Tuesday, 30 January 2018

पिंपळगाव ग्रामपंचायतीकडून पाणी पुरवठा विहीर स्वच्छतेचे काम सुरू

सिद्धनेर्ली  (वार्ताहर) दूधगंगा नदीच्या पाण्याच्या पातळीत कमालीची घट झाल्यामुळे सध्या पिंपळगाव खुर्द (ता कागल) येथील गावकऱ्यांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे  यावर उपाय म्हणून पिंपळगाव ग्रामपंचायतीने तलावाशेजारी असणारी गावच्या पाण्याची सोय करण्यासाठी असणारी विहीर स्वच्छ करण्याचे काम हाती घेतलेले आहे .लवकरच ह्या हे काम पूर्ण होणार असून या पुढे या विहिरीच्या माध्यमातून गावाला पाणी पुरवठा करण्यात येणार आहे.
                सध्या पिंपळगावला पाणी पुरवठा हा दुधगंगा नदीतून केला जात आहे ,पण काही वेळेला ह्या पाण्याच्या कमतरतेमुळे गावाला पाणी टंचाईचा सामना करावा लागतो ,ह्या आधी या गावाला पिण्याच्या पाण्यासाठी गावात असणाऱ्या विहिरीच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जायचा पण जेव्हा पासून नदीच्या पाण्यावर गावकार्याची तहान भागू लागली आहे तेव्हा पासून ह्या विहिरीकडे साफ दुर्लक्ष झालेलं होते त्या मुळे सध्या  ह्या विहिरीतील असणारे पाणी पूर्ण पणे हिरवे झालेले आहे त्याच बरोबर विहिरीच्या कठड्यावर आणि शेजारी झाडेझुडपे मोठ्या प्रमाणावर वाढली आहेत.वेळीच लक्ष न दिल्याने सध्या ह्या विहिर मोडकळीस आली आहे.नदीतील पाणी कमी पडू लागणल्याने पुन्हा ह्या विहिरीकडे प्रशासनाचे लक्ष गेल्याने सध्या ह्या ठिकाणी स्वच्छतेचे काम ग्राम पंचायतीने हाती घेतले आहे.
फोटो-पाणी पुरवठा करणयात येणाऱ्या विहिरींची स्वछता करताना पिंपळगाव खुर्दचे ग्रामपंचायत कर्मचारी (छाया -रवींद्र पाटील)

Monday, 29 January 2018

केडीसीसीच्या विविध कर्ज योजनांचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व कॅशलेस व्यवहार करावा - संजय कुडचे

हेरले /प्रतिनिधी  दि.र९/१/१८
       मौजे वडगाव येथे कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या वतीने चालू केलेल्या विविध कर्ज योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा व कॅशलेस व्यवहार करावा असे प्रतिपादन हातकणंगले तालुका आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख संजय कुडचे यांनी केले. ते दत्त विकास सेवा सोसायटीमध्ये शेतकरी सुसंवाद मेळाव्यात बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सरपंच काशीनाथ कांबळे होते.
       केंद्रप्रमुख कुडचे पुढे म्हणाले की ;केडीसी बँकेच्या वतीने ग्रामीण भागातील शेतकऱ्यासाठी विविध योजना सुरू केल्या असून त्यामध्ये सुवर्णकन्या सोने खरेदी योजना ,छोटे व्यापारी यांच्यासाठी उन्नती योजना , व्यावसायिकांसाठी गृहकर्ज योजना , आधार पेन्शन योजना , हम सफर वाहनकर्ज योजना , पगारदारांसाठी गृहकर्ज योजना , तर शेतकऱ्यासांठी बिनव्याजी सोलर खरेदी कर्ज योजना, 'तसेच पुरुष व माहिला बचत गटांसाठी विविध योजना असून अधिक माहीती साठी संबधीत जवळच्या शाखेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले
     या प्रसंगी हेरले शाखेचे बँक इन्स्पेक्टर आर .डी. चौगुले , अनिल कांबळे , पोलिस पाटील आमिर हजारी  प्रकाश सावंत , गौतम तराळ ' कृष्णात गोरड रघुनाथ काकडे , मोहन शेटे , महालिंग जंगम ;मनोहर चौगुले ,  वंदना भोसले , राजश्री लोहार ;यांच्यासह संचालक  कर्मचारी वर्ग तसेच शेतकरी वर्ग मोठया प्रमाणात उपस्थित होते.प्रास्ताविक संस्थेचे चेअरमन अॅड.विजय चौगुले यांनी केले तर आभार संस्थेचे सचिव महेश माने यांनी मानले.
        फोटो कॅप्शन
मौजे वडगांव येथे मार्गदर्शन करतांना आर्थिक साक्षरता केंद्र प्रमुख संजय कुडचे व इतर मान्यवर.

