्मक दृष्टिकोनांच्या केंद्रस्थानी खेळण्याचे महत्त्व यावर भर दिला गेला आहे.
प्रारंभिक बाल्यावस्था संगोपन में शिक्षणाच्या संदर्भात 'खेळणे' या शब्दामध्ये बालकासाठी मनोरंजक आणि गुंतवून ठेवणाऱ्या सर्व कृतांचा समावेश होतो, यामध्ये शारीरिक खेळ, परस्परसंवाद, संभाषण, प्रश्नोत्तर सत्रे, कथा सांगणे, मोठ्याने वाचन करणे आणि सामायिक वाचन, बडबडगीते किंवा खेळ, खेळणी, दृश्यकला आणि संगीत यांचा अभिनयाचा समावेश असलेल्या इतर आनंददायक वातावरणात कृती असू शकतात
खेळ बालकांना क्रियाशील ठेवून, शिकण्याच्या संधी प्रदान करून, त्यांना चालना देतात आणि ते वेगवेगळ्या पद्धतीने आयोजित केले जाऊ शकतात.
अ) मुक्त शिक्षण 
१) बालकांना कोणता खेळ व  काय खेळायचे आहे, त्यांना ते कसे खेळायचे आहे आणि किती वेळचे सर्वांचे संस्थात्मिकीकरण व्हावे आया बरोबर सामाजिक क्षमता, संवेदनशीलता, चागले वर्तन, सौजन्य, नैतिकता, वैयक्तिक आणि सार्वजनिक स्वच्छता, गटकार्य आणि सहकार्य वृत्ती विकसित करण्यावर भर दयावा. (NEP २०२०, परिच्छेद १.२)
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार स्तर वय वर्षे ३ ते ८ असा असेल. या पाच वर्षांच्या शालेय शिक्षणात, पूर्व शालेय शिक्षणातून इयत्ता दुसरीपर्यंतचे शिक्षणसमाविष्ट आहे, म्हणून वयाची ६ वर्षे पूर्ण असलेली बालके पहिलीत असावीत.
*मार्गदर्शक तत्वे*
  राष्ट्रीय शैक्षणिक धोरण-२०२० नुसार, पायाभूत स्तरासाठी मार्गदर्शक तत्त्वे
१) जन्माची परिस्थिती किंवा पार्श्वभूमी काहीही असली, तरी प्रत्येक बालक शिकण्यास सक्षम असते.
२) प्रत्येक बालक वेगळे आणि स्वतःच्या गतीने वाढते, शिकते आणि विकसित होते.
३) बालके उत्तम निरीक्षण कौशल्य असणारी नैसर्गिक संशोधक असतात. ती स्वतः शिकण्याच्या
अनुभवांची निर्माती असतात आणि विविध प्रकारे आपल्या भावना आणि कल्पना व्यक्त करतात.आजची बालके ही उद्याच्या भारतातील समाजाचा घटक आहेत; ती निरीक्षण, अनुकरण आणि सहकार्य यांद्वारे शिकतात. बालके प्रत्यक्ष अनुभवांतून, त्यांच्या ज्ञानेंद्रियांचा वापर करून आणि पर्यावरणाबरोबर आंतरक्रिया करून शिकतात.
1) बालकांचे अनुभव आणि अध्ययनाच्या पद्धती स्वीकारल्या पाहिजेत. जेव्हा बालकांचा आदर केला जातो, त्यांना महत्त्व दिले जाते, शिक्षण प्रक्रियेत त्यांचा पूर्ण सहभाग घेतला जातो, तेव्हा ती उत्तम प्रकारे शिकतात.
६) खेळ आणि कृती हे बालकांच्या शिकण्याचे आणि विकासाचे प्रमुख मार्ग आहेत. बालकांना वातावरणाचा अनुभव घेण्याची, शोध घेण्याची आणि प्रयोग करण्याची संधी मिळावी.
७) विकासात्मक आणि सांस्कृतिकदृष्ट्या योग्य असलेली सामग्री, तसेच बालकांना संकल्पनांचे आकलन व समस्या निराकरण क्षमता विकसनासाठी कृती आणि वातावरण यांमध्ये बालकांचा सहभाग घेतला पाहिजे.
८) शिक्षकांनी बालकांच्या अनुभवांतून आशय तयार केला पाहिजे. आशयाची नावीन्यता किंवा त्यातील आव्हाने, बालकांच्या परिचित अनुभवांवर आधारित असावीत.
९) बालकांच्या विकासाच्या गरजांनुरूप आशय असावा. कला, संगीत, कल्पना रंजक खेळ, गोष्टी सांगणे यांसाठी त्यांना अनेक संधी दिल्या जाव्यात.
१०) आशयामध्ये लिंग, जात, वर्ग आणि दिव्यांगत्व यांसारख्या मुद्द्यांसाठी समानतेवर भर दिला पाहिजे.
११) शिक्षकांनी बालकांचे सुलभक म्हणून काम करावे. मुक्त प्रश्न विचारून, शोध घेण्याच्या प्रवृत्तीला चालना देऊन, बालकांना साहाय्य करावे.
१२) कुटुंब व समाज हे दोन्ही या प्रक्रियेतील भागीदार असून, त्यांना विविध मार्गांनी सहभागी करून घ्यावे.
१३) बालशिक्षण केंद्रांत बालकांची काळजी घेतली जाते. परिचित प्रौढांकडे बालके सहजपणे काळजीवाहक म्हणूनच पाहतात. शिक्षक हा बालकांच्या गरजा आणि भावनिकतेप्रती संवेदनशील आणि जबाबदार असावा. वर्गातील कृतींमध्ये शिकण्याच्या भावनात्मक पैलूंवर भर असावा. (उदा., अभिनय कलेचा उपयोग करून गोष्ट सांगणे,)
इत्यादी अध्ययन व अध्यापन प्रक्रियेतून विद्यार्थ्यांच्या अंगी असणारे सुप्त गुणांना वाव देण्यासाठी शिक्षकांची भूमिका फक्त योग्य मार्गदर्शक मित्र व सुलभकतेचे दिशादर्शक कार्य करायचे आहे. 
एकूणच शैक्षणिक गुणवत्ता तपासताना विद्यार्थ्यांना कौशल्यधिष्ठित अभ्यासक्रम देऊन एकविसाव्या शतकात सामर्थ्यवान बनण्यासाठी सक्षम करायचे आहे.
हे कार्य काही एका दिवसात एका महिन्यात होणार नाही त्यासाठी शिक्षक पालक व मित्र यांनी त्यासाठी वेळ देणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांची स्वप्ने ,इच्छा ,ध्येय व धोरणे मोठी आहेत का ते तपासून पाहणे गरजेचे आहे. सध्या कौशल्याधिष्ठित म्हणजेच त्या विद्यार्थ्याला कोणते क्षेत्र आवडते कोणत्या क्षेत्रामध्ये त्याचा जास्तीत जास्त कल आहे ते पाहून त्यास मार्गदर्शन करण्याचे कार्य आहे त्यामुळे तो आपल्या जीवनामध्ये यशस्वी होण्यास त्याला दिशा मिळणार आहे. त्याचे त्याला चांगले सवय लावून स्वतःवर लक्ष केंद्रित त्यांनी केले पाहिजेत. सकाळी लवकर उठणे,सखोल वाचन करणे, स्वतःच्या आरोग्यासाठी वेळ देणे ,ध्यानधारणा करणे अशा  छोट्या मोठ्या गोष्टी त्यांनी सवयी आपल्या अंगी लावणे गरजेचे आहे, त्यासाठी त्याने जिद्द चिकाटी व सातत्य हे राखले पाहिजेत तरच त्याला आपल्या स्वप्नांची नवी पहाट दिसणार आहे. याची सुरुवात बालवाडी म्हणजेच पूर्व प्राथमिक स्तरापासून सुरुवात करणे महत्वाचे आहे. मूलभूत शिक्षण त्यास आत्मसात झाले तरच तो भविष्यकालीन शिक्षण घेण्यास सक्षम राहणार आहे.
   जय हिंद...
( लेखक मराठी साहित्यातील -  पीएच,डी. धारक आहेत )

Sunday, 22 December 2024

यशस्वी धरणे आंदोलन नागपूर


कोल्हापूर / प्रतिनिधी
गुरुवार दिनांक 19 डिसेंबर 2024 रोजी महाराष्ट्र राज्य अंशतः टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी संघटनेच्या वतीने नागपूर येथे यशवंत स्टेडियम मध्ये एक दिवसीय धरणे आंदोलन यशस्वीरित्या पार पडले यामध्ये  आमदार सुधाकर अडबाले,आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, आमदार अभ्यंकर  आमदार दराडे ,  संगीताताई शिंदे वितेश खांडेकर तसेच अनेक विधिमंडळ सदस्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन आमच्या मागण्यांना पाठिंबा दिला.  
  महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक बांधव आंदोलन स्थळी उपस्थित होते.भविष्यातील वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनाला आपण बळकटी प्राप्त करून देण्यासाठी असाच उत्स्फूर्त लढा दिला तर यश आपल्याला लवकरात लवकर मिळेल असा विश्वास व्यक्त केला.  संघटनेच्या कार्यकारिणीवर विश्वास ठेवून हाकेला प्रतिसाद देऊन शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी हजारोच्या संख्येने पोहोचले होते. आंदोलन खूपच यशस्वी ठरले. आपण यशाच्या एक नाही तर हजार पावले यशस्वीतेच्या दिशेने पुढे गेलो आहोत. आपले  निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वतीने नामदार  अतुलजी सावे यांनी स्वीकारून सविस्तर चर्चा केली. तसेच नामदार अजितदादा पवार यांच्या स्वीय सहायकांनी एक तासभर चर्चा केली आणि दादांच्या भेटीबद्दल सकारात्मक चर्चा झाली. अशी माहिती  प्रा. विजय शिरोळकर अध्यक्ष महाराष्ट्र राज्य 2005 पूर्वी अंशतः /टप्पा अनुदान प्राप्त शिक्षक शिक्षकेतर संघटना यांनी प्रसिध्दीस दिली.

           फोटो 

नामदार  अतुलजी सावे यांनी निवेदन स्वीकारून त्यांच्याशी व नामदार अजितदादा पवार यांचे स्वीय सहायक यांच्याशी सकारात्मक चर्चा करतांना प्रा. विजय शिरोळकर व शिष्टमंडळ.

