Sunday, 21 May 2017

ORS पिणे अत्यंत फायदेकारक

आला उन्हाळा तब्येत सांभाळा असे नेहमीच म्हणले जाते ,कारण उन्हाळ्यात बाह्य तापमान वाढल्याने
शरीरातील यंत्रणा सक्रिय होऊन आपल्या शरीराचे तापमान स्वतः नियंत्रित करू पाहते ( ऑटोमॅटिक) यासाठी शरीरातील पाणी घामावाटे बाहेर टाकून शरीर थंड ठेवण्याच्या प्रक्रियेचा प्रामुख्याने समावेश होतो पण नेमके याच वेळेस होते काय कि घामावाटे पाण्याबरोबरच काही महत्वाची इलेक्टलाईट्स हि बाहेर टाकली गेल्याने आपल्याला थकवा जाणवतो , कधी कधी उष्माघात होऊन सलाईनही लावावे लागते अश्या वेळेस अत्यंत सोपा असा मार्ग आहे तो म्हणजे ORS चा .
          ORS हि एक जीवनदायक संजीवनीच आहे ज्याला WHO ने प्रमाणित केले आहे ,सर्व प्रथमोपचारामध्ये याचा समावेश आहे . आता तर हल्ली तयार ORS टेट्रापॅकमध्येही सर्व मेडिकल शॉपमध्ये उपलब्ध असते , एक ORS टेट्रापॅक म्हणजे जवळपास एक सलाईनच्या ताकद देणारे असते ,ORS चा अर्थच मुळी ओरल रेहायड्रेट सोलुशन असा म्हणजेच तोंडावाटे घ्यायची असा आहे , लहान मुलापासून ते वयोवृद्धांपर्यंत कोणीही घेऊ शकतो याला डॉक्टर  सल्ल्याचीही गरज अजिबात नाही , आता तर हल्ली हॉस्पिटलमध्ये पेशंटला पाहायला जाताना नातेवाईक व मित्र मंडळी बिस्कीट ब्रेड असे बेकरी पदार्थ नेण्याऐवजी ORS ला प्राधान्य देऊ लागली आहेत .
     आणि जाता जाता एक उदाहरण आमचा एक मित्र ज्याला अपघात झाला होता ,त्याच्या पायावरून वाहनाचे चाक गेल्याने पाय पूर्ण निकामी झाला होता पण डॉक्टरांचे कौशल्य , पेशंटची मानसिक मजबुती व पेशंट मूळचा खेळाडू असल्याने शारीरिक क्षमता यांचा मेळ जुळून आल्याने पाय  बचावला यावेळी त्याला भेटायला गेलो होतो ,जेवण जात न्हवते तर त्याने १०० ORS चा एक बॉक्स मागवला व रोज दिवसातून ५ वेळा ORS प्यायला आज त्याची तब्येत एकदम खणखणीत आहे व पायही पूर्ववत होत आहे .

