Thursday, 30 January 2025

संविधान हा राष्ट्रग्रंथ : खासदार धैर्यशील माने

देश समृद्ध व सशक्त नागरिक घडवण्यासाठी संविधान आवश्यक :आमदार विनय रावजी कोरे



 संविधान महावाचन सप्ताह या उपक्रमाची  "युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड" मध्ये नोंद

हेरले / प्रतिनिधी

 भारतात विविध जाती धर्म पंत वर्गाचे लोक आहेत. या देशात गीता, बायबल, कुराण, रामायण, महाभारत, ज्ञानेश्वरी अशा धर्मग्रंथांचे पारायण केले जाते.त्याच पद्धतीने आज आदर्श गुरुकुल विद्यालय मध्ये संविधानाचे वाचन व जागर चला जातो ही अभिमानाची बाब आहे.भारतीय संविधान हे केवळ पुस्तक नसून तर संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे : असे प्रतिपादन खासदार धैर्यशील माने यांनी केले.

श्री माने पुढे म्हणाले की "मला अभिमान आहे की तुम्ही संविधान वाचन केलेले जागृत उमेदवारी होणार आहात.हे संविधान प्रत्येकाच्या मनामनात ऊर्जा ज्योत निर्माण करेल.या संविधान वाचन सप्ताहामध्ये ११११ राष्ट्र सैनिक बनवत आहात ही अभिमानाची बाब आहे.यातील एखादा सुजाण विद्यार्थी भविष्यात देशातील  पंतप्रधान बनतील यात शंका नाही."

देश समृद्ध व सशक्त नागरिक घडवण्यासाठी संविधान आवश्यक :आमदार विनय रावजी कोरे

आमदार विनय रावजी कोरे बोलताना म्हणाले की "सामान्य कुटुंब मध्ये जन्मलेला असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जे संविधान आपल्याला दिले. भारतीयांना आपले हक्क अधिकार कर्तव्याचे जाणीव झाली आहे. हा देश एखाद्या व्यक्तीमुळे किंवा नेत्यामुळे चालत नाही तर भारतीय संविधानामुळे हा देश चालतो.विविधतेने नटलेल्या भारतीयांना संघटित करून देश समृद्ध व सशक्त नागरिक घडवण्यासाठी संविधान आवश्यक आहे.

एस.एस.सी बोर्ड विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर बोलताना म्हणाले की "देशातील महत्त्वाचा दुसरा उत्सव म्हणजे प्रजासत्ताक दिन आहे.भारतीय संविधान हे केवळ जगातील सर्वात मोठे संविधान नसून सर्वश्रेष्ठ संविधान आहे.

स्वागत प्रास्ताविक मध्ये डॉ. डी. एस घुगरे" म्हणाले की गेल्या सात दिवसापासून दररोज चार तास या संविधानाचे वाचन हे ११११ विद्यार्थी करीत आहेत.
विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी व देशाप्रती श्रद्धा वाढवण्यासाठी या संविधानाचे वाचन आम्ही करत आहोत महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील हे विद्यार्थी असून भविष्यात हे आदर्श व्यक्ती बनतील.

चौकट.......
११११ विद्यार्थ्यांनी ७ दिवस ४ तास संविधान महावाचन सप्ताह केल्याचे नोंद.युनिव्हर्सल बुक ऑफ रेकॉर्ड याची नोंद झाली. आमदार विनयरावजी कोरे,खासदार धैर्यशील माने व आमदार अशोकराव माने यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन आदर्श गुरुकुल शिक्षण समूहास सन्मानित करण्यात आले.

Monday, 27 January 2025

राज्य अभ्यासक्रम आराखडा निर्मिती सदस्यपदी संदीप पाथरे यांची निवड


कोल्हापूर / प्रतिनिधी

 नवजीवन शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिये हायस्कूल ज्युनियर कॉलेज मधील क्रीडा शिक्षक संदीप पाथरे यांची
राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 यावर आधारित शालेय अभ्यासक्रम निर्मिती करिता शारीरिक शिक्षण व निरामयता या विषयाकरीता तज्ञ सदस्यपदी  यांची निवड झाली.राज्य शैक्षणिक संशोधन व शिक्षण परिषद एनसीईआरटी महाराष्ट्र पुणे मार्फत राज्य अभ्यासक्रम आराखडा 2024 तयार करण्यात येणार आहे.
         इयत्ता तिसरी ते दहावी करिता नवीन शालेय शिक्षण अभ्यासक्रम निर्मिती करण्यात येत आहे. यामधील शारीरिक शिक्षण व निरामयता या विषयाकरिता त्यांची निवड करण्यात आली आहे.श्री.पाथरे गेली २७ वर्ष क्रीडा शिक्षक व पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली कबड्डी, सॉफ्टबॉल, बेसबॉल या खेळात अनेक राष्ट्रीय खेळाडू घडले आहेत. ते कोल्हापूर जिल्हा शारीरिक शिक्षण संघटनेचे सचिव व करवीर तालुका शारीरिक शिक्षक संघटनेचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांना संस्थेचे अध्यक्ष श्री .दत्तात्रय गाडवे ,डायटचे प्राचार्य डॉ. राजेंद्र भोई .शारीरिक शिक्षण शिक्षक संघटनेचे राज्याचे अध्यक्ष शरदचंद्र धारूरकर व आर.डी.पाटील यांचे प्रोत्साहन लाभले.