Friday, 20 December 2024

सहअध्ययन प्रक्रिया : एक प्रभावी तंत्र-- डॉ अजितकुमार पाटील. ( कोल्हापूर )(Co-Operative Learning)


शिक्षण प्रक्रियेत अध्ययन परिणामकारक होण्यास अनेक पूरक गोष्टींचा अंतर्भाव केला जातो. अध्ययन उपपत्ती, शैक्षणिक तंत्रविज्ञान, विद्यार्थी क्षमता, बाह्य परिस्थिती अशा शिक्षणातील काही आधुनिक प्रवाह
विविध दृष्टिकोणांतून संशोधन करून या क्षेत्रातील अध्यापन व अध्ययन या दोन चलांमधील परस्परसंबंधाचा अभ्यास केला गेला आहे. विद्यार्थ्यांचे अध्ययन केवळ शिक्षकांच्या अध्यापनामुळेच होते असे नाही तर विद्यार्थी-विद्यार्थी यांच्यातील परस्पर सहकार्यान अध्ययनास पूरक वातावरण निर्मिती होते. या संदर्भात गेल्या २० वर्षांपासून विविध तज्ज्ञांनी सहअध्ययनाबाबत आपले विचार मांडले आहेत. यात प्रामुख्याने डेव्हिड जॉनसन, रॉजर जॉनसन, रॉबर्ट स्लॅवीन, इलोमो शैरेन व यील रॉरेन यांचा उल्लेख करावा लागेल.
सहअध्ययन प्रक्रियेत वर्गातील अध्ययनार्थीची लहान-लहान गटात विभागणी करून, त्याच्यातील परस्पर आंतरक्रियेतून अध्ययनास चालना दिली जाते. या गटांना यशासाठी समान संधी दिली जाते. त्याचप्रमाणे गटा-गटामध्ये यशासाठी स्पर्धात्मक वातावरण निर्माण केले जाते. त्यासाठी निकषांवर आधारित श्रेयांक पद्धतीचा वापर केला जातो. ज्यामुळे गटातील अध्ययनार्थीमध्ये सहकार्याची व एकमेकांना उत्तेजन देण्याची भावना वाढीस लागते.
*सहअध्ययन संकल्पनेचा उदय*
अमेरिकेसारख्या देशातील शिक्षणप्रणालीत विद्यार्थ्यांचे अध्ययन परिणामकारक होण्यासाठी केल्या गेलेल्या प्रयत्नात तेथील संस्कृतीचा प्रभाव आढळून येतो. अमेरिका आणि अमेरिकेच्या शेजारील राष्ट्रे यांच्या सांस्कृतिक पार्श्वभूमीत भिन्नता आहे. ही भिन्नता वांशिक, सांस्कृतिक, सामाजिक आणि वैचारिक क्षेत्रावर आपला प्रभाव पाडीत असते. अशा भिन्न पार्श्वभूमी असलेले विद्यार्थी जेव्हा अध्ययनासाठी एकत्र येतात तेव्हा त्यांच्यात सहकार्याची भावना निर्माण होऊन त्यांचे अध्ययन परिणामकारक व्हावे यासाठी विविध प्रकारचे संशोधन केले जाते. या जाणिवेतून सहअध्ययन संकल्पनेचा उदय झाला.
एखाद्या विशिष्ट उद्देशाने एकत्र येऊन वेगवेगळ्या घटकांवर प्रभुत्व मिळविण्यासाठी छोट्या गटामध्ये एकत्र येऊन एकमेकांस मदत करून शिकणे ही सहअध्ययनाची सर्वसामान्य कल्पना आहे. यामध्ये विद्यार्थी शिकण्यासाठी प्रोत्साहित होतील, एकटे राहून शिकण्यापेक्षा समूहामध्ये जास्त शिकतील, त्यांच्यात सहकार्याची भावना वाढीला लागेल अशी व्याख्या असते.
सहअध्ययनाची अनेक तंत्रे आहेत. उदा. संघ अध्ययन तंत्र हे संघाला मिळणाऱ्या बक्षिसावर संघातील प्रत्येकाच्या वैयक्तिक सहभागावर व संघातील प्रत्येकाला मिळणाऱ्या यशाच्या समान संधीवर अवलंबून आहे. संघाचे बक्षीस हे संघातील परस्परांच्या स्पर्धेतून मिळणाऱ्या अंतिम यशावर अवलंबून नसते तर प्रत्येक संघाने पूर्व निर्धारित निकषानुसार कार्य कोणत्या स्तरापर्यंत केले यावर संघाचे यश निर्धारित केले जाते. म्हणजेच संघाला यश मिळण्यासाठी त्या संघातील प्रत्येकाने योग्य पातळीवर कारवाई करणे आवश्यक असते. ही योग्य पातळी जरी सरासरीवर ठरली जाते तरी एखाद्यानेच उत्तम कामगिरी करणे यात अपेक्षित नाही. संघाच्या किंवा गटाच्या यशासाठी पूर्वी केलेल्या कामगिरीत सुधारणा करण्याची परवानगी दिली जाते.
सहअध्ययन संकल्पनेचे उद्‌गाते रॉबर्ट स्लॅव्हीन यांच्या मते, सहअध्ययन शिक्षणपद्धतीत ज्यात सहअध्ययन नाही अशा शिक्षणपद्धतीपेक्षा चौसष्ट टक्के जास्त संपादन क्षमता दिसून येते. सहअध्ययन शिक्षण प्रकल्पाचे निकाल सातत्याने होकारात्मक राहिले आहेत. सहअध्ययन पद्धतीने गटात कार्य करणारे विद्यार्थी हे जरी भिन्न संस्कृतीचे, समाजाचे असले तरी ते आपल्या सहअध्ययनार्थीशी मित्रत्वाने वागतात हे सहअध्ययनाचे एक यश आहे. भारत हा देशही विविधतेने नटलेला, बहुभाषिक, बहुसांस्कृतिक देश आहे. अशा देशातही अनेक वेळा अशा भिन्न परिवेश असलेल्या गटाला एकत्रितरित्या अध्ययनाची संधी उपलब्ध करून द्यावी लागते. अशा वेळी या सहअध्ययनाच्या विशिष्ट तत्त्वांचा वापर करून गटातील प्रत्येकाचे अध्ययन व ध्येयपूर्तीचे उद्दिष्ट गाठता येऊ शकते.
*सहअध्ययनाच्या उपयुक्ततेसंदर्भातील केलेल्या संशोधनाचे निष्कर्ष*
स्लॅव्हीन यांनी केलेल्या संशोधनातून मिळालेल्या निष्कर्षानुसार सहअध्ययन हे अभ्यासविषयक दृष्टिकोणातून उच्च पातळीच्या प्रेरणा सहअध्ययन गटात संवर्धित करण्यास मदत करते. ज्यांना असे वाटते की विद्यार्थ्यांनी दररोज शाळेतच येऊन अध्ययनासाठी परिश्रम केले तरच त्यांचे अध्ययन होऊ शकते. त्यापेक्षा सहअध्ययन करणारे विद्यार्थी हे जास्त प्रभावी ठरू शकतात हे संशोधनाने सिद्ध झाले आहे.
सहअध्ययनामुळे सकारात्मक प्रेरणा मिळते. अध्ययनास प्रेरित करणाऱ्या भावना जागृत होतात. गटातील विद्यार्थ्यांच्या स्वाभाविक तसेच गुणवैशिष्ट्यांना प्रवृत्त केले जाते. सहअध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा ओढा हा यश हे नशिबाने मिळते याकडे नसून यश हे मेहनत, स्वतःच्या क्षमता आणि सहकार्य यातून मिळते याकडे आहे
सहअध्ययनासंदर्भात केलेल्या संशोधनातून असेही दिसून आले. आहे की सहअध्ययन गटात विविध वर्ग, क्षमता, संस्कृतीचे अध्ययनार्थी असले तरी त्यांच्या मते, सामाजिक सलोख्याची परस्पर सहकार्याची भावना निर्माण होते. मानसिक दुर्बलता असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या बाबतही सकारात्मक प्रभाव दिसून येतो. परस्पर मैत्री ही भावना वाढीस लागते. गटात नव्याने प्रवेश केलेल्या विद्यार्थ्यांबाबतदेखील सहकार्याची भावना इतर स्पर्धात्मक अध्ययनार्थीपेक्षा सहअध्ययन गटात प्रभावीपणे आढळते. त्यामुळे सहअध्ययन ही प्रक्रिया सामाजिक संबंध सुधारणा प्रक्रियेस पोषक ठरते.
संशोधनातून असेही सिद्ध झाले आहे की सहअध्ययनात मिळणाऱ्या होकारात्मक प्रबलनामुळे विद्यार्थी कठोर परिश्रम करतात, नियमित उपस्थित राहतात, दुसऱ्याकडून मदत मागतात. त्यांच्या समूहाचे यश हे त्यांचे सामुदायिक बक्षीस असते.
लेव्ह व्हिगोत्सीच्या मते, दुसऱ्याबरोबर काम केल्यामुळे त्यांची बोधात्मक वाढ होते. कारण प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या प्रकारे विचार करीत असतो. त्यांचे विचार जेव्हा ते मोकळेपणाने गटात मांडतात त्या वेळी आपल्यापेक्षा भिन्न असलेल्या संकल्पना त्यांना ऐकण्यास मिळतात.
जीन पियाजेच्या मते गटातील जोडीदाराच्या सहकार्यामुळे न्यूनगंड कमी होतो. स्वतःच्या कमतरतेमध्ये सुधारणा करण्यास, त्यांचा विकास करण्यास मदत होते.
सहअध्ययनार्थी गटाचे स्वरूप व वैशिष्ट्ये
१.वैविध्यपूर्ण एकता : सहअध्ययनार्थी गट हा लहान किंवा परिस्थितीनुसार
एकजिनसी असावा. या गटात सात ते आठ विद्यार्थ्यांचा समावेश असावा. गटामध्ये मुले व मुली या दोघांचा समावेश असावा. गटात विविध क्षमता असणारे विद्यार्थी किंवा शक्य असल्यास विविध वर्णांचे, वंशांचे, भिन्न सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असणारे विद्यार्थी गटात असले तरी गटाचे कार्य प्रभावी होऊ शकते.
२.कार्यविभागणी : जेव्हा एखादा गट एकत्र येऊन कोणतीही समस्या सोडवितो,
एखादा प्रकल्प पूर्ण करतो किंवा एखाद्या घटकाचे अध्ययन करतो त्या वेळी त्या कार्याच्या पूर्णत्वाबद्दल त्यांना मिळणारे यश, त्या यशाचे प्रमाणपत्र किंवा त्यांना मिळणारा शेरा हे त्या गटकार्याचे ध्येय असते. पण केवळ हे ध्येय साध्य करणे हे सहअध्ययन गटाचे वैशिष्ट्य ठरत नाही. तर त्या यशप्राप्तीसाठी गटातील प्रत्येक जण स्वतःला वाहून घेतात. कार्याची विभागणी करून आपापले कार्य पूर्ण करतात. हे वैशिष्ट्य सहअध्ययन करणाऱ्या गटामध्ये आढळते.
३.परस्पर सहकार्य सहअध्ययनार्थी गटातील विद्यार्थी जेव्हा एखाद्या विशिष्ट ध्येयप्राप्तीसाठी आपापली कार्ये विभागून ती पूर्ण करीत असतात. त्या वेळी ते केवळ आपले कार्य पूर्ण करावयाचे आहे, ते पूर्ण केले म्हणजे आपली जबाबदारी संपली असा विचार करीत नाहीत तर माझ्याकडे असलेले कार्य पूर्ण करीत असताना ते कार्य माझ्या गटातील इतरांस कसे पूरक ठरणार आहे याचाही विचार करतात. त्यामुळे त्याच्या कार्यात सकारात्मक परस्परावलंबत्व असते. समजा, एखाद्या विद्यार्थ्याला त्याचे कार्य पूर्ण करण्यास काही अडचणी, संकटे येत असतील तर त्याला मदत करणे आवश्यक मानतात, कारण त्याच्या अकार्यक्षमतेचा किंवा अपयशाचा परिणाम हा आपल्या कार्यावर तसेच गटाच्या ध्येयप्राप्तीवर किंवा यशावर होतो याची जाणीव या गटातील प्रत्येक अध्ययनार्थीला असते.