Thursday, 18 May 2017

७४ वर्षांचे निवृत्त शिक्षक दररोज जगतायत स्वच्छ भारत अभियान

एके काळी निसर्गसाखळीच्या दृष्टीने मृत घोषित कऱण्यात आलेला नैनी तलाव हा दिल्लीतील मॉडेल टाऊन या एका मोठ्या वसाहतीत आहे. गेली कित्येक वर्ष या तलावाचा मुद्दा महापालिकेसाठी आणि स्थानिक राजकारण्यांसाठी वादाचा मुद्दा राहिलेला आहे. दोन वेळा या तलावाच्या जागी उद्यान होता होता राहिले आहे आणि हा तलाव अजूनही टिकून राहिला आहे. नशीबानेज्या स्थानिकांनी या तलावाचे सौंदर्य पाहिले आहे त्यांनी या तलावाला वाचविण्यासाठी कडवा लढा दिला. त्यांनी या तलावाचे अजून एक टाकाऊ उद्यान होण्यापासून तसेच शहरातील इतर पाणवठ्यांप्रमाणे या तलावाचा दुर्गंधीयुक्त नाला होण्यापासून बचाव केला.
                               स्वच्छ शहराच्या मुद्द्यासाठी लढणाऱ्या नागरिकांपैकीच एक आहेत ७४ वर्षांचे जलेश्वर नाथ पांडे हे निवृत्त शिक्षक. नैनी लेक आणि उत्तर दिल्लीमधील इतर अनेक उद्याने आज इतर उद्यानांच्या तुलनेत स्वच्छ राहिली आहेत यात पांडे यांचा सिंहाचा वाटा आहे. ते 'वन मॅन आर्मी' आहेत आणि क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे ही म्हण त्यांनी कृतीत आणली आहे. गेल्या सात वर्षांहून अधिक काळापासून पांडे रोज पहाटे नैनी तलावापाशी जातात आणि तो परिसर आपल्याकडील केरसूणीने स्वच्छ करतात आणि त्यानंतर इतर उद्यानांमध्ये जातात. त्यांच्या आजुबाजूने जाणारे त्यांची थट्टाही करतातपण त्याने ते अजिबात विचलित होत नाहीत. हे ज्येष्ठ नागरिक आपला रोजचा नेम चुकवत नाहीत आणि ही स्वच्छता करताना त्यांचे मनही स्वच्छच असते.
केवळ कल्पना करून शेतात पिक येऊ शकत नाहीचांगल्या गोष्टी घडण्यासाठी मेहेनत करावीच लागेल, यावर त्यांचा विश्वास आहे. सार्वजनिक ठिकाणच्या या त्यांच्या स्वच्छता अभियानाची थट्टा होतेपण ते त्या थट्टेकडे दुर्लक्ष करतात. स्वच्छ भारत अभियानात प्रत्येक नागरिक त्याचा वाटा उचलत नाही तोपर्यंत ही योजना उपयोगाची नाहीअसे त्यांचे मत आहे. जलेश्वर नाथ अगदी विनम्रतेनेअभिमानाने आणि हसतमुखाने सांगतात की त्यांच्या वैयक्तिक स्वच्छता अभियानापासून त्यांना काहीही आणि कोणीही थांबवू शकत नाही.

बजाज व्ही इन्व्हिन्सिबल इंडियन्सच्या सौजन्याने 

Tuesday, 16 May 2017

टॅटू काढणे त्वचेला घातक

     
          शरीरावर वेगवेगळ्या भागांवर टॅटू काढण्याची आजकालच्या तरुणाईची फॅशन झाली आहे. टॅटू काढणे म्हणजे आपण किती फॉरवर्ड आहोत हे दाखवण्याचे लक्षण मानले जात आहे , पूर्वी गोंदण काढले जायचे पण त्यासाठी लागणारे रंग हे नैसर्गिक पदार्थांपासून तयार केले जायचे या बाबतीत वैदू लोकांची खासियत असायची पण आता याला पूर्ण व्यावसायिक रूप आले असून टॅटू आकर्षक व टिकाऊ  होण्याकरिता अत्यंत तीव्र अश्या कृत्रिम रासायनिक रंगांचा वापर हमखास केला जातो यावेळी त्वचेच्या आरोग्याची काळजी बिलकुल घेतली जात नाही .
           नुकताच टॅटूमुळे त्वचेचा  जंतूसंसर्ग झाल्याने जीवावर बेतण्याची घटना थायलंडमध्ये घडली आहे पासुदा नावाच्या तरुणीने गळ्यावर फुलांचा मोठा टॅटू काढला होता रासायनिक केमिकलचा वापर करून टॅटू काढण्यात  येतो. मात्र टॅटू काढल्यावर  त्यात जंतूसंसर्ग झाल्याने पासुदाच्या गळ्यावर गंभीर जखम झाली आणि कालांतराने तेथे पांढरा चट्टा पडल्याचे दिसून आले.या तरुणीने काही फोटो इंन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. त्यात गळ्यावरील लाल जखम आणि त्यानंतर पडलेला पांढरा चट्टा स्पष्ट दिसत आहे.
      तेंव्हा येथून पुढे टॅटू काढताना सावधान !

MH9 LIVE NEWS आवडल्यास जरूर लाईक करा व शेअर करा !