माजी पंचायत समिती सभापती राजेश पाटील यांचा शिंदे शिवसेनेत प्रवेश


हेरले /प्रतिनिधी

 हेरले येथील हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेश पाटील यांनी गुरुवारी कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. उपमुख्यमंत्री यांनी राजेश पाटील यांच्या गळ्यात शिवसेनेचा भगवा स्कार्फ घालून त्यांचे स्वागत केले.
    माजी सभापती  राजेश पाटील यांच्या शिंदेसेना प्रवेशाने रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघातील राजकारण बदलणार आहे. रुकडी जिल्हा परिषद मतदार संघात खासदार धैर्यशील माने यांचे कट्टर विरोधक म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजेश पाटील यांनी शिंदेसेनेत प्रवेश केल्याने स्थानिक स्वराज संस्थेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर शिंदेसेनेकडून पक्षबांधणीला सुरुवात झाली आहे. शिंदेसेनेकडून खा. धैर्यशील माने आणि जिल्हा शिवसेना प्रमुख रवींद्र माने यांच्यावर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची कोल्हापूर जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आलेली आहे.
    रुकडी जिल्हा परिषद मतदारसंघात २०१७ च्या निवडणुकीत राजेश पाटील यांच्या पत्नी डॉ. पद्माराणी पाटील यांनी खासदार माने यांच्या पत्नीचा पराभव केला होता. गेली सात वर्षे कट्टर विरोधक आता एकत्र आले आहेत. रुकडी व हेरले दोन जिल्हा परिषद मतदार संघ होतील असे समजते. राजेश पाटील यांचा शिंदे शिवसेनेत खासदार धैर्यशील माने यांनी प्रवेश केल्याने या दोन्ही जिल्हा परिषद मतदार संघावर खासदारांचे वर्चस्व राहणार आहे.
      यावेळी  स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले  तालुका सरचिटणीस मुनीर जमादार, श्री छत्रपती शिवाजी सोसायटीचे चेअरमन अशोक मुंडे , माजी उपसरपंच संदीप चौगुले, श्री छत्रपती शिवाजी महाराज सहकारी दूध संस्थेचे चेअरमन सुनील खोचगे यांचा शिवसेना प्रवेश झाला.यावेळी उदय वड़ड, सूरज पाटील,माजी ग्रामपंचायत सदस्य बाळासो माणगावे  तुषार आलमान उपस्थित होते.

     फोटो 
हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजेश पाटील यांनी  कार्यकर्त्यांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत खासदार धैर्यशील माने यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.

Friday, 24 January 2025

मौजे वडगाव येथील जय हनुमान दूध संस्थेच्या नूतन इमारतीचा उदघाटन समारंभ संपन्न !


हेरले / प्रतिनिधी


 महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेले गायीच्या दुधाचे प्रति लिटर अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर तत्काळ जमा करण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे प्रतिपादन गोकुळ दूध संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे यांनी केले.ते मौजे वडगाव, ता.हातकणंगले येथील जय हनुमान सहकारी दूध व्यावसायिक संस्थेच्या नूतन इमारत उदघाटन प्रसंगी बोलत होते.
 आमदार अमल महाडिक, आमदार डॉ. अशोकराव माने यांच्या हस्ते व या कार्यक्रमाचे अध्यक्ष कोल्हापूर जिल्हा सहकारी ( गोकुळ) दूध संघाचे चेअरमन अरुणकुमार डोंगळे,गोकुळ दूध संघाचे माजी चेअरमन व जेष्ठ संचालक विश्वास पाटील(आबाजी), संचालक डॉ.  सुजित मिणचेकर, मुरलीधर जाधव, सहाय्यक निंबधक प्रदीप मालगावे, सरपंच कस्तुरी पाटील आदींची प्रमुख उपस्थिती होती.
डोंगळे पुढे म्हणाले, जय हनुमान संस्थेने संघाच्या धोरणांची अंमलबजावणी व पारदर्शक कारभार करुन दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय दिला आहे. भविष्यात दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत चांगल्या योजना राबविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे तसेच गोकुळ दूध संघ सोलर धोरण लवकरच अंमलात आणणार असल्याचे डोंगळे यांनी सांगितले.
 यावेळी बोलताना आमदार अमल महाडिक म्हणाले ,मौजे वडगाव, तासगाव हा कमी पाण्याचा भाग म्हणून ओळखला जात होता.या भागात सहकाराच्या माध्यमातून  दुग्ध व्यवसाय समृद्ध बनला आहे. गावातील तरुणवर्ग या व्यवसायाकडे एक वेगळा व्यवसाय म्हणून बघत आहेत.ही एक जमेची बाजू आहे.
याप्रसंगी आमदार अशोकराव माने, माजी आमदार डॉ.सुजीत मिणचेकर यांनीही मनोगत व्यक्त केले.
यावेळी उत्कृष्ट दूध पुरवठादारांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास उपसरपंच रघुनाथ गोरड, दूध संस्थेचे चेअरमन सतीशकुमार चौगुले, व्हा. चेअरमन इंदूताई नलवडे, संचालक बाळासो थोरवत, सुरेश कांबरे,महादेव शिंदे,रावसो चौगुले, सुभाष मुसळे,महादेव चौगुले, शकील हजारी, जयवंत चौगुले, नेताजी माने,जयश्री यादव,जयश्री रजपूत,सचिव आण्णासो पाटील यांच्यासह सर्व दूध उत्पादक सभासद, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.. 