मसल वर्क्स जिम या अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उदघाटन

हेरले / प्रतिनिधी : टि.२९/१ / १८
    मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील मसल वर्क्स जिम या अत्याधुनिक व्यायाम शाळेचे उदघाटन  इंडियन रनर ऑल नॅशनल प्लेअर दुर्गाप्रसाद दासरी यांचे  प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
              दुर्गाप्रसाद दासरी हे मुळचे आंध्र प्रदेश  राज्यातील असुन चाळीस वर्षा्पूर्वी त्यांचे आईवडील कोल्हापूर येथे स्थाईक झाले, त्यांचे शिक्षण कोल्हापूर मध्येच झाले.गेली दहा वर्ष झाली ते या क्षेत्रात असुन दोन वेळा 'भारत श्री ' उपविजेता, तिन वेळा 'महाराष्ट्र श्री ' १८१८किताब जिंकले आहेत. त्यांनी युवकांना बॉडी बनविणे अगोदर फिटनेस कडे लक्ष देणे यामध्ये कष्ट आवश्यक आहे,व्यायामला सुरूवात करणे महत्वाचे, खाण्यावर सुरूवातीला कमी भर द्या, टप्या टप्याने व्यायाम वर भर दया, आणि व्यायामाला सुरूवात करा. ही व्यायामशाळा अतिशय चांगली केली असुन शहरी भागातील व्यायाम शाळेसारखी आहे असे त्यानी मत व्यक्त केले. यासाठी त्यांनी शिवकुमार लंबे, गणेश डोरले, अनिल कांबळे,यांचे व त्यांचे आईवडील यांच मुलाना चांगला उद्योग सुरू करणेस मदत केली म्हणून आभार मानले. तसेच गावातील युवकांना एक चांगला आदर्श घालून देऊन शरीरयस्टी बनविनेचे चांगले साधन यानी युवकांना उपलब्ध करून दिलेचे समाधान व्यक्त केले,.
     यावेळी त्यांचा सत्कार प्रकाश लंबे व पांडुरंग डोरले यांनी केला.त्यांचे सहकारी मंगेश कोटकर यांचा सत्कार अनिल कांबळे व अशोक लंबे यांनी केला.यावेळी उपसरपंच किरण चौगुले ,पि. के. सामाजीक सेवा ग्रुपचे प्रकाश कांबरे तसेच बॉडी बिल्डर रोहन चव्हाण, राकेश जठार, हिम्मत जठार, प्रशिक्षक कुमार ,किरण , प्रभाकर लंबे, सुनिल गरड, असिफ हजारी, सुधीर तोरस्कर, गावातील  युवक उपस्थित होते.स्वागत राहूल लंबे यांनी तर प्रास्तवीक अमर तराळ यांनी केले.
        फोटो
मौजे वडगांव येथे नूतन व्यायाम शाळेचे उद्घाटन प्रसंगी दुर्गाप्रसाद दासरी व इतर मान्यवर.