४.वैयक्तिक जबाबदारी सहअध्ययन गटात गटभावनेचे एकसंध कार्याचे जेवढे महत्त्वाचे स्थान आहे तेवढेच महत्त्वाचे स्थान हे वैयक्तिक क्षमता प्रदर्शनास आहे. गटकार्यातील सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने वैयक्तिक यश कोणत्या पातळीपर्यंत प्राप्त केले आहे, याचाही विचार केला जातो. बरेच वेळा जेव्हा एखादी कृती सांघिकतेने केली जाते तेव्हा असे दिसून येते की गटातील काही विद्यार्थी खूप उत्साहाने कार्य करतात, प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींचे अध्ययन करतात. प्रयत्न करतात व गटाला यश मिळवून देतात. त्या गटाच्या यशात त्यांच्या अध्ययनाचे, प्रयत्नांचेच महत्त्वाचे स्थान असते. परंतु याच गटातील काही विद्यार्थी मात्र निष्क्रिय असतात. ते आपल्या अध्ययनासाठी प्रयत्न करीत नाहीत. कोणतीही वैयक्तिक जबाबदारी स्वीकारीत नाहीत. परंतु तरीही ते केवळ त्या गटाचे घटक आहेत म्हणून त्या गटाच्या यशप्राप्तीचे ते वाटेकरी ठरतात. गटाचे ध्येय साध्य झाले म्हणजे ते ध्येय साध्य करण्यात त्यांचाही सहभाग गृहीत धरला जातो. परंतु सहअध्ययन गटात केवळ गटाच्या अध्ययनात यशाचा एकत्रित विचार केला नाही तर गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक यशाचा, कार्याचा, सहभागाचा विचार केला जातो.
●*सहअध्ययनार्थी गटाचे स्वरूप व वैशिष्ट्ये*●
१.वैविध्यपूर्ण एकता : सहअध्ययनार्थी गट हा लहान किंवा परिस्थितीनुसार एकजिनसी असावा. या गटात सात ते आठ विद्यार्थ्यांचा समावेश असावा. गटामध्ये मुले व मुली या दोघांचा समावेश असावा. गटात विविध क्षमता असणारे विद्यार्थी किंवा शक्य असल्यास विविध वर्णांचे, वंशांचे, भिन्न सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असणारे विद्यार्थी गटात असले तरी गटाचे कार्य प्रभावी होऊ शकते.
२.कार्यविभागणी : जेव्हा एखादा गट एकत्र येऊन कोणतीही समस्या सोडवितो,
एखादा प्रकल्प पूर्ण करतो किंवा एखाद्या घटकाचे अध्ययन करतो त्या वेळी त्या कार्याच्या पूर्णत्वाबद्दल त्यांना मिळणारे यश, त्या यशाचे प्रमाणपत्र किंवा त्यांना मिळणारा शेरा हे त्या गटकार्याचे ध्येय असते. पण केवळ हे ध्येय साध्य करणे हे सहअध्ययन गटाचे वैशिष्ट्य ठरत नाही. तर त्या यशप्राप्तीसाठी गटातील प्रत्येक जण स्वतःला वाहून घेतात. कार्याची विभागणी करून आपापले कार्य पूर्ण करतात. हे वैशिष्ट्य सहअध्ययन करणाऱ्या गटामध्ये आढळते.
३.परस्पर सहकार्य सहअध्ययनार्थी गटातील विद्यार्थी जेव्हा एखाद्या विशिष्ट ध्येयप्राप्तीसाठी आपापली कार्ये विभागून ती पूर्ण करीत असतात. त्या वेळी ते केवळ आपले कार्य पूर्ण करावयाचे आहे, ते पूर्ण केले म्हणजे आपली जबाबदारी संपली असा विचार करीत नाहीत तर माझ्याकडे असलेले कार्य पूर्ण करीत असताना ते कार्य माझ्या गटातील इतरांस कसे पूरक ठरणार आहे याचाही विचार करतात. त्यामुळे त्याच्या कार्यात सकारात्मक परस्परावलंबत्व असते. समजा, एखाद्या विद्यार्थ्याला त्याचे कार्य पूर्ण करण्यास काही अडचणी, संकटे येत असतील तर त्याला मदत करणे आवश्यक मानतात, कारण त्याच्या अकार्यक्षमतेचा किंवा अपयशाचा परिणाम हा आपल्या कार्यावर तसेच गटाच्या ध्येयप्राप्तीवर किंवा यशावर होतो याची जाणीव या गटातील प्रत्येक अध्ययनार्थीला असते.
४.वैयक्तिक जबाबदारी सहअध्ययन गटात गटभावनेचे एकसंध कार्याचे जेवढे महत्त्वाचे स्थान आहे तेवढेच महत्त्वाचे स्थान हे वैयक्तिक क्षमता प्रदर्शनास आहे. गटकार्यातील सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने वैयक्तिक यश कोणत्या पातळीपर्यंत प्राप्त केले आहे, याचाही विचार केला जातो. बरेच वेळा जेव्हा एखादी कृती सांघिकतेने केली जाते तेव्हा असे दिसून येते की गटातील काही विद्यार्थी खूप उत्साहाने कार्य करतात, प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींचे अध्ययन करतात. प्रयत्न करतात व गटाला यश मिळवून देतात. त्या गटाच्या यशात त्यांच्या अध्ययनाचे, प्रयत्नांचेच महत्त्वाचे स्थान असते. परंतु याच गटातील काही विद्यार्थी मात्र निष्क्रिय असतात. ते आपल्या अध्ययनासाठी प्रयत्न करीत नाहीत. कोणतीही वैयक्तिक जबाबदारी स्वीकारीत नाहीत. परंतु तरीही ते केवळ त्या गटाचे घटक आहेत म्हणून त्या गटाच्या यशप्राप्तीचे ते वाटेकरी ठरतात. गटाचे ध्येय साध्य झाले म्हणजे ते ध्येय साध्य करण्यात त्यांचाही सहभाग गृहीत धरला जातो. परंतु सहअध्ययन गटात केवळ गटाच्या अध्ययनात यशाचा एकत्रित विचार केला नाही तर गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक यशाचा, कार्याचा, सहभागाचा विचार केला जातो.
५.संप्रेषण कौशल्य क्षमता : सहअध्ययन गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये  परस्परांशी
सहकार्यासाठी संप्रेषण कौशल्य क्षमता असावी लागते. आपल्या सहकाऱ्यांच्या कार्याला जर मदत करावयाची असेल तर त्याच्याशी सुसंवाद कसा करावा, त्याचे म्हणणे, त्याच्या अडचणी कशा पद्धतीने समजावून घ्याव्यात यासाठी संप्रेषण कौशल्य उपयुक्त ठरते. त्याचबरोबर आपल्या अडचणी दुसऱ्याला सांगतानाही हे कौशल्य उपयुक्त ठरते. एकदा आपल्या सहकाऱ्याच्या अडचणी समजावून घेतल्या किंवा त्याला आपल्या अडचणी समजावून सांगितल्या की त्यानंतर त्या अडचणी दूर करण्यासाठी जे सहकार्य करावे लागते, ते सांगण्यासाठी किंवा दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेऊन आपल्या समस्या दूर करण्यासाठीही संप्रेषण - कौशल्याची आवश्यकता असते. संप्रेषण कौशल्याच्या अभावी गटामध्ये सहअध्ययन प्रक्रिया घडत नाही. नेतृत्व, निर्णयक्षमता, विश्वासार्हता, स्पष्ट संभाषण कौशल्य या कौशल्यामुळे संप्रेषण घडते.
६.व्यवस्थापन कौशल्य क्षमता: सहअध्ययन करीत असताना गटात अनेक वेळा
संघर्षाचे प्रसंग उभे राहतात. निर्णय कोणी घ्यायचे ? कार्य विभागणी कशी करायची, आपत्तीच्या वेळी मार्ग कसे काढायचे, दोन विभिन्न मते असल्यास नेमके कोणाचे मत ग्राह्य धरायचे या सर्वांचे व्यवस्थापन करण्याची गरज असते. त्यामुळे सहअध्ययन गटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापन कौशल्य असण्याची गरज असते. जेव्हा सर्व गटांच्या कार्याचे समापन करण्याचे कार्य असते, किंवा गटकार्याच्या ध्येयपूर्तीसाठी एखाद्या नवीन माहितीचा शोध घेण्याची प्रक्रिया असते त्या वेळी व्यवस्थापन कौशल्याची आवश्यकता भासते.
*सहअध्ययनातील संप्रेषण प्रक्रिया*
सहअध्ययनात संप्रेषणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण सहअध्ययनात समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक घटकाचे दुसऱ्या घटकाशी योग्य संप्रेषण झाल्याशिवाय गटाचे ध्येय, अर्थातच सहअध्ययन होणे शक्य नाही. हे संप्रेषण पुढीलप्रमाणे विविध घटकांत अपेक्षित असते.
१.सहअध्ययनार्थीमधील संप्रेषण : सहअध्ययनात सहअध्ययनार्थीमधील संप्रेषण
हे सकारात्मक असावे लागते. ते त्यांच्या विचारात आणि वर्तनातून प्रतीत होत असते. तसे असेल तरच एक गट, संघ किंवा समूह म्हणून घेतलेली जबाबदारी, प्रकल्प, अध्ययन घटक किवा ठरविलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी केली जाणारी गटातील प्रत्येकाची कामगिरी ही एका विशिष्ट दिशेने प्रगतीपथावर जाते. त्याच्यातील परस्पर सकारात्मक देवाणघेवाणीमुळे ते एकमेकांना पूरक माहिती देतात, चुकांना सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतात, योग्य कार्याची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रोत्साहन देतात. सहअध्ययनाची ही प्रमुख वैशिष्ट्ये सह- अध्ययनार्थीला वैयक्तिक विकासाला चालना देतात. त्यांची स्वतःची मूल्ये, विचार व अध्यापनात अनेक वेळा शिक्षकांना अनुभव येतो. जेव्हा शिक्षक एखादा प्रश्न, समस्या आत्मविश्वास विकसित करतात गटाच्या ध्येयपूर्तीचा मार्ग सुकर करतात.
प्रत्येकाचे वैयक्तिक यश किंवा अध्ययन किती झाले यावर गटाच्या यशाचा विचार केला जातो.
*सहअध्ययन कार्याचे मूल्यमापन*
सहअध्ययन गटाच्या कार्यवाही घटकांच्या घटकांबद्दल माहिती घेतल्यानंतर सहअध्ययन कार्याचे मूल्यमापन कसे करता येईल याचाही विचार होणे आवश्यक आहे.
'शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे असे लहान-लहान सहअध्ययन गटात विभाजन करून त्यांना अध्ययनास किंवा एखादा प्रकल्प करण्यास प्रवृत्त केल्यानंतर व विद्यार्थ्यांनी त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही केल्यानंतर कोणत्या सहअध्ययन गटाचे कार्य उत्तम झाले आहे हे ठरविण्यासाठी मूल्यमापन करणे गरजेचे आहे. मूल्यामापन प्रक्रिया सर्व गटांची एकत्रितरित्या करीत असताना खालील तंत्रांचा वापर करता येतो.
◇ प्रत्येक गटाला आपल्या अहवाल सादरीकरणास पुरेसा वेळ द्यावा.
◇ गटातील सदस्यांना वैयक्तिकरित्या प्रश्न विचारून त्यांच्या सहभागातील यशाची खात्री करून घ्यावी.
◇ सहअध्ययनाच्या वेळेच्या संदर्भात प्रश्न विचारावेत.
◇ सामूहिक प्रश्नांच्या उत्तरांवर प्रतिसाद नोंदविण्यासाठी खुणा ठरवून द्याव्यात.
◇ विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांवरून नेमके मूल्यमापन करावे.
◇ विद्यार्थ्यांना अध्ययन करीत असताना आलेल्या अनुभवांबाबत प्रश्न विचारावेत, अडचणी कशा सोडविल्या हे विचारून त्यांनी केलेल्या प्रक्रिया या सहअध्ययन या संकल्पनेस पूरक आहेत का याचा विचार करून त्यांच्या गटाच्या यशाचे मूल्यामापन करावे.
◇ प्रश्नावली, पदनिश्चयनश्रेणी, पडताळा सूची इत्यादींचा वापर करून मूल्यमापन करावे.
◇ सहअध्ययन कार्याचे अहवाललेखन लिखित स्वरूपात आहे किंवा नाही हे पाहावे.
हे लेखन अचूक व पूर्ण असावे. यासंबंधीचा विचार मूल्यमापनात करावा. अहवालात उल्लेख केलेल्या प्रत्येक बाबींवर गटातील सर्वांची सहमती आहे का हे पाहावे.