फोटो..
मौजे वडगाव येथे हनुमान दूध संस्थेच्या नूतन इमारत उद्घाटनप्रसंगी दिप प्रज्वलन करताना आमदार अमल महाडिक, प्रसंगी अरुणकुमार डोंगळे, आमदार अशोकराव माने,विश्वासराव पाटील व मान्यवर.

कोल्हापूर जिल्ह्यातील शैक्षणिक संघटनांची सहविचार सभा संपन्न

.



कोल्हापूर / प्रतिनिधी

मुख्यमंत्री यांचे ७ कलमी कृती कार्यक्रम व शालेय शिक्षण मंत्री यांचे १० कलमी कृती कार्यक्रम कोल्हापूर जिल्ह्यात सक्षमपणे राबविण्यासाठी माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी केलेल्या आवाहनास कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संघटनांनी सहविचार सभेत सहमती दर्शविली.
   डॉ. एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर यांनी आपल्या दालनात
अध्यक्ष / सचिव, मुख्याध्यापक,शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना, (सर्व) खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा कोल्हापूर संघटना यांची सहविचार सभा आयोजित केली होती त्या प्रसंगी ते बोलत होते.
      माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर यांनी  शालेय शिक्षण मंत्री यांचे १० कलमी शिक्षणाचा कृती कार्यक्रम,महाराष्ट्र गीत "जय जय महाराष्ट्र माझा गर्जा महाराष्ट्र माझा" या गीताची सर्वत्र अंमलबजावणी करणे,मराठी अभिजात भाषा सर्व माध्यमांना अनिवार्य सर्व कर्मचारी, शिक्षक व अधिकारी शिक्षक यांना बंधनकारक, विद्यार्थी केंद्रित गुणवत्तापूर्ण व आनंददायी शिक्षण अशैक्षणिक कामे वगळून शिक्षकांच्या अडी-अडीचणीचे निराकरण करुन अध्यापनासाठी मुबलक वेळ देणे,सर्व शाळांचा विविध योजनाद्वारे विकास करणे,शाळा व्यवस्थापन समिती सक्षमीकरणात पालक व नागरिकांचा सहभाग वाढविणे, विद्यार्थी पालक - शिक्षक, व्यवस्थापन समिती, शैक्षणिक संस्था, अधिकारी यांच्या नाविन्यपूर्ण क्षेत्रीय कार्याचा यथोचित गौरव करणे,
राज्याच्या शैक्षणिक धोरणात विद्यार्थी, पालक, शिक्षक, व्यवस्थापन समित्या, शैक्षणिक संस्था, शिक्षण तज्ञ यांच्या विचारातील सकारात्मक मुद्यांचा समावेश करणे,शिक्षक भरती प्रक्रिया जलद गतीने राबविणे,विद्यार्थी आरोग्य व पोषण सक्षमपणे राबविणे, मिनी अंगणवाडी, इंग्रजी शाळा / क्लासेस फी नियंत्रण आदींची माहिती देऊन सर्व संघटनांनी हा १० कलमी कार्यक्रम यशस्वी करावा असे चर्चेत त्यांनी स्पष्ट केले.
     डॉ. आंबोकर पुढे म्हणाले की, होऊ घातलेल्या इयत्ता दहावी व बारावी बोर्ड परीक्षा कॉपीमुक्त होण्याचे अभियान राबविण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावे आणि विद्यार्थ्यांची परीक्षा भयमुक्त वातावरणात व्हावी यासाठी सर्वांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. त्या आवाहनास सर्व शिक्षक व शिक्षकेतर संघटनांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.
   या प्रसंगी माजी शिक्षक आमदार भगवान साळुंखे, शैक्षणिक  व्यासपीठ अध्यक्ष एस. डी. लाड, शिक्षक नेते दादासाहेब लाड, मुख्याध्यापक संघ अध्यक्ष राहुल पवार, सचिव आर. वाय. पाटील, शिक्षक भारती जिल्हा कार्याध्यक्ष बाळ डेळेकर, सुधाकर निर्मळे, बाबा पाटील, जगदीश शिर्के, मनोहर जाधव, राजेंद्र सुर्यवंशी, विष्णू पाटील, निलेश म्हाळुंगेकर, सुशांत शिरतोडे आदीसह शिक्षक व शिक्षकेत्तर संघटनांचे अध्यक्ष व सचिव उपस्थित होते.