शिक्षण बचाव कृती समितीची सभा पुणे येथे संपन्न

हेरले/ प्रतिनिधी  दि.र९/१/१८

   महाराष्ट्र शिक्षण बचाव कृती समितीची सभा पुणे येथे  २८ जानेवारी  रोजी शिक्षण बचाव प्रश्ना संदर्भात संपन्न झाली. या वेळी महाराष्ट्रातील ९२ संघटनेचे प्रतिनिधि उपस्थित होते.
            पदवीधर मतदार संघाचे  आमदार विक्रम काळे(औरंगाबाद),  आम..डॉ.सुधीर तांबे (नाशिक),    आम.निरंजन डावखुरे (नवी मुंबई),  आम.बाळाराम पाटील (कोकण), आम.दत्तात्रय सावंत (पुणे),  आम.अपूर्व हिरवे (अमरावती) आदी मान्यवर उपस्थित होते.
     सदर परिषदेसाठी जुनी पेंशन संघटनेच्या वतीने जगदीश ओहोळ पुणे, अमोल शिंदे सांगलीे, राहुल कांबळे, विकास चौगुल कोल्हापूर , सचिन खरतोडे रायगड, याशिवाय सांगलीतून आरोग्य विभागाचे (dcps )धारक कर्मचारी उपस्थित होते..
याप्रसंगी सर्व आमदारांना पेंशन संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले,
सर्व आमदारांनी जुनी पेंशन साठी चा लढा आणखी तीव्र करणार असे पत्रकार परिषद घेऊन सांगितले.
सदर परिषदेस  शिक्षक संघाचे राज्यानेते संभाजीराव थोरात ,कोल्हापूर समन्वय समितीचे नेते  मोहन भोसले, राज्यनेते जनार्दन नेऊंगरे  उपस्थित होते. आमदारांना पेंन्शन विषयाचे गांभीर्य पटवून देण्यास मदत केली. ही परिषद भाऊसाहेब चासकर ,  मधुकर काढोळे, यांच्या प्रयत्नातून आयोजित करण्यात आली होती.
    भविष्यात शिक्षण हक्क कायद्याची अंमल बजावणी योग्य पद्धतीने व्हावी आणि शिक्षणाचे खाजगीकरण याविरोधात व्यापक लढा उभा करण्याचा निर्धार याठिकाणी सर्व संघटनाच्या उपस्थितीत  करण्यात आला.
पेंशन संघटनेच्या वतीने विकास चौगुले यांनी पेंशन संघटनेचा लढा , वाटचाल याविषयीची माहिती मांडली. अशी माहिती प्रसिध्दीस कोल्हापूर समन्वय समितीचे शिक्षक नेते मोहन भोसले यांनी दिली.
       फोटो
पुणे येथे महाराष्ट्र शिक्षण बचाव  कृती समिती सभा प्रसंगी चर्चा करतांना आम. दत्तात्रय सावंत, राज्य नेते संभाजीराव थोरात,मोहन भोसले, व अन्य मान्यवर.

हातकणंगले तालुका, कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनची सभा उत्साहात संपन्न

हेरले / प्रतिनिधी दि.२९/१/१८
हातकणंगले तालूका शाखा कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशनची सभा अत्यंत उत्साहात संपन्न झाली.
    या सभेस प्रमुख पाहुणे पोलीस उपअधिक्षक कृष्णात पिंगळे उपस्थित होते. त्यांच्या हस्ते २२ पत्रकारांचा सत्कार करण्यात आला. संस्थापक अध्यक्ष सुधाकर निर्मळे यांच्या हस्ते त्यांचा करण्यात आला.
   पेठवडगांव, कबनूर, हुपरी, हातकणंगले, शिरोली, हेरले परिसरातील ५२ पत्रकार उपस्थित होते. या सभेचे आयोजन सल्लागार मंडळ सदस्य शशिकांत राज, तालूका अध्यक्ष प्रा. रविंद्र पाटील, कोर कमिटी मेंबर विवेक स्वामी , संघटक युवराज पाटील यांनी केले होते. यावेळी संघाचे उपाध्यक्ष अभिजीत कुलकर्णी, सचिव सुरेश पाटील, कौन्सील मेंबर नंदकुमार कुलकर्णी, सुरेश कांबरे, कोर कमिटी मेंबर संजय दबडे, संतोष सणगर, बाळासाहेब कांबळे, तानाजी घोरपडे, प्रविण कुंभोजकर, कार्याध्यक्ष सचिनकुमार शिंदे, बाळासाहेब चोपडे, अनिल तोडकर, दिपक जाधव , आनंदा काशिद आदी पदाधिकारी सह मोठया संख्येंनी पत्रकार उपस्थित होते.