Monday, 15 May 2017

असह्य गुडघेदुखी



प्रत्येकाला आयुष्यात उतारपणी सोसावी लागणारी अशी गुडघेदुखी !
    खाण्यापिण्याच्या अनियमित वेळा, अपूरी झोप, वाढणार वजन,व्यायामाचा अभाव यामुळे इतर शारिरीक समस्यांबरोबरच वयस्कर लोकांबरोबरच  तरुणांमध्ये ऑस्टीयो अर्थरायटीस हा आजार बळावतोय. दरवर्षी एक लाखाहून अधिक जण या आजाराने ग्रस्त होत आहेत.सांधे,मांसपेशी व हाडाशी संबंधित असलेला हा आजार ऐन विशीतील तरुण गुडघेदुखी, कंबरदुखी,मानेचे दुखणे,हातापायाची बोटी वाकडी होणे यांनी आजारी पडू लागली आहेत.हाड,सांधे व मांसपेशीशी संबंधित हा आजार हळूहळू बळावतो. हाड मांसपेशी कमकुवत होतात. हाडं ठिसूळ झाल्यामुळे गुडघ्यातील दोन सांध्यांमध्ये प्रचंड वेदना होतात. त्यातच जर रुग्ण स्थूल असेल तर शरीराचा भार गुडघ्यावर येतो यामुळे त्या व्यक्तीस अधिक त्रास होतो. वाढलेल वजन,मुका मार,कमकुवत हाड यामुळे सांधेहुखीच हे दुखण दिवसेंदिवस वाढत जात.
       पण वजन कमी केल्यास तसेच नियमितपणे महानारायण तेलाने मालिश केल्यास गुडघे दुखी  या आजारावर नियंत्रण मिळवता येत.
       रोज सकाळी काही ठराविक व्यायाम केला व तेल जिरवून मालिश केल्यास  तरीही रुग्णास आराम मिळतो.
          तरुणांनी रोजच्या धावपळीतून जर थोडा वेळ व्यायामासाठी दिला व आहारात बदल केला आणि नियमितपणे तेलाने मालिश केले म्हणजेच सांध्यांना वंगण केल्यास आयुष्यात कधी असह्य गुडघेदुखीस सामोरे जावे लागणार नाही.

edited by - Dnyanraj Patil

MH9 LIVE NEWS आवडल्यास अवश्य लाईक व शेअर करा

जंक फूडची चटक जीवनाला अटक






BY - DNYANRAJ PATIL, KOLHAPUR

मॅगी, बर्गर, पिझ्झा, पास्ता, हे पाश्‍चात्य पदार्थ चवीला चटकदार असल्याने, शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांतही हे पदार्थ खाण्याचे प्रमाण सातत्याने वाढतच आहे. श्रीमंत, मध्यमवर्गीय पालक आपल्या मुलांचे फाजील लाड तर करतातच, पण त्यांच्या हट्टासाठी असे चटकदार पदार्थ उपहारगृहात आपल्या मुलांना नेऊन खाऊही घालतात. या बरोबरीने हल्ली चायनीज ,मंचुरियन ,चिकन ६५ असे आरोग्यास घटक पदार्थही लोकांना चटक लावत आहेत ,एक वेळ घरची भाजी भाकरी खाणार नाही पण नुसत्या चायनीज राईस व नूडल्स वर दिवस काढणारे पुष्कळ आहेत .
          पिझ्झा, बर्गर आणि साखर, मैदायुक्त बेकरी पदार्थांच्या अतिखाण्यामुळे लठ्ठपणाचे प्रमाण खूपच वाढते आहे आणि असे पदार्थ खाण्याने  आरोग्यही बिघडत असल्याने,  सर्वांनीच या महत्त्वाच्या बाबतीत गांभीर्याने विचार करावा आणि  आरोग्य चांगले राहण्यासाठी अशा घातक पदार्थांपासून स्वतःला  दूर ठेवावे.
                  देशात पाश्‍चात्य चंगळवादी संस्कृती रुजली आणि फोफावली. पाश्‍चात्य खाद्य पदार्थांची चटक शहरी-ग्रामीण भागातील लोकांना लागली. ज्यादा मीठ, साखर आणि मेदयुक्त पदार्थ असलेल्या या कमी पोषण मूल्यांच्या पाश्‍चात्य पदार्थांमुळे लठ्ठपणा, दातांचे विकार, मधुमेह, हृदयविकारांसह अनेक विकार बळावत असल्याचा इशारा यापूर्वी देशातील वैद्यकीय आणि आरोग्य तज्ञांनी वारंवार दिला आहे. नुकताच मानवी आरोग्याला प्रचंड धोकादायक आणि विविध आरोग्याच्या समस्यांना कारणीभूत असलेल्या ‘जंक फूड’वर शाळांच्या उपहारगृहात बंदी आणण्याचा राज्य सरकारने घेतलेला निर्णय लोक आणि विद्यार्थ्यांच्या हिताचाच आहे.