सहअध्ययन कार्याच्या मूल्यमापनासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे गटाने केलेल्या कार्यातून त्यांच्यामध्ये एकमेकांच्या मदतीने स्वसंकल्पना विकास झाला का ? त्यांच्या कल्पनाशक्तीला इतरांच्या विचाराने चालना मिळाली का ? त्यांच्यामध्ये तर्कनिष्ठ विचार करून समस्या सोडविण्याची क्षमता निर्माण झाली का आणि आपण दुसऱ्यास मदत करतात.
सहअध्ययनार्थी गटाचे स्वरूप व वैशिष्ट्ये
१.वैविध्यपूर्ण एकता : सहअध्ययनार्थी गट हा लहान किंवा परिस्थितीनुसार
एकजिनसी असावा. या गटात सात ते आठ विद्यार्थ्यांचा समावेश असावा. गटामध्ये मुले व मुली या दोघांचा समावेश असावा. गटात विविध क्षमता असणारे विद्यार्थी किंवा शक्य असल्यास विविध वर्णांचे, वंशांचे, भिन्न सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक पार्श्वभूमी असणारे विद्यार्थी गटात असले तरी गटाचे कार्य प्रभावी होऊ शकते.
२.कार्यविभागणी : जेव्हा एखादा गट एकत्र येऊन कोणतीही समस्या सोडवितो,
एखादा प्रकल्प पूर्ण करतो किंवा एखाद्या घटकाचे अध्ययन करतो त्या वेळी त्या कार्याच्या पूर्णत्वाबद्दल त्यांना मिळणारे यश, त्या यशाचे प्रमाणपत्र किंवा त्यांना मिळणारा शेरा हे त्या गटकार्याचे ध्येय असते. पण केवळ हे ध्येय साध्य करणे हे सहअध्ययन गटाचे वैशिष्ट्य ठरत नाही. तर त्या यशप्राप्तीसाठी गटातील प्रत्येक जण स्वतःला वाहून घेतात. कार्याची विभागणी करून आपापले कार्य पूर्ण करतात. हे वैशिष्ट्य सहअध्ययन करणाऱ्या गटामध्ये आढळते.
३.परस्पर सहकार्य सहअध्ययनार्थी गटातील विद्यार्थी जेव्हा एखाद्या विशिष्ट ध्येयप्राप्तीसाठी आपापली कार्ये विभागून ती पूर्ण करीत असतात. त्या वेळी ते केवळ आपले कार्य पूर्ण करावयाचे आहे, ते पूर्ण केले म्हणजे आपली जबाबदारी संपली असा विचार करीत नाहीत तर माझ्याकडे असलेले कार्य पूर्ण करीत असताना ते कार्य माझ्या गटातील इतरांस कसे पूरक ठरणार आहे याचाही विचार करतात. त्यामुळे त्याच्या कार्यात सकारात्मक परस्परावलंबत्व असते. समजा, एखाद्या विद्यार्थ्याला त्याचे कार्य पूर्ण करण्यास काही अडचणी, संकटे येत असतील तर त्याला मदत करणे आवश्यक मानतात, कारण त्याच्या अकार्यक्षमतेचा किंवा अपयशाचा परिणाम हा आपल्या कार्यावर तसेच गटाच्या ध्येयप्राप्तीवर किंवा यशावर होतो याची जाणीव या गटातील प्रत्येक अध्ययनार्थीला असते.
4.वैयक्तिक जबाबदारी सहअध्ययन गटात गटभावनेचे एकसंध कार्याचे जेवढे महत्त्वाचे स्थान आहे तेवढेच महत्त्वाचे स्थान हे वैयक्तिक क्षमता प्रदर्शनास आहे. गटकार्यातील सहभागी विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकाने वैयक्तिक यश कोणत्या पातळीपर्यंत प्राप्त केले आहे, याचाही विचार केला जातो. बरेच वेळा जेव्हा एखादी कृती सांघिकतेने केली जाते तेव्हा असे दिसून येते की गटातील काही विद्यार्थी खूप उत्साहाने कार्य करतात, प्रत्येक बारीक-सारीक गोष्टींचे अध्ययन करतात. प्रयत्न करतात व गटाला यश मिळवून देतात. त्या गटाच्या यशात त्यांच्या अध्ययनाचे, प्रयत्नांचेच महत्त्वाचे स्थान असते. परंतु याच गटातील काही विद्यार्थी मात्र निष्क्रिय असतात. ते आपल्या अध्ययनासाठी प्रयत्न करीत नाहीत. कोणतीही वैयक्तिक जबाबदारी स्वीकारीत नाहीत. परंतु तरीही ते केवळ त्या गटाचे घटक आहेत म्हणून त्या गटाच्या यशप्राप्तीचे ते वाटेकरी ठरतात. गटाचे ध्येय साध्य झाले म्हणजे ते ध्येय साध्य करण्यात त्यांचाही सहभाग गृहीत धरला जातो. परंतु सहअध्ययन गटात केवळ गटाच्या अध्ययनात यशाचा एकत्रित विचार केला नाही तर गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक यशाचा, कार्याचा, सहभागाचा विचार केला जातो.
५.संप्रेषण कौशल्य क्षमता : सहअध्ययन गटातील प्रत्येक विद्यार्थ्यांमध्ये परस्परांशी सहकार्यासाठी संप्रेषण कौशल्य क्षमता असावी लागते. आपल्या सहकाऱ्यांच्या कार्याला जर मदत करावयाची असेल तर त्याच्याशी सुसंवाद कसा करावा, त्याचे म्हणणे, त्याच्या अडचणी कशा पद्धतीने समजावून घ्याव्यात यासाठी संप्रेषण कौशल्य उपयुक्त ठरते. त्याचबरोबर आपल्या अडचणी दुसऱ्याला सांगतानाही हे कौशल्य उपयुक्त ठरते. एकदा आपल्या सहकाऱ्याच्या अडचणी समजावून घेतल्या किंवा त्याला आपल्या अडचणी समजावून सांगितल्या की त्यानंतर त्या अडचणी दूर करण्यासाठी जे सहकार्य करावे लागते, ते सांगण्यासाठी किंवा दुसऱ्याचे म्हणणे ऐकून घेऊन आपल्या समस्या दूर करण्यासाठीही संप्रेषण - कौशल्याची आवश्यकता असते. संप्रेषण कौशल्याच्या अभावी गटामध्ये सहअध्ययन प्रक्रिया घडत नाही. नेतृत्व, निर्णयक्षमता, विश्वासार्हता, स्पष्ट संभाषण कौशल्य या कौशल्यामुळे संप्रेषण घडते.
६.व्यवस्थापन कौशल्य क्षमता: सहअध्ययन करीत असताना गटात अनेक वेळा संघर्षाचे प्रसंग उभे राहतात. निर्णय कोणी घ्यायचे ? कार्य विभागणी कशी करायची, आपत्तीच्या वेळी मार्ग कसे काढायचे, दोन विभिन्न मते असल्यास नेमके कोणाचे मत ग्राह्य धरायचे या सर्वांचे व्यवस्थापन करण्याची गरज असते. त्यामुळे सहअध्ययन गटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यवस्थापन कौशल्य असण्याची गरज असते. जेव्हा सर्व गटांच्या कार्याचे समापन करण्याचे कार्य असते, किंवा गटकार्याच्या ध्येयपूर्तीसाठी एखाद्या नवीन माहितीचा शोध घेण्याची प्रक्रिया असते त्या वेळी व्यवस्थापन कौशल्याची आवश्यकता भासते.
सहअध्ययनातील संप्रेषण प्रक्रिया
सहअध्ययनात संप्रेषणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. कारण सहअध्ययनात समाविष्ट असणाऱ्या प्रत्येक घटकाचे दुसऱ्या घटकाशी योग्य संप्रेषण झाल्याशिवाय गटाचे ध्येय, अर्थातच सहअध्ययन होणे शक्य नाही. हे संप्रेषण पुढीलप्रमाणे विविध घटकांत अपेक्षित असते.
१.सहअध्ययनार्थीमधील संप्रेषण : सहअध्ययनात सहअध्ययनार्थी धील संप्रेषण
हे सकारात्मक असावे लागते. ते त्यांच्या विचारात आणि वर्तनातून प्रतीत होत असते. तसे असेल तरच एक गट, संघ किंवा समूह म्हणून घेतलेली जबाबदारी, प्रकल्प, अध्ययन घटक किवा ठरविलेल्या उद्दिष्टपूर्तीसाठी केली जाणारी गटातील प्रत्येकाची कामगिरी ही एका विशिष्ट दिशेने प्रगतीपथावर जाते. त्याच्यातील परस्पर सकारात्मक देवाणघेवाणीमुळे ते एकमेकांना पूरक माहिती देतात, चुकांना सुधारण्यासाठी मार्गदर्शन करतात, योग्य कार्याची पुनरावृत्ती करण्यासाठी प्रोत्साहन देतात. सहअध्ययनाची ही प्रमुख वैशिष्ट्ये सह- अध्ययनार्थीला वैयक्तिक विकासाला चालना देतात. त्यांची स्वतःची मूल्ये, विचार व अध्यापनात अनेक वेळा शिक्षकांना अनुभव येतो. 
प्रत्येकाचे वैयक्तिक यश किंवा अध्ययन किती झाले यावर गटाच्या यशाचा विचार केला जातो.
सहअध्ययन कार्याचे मूल्यमापन
सहअध्ययन गटाच्या कार्यवाही घटकांच्या घटकांबद्दल माहिती घेतल्यानंतर सहअध्ययन कार्याचे मूल्यमापन कसे करता येईल याचाही विचार होणे आवश्यक आहे.
'शिक्षकांनी आपल्या वर्गातील विद्यार्थ्यांचे असे लहान-लहान सहअध्ययन गटात विभाजन करून त्यांना अध्ययनास किंवा एखादा प्रकल्प करण्यास प्रवृत्त केल्यानंतर व विद्यार्थ्यांनी त्यानुसार प्रत्यक्ष कार्यवाही केल्यानंतर कोणत्या सहअध्ययन गटाचे कार्य उत्तम झाले आहे हे ठरविण्यासाठी मूल्यमापन करणे गरजेचे आहे. मूल्यामापन प्रक्रिया सर्व गटांची एकत्रितरित्या करीत असताना खालील तंत्रांचा वापर करता येतो.
◇ प्रत्येक गटाला आपल्या अहवाल सादरीकरणास पुरेसा वेळ द्यावा.
◇ गटातील सदस्यांना वैयक्तिकरित्या प्रश्न विचारून त्यांच्या सहभागातील यशाची खात्री करून घ्यावी.
◇ सहअध्ययनाच्या वेळेच्या संदर्भात प्रश्न विचारावेत.
◇ सामूहिक प्रश्नांच्या उत्तरांवर प्रतिसाद नोंदविण्यासाठी खुणा ठरवून द्याव्यात.
◇ विद्यार्थ्यांनी दिलेल्या उत्तरांवरून नेमके मूल्यमापन करावे.
◇ विद्यार्थ्यांना अध्ययन करीत असताना आलेल्या अनुभवांबाबत प्रश्न विचारावेत, अडचणी कशा सोडविल्या हे विचारून त्यांनी केलेल्या प्रक्रिया या सहअध्ययन या संकल्पनेस पूरक आहेत का याचा विचार करून त्यांच्या गटाच्या यशाचे मूल्यामापन करावे.
◇ प्रश्नावली, पदनिश्चयनश्रेणी, पडताळा सूची इत्यादींचा वापर करून मूल्यमापन करावे.
◇ सहअध्ययन कार्याचे अहवाललेखन लिखित स्वरूपात आहे किंवा नाही हे पाहावे.
हे लेखन अचूक व पूर्ण असावे. यासंबंधीचा विचार मूल्यमापनात करावा. अहवालात उल्लेख केलेल्या प्रत्येक बाबींवर गटातील सर्वांची सहमती आहे का हे पाहावे.
सहअध्ययन कार्याच्या मूल्यमापनासाठी सर्वांत महत्त्वाची बाब म्हणजे गटाने केलेल्या कार्यातून त्यांच्यामध्ये एकमेकांच्या मदतीने स्वसंकल्पना विकास झाला का ? त्यांच्या कल्पनाशक्तीला इतरांच्या विचाराने चालना मिळाली का ? त्यांच्यामध्ये तर्कनिष्ठ विचार करून समस्या सोडविण्याची क्षमता निर्माण झाली का आणि आपण दुसऱ्यास मदत
केल्यामुळे व दुसऱ्याकडून आपण मदत स्वीकारल्यामुळे आपली प्रगती होते, विकास होतो ही भावना वाढीस लागली का ? या बाबी मूल्यामापन करीत असताना विचारात घेणे आवश्यक आहे. कारण विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक वैशिष्ट्यांचा, व्यक्तिभेदाचा विचार करून, त्यांच्या बलस्थानांचा उपयोग इतरांना व इतरांच्या बलस्थानांचा उपयोग त्यांना करून देणे सर्वांच्या प्रगतीची पातळी उंचावणे सहअध्ययन पद्धतीचे खास वैशिष्ट्य आहे.