फोटो 
माध्यमिक शिक्षणाधिकारी डॉ. एकनाथ आंबोकर कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक संघटनांची सहविचार सभेत बोलतांना शेजारी माजी आमदार भगवान साळुंखे एस. डी. लाड,दादासाहेब लाड,राहुल पवार, आर. वाय. पाटील, बाळ डेळेकर

Friday, 17 January 2025

आर टी ई प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू.


कोल्हापूर / प्रतिनिधी                                            

    शैक्षणिक वर्ष२०२५ - २६  मधील पहिलीसाठी २५ टक्के आरक्षण प्रवेश प्रक्रिया  ऑनलाईन पद्धतीने सुरू झालेली आहे.२७जानेवारी पर्यंत प्रवेशासाठी पालकांकडून ऑनलाईन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.अशी माहिती प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे यांनी प्रसिध्दीस दिली.
    यावर्षी प्रवेश प्रक्रिया लवकर सुरू झाली असून कोल्हापूर शहरांमधील अहिल्याबाई सेंट्रल गर्ल्स स्कूल मंगळवार पेठ या ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी समाजकल्याण विभाग कोल्हापूर व  प्राथमिक शिक्षण समिती मनपा कोल्हापूर यांच्याकडून मोफत सेंटर सुरू करण्यात आले आहे. तरी पालकांनी बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकार २००९  अधिनियमानुसार इंग्रजी व मराठी माध्यमाच्या खाजगी शाळांमध्ये २५ टक्के जागांवर दुर्बल व वंचित घटकातील बालकांच्या प्रवेशासाठी अर्ज करून त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत त्याचा लाभ होणार आहे. यासाठी आज अहिल्याबाई सेंट्रल गर्ल्स स्कूल मध्ये उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला.
   यावेळी प्राथमिक शिक्षण समितीचे प्रशासनाधिकारी आर. व्ही. कांबळे, आशा रावण बार्टी समाजकल्याण विभाग,शैक्षणिक पर्यवेक्षक बाळासाहेब कांबळे,जगदीश ठोंबरे लिपिक,शाळेच्या मुख्याध्यापिका सारिका पाटील,अध्यापिका मनीषा तळप, सुवर्णा पालकर, सर्व शिक्षा अभियानाचे अविनाश लाड,नचिकेत सरनाईक, अर्चना कुंडले,अस्मा पठाण,सुनील भांबुरे आदी उपस्थित होते. यावेळी आर टी ई प्रवेशासाठी आलेल्या पालकांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले

गोकुळ कर्मचाऱ्यांकडून मदतीचा हात

कोल्हापूर/प्रतिनिधी
गोकुळ दूध संघ ताराबाई पार्क विभागाकडील कंत्राटी कर्मचारी सौ.सुनीता संताजी मोरे यांचे पती जर्जर आजारांवर उपचार घेत आहेत.तो खर्च मोठा असल्याने तसेच आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने त्यांना मदतीचा हात देण्यासाठी ताराबाई पार्क येथील आस्थापना विभाग प्रमुख अशोक पुणेकर यांनी पुढाकार घेतला.त्यांच्या हाकेला साथ देत बघता बघता सुमारे पंचवीस हजार रुपये जमा झाले. 
ती रोख स्वरूपातील आर्थिक मदत  पशुसंवर्धन विभागाचे व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, आस्थापना विभागाचे प्रमुख अशोक पुणेकर, युनियन प्रतिनिधी निवास पाटील यांच्या हस्ते देणेत आली.
याप्रसंगी सहा.संकलन अधिकारी सुरेश पाटील, स्टोअर प्रमुख सुरेश पाटील, अशोक पाटील, विनोद पाटील,  पंडीत पाटील, मिलिंद जोशी, सुनिता कांबळे, सुनिल पाटील, रंगराव कोळेकर, चंद्रकांत बडेकर आदीसह ताराबाई पार्क कार्यालयातील कर्मचारी उपस्थित होते.
फोटो..
ताराबाई पार्क कोल्हापूर येथे कंञाटी कर्मचारी सौ.सुनीता मोरे यांना आर्थिक मदत देताना डॉ.प्रकाश साळुंखे, अशोक पुणेकर, निवास पाटील, सुनिता कांबळे आदी.

Thursday, 16 January 2025

कोहिनूर मेटॅलिक्स प्रा.लि. व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेन्ट्रलच्या वतीने विद्या मंदिर शाळेला पायाभूत सुविधा