MH9 LIVE NEWS आवडल्यास अवश्य लाईक व शेअर करा .

Sunday, 7 May 2017

‘भाकरीचे गाव’ अशी ओळख असलेले ‘तक्का गाव’



'भाकरीचा चंद्र शोधण्यातच जिंदगी बर्बाद झाली' किंवा ‘अरे संसार, संसार आधी हाताले चटके, तवा मिळते भाकर !’ या ओळीचा संदर्भ जरी वेगळा असला तरी त्यातील भाकर ही पनवेल तालुक्यातील तक्का गावाची वेगळी ओळख म्हणून उभी राहिली आहे. आयुष्य हे भाकरी भोवतीच कसे फिरते किंवा पावलो पावली कसे चटके देते ते दाखवणार्‍या या ओळी पनवेल शहराजवळील तक्का गावातील महिलांसाठी वरदान ठरल्या असून भाकरी बनवून गावातील प्रत्येक महिला ही सक्षम बनली आहे. स्वतःला सक्षम बनवताना तिने आपल्या कुटूंबाला देखील आधार दिला आहे.




पनवेल तालुक्याच्या विकासाबरोबर तालुक्यातील गावाची ओळख बदलत चालली आहे. गावाची शहरे झाली, बंगल्याचे इमले झाले, इतके असताना देखील याच तालुक्यातील पनवेल शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या तक्का गावातील महिलेच्या जिद्दीमुळे आज देखील हे गाव एक ‘गाव’ म्हणून ओळखले जाते. या मागचे कारण म्हणजे या गावात घरी बनवल्या जाणार्‍या तांदळाच्या भाकरी. या गावातील प्रत्येकाच्या घरात ‘तांदळाची भाकरी’ हेच खाद्यपदार्थांमधील मुख्य अन्न आहे. घरात मच्छी किंवा मटण असेल तर बरोबर तांदळाची भाकरी असल्या तरच हे खाद्य रूचकर लागत असल्याची भावना व्यक्त होत आहे. घरात केवळ कुटूंबासाठी बनवली जाणारी या तांदळाच्या भाकरीने पनवेल तालुक्यातील तारांकीत हॉटेल, ढाबे यांनी घेतली आहे. आणि या हॉटेल तसेच ढाब्यामध्ये जाणारी ही भाकरी तक्का गावातील असल्याचे या गावातील महिला ठणकावून सांगत आहे. या गावातील महिलांबरोबर गावातील सर्व सदस्यांसाठी ओम साई महिला मंडळाने रोजगार उपलब्ध करून दिला आहे. या मंडळामध्ये जवळपास ४० महिला कार्य करीत आहेत. या महिला सकाळी व संध्याकाळी ऑर्डरनुसार भाकर्‍या बनवतात. ही केवळ तांदळाची भाकरी नाही तर तांदळामधून उकड काढून पाण्यावर थापून ही बनवली जाते. जवळपास एक महिला दिवसाला ५० भाकर्‍या बनवते. तसेच दिवसातून येणारी भाकर्‍यांची ऑर्डर ही महिला मंडळामध्ये समसमान रितीने वाटून घेतली जाते, अशी माहिती महिला मंडळाच्या अध्यक्षा सुनंदा वाघिलकर यांनी दिली. दीड हजारा पासून ते पाच हजारा पर्यंतच्या तांदळाच्या भाकर्‍यांची ऑर्डर घेत असल्याचे महिलांनी सांगितले. या गावातून दिवसाला हजारो भाकर्‍यांची ऑर्डर पनवेल परिसरातील मोठ-मोठे ढाबे व पंचतारांकीत हॉटेलमध्ये जात असल्याचे वाघिलकर यांनी सांगितले. तर या रोजगारामुळे एक महिला महिन्याला जवळपास १० हजार रूपये कमवते. या व्यवसायाच्या माध्यमातून आलेल्या कमाईतून प्रत्येक महिला ही १०० रूपये जमा करून सर्व महिलांकडून विशिष्ट रक्कम जमा केली जाते. जमा झालेल्या या एकूण रक्कमेतून पनवेल परिसरात लोकोपयोगी समाजकार्य केले जातात. आत्तापर्यंत जमा झालेल्या एकूण रक्कमेतून मंदिर व शाळांना जवळपास ८ इन्व्हर्टर दिले गेले असल्याचे महिला सदस्यांनी सांगितले.
खापरावरची भाकरी  
तांदळाच्या पिठाची उकड बनवलेली ही भाकरी खास करून खापरावर बनवली जाते. तसेच पीठात मळण्यापेक्षा ही पाण्यासोबत मळली जाते. तेव्हाच या भाकरीला चव येते. सध्यातरी विविध समारंभांमध्ये या भाकर्‍यांना चांगलीच मागणी आहे
 ,your story च्या सौजन्याने 