Friday, 26 January 2018

कोल्हापूर शिवाजी पुलावरून ट्रॅव्हलर नदीत पडली, 10 पेक्षा अधिक मृत्यू ची शक्यता

कोल्हापूरः प्रतिनिधी

पंचगगा नदीवरील शिवाजी पूलावरून टेम्पो ट्रॅव्हलरने पूलाचा कठड्याला धडकून नदीत खाली पडली . रात्री पावणे बाराच्या सुमारास ही घटना घडल्याचे सांगण्यात आले. या अपघातात जवळपास 10 पेक्षा जास्त मृत्यूमुखी झाल्याची माहिती आहे.

जखमी बालेवाडी पुणे येथील असून गणपतीपुळ्याहून देवदर्शन करून कोल्हापुरात येताना शिवाजी पुलाचा मजबूत लोखंडी कठडा तोडून ट्रॅव्हलर MH12 NS 8556 पंचगंगा नदीत पडली. ट्रॅव्हलरमध्ये केदारी नामक कुटुंबातील 16 व  चालक असे 17जण प्रवास करत होते.

कोल्हापूर बुधवार पेठेतील स्थानिक लोकांच्या मदतीने सुरूवातीला बचाव कार्य सुरू होते, २ तासानंतर व्हाईट आर्मीचे जवानांनी मदतकार्य सुरू केले . या अपघातातील ७ जणांना स्थानिक लोकांच्या मदतीने बाहेर काढण्यात आले असून काहीजण गाडीत अडकून पडले आहेत.
इतरांना जलसमाधी मिळाली अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.
चालकाने मद्यपान केले असावे असे बोलले जात आहे. गाडी काढण्यासाठी मोठी क्रेन मागविण्यात आली असून घटनास्थळी मदत कार्य सुरू आहे.


आरग येथील जितेंद्र देसाई हे राज्य उत्पादन शुल्क MPSC स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण

प्रतिनिधी कोल्हापूर

आरग (ता . मिरज जि. सांगली ) गावचे सुपुत्र जितेंद्र दत्तात्रय देसाई हे राज्य उत्पादन शुल्य  महाराष्ट्र राज्य स्पर्धा परीक्षेत  उत्तीर्ण झाले . जितेंद्र देसाई हे आर्मीत देशसेवा बजावून आले आहेत . स्वयंशिस्त , कठोर परीश्रम , स्वअभ्यास  वर हे यश संपादन केले आहेत .या यशाबदल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे ,  महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष श्री सतिश लोहार सर व आरग शिवसेना शाखा अध्यक्ष श्री विजय देसाई सर यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या व अभिनंदन केले ......

राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न...