कोल्हापुरात एक लाख परीक्षार्थी घेणार कॉपी न करण्याची शपथ !


विभागीय मंडळाकडून शाळास्तरावर बोर्ड परीक्षेचा अनोखा जागर 

कोल्हापूर /प्रतिनिधी

येत्या फेब्रुवारी मार्च २०२५ मध्ये  इयत्ता दहावी व बारावी परीक्षेसाठी प्रविष्ट होत असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे १ लक्ष ४ हजार ४५८ इतक्या परीक्षार्थींना त्यांना चालू डिसेंबर महिन्यात शाळा स्तरावर आणि फेब्रुवारी महिन्यात लेखी परीक्षेच्या पहिल्या दिवशी परीक्षाकेंद्र स्तरावर कॉपी न करण्याची शपथ देण्यात येणार आहे. शिक्षक,पालक,विद्यार्थी यांच्यासह संबंधित सर्व घटकांना परीक्षेची इत्यंभूत माहिती व्हावी, यासाठी विभागीय मंडळांने शाळा स्तरावर चालू वर्षी प्रथमतःच बैठका घेण्याचे निर्देश दिले आहेत. यानिमित्ताने २४ डिसेंबर पर्यंत शाळा स्तरावर बोर्ड परीक्षेचा जागर होत आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळ अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत जिल्हास्तरावर १७ डिसेंबर रोजी परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी सर्व शाळाप्रमुखांची ऑफलाईन बैठक घेण्यात आली. या बैठकीत परीक्षेशी संबंधित सर्व मुद्द्यांची माहिती पीपीटीद्वारे देण्यात आली. एवढेच नव्हे तर कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त परीक्षा आयोजनासाठी कडक कारवाईच्या सूचना आणि गुणात्मक सुधारणेसाठी परीक्षेशी संबंधित आवश्यक माहिती व सर्व घटकांची मानसिकता बदलण्याच्या सूचना देण्यात आल्या.

जिल्ह्यात ९७७ माध्यमिक शाळांमधून तर ३७९ उच्च माध्यमिक अशा एकूण १३५६ विद्यालयातील विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट होणार आहेत. त्यातून इयत्ता दहावी करिता ५४ हजार ६४४ आणि इयत्ता बारावी करिता ४९ हजार ८१४ विद्यार्थी परीक्षेस बसणार आहेत.

शाळास्तरावर घ्यावयाच्या बैठकीसाठी विभागीय मंडळांने आवश्यक माहितीची पीपीटी आणि शासन निर्णय-परिपत्रकांची रसदच शाळांना पुरवली आहे. तसेच १८ डिसेंबर रोजीच्या पत्राद्वारे शाळा प्रमुखांना विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी सविस्तर सूचना दिल्या आहेत.

पत्रात जिल्हा बैठकीमध्ये दिलेल्या सूचनानुसार आवश्यक ती कार्यवाही शाळा व कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर करावी. अभ्यासाची उजळणी घेणे, प्रश्नपत्रिका सराव घेणे व उद्बोधन वर्ग घेणे, परीक्षेस प्रविष्ट होणारे विद्यार्थी, पालक, शिक्षक यांची बैठक दि.२०/१२/२०२४ ते दि.२४/१२/२०२४ या कालावधीत कोणत्याही एका दिवशी आयोजित करुन PPT च्या सहाय्याने योग्य त्या सूचना देणे, तसेच कॉपीमुक्त अभियानाबाबत उद्बोधन करणे, बैठकीचे उपस्थितीपत्रक व इतिवृत्त जतन करणे आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मागणी केल्यास तात्काळ उपलब्ध करुन देण्याबाबत निर्देश आहेत.

शिवाय बैठकीत विद्यार्थ्यांच्या परीक्षेसंबंधीच्या शिक्षासूचीचे, उत्तरपत्रिकेच्या मुखपृष्टामागील सुचनांचे वाचन, तसेच मंडळाने सुचविलेल्या नमुन्यात 'परीक्षेत गैरमार्ग करणार नाही' अशा आशयाची शपथ / प्रतिज्ञा शाळाप्रमुखांनी शाळास्तरावर देण्याबाबत सूचना आहेत. राज्य मंडळ व विभागीय मंडळाकडे असलेल्या सुविधा व योजनांची माहिती देण्याचेही निर्देश आहेत.

 तसेच लेखी परीक्षेच्या पहिल्या दिवशी केंद्र संचालकांनी परीक्षाकेंद्र स्तरावर शपथ देणे, शाळा प्रमुखांनी चालू शैक्षणिक वर्ष २०२४-२०२५ करीता नोंदणी शुल्क, शिक्षण संक्रमण शुल्क, शिक्षक पॅनेल माहिती, संकेतांक नुतनीकरण शुल्कासह प्रस्ताव यांची पुर्तता दि.३१ डिसेंबर २०२४ अखेरपर्यंत करावी. नोंदणी शुल्क, शिक्षण संक्रमण शुल्क, शिक्षक पॅनेल माहितीची पुर्तता मुदतीत प्राप्त न झाल्यास परीक्षाच्यांची प्रवेशपत्रे अशा शाळांना उपलब्ध होणार नाहीत. त्याची जवाबदारी संबंधित
शाळाप्रमुखांवर निश्चित होईल. त्यामुळे होणा-या विद्याथ्यांच्या संभाव्य शैक्षणिक नुकसानीची जबाबदारी शाळा प्रमुखांवर निश्चित करण्यात आली आहे.