Saturday, 6 May 2017

चिकन 65 व चायनीज खाणार त्याला कॅन्सर होणार ?


आजच्या धावपळीच्या युगात फास्टफूड या नव्या खाद्य संस्कृतीची भुरळ सर्वांनाच पडली आहे. त्यामुळे कोल्हापुरात  ठिकठिकाणच्या खाद्यपदार्थांच्या गाडय़ांवर आपल्याला रोजच गर्दी पहायला मिळते व त्यात चायनीज पदार्थांचे वेड तरुणाईत खूपच लागले आहे. पण जिभेचे चोचले पुरवणार्या या चायनीज पदार्थ आरोग्यास किती घातक आहेत, याची जराही कल्पना आजच्या तरुणाईला नाही. पण कोल्हापूरा तील चायनीज हॉटेल व रस्त्याच्या कडेला लागणार्या चिकन 65 व चायनीज गाडय़ांवर बनवल्या जाणार्या पदार्थांमध्ये `अजिनोमोटो’ नामक पावडर वापरली जात असल्याची बाब आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे.
     चिकन 65  व  चायनीज पदार्थांमध्ये वापरण्यात येणारे कृत्रिम रासायनिक रंग, सॉस व नूडल्स आरोग्यास घातक असल्याचे तज्ञ डॉक्टरांकडून वारंवार सांगितले जाते.अन्नपदार्थांमधील भेसळीच्या वाढत चाललेल्या प्रकरणांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न हा दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालला आहे. कारण आज चिकन 65 व  चायनीज पदार्थांचे स्टॉलवाले स्वतःचे खिसे भरण्यासाठी ग्राहकांच्या जीवाशी खेळ करत आहे.
          रस्त्यावर अतिक्रमण करून राजरोसपणे धंदा करणाऱ्या अश्या चिकन 65 व  चायनीज पदार्थांचे स्टॉलवर महानगर पालिका अतिक्रमण विभागाने कधीही कारवाई केल्याचे ऐकिवात नाही ना आरोग्य विभागाला याची फिकीर आहे
            अजिनोमोटो म्हणजेच एम एस जी या पदार्थावर जरी खाद्यपदार्थात वापरास बंदी असली तरी हा चव येण्यासाठी सर्रास वापरला जातो याचे कॅन्सर व मेंदूवर घातक परिणाम होतात , आरोग्य विभागाला जरी याची फिकर नसली तरी सुजाण नागरिकांनीच जागरूक होऊन आपण होऊन या पदार्थांवर बहिष्कार घातला पाहिजे , यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करणे महत्वाचे ठरेल .