*

कसबा बावडा,दि.२६:
                  प्राथमिक शिक्षण समिती महानगरपालिका कोल्हापूर संचलित कसबा बावडा परिसरातील उपक्रमशील शाळा राजर्षी शाहू विद्यामंदिरच्या वतीने 69 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न करण्यात आला. यावेळी मा.नगरसेवक तथा प्राथमिक शिक्षण व परिवहन समिती सदस्य अशोक जाधव सर यांच्या हस्ते ध्वजारोहण करणेत आले.यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा प्राजक्ता शिंदे,उपाध्यक्षा पल्लवी पाटील, केंद्रमुख्याध्यापक अजितकुमार पाटील,सदस्य रमेश सुतार ,शुभांगी चौगले,वैशाली कोरवी,सामाजिक कार्यकर्ते प्रा.दीपक घाग,राकेश शिंदे,राजू चौगले,जावेद पाखाली ,तुषार कुंभार,रेश्मा पवार,परशुराम जोगानी, शारदा पाटोळे,अमर माने ( दादू ),सुखदा वेलींणकर, भारतवीर मंडाळचे अध्यक्ष चेतन चौगले,उपाध्यक्ष स्वप्नील चौगले,शारदा पाटोळे,भारती घेवदे, आदी उपस्थित होते.
पाहुण्यांचे व पालकांचे स्वागत मालन दरवेशी,प्रास्ताविक अजितकुमार पाटील,आभार सादिया शेखने मानले.या निमित्त मयुरी कांबळे , निशिका शिंदे ,चिन्मय पोवार,समर्थ कांबळे,निखील सुतार,निशा कांबळे आदी विद्यार्थ्यांनी भाषणे सादर केली.प्रणव शिंदे याने स्वछ भारत स्वछ विद्यालय ही घोषणा दिली.संविधान प्रास्ताविक निशिका माळी हिने केले.
या कार्यक्रमाचे नियोजन सुशील जाधव,शिवशंभू गाटे,सुजाता आवटी,जे.बी.सपाटे,आसमा तांबोळी,प्राजक्ता कुलकर्णी,सेविका मंगल मोरे , बालवाडी शिक्षिका पाटील आदींनी केले.

Sunday, 21 January 2018

पत्रकार भुषण पुरस्काराने सुधाकर निर्मळे सन्मानित

हेरले / प्रतिनिधी दि. २१/१/१८

             श्रमशक्ती एकता सामाजिक सेवा संस्था इचलकरंजी यांच्या वतीने राजस्तरीय पत्रकार भुषण पुरस्काराने सुधाकर निर्मळे यांना  गौरविण्यात आले.
     कोल्हापूर जिल्ह्यात सुधाकर निर्मळे यांनी कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोसिएशन स्थापन करून पत्रकारांना संघटित करण्याचे कार्य केले आहे. सार्वजनिक ,सामाजिक , शैक्षणिक समस्या सोडविण्यासाठी सातत्याने लिखाण करून अनेक समस्यांचे निराकरण केले आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना आम. उल्हास पाटील, प.पु. पंडीत अतुलशास्त्री भगरे, अध्यक्ष अमित काकडे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह व सन्मान पत्र देऊन पत्रकार भुषण पुरस्काराने गौरविण्यात आले.

         फोटो - इचलकरंजी येथे सुधाकर निर्मळे यांना पत्रकार भुषण पुरस्कार प्रदान करतांना आम. उल्हास पाटील, प.पु. पंडीत अतुलशास्त्री भगरे, अध्यक्ष अमित काकडे