कोल्हापूर / प्रतिनिधी

शिरोली औद्योगिक वसाहतीतील कोहिनूर मेटॅलिक्स प्रा.लि. व रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेन्ट्रलच्या वतीने श्रीरामनगर  येथील विद्या मंदिर शाळा क्रमांक ३ ला पायाभूत सुविधा देण्यात आल्या.
यावेळी बोलताना जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर यांनी वाचनातून बुद्धीचा विकास होतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी नेहमी वाचन करावे असे मत  व्यक्त केले. सरपंच शितल कदम या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होत्या.तर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे, रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सेन्ट्रलचे अध्यक्ष संजय भगत, प्राचार्य डॉ.महादेव नरके प्रमुख उपस्थित होते. 
श्रीमती शेंडेकर पुढे म्हणाल्या, प्राथमिक शाळांच्या पायाभूत सुविधांसाठी रोटरी सारख्या सामजिक संस्थांनी पुढे येणे गरजेचे आहे. शाळांमध्ये शिक्षणाबरोबरच मुलींसाठी स्वच्छतागृहे अत्यावश्यक आहेत. त्यामूळे समाजातील दानशूर व्यक्ती आणि संस्थांनी अशा प्रकारचे काम करुन शासकीय शिक्षण व्यवस्था बळकट करावी असे आवाहन त्यांनी केले.
याप्रसंगी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्य अध्यक्ष भरत रसाळे, रोटरीचे अध्यक्ष संजय भगत, प्राचार्य डॉ.महादेव नरके यांनी मनोगत व्यक्त केले.मुख्याध्यापिका खामकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.यावेळी कोहिनूर मेटॅलिकच्यावतीने उभारण्यात आलेल्या स्वच्छ्ता गृहाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी विविध पुस्तके भेट देण्यात आली.
उपसरपंच विलास गुरव, ग्रामपंचायत सदस्य आनंदा कांबळे, सौ. छाया बुवा, रोटरियन संदिप साळुंखे, अविनाश चिकनिस, राहुल माने, राजेश अडके, बदाम पाटील, ओंकार भगत, उमेश मालेकर आदी उपस्थित होते.
............................
फोटो.. 
राम नगर एमआयडीसी येथील विद्या मंदिर शाळा क्रमांक ३ ला पायाभूत सुविधा उद्घाटन प्रसंगी प्राथमिक शिक्षण अधिकारी मीना शेंडकर, शेजरी शितल कदम, भरत रसाळे, संजय भगत, महादेव नरके, अविनाश चिकनिस आदी.

वर्धापन दिनानिमित्त कोल्हापूर मंडळात विविध उपक्रम.


कोल्हापूर / प्रतिनिधी

सामूहिक ग्रंथवाचन, वृक्षारोपण, क्रीडास्पर्धा व फनी गेम्स, सांस्कृतिक कार्यक्रम आणि रक्तदान शिबिर 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या कोल्हापूर विभागीय मंडळात राज्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त विविध उपक्रम घेण्यात आले.

कोल्हापूर विभागीय मंडळामध्ये ०१ जानेवारी या राज्य मंडळाच्या वर्धापन दिनानिमित्त दि. ०१ ते १० जानेवारी २०२५ या कालावधीमध्ये विविध क्रीडा स्पर्धा व सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

१ जानेवारी रोजी सकाळच्या सत्रामध्ये पुस्तकांचे सामुहिक वाचन करण्यात आले व त्यानंतर वृक्षारोपणचा कार्यक्रम संपन्न झाला. प्राध्यापक डॉ. पी. डी. पाटील सर यांचे कथाकथन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ०७ जानेवारी रोजी सकाळी विभागीय अध्यक्ष, राजेश क्षीरसागर, सचिव सुभाष चौगुले, सहसचिव बी. एम. किल्लेदार, सहाय्यक सचिव हावळ एस.एल. व मंडळातील कर्मचारी यांच्या उपस्थितीमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे उदघाटन करण्यात आले. त्यामध्ये क्रिकेट, बुध्दिबळ, कॅरम, संगीत खुर्ची, हॉलीबॉल, लिंबू चमचा, बॅडमिटन या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. 

बुधवार दिनांक ०८ जानेवारी रोजी सायंकाळी एस.एम. लोहिया प्रशालेत यांच्या गडकरी हॉलमध्ये सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये गायन, नृत्य, फॅन्सी ड्रेस नकला असे विविध कर्मचाऱ्यांच्या गुणदर्शनाचे आयोजन करण्यात आले. शिक्षकमंचाच्या कलाकारांनी  सुमधुर गायन केले.

तसेच दिनांक १० जानेवारी रोजी मंडळ कार्यालयामध्ये महालक्ष्मी रक्तकेंद्र मंगळवार पेठ कोल्हापूर यांच्यामार्फत या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेवून १६ रक्तदान केले.

Wednesday, 15 January 2025

शिरोली औद्योगिक वसाहतीतील ग्नॅट फाउंड्रीच्या वतीने सीपीआर रुग्णालयास हजार चष्मे प्रदान