दिव्यांग विद्यार्थी प्रस्ताव, आवेदनपत्र रद्द प्रस्ताव, चित्रकला/ शास्वीय कलाः लोककला प्रस्ताव, खेळाडू प्रस्ताव, अतिविलंब आवेदनपत्रे इत्यादी मंडळ कार्यालयास विहित मुदतीत सादर करावेत.
पुढील काळात विभागीय मंडळाकडून शाळाप्रमुखांसाठी आवश्यकतेनुसार ऑनलाईन सभा आयोजित करण्यात आहेत, त्यास शाळाप्रमुखांनी आवश्यक
माहितीसह स्वतः उपस्थित राहणे आवश्यक आहे.
 राज्यमंडळाच्या व विभागीय मंडळाच्या संकेतस्थळास नियमितपणे पाहणे आणि. शिवाय मंडळाच्या MSBSHSE या ॲपचा वेळोवेळी उपयोग करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

"कॉपीमुक्त व गैरमार्गमुक्त परीक्षेसाठी विद्यार्थी पालक व शिक्षक यांच्यासह परीक्षेशी संबंधित सर्व घटकांची मानसिकता बदलणे आवश्यक आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यात शाळा स्तरावर प्रबोधन आवश्यक आहे, अन्यथा दुसऱ्या टप्प्यात कारवाई करणे अटळ आहे.
-राजेश क्षीरसागर,विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ

प्रतिज्ञा/शपथेचा नमुना•
मी.... या शाळेचा/ची कनिष्ठ महाविद्यालयाचा/ची विद्यार्थी/ विद्यार्थिनी आजच्या दिवशी अशी शपथ घेतो/घेते की, मी फेब्रुवारी-मार्च२०२५ च्या इयत्ता दहावी/बारावी परीक्षेस परिपूर्ण अभ्यास करूनच सामोरे जाईन. मी उत्तीर्ण होण्यासाठी परीक्षेत कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब करणार नाही किंवा परीक्षेसाठी गैरमार्गाचा विचारही करणार नाही. 
जर कोणी गैरमार्गाचा विचार करत असेल तर त्यास गैरमार्गापासून परावृत्त करेन. परीक्षेला सामोरे जाताना मंडळ सूचनांचे व नियमांचे काटेकोरपणे पालन करेन. सातत्याने अभ्यास करेन. प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करेन.परीक्षेस मोठ्या आत्मविश्वासाने, निर्भीडपणे, तणाव विरहित सामोरे जाईन. चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन माझ्या शाळेचे/ कनिष्ठ महाविद्यालयाचे, गुरुजनांचे, आई-वडिलांचे नाव उज्वल करेन.

Thursday, 19 December 2024

कोल्हापूर येथे सामाजिक अभियानांतर्गत उद्योजक प्रशिक्षण शिबीर संपन्न

हेरले / प्रतिनिधी

समर्थ सोशल फाउंडेशन, न्यूट्रीफील हेल्थ प्रा. लि व  शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर येथे व्यसन मुक्ती व मधुमेह मुक्ती सामाजिक अभियानांतर्गत उद्योजक प्रशिक्षण शिबीर पार पडले.महाराष्ट्र तसेच अन्य राज्यातून सुमारे बाराशे पेक्षा ज्यास्त लोकांनी या शिबिरास नोंदणी करून उपस्थिती दर्शवली.
संस्थेने येणाऱ्या वर्षभरात ५० हजार पेक्षा ज्यास्त लोकांना सामाजिक कार्यातून उद्योजक बनवन्याचा संकल्प केला आहे.
या संदर्भाची सविस्तर माहिती संस्थेचे संस्थापक सादिक शेख  यांनी केली यावेळी संस्थेमध्ये कार्यरत असलेले अनेक पदाधिकारी यांनीं आपले मनोगत व्यक्त केले.
नोकरी, व्यवसायाच्या शोधात असनाऱ्या शेकडो लोकांना त्यातून प्रेरणा मिळाली व त्यांनी एकमताने समर्थ सोशल फाउंडेशन या संस्थे सोबत जुडण्याचा निर्णय घेतला.

कार्यक्रमांचे सूत्रसंचालन, संचालक  अस्लम शेख यांनी केले. तसेच प्रास्ताविक संचालक  सुहास पाटील यांनी तर आभार संचालक व शिवशंभु व्यसनमुक्ती केंद्राचे अध्यक्ष सागर देसाई याने मानले.
या शिबिरास संस्थेचे सर्व पदाधिकारी, तसेच नव उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tuesday, 17 December 2024

शिक्षण विभाग माध्यमिकने घेतली दुसऱ्या वर्षी ही (NMMS) एन.एम. एम. एस. सराव चाचणी


कोल्हापूर /प्रतिनिधी

   कोल्हापूर शिक्षण विभाग गुणवत्तेमध्ये नेहमीच राज्यात अग्रेसर आहे. त्याचे कारण म्हणजे गुणवत्तेची कास धरून काम करणारे शिक्षक ,मुख्याध्यापक,  आणि त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप देणारे प्रशासन.
    गेली दोन वर्षे NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांना भरघोष यश मिळावे व जास्तीत जास्त विद्यार्थी गुणवत्ता धारक व्हावे या साठी शिक्षण विभाग (माध्यमिक) सराव चाचणीचे नियोजन करत आहे.
 जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी  एस. कार्तिकेयन व कोल्हापूर विभागाचे उपसंचालक महेश चोथे  यांच्या प्रेरणेतून, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर यांच्या कुशल नेतृत्वाखाली, श्री चौंडेश्वरी शिक्षण प्रसारक मंडळ इचलकरंजीचे  अध्यक्ष तसेच नामांकित उद्योजक कस्तुरे त्यांचे सहकारी  टारे  यांच्या दातृत्वातून, उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे, विस्ताराधिकारी  धनाजी पाटील,श्रीमती जयश्री जाधव यांच्या प्रयत्नातून व उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे ,उपशिक्षणाधिकारी अजय पाटील, विस्तराधिकारी विश्वास सुतार,  डी. सी. कुंभार श्रीमती रत्नप्रभा दबडे यांच्या सहकार्यातून दिनांक 14 डिसेंबर  रोजी NMMS सराव चाचणीचे नियोजन करण्यात आले होते.
  सदर परीक्षेला जिल्ह्यातील ७२ केंद्रातून २७६३४  विद्यार्थी बसले होते. अंतिम परीक्षेच्या धरतीवर घेतली आहे. या चाचणीचे पेपर काढण्याचे काम व्यंकटराव हाय इचलकरंजीचे  प्रवीण आंबोळे , सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए.आर. पाटील,अन्सारी मुख्याध्यापक नॅशनल हायस्कूल इचलकरंजी,  आत्तार अध्यापक नेहरू हायस्कूल कोल्हापूर, राहुल नवकुडकर मुख्याध्यापक जयप्रभा हायस्कूलजयसिंगपूर यांनी केले .अशाच प्रकारचे उपक्रम राबवून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी तसेच कोल्हापूर जिल्हा शिक्षणाच्या बाबतीत सर्वांगाने अव्वल राहण्यासाठी माध्यमिक शिक्षण विभाग नक्कीच कटिबद्ध राहील. अशी माहिती प्रसिद्धीस उपशिक्षणाधिकारी दिगंबर मोरे यांनी दिली.

ऑल इंडिया रग्बी अशोसिएशनचे अध्यक्ष तसेच सिनेकलाकार राहुल बोस यांची शिंगणापूर क्रीडा प्रशालेला भेट

हेरले /प्रतिनिधी

राजर्षी छत्रपती शाहू विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशाला शिंगणापूर येथील रग्बी खेळातील 14 वर्षाखालील मुले व मुली आणि 17 वर्षाखालील मुले व मुली अशा चारही संघांनी बालेवाडी, पुणे येथे झालेल्या शालेय राज्यस्तरीय रग्बी क्रिडा स्पर्धेत सुवर्ण पदके प्राप्त केली आहेत. तसेच यातील एकूण 14 विद्यार्थ्यांची राष्ट्रीय पातळीवर निवड झाल्याने रग्बी इंडिया चे  अध्यक्ष तथा प्रसिद्ध सिने कलाकार श्री.राहुल बोस यांनी शाळेला भेट दिली .
    रग्बी खेळातील शिंगणापूर शाळेच्या बहुमूल्य योगदानाबद्दल त्यांनी सर्व खेळाडू व रग्बी प्रशिक्षक श्री दिपक पाटील  यांचे विशेष कौतुक केले. तसेच रग्बी खेळातील आंतरराष्ट्रीय खेळाडू तथा शिव छत्रपती पुरस्कार जाहीर झालेले प्रशालेचे माजी विद्यार्थी वैष्णवी पाटील व श्रीधर निगडे या खेळाडूंचेही श्री बोस यांनी अभिनंदन केले. श्री बोस यांनी यानंतर प्रशालेतील सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना खेळाबाबत प्रोत्साहन दिले. जिल्हा परिषद कोल्हापूरचे चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री कार्तिकेयन एस.  यांनी रग्बी इंडियाचे अध्यक्ष श्री. बोस यांना प्रशालेचा सर्व परिसर दाखवून प्रशालेमध्ये चालू असलेल्या सर्व क्रीडा प्रकारांची माहिती दिली  तसेच भविष्यात येथे नियोजित असलेल्या खेळनिहाय सोयी सुविधा यांचीही माहिती दिली. श्री.बोस यांनी रग्बी खेळातील व इतर खेळातील प्रशिक्षकांचे मूल्यमापन करून त्यांना विशेष प्रशिक्षण, रग्बी खेळाडूंचे मूल्यमापन करून त्यांना प्रशिक्षण तसेच इतर क्रीडा प्रकारांसाठी शक्य ती सर्व मदत पुरविण्याबाबत आश्वासित केले. या भेटी दरम्यान जिल्हा परिषद कोल्हापूर चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री .कार्तीकेयन एस, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्रीम. मीना शेंडकर, प्रशासनाधिकारी श्री. समरजित पाटील, मुख्याध्यापिका श्रीम. आशा शेळके , प्रशालेचे सर्व कर्मचारी,यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक इत्यादी उपस्थित होते.
       फोटो 
ऑल इंडिया रग्बी अशोसिएशनचे अध्यक्ष तसेच सिनेकलाकार राहुल बोस यांची शिंगणापूर क्रीडा प्रशालेला भेट दिली. शेजारी प्राथमिक शिक्षणाधिकारी मीना शेंडकर व अन्य मान्यवर

दहावी बारावीच्या परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्यांची गय नाही-राजेश क्षीरसागर