Monday, 15 January 2018

हभप गुरुवर्य श्री भाऊसाहेब पाटील महाराज यांना 'सहजानंद महाराज ' या पदवीने सन्मान

हेरले / प्रतिनिधी दि. १५/१/१८

मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील निरंजन महाराज आश्रमाचे सदगुरू श्री विनयानंद महाराज यांच्या अमृतहस्ते हभप गुरुवर्य श्री भाऊसाहेब पाटील  महाराज यांना 'सहजानंद महाराज ' या पदवीने सन्मानित करण्यात आले.
      याप्रसंगी सदगुरू विनया नंद महाराज म्हणाले की, प्रवचनी प्रगटे आनंदl किर्तने भेटे मुकुंदllगायनी लाभे स्वानंदI म्हणूनी नाम सदानंद I| वेदांत सहज भाषेत उकलून सहज आनंद प्रदान करण्याची कलाही भगवंतांची कृपा आहे. म्हणून त्यांना सहजानंद पदवी बहाल करण्यात येत आहे.
         सहजानंद महाराज यांना यादव महाराज, रंगनाथ महाराज, तळाशीकर महाराज, देऊकर महाराज यांचा सहवास व मार्गदर्शन लाभले. गेली ५० वर्षे श्री सहजानंद महाराज किर्तन प्रवचनाद्वारे अध्यात्म ज्ञान प्रसार सेवा मोठया निष्ठेने व ईश्वर सेवा म्हणून करीत आहेत. ते वारकरी महासंघाचे बेळगांवचे अध्यक्ष आहेत.या प्रसंगी आश्रमाचे आदिनाथ महाराज, आबासो देसाई, सुरेश चौगुले, संदिप थोरवत, दत्तात्रय भानसे, विश्वनाथ माळी, श्री बिसले महाराज, नारायण एकल महाराज, जगन्नाथ पाटील महाराज, जि.प. सदस्य राजेंद्र पाटील, साळवे निपाणी व जेष्ठ साधक उपस्थित होते.

   फोटो
श्री भाऊसाहेब पाटील महाराज यांना सहजानंद पदवी प्रदान करतांना सदगुरू श्री विनयानंद महाराज व इतर मान्यवर

Sunday, 14 January 2018

मौ. वडगांव जुनी गाव चावडीची मोजते आहे शेवटची घटिका !

हेरले / प्रतिनिधी    दि. १४/१/१८

    मौजे वडगांव ( ता.हातकणंगले ) येथील मध्यवस्तीतील जुनी गाव चावडीची  इमारत शेवटची घटिका मोजत असून ही इमारत कधीही कोसळण्याची शक्यता असल्याने मोठी दुर्घटना घडू शक्यते. हा अनर्थ घडू नये यासाठी जि.प. सदस्य व आमदार यांनी या जुन्या वास्तूसाठी विकास निधी उपलब्ध करावा अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.
       मौजे वडगांवमध्ये मध्यवस्तीत स्वातंत्र्यपूर्व काळातील गावचावडी ही जूनी इमारत आहे. या इमारती मध्ये १९५६ ते २००२पर्यंत गावचावडी म्हणून गावकारभार चालत होता. ग्रामपंचायत, गावचावडी ही दोन्ही एकत्र कार्यालय या इमारतीमध्ये होते. सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तलाठी , कोतवाल आदी प्रशासन घटक याच कार्यालयातून आपल्या गावचा कारभार पाहत होते. तब्बल ४६ वर्ष इमारतीमध्येे गावकारभार चालला.
       २oo२ साली शासनाकडून ग्रामपंचायत बांधकामासाठी निधी मिळाला. या निधीतून आरसीसी ग्रामपंचायत इमारत बांधली गेली. त्यामुळे जुन्या गावचावडी इमारतीतून सर्व प्रशासकिय दप्तर नव्या इमारतीमध्ये हलवण्यात आले. तदनंतर गेली १५ वर्षापासून जुन्या इमारतीचा वापर झाला नाही. त्यामुळे भिंतीचे बांधकाम सुटले आहे, कौले फुटली आहेत त्यामुळे पावसाळ्यात पाणी गळाल्याने भिंतीची पडझड होऊन लाकडी छत कुजले आहे. ही इमारत मुख्य रस्त्यालगत असून शेजारी वस्ती आहे. या भग्नाअवस्थेतील ही इमारत कधीही कोसळू शकते. त्यामुळे रस्त्यावरील येणारे जाणारे लोक, शेजारील घरांची वस्ती यांचे जिवीत व वित्त धोक्यात आले आहे.
   प्रशासनाने या इमारतीची दुरूस्ती करावी किंवा  बांधकाम उतरावे, तसेच या ठिकाणी विकास निधी लावून ग्रंथालय, अभ्यासिका यासाठी नूतन वास्तू उभारावी. चोरट्याकडून दोन वेळा येथील पेटाऱ्यातील तलवारी लंपास करण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र तो अयशस्वी झाला. त्यावेळी पोलीस पाटील अमिर हजारी यांनी या इमारतीमधील मोठ्या पेटारामध्ये असणाऱ्या पाच तलवारी, एक दानपट्टा व मोठी पितळी घंटीआदी ऐतिहासीक वस्तू ग्रामपंचायतमध्ये जमा करून त्याचे जतन करण्याचे कार्य केले आहे.