हेरले / प्रतिनिधी

राजश्री छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सीपीआर रुग्णालयास नेत्र चिकित्सा शास्त्र विभागाकरिता नॅट फाउंड्रीचे सुरेन्द्र जैन यांच्या वतीने एक हजार चष्मे प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय अंधत्व निर्मूलन कार्यक्रमांतर्गत रुग्णांना मोतीबिंदूच्या शस्त्रक्रिया नंतर आवश्यक असणारे चष्मे दिले जातात. महिन्याला सुमारे तीनशे मोतीबिंदू शस्त्रक्रिया सीपीआर मध्ये केल्या जातात. काही महिने हे चष्मे शासनाकडून प्राप्त न झाल्यामुळे रुग्णांची गैरसोय झाली होती. त्यामुळे नॅट फाउंड्री कोल्हापूरच्या वतीने देणगी स्वरूपात एक हजार चष्मे देणार असल्याचे जाहिर केले. त्यानुसार मंगळवारी आमदार राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीत चष्मे प्रदान करण्यात आले. यावेळी सुरेंद्र जैन यांनी शासनाकडून निधी प्राप्त होईपर्यंत सदर चष्म्यांचा पुरवठा ग्नॅट ट फाउंड्रीकडून केला जाईल असे जाहिर केले. 
यावेळी शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे अध्यक्ष राजू पाटील, गोशिमाचे अध्यक्ष स्वरूप कदम, कोल्हापूर इंजिनिअरिंग असोसिएशनचे अध्यक्ष बाबासाहेब कोंडेकर, उपाध्यक्ष कमलाकर कुलकर्णी, महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. एस. एस. मोरे, डॉ. अनिता साहेबानावार, वैद्यकीय अधीक्षक डॉ. शिशिर मिरगुंडे, नेत्ररोग विभागाच्या डॉक्टर पाटील, देणगी समिती सचिव महेंद्र चव्हाण उपस्थित होते. 
..............
फोटो..  
कोल्हापूर , सीपीआर रुग्णालयास नॅट फाउंड्रीचे सुरेन्द्र जैन यांच्या वतीने चष्मे देताना आमदार राजेश क्षीरसागर, शेजारी आशा जैन, राजू पाटील, बाबासाहेब कोंडेकर आदी.
...........................................

विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे : राजेश क्षीरसागर



कोल्हापूर /प्रतिनिधी
'शालेय वयात इयत्ता दहावी आणि बारावी इयत्तांच्या परीक्षांना महत्त्वपूर्ण स्थान आहे. शालेय जीवनात हा टप्पा करियरसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे विद्यार्थी या दोन इयत्तांच्या परीक्षांसाठी अभ्यासाची विशेष तयारी करतात. या परीक्षांसाठी विद्यार्थ्यांनी तणावमुक्त होऊन परीक्षेला सामोरे जावे', असा  सकारात्मक संदेश महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, कोल्हापूरचे विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी सहभागी विद्यार्थ्यांना दिला. जिल्हा परिषद कोल्हापूर अंतर्गत माध्यमिक शिक्षण विभाग आणि मुख्याध्यापक संघ, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या विद्यार्थ्यांच्या 'जिल्हास्तरीय ऑनलाईन उद्बोधन' सत्रात ते प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते. अध्यक्ष क्षीरसागर यांच्याच संकल्पनेतून या उद्बोधन सत्राचे आयोजन करणेत आले होते. त्यांच्यासोबत विभागीय सचिव सुभाष चौगुले यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले. मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील हे प्रमुख उपस्थित होते. डॉ. एकनाथ आंबोकर शिक्षणाधिकारी (माध्यमिक) जिल्हा परिषद, कोल्हापूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यशाळा संपन्न झाली.

या अभिनव उद्बोधन सत्रासाठी कोल्हापुरातील दादासाहेब मगदूम  विद्यालय आणि न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल येथील पन्नास निवडक विद्यार्थी, शिक्षक आणि पालकांचा सहभाग घेण्यात आला. तसेच सहभागी विद्यार्थी,पालक यांना शंका निरसन करण्याची सुद्धा संधी देण्यात आली.या सर्व उद्बोधन सत्राचे आभासी पद्धतीने यूट्यूब आणि फेसबुक या समाज माध्यमांद्वारे प्रक्षेपण करून जिल्ह्यातील सर्व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनाचा लाभ देण्यात आला.

इयत्ता दहावी,बारावी परीक्षेच्या अभ्यासाचे यापुढील वेळापत्रक कसे असावे यासंदर्भात दिगंबर मोरे उपशिक्षणाधिकारी माध्यमिक यांनी मार्गदर्शन केले.विद्यार्थ्यांनी परीक्षापूर्व आणि परीक्षा काळात आपले आरोग्य सांभाळावे तसेच तणावमुक्तीसाठी कांहीं कृती कराव्यात, या अनुषंगाने डॉ. शशिकांत कुंभार आणि डॉ. प्रवीण माने यांनी अचूक मार्गदर्शन केले.
भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रे,वाणिज्य या मूलभूत विषयांबाबत   ज्ञानेश्वर नारायणकर, सागर वातकर, सुधीर आमणगी, बाबासो माळवे, उत्तम कांबळे, श्रीमती सौदागर, व्ही . व्ही. माणगावकर श्री उपाध्ये आदी तज्ज्ञ शिक्षकांनी मार्गदर्शन केले. 

या उद्बोधन सत्रासाठी माध्यमिक शिक्षण विभागाचे उपशिक्षणाधिकारी गजानन उकिर्डे, दिगंबर मोरे, अजय पाटील,  शिक्षण विस्तार अधिकारी डी. सी. कुंभार, डॉ. विश्वास सुतार, धनाजी पाटील, जयश्री जाधव, रत्नप्रभा दबडे आणि राजेंद्र कोरे, नवनाथ कुंभार, किरण खटावकर यांनी परिश्रम घेतले. जयश्री जाधव यांनी सूत्रसंचालन केले.  गजानन उकिर्डे यांनी आभार मानले.