जिल्हाधिकारी सर्व विभाग प्रमुखांची भरारी पथके नेमणार 

कोल्हापूर /प्रतिनिधी

यावर्षी होणा-या इयत्ता १० वी, इयत्ता १२ वीच्या बोर्डाच्या परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त घेण्याबरोबरच निकालाची गुणवत्ता वाढवण्यासाठी सर्व प्राचार्य व मुख्याध्यापकांसह परीक्षा संचलनातील सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याचे निर्देश कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिले. प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी जिल्हास्तरावरून सर्व विभागांची भरारी भरारी पथके नेमून अचानक भेटी देण्याबाबत आदेश काढणार असल्याबाबत बैठकीत सांगितले. कोल्हापूर जिल्ह्यात गैरप्रकार मुक्त परीक्षा होण्यासाठी कटाक्षाने लक्ष देण्याची सूचना सर्व शाळा प्रमुखांना केली.
     कोल्हापूर विभागीय मंडळाच्यावतीने कोल्हापूर जिल्हयातील सर्व माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांचे प्राचार्य व मुख्याध्यापक यांची दोन टप्प्यात बैठक येथील विवेकानंद महाविद्यालयात गुरुवारी आयोजित केली होती. त्यावेळी त्यांनी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या कोणत्याही स्तरावरील व्यक्तीची गय केली जाणार नाही असा इशारा दिला. यावेळी विभागीय शिक्षण उपसंचालक महेश चोथे,विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी.एम.किल्लेदार, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ.एकनाथ आंबोकर,योजना शिक्षणाधिकारी अनुराधा म्हेत्रे, बोर्डाचे अधिक्षक सुधीर हावळ, एस.वाय.दूधगावकर,एम.जी. दिवेकर,एच.के.शिंदे, आम्रपाल बनसोडे, प्रणाली जमदग्नी,जिल्हा मुख्याध्यापक संघाचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
            राजेश क्षीरसागर म्हणाले की, प्राचार्य व मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढवण्यासाठी विद्यार्थ्यांची तयारी चांगली करून घ्यावी, शाळा स्तरावर उजळणी घेऊन पुरेसा प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करून घ्यावा. केंद्रावर होणारे गैरप्रकार बंद करा. अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागेल असा इशारा नियमावलीतील तरतुदींसह दिला. विद्यार्थ्यांनाही शिक्षासूचीची माहिती दया. विद्यार्थ्यांचे उदबोधन वर्ग आयोजित करा. कॉपीमुक्तीची शपथ घ्या व भयमुक्त वातावरणात परीक्षेला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना यथायोग्य मार्गदर्शन करा असे सांगून राज्य मंडळ व विभागीय मंडळाच्या संकेतस्थळाबाबत माहिती दिली. राज्य मंडळांने नव्याने विकसित केलेल्या  ॲपविषयी सविस्तर माहिती देऊन शाळाप्रमुख शिक्षक व विद्यार्थ्यांनी त्याचा वेळोवेळी उपयोग करावा अशीही सूचना केली. मंडळातील इतर सुविधा व आवश्यक बाबीविषयी पीपीटीदवारे मार्गदर्शन केले. यावेळी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे दिली. प्रशासकीय तांत्रिक बाबींच्या मार्गदर्शनासाठी विभागीय मंडळाची संपूर्ण टीम उपस्थित होती.
     विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी प्रास्ताविकात सर्वांना काळाबरोबर तुम्ही आपल्यात सुधारणा केली नाही तर बंद पडलेल्या कंपनी सारखी आपली  वाईट अवस्था होईल. नवीन गोष्टी आत्मसात करणे आपले काम आहे, आज याठिकाणी तुमची बोर्डाच्या कामासंबंधी उजळणी झाली आहे. पीपीटी मिळाल्यावर स्टाफ मिटींग घेवून सर्वांना अवगत करायचे आहे. पीपीटीसह शिक्षक पालक ,विद्यार्थी यांची बैठक घेवून त्याचे इतिवृत्त ठेवायचे, ते भेटीसाठी आलेल्या अधिका-यांना  दाखवायचे आहे, अशा सूचना दिल्या. 

यावेळी उपसंचालक महेश चोथे, माध्यमिक शिक्षण अधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनीही मार्गदर्शन केले. तर सहसचिव बी.एम.किल्लेदार, अधिक्षक सुधीर हावळ, एस.वाय.दुधगावकर, एच.के.शिंदे,एम.जी.दिवेकर यांनी बोर्डाच्या विविध कामाविषयी विषयी  माहिती दिली.
        परीक्षेबाबत इत्यंभूत माहिती देण्यासाठी केलेल्या सूक्ष्म नियोजनाची व यापुढे मानसिकता बदलावी लागणार याची चर्चा बैठकीनंतर मुख्याध्यापकांमध्ये होती.

वैशिष्ट्यपूर्ण बैठक-
•तब्बल सात वर्षानंतर पूर्णवेळ विभागीय अध्यक्षांच्या उपस्थितीत थेट जिल्हास्तरावर सभा. हटके व वैशिष्ट्यपूर्ण सभेमुळे शाळा प्रमुखांचा पालटला नूर.
•राज्य मंडळ व विभागीय मंडळ आणि मोबाईल ॲपबाबत सविस्तर मार्गदर्शन.
• मंडळ सातत्याने ऑनलाइन बैठका घेऊन परीक्षा कामकाजाचा आढावा घेणार.
•परीक्षा काळातील व परीक्षोत्तर गैरमार्ग बंद करणार.
•जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मदतीने कडक नियंत्रणात परिक्षा घेण्याचा निर्धार.
•चालू महिन्यात शाळास्तरावर आणि नंतर परीक्षेच्या पहिल्या दिवशी केंद्रावर कॉपीमुक्तीची विद्यार्थ्यांना शपथ देणार.
•भयमुक्त व निर्भयपणे विद्यार्थ्यांनी परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन उद्बोधन कार्यक्रम घेणार.
•विद्यार्थी पालक व शिक्षकांची मानसिकता बदलण्यासाठी शाळास्तरावर बैठका घेण्याचे व इतिवृत्त ठेवण्याचे निर्देश. त्यात आवश्यक सूचनांचे प्रकट वाचन करण्याचेही निर्देश.
 •सामूहिक कॉपी व पेपरफुटी सारख्या गंभीर प्रकरणी केंद्र शाळेचे अनुदान बंद करणे,शाळा स्वयम् अर्थसहायित करण्यासाठी शिफारस, मंडळाकडून शाळांचे संकेतांक गोठवणे यासारखी गंभीर कारवाई करण्याचाही दिला इशारा.
•परीक्षेत नेमून दिलेले काम टाळल्यास होणार कारवाई. 
•शाळेकडे विभागीय मंडळाची कोणतीही थकबाकी असल्यास विद्यार्थी प्रवेशपत्रे रोखणार, पर्यायाने जबाबदारी शाळेवर निश्चित होणार.
•गैरहजर शाळा प्रमुखांना शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत नोटीसा.

   फोटो 
 इयत्ता दहावी बारावीच्या परीक्षेच्या पूर्वतयारी संदर्भात   उपस्थित प्राचार्य व मुख्याध्यापक. मार्गदर्शन करताना विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर

Sunday, 15 December 2024

डॉ . डी. एस. घुगरे यांची राज्य अभ्यासक्रम निर्मिती करीता निवड


हेरले / प्रतिनिधी
राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद एस सी ई आर टी महाराष्ट्र पुणे मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 तयार करण्यात आला आहे .
राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 यावर आधारित शालेय अभ्यासक्रम निर्मिती करिता शारीरिक शिक्षण व निरामयता या विषयाकरिता तज्ञ सदस्यपदी आदर्श शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. डी .एस. घुगरे  यांची निवड झाली.
डॉ. डी.एस. घुगरे हे स्वातंत्र्य सैनिक मारुती गणपती पाटील आदर्श विद्यानिकेतन आणि ज्युनिअर कॉलेज मिणचे ता . हातकणंगले येथे मुख्याध्यापक या पदावर कार्यरत असून ते राष्ट्रीय खेळाडू आहेत. ते 27 वर्ष क्रीडा शिक्षक व मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहेत . त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज अखेर विविध क्रीडाप्रकारात 2790 राज्य , 423 राष्ट्रीय व 23 आंतरराष्ट्रीय खेळाडू घडले आहेत.
त्यांच्या मार्गदर्शनाखाली युवक कल्याण व क्रीडा विभाग महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत जिल्हा युवा पुरस्कार पालकमंत्र्यांच्या हस्ते शाळेस मिळालेला आहे .विद्यालयामध्ये शिवजयंती निमित्त सूर्यनमस्कार उपक्रम घेण्यात आला. या उपक्रमांतर्गत 400 विद्यार्थ्यांनी 1 लाख 4 हजार 444 सूर्यनमस्कार 40 मिनिटांमध्ये घालण्याचा विक्रम केला आणि याची नोंद महाराष्ट्र बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये घेण्यात आली तसेच शिवजयंती निमित्त विद्यालयामध्ये शिवपारायण उपक्रम घेण्यात आला यामध्ये 555 विद्यार्थ्यांनी शिवचरित्र वाचन केले आणि या उपक्रमाची नोंद इशियन बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये घेण्यात आली असे नाविन्यपूर्ण उपक्रम शाळेमध्ये ते सतत राबवत असतात .
त्यांनी योगशास्त्र विषयाअंतर्गत डिप्लोमा इन योगा एज्युकेशन पदवी व शिक्षणशास्त्र  या विषयांतर्गत पीएचडी पदवी  प्राप्त केली आहे. राज्य व जिल्हा क्रीडा विविध असोसिएशनवरती विविध पदावर ते पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक संघ ,महामंडळ येथे उपाध्यक्षपदी कार्यरत आहेत .
त्यांना डाएटचे प्राचार्य डॉ .राजेंद्र भोई, माध्यमिक शिक्षणाधिकारी  डॉ .एकनाथ आंबोकर यांचे प्रोत्साहन मिळाले. त्यांचे निवडीबद्दल शिक्षणक्षेत्रात कौतुक होत आहे .

Saturday, 14 December 2024

उल्लास साक्षरता कार्यक्रमाची जबाबदारी - आता विभागीय मंडळांवरही राजेश क्षीरसागर यांची राज्य समन्वयक म्हणून नियुक्ती


कोल्हापूर / प्रतिनिधी
 उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रमाची क्षेत्रीय स्तरावर प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य समन्वयक कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर व विभागीय समन्वयकपदी रत्नागिरी मंडळ वगळता संबंधित विभागीय मंडळाच्या अध्यक्षांची नेमणूक करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी आणि योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी संयुक्तपणे जारी केले आहेत.

 राज्य शासनाने केंद्र पुरस्कृत उल्लास नव भारत साक्षरता हा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम १४ ऑक्टोबर २०२२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे स्वीकारला आहे. हा कार्यक्रम सन २०२२ ते २०२७ या कालावधीत देशभर राबवला जात आहे. तर २५ जानेवारी २०२३रोजीच्या शासन निर्णयाद्वारे राज्य, जिल्हा, तालुका व शाळा स्तरावरील समित्यांचे गठन करण्यात आले आहे.