            प्रतिक्रिया
  शिवसेना शाखा प्रमुख सुरेश कांबरे

गावचावडी इमारतीमध्ये गेली ४६ वर्षे गावचा कारभार झाला आहे. स्वातंत्र्यपूर्व वास्तूची देखभाल दुरूस्ती  करणे प्रशासनाचे कार्य होते. मात्र ते काही झाले नाही. या वास्तूच्या पडझडीमुळे इमारत खिळखिळी बनली आहे,कधीही पडण्याची शक्यता असल्याने शेजारील ग्रामस्थांचे जिवीत धोक्यात आले आहे. तरी या इमारतीची दुरूस्ती अथवा इमारत उतरून घेऊन धोका टाळावा आणि नागरिकांचे जिवीत व वित्ताचे संरक्षण प्रशासनाने करावे. अन्यथा आंदोलन केले जाईल.

          प्रतिक्रिया
ग्रा.पं. सदस्य. अवधूत मुसळे

महसूल विभागाची ही इमारत दुरूस्ती व्हावी आणि त्याचे गतवैभव प्राप्त करून देणेसाठी चौदाव्या वित्त आयोगातून निधी उपलब्ध करून देणेसाठी प्रयत्न शील आहे. तसेच महसूल विभाग,जि.प. सदस्य, आमदार आदी लोकप्रतिनिधीकडून विकास निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करून ही इमारत सुसज्ज करणेसाठी क्रियाशील राहणार असे मत त्यांनी व्यक्त केले.

     फोटो - मौजे वडगावची जुनी गावचावडी इमारतीची दुर्दशा

उडान फाऊंडेशनकडून संक्रांतीच्या सणाला एक आगळावेगळा उपक्रम

हेरले / प्रतिनिधी दि. १४/१/१८

                    प्रत्येक सामाजिक उपक्रमातून वेगळी छाप पाडणाऱ्या उडान फाऊंडेशनकडून संक्रांतीच्या सणाला असाच एक वेगळा उपक्रम राबवण्यात आला.. तिळगुळ आणि एकमेकांना शुभेच्छा म्हणून भेटवस्तू न देता झोपडपट्टी मधील गरजू लोकांना कपडे, अन्नधान्य आणि इतर उपयोगी साहित्याचे वाटप करण्यात आले. फौंडेशनचे संस्थापक-अध्यक्ष भुषण शिवाजी लाड यांच्या कल्पनेला उपक्रम प्रमुख म्हणून मोनिका ताम्हणकर आणि माधुरी जाधव यांचे सहकार्य लाभले..
                    ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचे आपणही काहीतरी देने लागतो या भावनेतून उडान फौंडेशनची सुरुवात करण्यात आली. आतापर्यंत वेगवेगळे सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबवून "उडान फौंडेशन" ने अल्पावधीतच आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. या ग्रुप मध्ये कोल्हापूर मधील २५० पेक्षा जास्त मुली व महिला आणि २०० पेक्षा जास्त मुले आणि पुरुष सहभागी आहेत. या ग्रुपमध्ये सहभागी होण्याचे असेल तर ८६९८८७ ९८९०या नंबरशी संपर्क साधावा.
                    संक्रांतिनिमित्त ग्रुप मधील सदस्यांनी जुने-नविन कपडे, तांदूळ, गहू, तेल असे साहित्य जमा केले होते. हे साहित्य *नागाव ता. हातकणंगले* या ठिकाणी राहत असलेले ऊस तोडणी मजूर, झोपडपट्टी आणि कोल्हापूर मधील चंबूखडी रोड जवळ असणाऱ्या झोपडपट्टीमध्ये देण्यात आले. या उपक्रमसाठी अध्यक्ष भुषण लाड, उपाध्यक्षा नेहाली दिवाण, अँड. उल्का पाटील, डॉ. नाझीया मोडक, सारीका सूर्यवंशी, पूजा रुग्गे, माधुरी जाधव, नम्रता भालकर, तेजल दिवाण, प्राजक्ता चव्हाण हे सदस्य उपस्थित होते.