Monday, 13 January 2025

यु - डायस प्रणालीत राज्यस्तरावर कोल्हापूर जिल्हयाचा गौरव, दोन्ही शिक्षणाधिकाऱ्यांचा पुण्यात सन्मान !!


कोल्हापूर / प्रतिनिधी
  कोल्हापूर जिल्हयाने २०२३-२४ या शैक्षणिक वर्षात यु-डायस प्लस प्रणालीमध्ये विद्यार्थी आधार व्हॅलिडेशनचे काम ९७.८९ टक्के पूर्ण केल्याबद्दल राज्य प्रकल्प संचालिका श्रीमती आर. विमला यांच्या हस्ते कोल्हापूर जिल्हयाचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. मीना शेंडकर व माध्यमिक शिक्षणाधिकारी 
डॉ. एकनाथ आंबोकर यांचा उत्कृष्ट कामकाजाबद्दल सन्मानपत्रांनी गौरव करण्यात आला. 
   हॉटेल ऑर्कीड, बालेवाडी पुणे येथे पार पडलेल्या दोन दिवशीय राज्यस्तरीय कार्यशाळेत हा सन्मान करण्यात आला.
   केंद्र व राज्य सरकारमार्फत राबविण्यात येणा-या सर्व योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने केंद्र शासनाने यु-डायस प्लस प्रणाली विकसित केली आहे. या प्रणालीमध्ये राज्यातील मान्यता प्राप्त शाळेतील इयत्ता पहिली ते बारावी पर्यतच्या विद्यार्थ्याची सविस्तर माहिती संगणकीकृत केली जाते.  विद्यार्थी आधार व्हॅलिडेशन पूर्ण केलेल्या विद्यार्थ्याना विविध प्रकारच्या सरकारी योजनेच्या लाभासाठी ग्राहय धरण्यात येते.  विद्यार्थी आधार व्हॅलिडेशन पूर्ण असलेल्या निकषावरच शाळांना शिक्षक मान्य होतात.  त्यामुळे कोल्हापूर जिल्हा प्रशासनाने विदयार्थी व शिक्षक हिताच्या दृष्टीने विद्यार्थी आधार व्हॅलिडेशन कामाकाजास प्राधान्य दिले आहे. 
    तसेच या उत्कृष्ट कामगिरीबद्दल कोल्हापूर जिल्हयातील उपशिक्षणाधिकारी शंकर यादव, जिल्हा संगणक प्रोग्रॅमर घन:श्याम पुरेकर तसेच तालुकास्तरावरील सर्व गटशिक्षणाधिकारी, प्रशासन अधिकारी, एमआयएस कॉ-ऑडीनेटर व डाटा एन्ट्री ऑपरेटर असे सर्वाचे सन्मानपत्र देवून अभिनंदन करण्यात आले. या कामकाजासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन. एस. यांचे मार्गदर्शन लाभले.

Tuesday, 7 January 2025

विद्या मंदिर मौजे वडगाव शाळेत सावित्रीच्या लेकींचा गौरव

हेरले (प्रतिनिधी )

 मौजे वडगांव (ता . हातकणंगले) येथील विद्या मंदिर मौजे वडगांव या शाळेत बालिका दिनाचे औचित्य साधून सावित्रीच्या लेकींचा गौरव करण्यात आला. या अभिनव उपक्रमाचे हे पाचवे वर्ष होते. कार्यक्रमाचे स्वागत आणि प्रास्ताविक ज्येष्ठ अध्यापिका सायली चव्हाण यांनी केले. अध्यापिका सविता कांबळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या जीवन कार्याचा आढावा घेतला.
        पुणे लॉ फर्म च्या वकील दिपाली पाटील आणि मलकापूर वनक्षेत्राच्या वनरक्षक आफ्रिन देवळेकर या कार्यक्रमाकरिता प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. वकील दिपाली पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणातील योगदान सांगत आजच्या परिस्थितीमध्ये विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी कसे वागले पाहिजे ,याबाबत मार्गदर्शन केले. वनरक्षक आफ्रीन देवळेकर यांनी आपल्या वनरक्षक पदापर्यंतचा खडतर प्रवास विद्यार्थ्यांच्या समोर उलघडला.
              यावेळी मौजे वडगावच्या सरपंच सौ कस्तुरी पाटील यांच्या हस्ते दोन्ही प्रमुख पाहुण्यांना गौरवण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते अमर तराळ यांच्या सहकार्याने दरवर्षी दिला जाणारा आदर्श विद्यार्थिनी पुरस्कार यावर्षी सई नलवडे या विद्यार्थिनीला देण्यात आला. अमर तराळ यांच्या वतीने विविध स्पर्धेतील विजेत्यांना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
                 शाळेच्या वतीने सर्व शिक्षकांचा आणि उपस्थित सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा  सावित्रीचा वारसा हे सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक बाळासाहेब कोठावळे होते.
       अतिग्रे रोटरी क्लबचे अध्यक्ष राजू थोरवत यांनी आपल्या मनोगतात शाळेच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सृष्टी थोरवत आणि सावली कांबरे या विद्यार्थिनींनी केले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य सुतार वहिनी आणि तराळ वहिनी उपस्थित होत्या.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकांनी  विशेष परिश्रम घेतले.

कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या पुरस्कारांचे रविवारी वितरण


गुरुबाळ माळी यांना जीवन गौरव तर
संतोष मिठारी व ज्ञानेश्वर साळुंखे यांना जिल्हा उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार जाहीर : 
   कोल्हापूर / प्रतिनिधी
कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशनच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार गुरुबाळ माळी यांना जीवनगौरव, संतोष मिठारी यांना उत्कृष्ट पत्रकार ( प्रिंट मीडिया शहर ), अशोक पाटील यांना उत्कृष्ट जिल्हा पत्रकार व ज्ञानेश्वर साळुंखे यांना उत्कृष्ट पत्रकार ( इलेक्ट्रॉनिक मीडिया ) असे पुरस्कार जाहीर करण्यात आले. कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते  व दैनिक सकाळचे संपादक निखिल पंडितराव यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. संजय घोडावत विद्यापीठाचे विश्वस्त विनायक भोसले, संचालक डॉ. विराट गिरी व बी चॅनेलचे कार्यकारी संपादक ताज मुल्लांनी हे या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थित असतील. रविवारी ( दि. १२ जानेवारी २०२५ ) रोजी अतिग्रे येथील संजय घोडावत विद्यापीठाच्या सभागृहामध्ये सकाळी ११ वाजता हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती संघटनेचे अध्यक्ष सुधाकर निर्मळे व सचिव सुरेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
धनाजी गुरव यांना उत्कृष्ट सेवा,  दीपक ऐतवडे यांना उत्कृष्ट छायाचित्रकार व शिवाजी भोरे यांना उत्कृष्ट सोशल मीडिया नेटवर्क असे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 
   याव्यतिरिक्त कोल्हापूर जिल्ह्यातील बारा तालुके व सीमा भागातील निपाणीसह तालुक्यातील उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार राधानगरी तालुका  बाजीराव विष्णू सुतार (दैनिक पुढारी) हातकणंगले तालुका सचिनकुमार हिंदुराव शिंदे (दैनिक सकाळ) सचिन बाबासो पाटील (दैनिक पुण्य नगरी )शकील इमाम सुतार (दैनिक लोकमत )पन्हाळा तालुका सरदार हिंदुराव चौगुले(दैनिक  लोकमत) नंदकुमार बाबू बुराण 
(दैनिक पुण्य नगरी ) कागल तालुका प्रकाश लक्ष्मण कारंडे( दैनिक पुढारी)  एकनाथ आप्पासो पाटील
(दैनिक पुढारी )निपाणी तालुका  तात्यासाहेब रामचंद्र कदम(दैनिक महासत्ता) चंदगड तालुका संजय मारुती कुट्रे( न्यूज चॅनेल युवा संवाद),करवीर तालुका संभाजी शामराव निकम (दैनिक सकाळ) शाहुवाडी तालुका भिमराव महादेव पाटील (दैनिक तरुण भारत)
  गडहिंग्लज तालुका शिवकुमार प्रकाश संसुदी
( टाईम्स २४ ) शिरोळ तालुका सुभाष इंगळे
(  दैनिक महान कार्य ) जमीर पठाण(दैनिक पुढारी )
 भुदरगड तालुका शिवाजी दिनकर खतकर
( दैनिक पुण्य नगरी) संदीप बाबुराव दळवी
( दैनिक महासत्ता )आजरा तालुका  रवींद्र महादेव येसादे दैनिक लोकमत / दैनिक नवराष्ट्र
गगनबावडा तालुका संतोष निवृत्ती साखरीकर
( संपादक साप्ताहीक दिनदयाळ ) आदी
 १९ पत्रकारांना उत्कृष्ट तालुका पत्रकार पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
   कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोर्टर्स वेल्फेअर असोसिएशन ही कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांसाठी कल्याणकारी सेवा करणारी संघटना आहे. या संघटनेच्या वतीने प्रतिवर्षी जिल्ह्यात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विविध माध्यमातील माध्यम प्रतिनिधींना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात येते. त्याचबरोबर ग्रामीण  पत्रकारांमध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होऊन त्यांना प्रोत्साहन मिळावे यासाठी उपक्रम राबविले जातात. संघटनेकडे जिल्ह्यातील ४०५ पत्रकार आजीव सभासद असून सुमारे नऊ लाख रुपयांची ठेव आहे. पत्रकार दिनाच्या कार्यक्रमासाठी जागल्या ही विशेष स्मरणिका प्रकाशित करण्यात येते. या स्मरणिकेस मिळणाऱ्या जाहिरातीच्या उत्पन्नातून वर्षभरातील विविध उपक्रम राबविले जात असल्याची माहिती अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांनी दिली. या वेळी संघटनेचे उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, जागल्या स्मरणिकेचे संपादक, कौन्सिल मेंबर प्राध्यापक रवींद्र पाटील, खजानिस सदानंद कुलकर्णी, संघटनेचे कोअर कमिटी मेंबर सतीश पाटील उपस्थित होते.