राज्यात प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शिक्षण संचालनालय (योजना) या कार्यालयाकडून राज्यस्तरावरून वेळोवेळी या कार्यक्रमाचा ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने आढावा घेण्यात येतो तसेच क्षेत्रभेटी देण्यात येतात. यावेळी आलेले अनुभव लक्षात घेता क्षेत्रीय स्तरावर या कार्यक्रमाचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक असल्याचे दिसून आले आहे. 

या योजनेत असाक्षरांचे सर्वेक्षण व स्वयंसेवक सर्वेक्षण, त्यांची उल्लास ॲपवर ऑनलाइन नोंदणी व जोडणी, अध्ययन अध्यापन, परीक्षेचा सराव, परीक्षा पूर्व व परीक्षोत्तर कामकाजाची कार्यवाही तसेच क्षेत्रिय स्तरावरील जिल्हा, तालुका, शाळास्तर समित्यांचे कामकाज या बाबींचा वेळोवेळी आढावा घेणे आवश्यक आहे. विभागीय शिक्षण उपसंचालक, डायट प्राचार्य, शिक्षणाधिकारी माध्यमिक, प्राथमिक, योजना यांचा या योजने संदर्भातील कामकाजाचा आढावा, योजनेची प्रसिद्धी, उद्दिष्टानुसार केले काम याबाबत विभागीय समन्वयकांनाही आता लक्ष घालावे लागणार आहे.

स्वयंसेवक म्हणून इयत्ता आठवी व त्यापुढील शालेय विद्यार्थी, महाविद्यालयीन विद्यार्थी, सेवानिवृत्त कर्मचारी, आशा कार्यकर्त्या, अंगणवाडी सेविका, एनसीसी, एनएसएस, अध्यापक विद्यालयाचे छात्र अध्यापक, शिक्षक यांचा अंतर्भाव करणे अपेक्षित आहे.

या योजनेत शाळा हे एकक असून स्वयंसेवक शिक्षकास कोणत्याही मानधनाची तरतूद नाही. जनभागीदारी (लोकसहभाग) हेही या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य आहे. या योजनेत स्वयंसेवक म्हणून कामकाज करणाऱ्या शालेय विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुणांची तरतूद करण्यासाठी शासनास प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश सप्टेंबर मध्ये शिक्षण मंत्री यांनी दिले होते. त्याबाबतचा प्रस्ताव राज्य शासनास सादर करण्याची कार्यवाही सुरू आहे.

चालू वर्षीची असाक्षर ऑनलाइन नोंदणी व त्यापुढील कार्यवाही सुरू आहे. इयत्ता आठवी व त्यापुढील शालेय विद्यार्थ्यांचा स्वयंसेवक म्हणून सहभाग वाढविणे आवश्यक आहे. त्यासाठी प्राचार्य व मुख्याध्यापकांच्या बैठकांमध्ये याचा आढावा घेण्याचे निर्देश विभागीय मंडळांना संचालकांनी दिले आहेत.
सध्या विभागीय अध्यक्ष म्हणून राजेंद्र अहिरे-मुंबई, डॉ. सुभाष बोरसे -नाशिक, मंजुषा मिसकर-पुणे, अनिल साबळे-छत्रपती संभाजी नगर, सुधाकर तेलंग-लातूर, नीलिमा टाके-अमरावती, माधुरी सावरकर-नागपूर हे काम पाहत आहेत. उल्लास योजनेतील अनुभव लक्षात घेता आदेशानुसार राजेश क्षीरसागर यांना राज्य समन्वयक, कोल्हापुर विभाग समन्वयक आणि रत्नागिरी विभाग समन्वयक म्हणून काम पहावे लागणार आहे.

Friday, 13 December 2024

हेरले येथे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा संपन्न


हेरले /प्रतिनिधी

हेरले ( ता. हातकणंगले) येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या  यांच्या वतीने ५ ते १२ डिसेंबर सात दिवसाचा पारायण सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला.

        ११ डिसेबंर रोजी सायंकाळी चार वाजता ज्ञानेश्वरी पालकी व दिंडी सोहळा आयोजीत केला होता. गावातील प्रमुख मार्गावरून वारकरी माऊंलीनी ज्ञानेश्वर माऊली , विठू माऊलींचा जयघोष करीत टाळ मृदूंगाच्या गजरात भक्तीभावाने भक्ती रसात रंगले होते. प्रत्येक गल्लीमध्ये व प्रमुख मार्गावरून तरूण मंडळांनी व कॉलनीतील महिला वर्गांनी रांगोळी काढून फुलांनी सजावट करून पालकीचे स्वागत केले. या सोहळ्यात महिला अबाल वृध्द मोठ्या भक्तिभावांने सहभागी झाले होते.झेंडा चौक, पाटाची गल्ली,सुर्यगंगा तरुण मंडळापासून हजारी कोपरा ,चोगुले गल्ली ,जय विजय, गड्डा ग्रुप, करके गल्ली शेवट विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथे दिंडीच सोहळ्याचेे विसर्जन करण्यात आले.
            १२ डिसेंबर रोजी महाप्रसाद  वाटप श्री व सौ प्रदीप मोहिते  यांच्या हस्ते करण्यात आले.महाप्रसादाचा लाभ गावातील व परिसरातील चार  हजार  लोकांनी घेतला. यावेळी  हेरले व हेरले परिसरातील वारकरी भक्त मंडळी उपस्थित होते.
              या पारायण सोहळ्यास विशेष सहकार्य माजी सभापती राजेश पाटील, पोलीस पाटील नयन पाटील, गव्हर्मेंट कॉन्ट्रॅक्टर दीपक जाधव यांनी केले.
            या पारायण सोहळयाचे संयोजन दादा भोसले, जनार्धन कुलकर्णी,  सतीश वड़ड़, अरुण पोतदार, धोडीराम मिरजे,वसंत कागले, केशव मिरजे,पोपट कोळेकर,इरप्पा जैन, संजय माने,प्रकाश माने,सुभाष जाधव, अजित पाटील,रामा कोळेकर, मुकुंद माने, दादासो कोळेकर, नाना कोळेकर, संजय उबारे, सौरभ निंबाळकर , सौरभ खुपिरे,उमेश वाघमोरे,किरण कुंभार,प्रधान मुंडे, सचिन माळी, सर्जेराव मोहिते, शामराव चौगुले, धनाजी कारंडे,बाळासो कोळी,महावीर कुरणे, बंटी जाधव, तुकाराम राठोड़, यांनी करून पारायण सोहळा यशस्वी केला.

   फ़ोटो 
हेरलेतील ज्ञानेश्वरी पालकी व दिंडी सोहळा

Tuesday, 10 December 2024

कॉपीमुक्त बोर्ड परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी शाळांना गृहपाठ



कोल्हापुरात विभागीय मंडळाची १७ डिसेंबर रोजी सभा 

कोल्हापूर / प्रतिनिधी

दहावी व बारावी बोर्ड परीक्षेतील गुणवत्ता वाढविणे आणि परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकार मुक्त करण्याच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर विभागीय मंडळाने तिन्ही जिल्ह्यात दोन टप्प्यात शाळाप्रमुखांच्या बैठकांचे आयोजन केले आहे. कोल्हापूर येथील विवेकानंद महाविद्यालयात मंगळवार दिनांक मंगळवार दिनांक १७ डिसेंबर रोजी आयोजित केलेल्या सभेवेळी पूर्वतयारी करूनच प्राचार्यांना उपस्थित राहण्याच्या सूचना विभागीय मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत. साताऱ्यात ११ व सांगलीत १२ डिसेंबर रोजी सभा आहे.

कोल्हापूर विभागीय मंडळाचे नूतन अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दहावी बारावी परीक्षा कॉपीमुक्त व गैरप्रकारमुक्त करून निकालातील गुणवत्ता वाढवण्याचा मनोदय पदभार घेतेवेळी व्यक्त केला होता, त्या दृष्टीने मंडळाच्या हालचाली सुरू झाल्या असून दरवर्षी घेतल्या जाणाऱ्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या प्राचार्यांच्या बैठकीस महत्त्व प्राप्त झाले आहे. शाळेची परीक्षेच्या अनुषंगाने प्रशासकीय, शैक्षणिक, तांत्रिक माहिती मुख्याध्यापक सभेसाठी विभागीय मंडळाचे सचिव सुभाष चौगुले यांनी मागवली आहे. तर जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनाही या बैठकीसाठी निमंत्रित करण्याबाबत जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी यांना कळविण्यात आले आहे.

येत्या मंगळवारी सकाळ सत्रात आजरा, भुदरगड, चंदगड, गडहिंग्लज, गगनबावडा, हातकणंगले व कागल या सात तालुक्यांची तर दुपार सत्रात करवीर, कोल्हापूर शहर, पन्हाळा, राधानगरी, शाहूवाडी व शिरोळ या सहा तालुक्यांची सहविचार सभा कोल्हापुरात होणार आहे. 

शाळा परिसर व वर्गातील सीसीटीव्ही, दिव्यांग विद्यार्थ्यांबाबतची माहिती, नोंदणी व शिक्षण संक्रमण मासिक, चालू वर्षीच्या परीक्षार्थी संख्येत झालेली वाढ किंवा घट, राज्य मंडळ व विभागीय मंडळ संकेतस्थळाचा वापर, मंडळाच्या मोबाईल ॲपचा विद्यार्थी व शिक्षकांकडून वापर, मागील वर्षाच्या निकालाची टप्पेनिहाय माहिती, उल्लास साक्षरता कार्यक्रमातील शाळेचा सहभाग, स्कूल प्रोफाइल, परीक्षक- नियामक, योग्यता व पात्रता प्रमाणपत्र, प्रात्यक्षिक परीक्षेची पूर्वतयारी, शास्त्रीय व लोककला संस्थांची माहिती, खेळाडू एनसीसी स्काऊट गाईड मधील वाढीव गुणांबाबत, प्रीलिस्ट दुरुस्ती, तोंडी परीक्षा, अंतर्गत मूल्यमापन, प्रकल्प, प्रयोगवही बाबतची माहिती, टंचाईग्रस्त व दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांच्या फी प्रतिपूर्तीबाबत यासह अनुषंगिक बाबींची शाळाप्रमुख यांनी पूर्वतयारी करून माहितीसह उपस्थित राहणे आवश्यक असल्याचे मंडळाने कळवले आहे.

 त्यास अनुसरून कोल्हापूर माध्यमिक शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी शाळांना बैठकीपूर्वी एक तास उपस्थित राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. अनुपस्थित राहिल्यास लेखी कारणे द्यावी लागणार आहेत.

बोर्ड परीक्षेची सर्वंकष माहिती होण्याच्या दृष्टीने तसेच येणाऱ्या परीक्षेची आवश्यक पूर्वतयारी करण्याच्या दृष्टीने विभागातील प्रत्येक जिल्ह्यात दोन टप्प्यात बैठकांचे आयोजन केले आहे.
-राजेश क्षीरसागर, विभागीय अध्यक्ष, कोल्हापूर मंडळ