   फोटो
उडान फाऊंडेशनचे कार्यकर्ते कपडे वाटप करतांना

Wednesday, 10 January 2018

मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथे रस्ता डांबरीकरण प्रारंभ

हेरले / प्रतिनिधी : दि. १०/१/१८
   मौजे वडगांव ( ता. हातकणंगले ) येथील नवीन वसाहत गल्ली नं .५ व ४ येथे डांबरीकरण कामाचा शुभारंभ हातकणंगले विधानसभा मतदार संघाचे  आमदार डॉ. सुजित मिणचेकर यांचे हस्ते व संजय गांधी निराधार योजनेचे हातकणंगले तालुका अध्यक्ष व माजी जि.प. सदस्य महेश चव्हाण यांचे उपस्थितीत संपन्न झाला,
      सदरच्या रस्त्यासाठी ५ लाखाचा निधी अपुरा असुन यामध्ये २०० मिटर्स रस्ता होतो व अर्धी गल्ली अपूर्ण राहते म्हणून प्रकाश कांबरे यांनी आमदार साहेबांना विनंती करून दोन पूर्ण गल्या  होतील असा निधी दयावा अशी विनंती केली, यावेळी ग्रां.पं. च्या वतीने उर्वरीत ४ गल्याचं रस्ता व गटर्स करावे असे निवेदन सरपंच काशीनाथ कांबळे यांनी दिले, यावेळी महादेव जाधव, शाखा प्रमुख सुरेश कांबरे.उपसरपंच किरण चौगुले, अवधूत मुसळे, मानसिंग रजपूत,महादेव शिंदे, पोलीस पाटीलअमीर हजारी,  सुभाष अकिवाटे,अर्जुन भेंडेकर,  अनंत जाधव,सचिन लोहार, पवन जाधव, अक्षय लोहार, शुभम कदम, विजय पाटील, दिलीप कांबरे, प्रकाश झांबरे, यश चौगले, विशाल काकडे, नंदू कांबरे, सलीम हजारी, शब्बीर हजारी, अभिजीत थोरवत, प्रसन्न कांबरे, उपस्थित होते.
   याप्रसंगी आमदार सुजित मिणचेकर यांचा सत्कार पि.के. सामाजीक सेवा ग्रुपचे प्रकाश कांबरे यांनी, महेश चव्हाण यांचा सत्कार महादेव जाधव यांनी, दिपक यादव यांचा सत्कार बाबुराव लोहार यांनी तर महादेव शिंदे यांचा सत्कार दिलीप कांबरे यांनी केला.
प्रास्तवीक शांतीलाल कांबळे यांनी केले तर आभार हेमंत चव्हाण यांनी मानले.

फोटो  :
मौजे वडगाव येथील नविन वसाहत रस्ता उद्घाटन प्रसंगी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, महेश चव्हाण, प्रकाश कांबरे, मानसिंग रजपूत,कारीनाथ केंबळे,दिपक यादव, अमीर हजारी, महादेव जाधव,
महादेव शिंदे,